Android Auto vs Apple Carplay : वाचकांनो आजच्या युगात गाडी मधून प्रवास करताना स्मार्ट कार तंत्रज्ञान असणे खूप महत्त्वाचे बनले आहे ज्यामध्ये Android Auto आणि Apple Carplay या दोन प्रमुख प्रणाली येतात या दोन्ही प्रणाली फोनच्या स्क्रीनला कारचा ड्रेस बोर्ड वर जोडून चालकाचे लक्ष न विचलित करता नेवीगेशन कॉल आणि संगीतची योग्यपणे सोय करतात ज्यामुळे ड्रायव्हर सुरक्षितपणे गाडी चालवू शकतो.
आजच्या लेखामध्ये आपण या Android Auto आणि Apple Carplay या दोन्ही सिस्टीम कसे काम करतात व सेटअप करण्याची सोप्या पद्धती आणि त्यांचे फायदे व सुरक्षिततेचे नियम यांच्या बद्दल तुम्हाला अधिक माहिती देण्यासाठी आजचा लेख असणार आहे चला सुरू करूया..

Android Auto म्हणजे काय?
Android Auto ही Google ने विकसित केलेली एक आधुनिक प्रणाली आहे जी तुमच्या Android स्मार्टफोनला कारच्या इन्फोटेनमेंट सिस्टीमशी (डॅशबोर्ड स्क्रीन) सुरक्षितपणे कनेक्ट करते व वाहन चालवताना फोन वापरणे धोक्याचे ठरू नये आणि चालकाचे लक्ष विचलित होऊ नये या उद्देशाने हे तंत्रज्ञान तयार केलेले आहे. ह्यालाच आपण Android Auto म्हणतो.
Android Auto या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण Google Maps नॅव्हिगेशन याद्वारे कारच्या मोठ्या स्क्रीनवर थेट अचूक मॅप आणि लाईव्ह ट्रॅफिक अपडेट दिसतात त्यामुळे रस्ता शोधणे सोपे होते तसेच Google Assistant द्वारे Hey Google किंवा Ok google बोलून तुम्ही स्क्रीन ला हात न लावता फोन कॉल करू शकता , मेसेज पाठवू शकता किंवा गाणी बदलू शकता.
मेसेजिंग ॲप्स द्वारे व्हाट्सअप आणि टेलिग्राम वरील मेसेज वाचून दाखवले जातात तुम्ही आवाजाद्वारे वाईस टू टेक्स्ट टाईप न करता थेट उत्तरे पाठवू शकता व प्रवासादरम्यान मनोरंजन साठी Spotify, YouTube music आणि Wynk यांसारखी लोकप्रिय म्युझिक ॲप्स कारच्या स्क्रीन वरूनच सेटअप करू शकता

Apple Carplay म्हणजे काय?
Apple Carplay ही ॲपल कंपनीने विकसित केलेली एक प्रगत इन-कार प्रणाली आहे जी प्रवासादरम्यान तुमचा आयफोन(iPhone) डॅशबोर्ड स्क्रीन सुरक्षितपणे जोडते आणि वाहन चालवताना फोन वापरणे धोकादायक ठरू शकते म्हणूनच चालकाचे लक्ष विचलित न होऊन देता आयफोन मधील महत्त्वाची फीचर्स कारच्या स्क्रीनवर वापरता यावेत या उद्देशाने ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.
ह्या ॲपल कार प्ले चे मुख्य फीचर्स खालील प्रमाणे आहेत जसे की स्क्रीनवर थेट नेव्हिगेशन आणि दिशा दर्शवणारे Apple Maps असतात याद्वारे रियल टाईम ट्रॅफिक अपडेट्स आणि पोहोचण्याची अंदाजे वेळ समजते व Siri नामक व्हाॅईस असिस्टंट सिस्टीम आहे. स्क्रीनला हात न लावता फक्त आवाज द्वारे फोन कॉल करणे , मेसेज वाचणे आणि गाणी लावणे शक्य होते.
प्रवासाचा आनंद वाढण्यासाठी तुमची आवडते संगीत प्ले-लिस्ट आणि पाॅडकास्ट थेट कारच्या ऑडिओ सिस्टीम वर ऐकता येतात व सिरीच्या मदतीने आलेले मेसेज ऐकता येतात आणि टाईप न करता केवळ बोलून नवीन मेसेज पाठवता येतात

Android Auto आणि Apple Carplay मधील मुख्य फरक
Android Auto आणि Apple Carplay हे दोन्ही सिस्टीम तुमच्या कारच्या स्क्रीनला स्मार्टफोन मध्ये बदलतात आणि त्यांच्यामधील काही महत्वाचे फरक आम्ही खालील तक्त्यात नमूद केलेले आहेत ते पाहावे:
वरील वैशिष्ट्यांची कार्यपद्धती कशी आहे व त्यांच्या वापरण्यातील फरक कसा असतो हे आपण पाहूया जसं की युजर इंटरफेस Apple carplay चा आहे तर इंटरफेस अगदी आयफोन सारखा सोपा आणि स्वच्छ आहे यात ॲप्स आयकॉनच्या रूपात दिसतात दुसरीकडे Android auto मध्ये मटेरियल डिझाईनच्या वापर केला जातो यात डायनॅमिक कार्ड्स आणि स्प्लिट स्क्रीन मोड मिळतो ज्यामध्ये एकाच वेळी नेवीगेशन आणि म्युझिक कंट्रोल करणे सोपे जाते.
व्हाॅईस असिस्टंट हा Android Auto मधील Google Assistant हे गुगलच्या अथांग डेटाबेस मुळे कमालीचे अचूक असते ते भारतीय उच्चार सहज समजते पण Apple carplay मधील सिरीज देखील उत्तम काम करते परंतु गुगलच्या तूलनेत तीची माहिती शोधण्याची क्षमता थोडी मर्यादित असते.
नेव्हिगेशनमध्ये Android Auto मध्ये गुगल मॅप्स डिफॉल्ट असतो जो अचूक ट्रॅफिक अपडेट साठी ओळखला जातो व Carplay मध्ये Apple maps डिफॉल्ट आहे. आत्ता Apple maps भारतात पूर्वीपेक्षा खूप सुधारलेल्या असले तरीही अजूनही अनेक युजर्स कार प्ले वरील देखील वापरण्यास प्राधान्य देतात.
कस्टमायझेशन हे Android auto युजर्सना वॉलपेपर बदलणे , ॲप्सची मांडणी बदलणे आणि विजेट्स सेट करण्याचे जास्त स्वातंत्र्य देते. Apple carplay मध्ये सुरक्षिततेला प्राधान्य दिलेले असल्याने कस्टमायझेशन पर्याय खूप मर्यादित असतात.
हे पाहिल्यावर तुम्हाला मर्यादित शब्दात सांगायचं झाल्यास जर तुम्हाला सोपा आणि स्थिर परफॉर्मन्स हवा असेल तर Apple carplay चा उपयोग तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला जास्त कष्टमयझेशन हवा असेल तर Android Auto वापरू शकता.

Android Auto आणि Apple Carplay फीचर्सची तुलना
१) नेवीगेशन
गुगल मॅप्स यामध्ये रियल टाईम लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स अत्यंत अचूक असतात व इंटरनेट नसताना वापरण्यासाठी ऑफ-लाइन मॅपचा उत्तम पर्याय देखील आपल्याला मिळतो तसेच गुगल असिस्टंटच्या मदतीने हातात वापरण्याकरता व्हाईस कंट्रोलद्वारे मार्ग शोधणे सोपे जाते.
एप्पल कार प्ले मध्ये याचा नेव्हीगेशन इंटरफेस अतिशय सुंदर आणि त्रिमितीय आहे यामध्ये लाईव ट्रॅफिक आणि ऑफलाइन मॅपचे फिचर्स उपलब्ध आहेत व हे ॲप सिरीच्या साह्याने चालते त्यामुळे ॲपल वापर करताना सुलभ व्हाईस कंट्रोल उपलब्ध होतो.
२) संगीत
Android Auto हे ॲप नेवीगेशन स्क्रीन वरून Sportify , Gaana आणि Audible सारख्या लोकप्रिय संगीत आणि पाॅडकास्ट ॲप्सना सपोर्ट करते ज्यामुळे प्रवास करताना गाणी बदलणे खूप सोपे जाते.
Apple Carplay हे मुख्यत्वे एप्पल म्युझिक आणि Audible सोबत उत्तम प्रकारे जोडलेले आहे परंतु थर्ड पार्टी ॲप्स वापरताना Android Auto च्या तुलनेत थोडे कमी पर्याय मिळत असतात.
३) कॉलिंग आणि मेसेजिंग
Android Auto सोबत ड्रायव्हिंग करताना हॅन्ड फ्री कॉलिंग आणि व्हाईस रिप्लाय फीचर्स सुरक्षित वाढवतात आणि यामध्ये गुगल असिस्टंटद्वारे व्हाट्सअप मेसेज वाचणे आणि त्यांना व्हाॅईस कमाडने उत्तर देणे सहज शक्य होऊन जाते.
ॲपल कार प्ले मध्ये सिरीच्या मदतीने हॅन्ड फ्री कॉलिंग आणि मेसेज चे उत्तर देणे खूप सोपे आहे. तसेच आयफोनच्या इनबिल्ड मेसेजिंग आणि व्हाइस रिप्लाय फीचर्सशी पूर्णपणे सारखेच आहे ज्यामध्ये व्हाट्सअप चा समावेश होतो

Android Auto आणि Apple Carplay कोणते वापरण्यास अधिक सोपे?
Apple carplay हे Android auto पेक्षा वापरण्यास अधिक सोपे आणि सुटसुटीत मानले जाते या दोन्ही सिस्टीम प्रमुख वैशिष्ट्यांचे आधारे खालील तुलना केलेली आहे जसे की युजर इंटरफेस यामध्ये Apple Carplay चा इंटरफेस अगदी आयफोन सारखा साधा परिचित असतो याचे ॲप आयकॉन्स मोठे असल्याने ड्रायव्हिंग करताना ते सहज दिसतात त्याच्याविरुद्ध Android Auto चा इंटरफेस थोडा आधुनिक असला तरी काही वेळा तो नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी गुंतागुंतीचा वाटू शकतो.
टच रिस्पॉन्स मध्ये दोन्ही सिस्टीमचा टच रिस्पॉन्स तुमच्या कारच्या स्क्रीनवर अवलंबून असतो मात्र Carplay ॲनिमेशन आणि स्क्रोलिंग अधिक स्मूथ आणि लेग फ्री जाणवते.
व्हाईस कमांडस मध्ये Android Auto मधील गुगल असिस्टंट बाजी मारते कारण ते क्लिष्ट भारतीय उच्चार आणि हिंदी मराठी भाषा एप्पलच्या सीरी पेक्षा जास्त अचूकपणे आणि स्पष्टपणे समजून घेते.
यूजर अनुभवमध्ये एकूणच Carplay मध्ये सर्व ॲप्स एकाच ठिकाणी व्यवस्थित दिसतात तर Android Auto मध्ये कस्टमर जास्त असले तरी ते कधीकधी वापरणाऱ्या लोकांना गोंधळात टाकू शकतात.

Android Auto आणि Apple Carplay कोणत्या कारमध्ये उपलब्ध आहे?
भारतात Android Auto आणि Apple Carplay हे दोन्ही सिस्टीम सध्या बहुतांश सर्वच नवीन कारमध्ये उपलब्ध आहेत पण बजेट पासून ते प्रीमियम गाड्यांपर्यंत सर्व कंपन्या ही सुविधा देतात आम्ही तुम्हाला प्रमुख कार कंपन्या ज्यांच्यामध्ये दोन्ही फीचर्स असणार आहेत ते सांगणार आहोत:
Maruti Suzuki ची Swift , brezza , Baleno , grand Vitara यात वायरलेस कनेक्टिव्हिटी देखील मिळते.
Hyundai आणि Kia च्या i20 , Creta , Alcazar आणि Kia seltos , Sonet , Careñs यांच्या मोठ्या टचस्क्रीन मध्ये हे फिचर्स खूप स्मूथपणे चालते.
Tata Motors च्या Altroz , Nexon, Harrier, Safari आणि Punch टाटाच्या नवीन इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये डिझाईन खूप आकर्षक दिसते.
Mahindra च्या XUV3XO , XUV7X0 आणि Scorpio-N यांसारख्या SUV मध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते.
Toyota आणि Honda मध्ये Glanza , Urban Cruiser Hyryder आणि Honda City , Elevate ह्या गाड्या आहेत
MG Motor मध्ये Astor , Hector , आणि ZS EV यांसारख्या इंटरनेट कनेक्टेड गाड्या आहेत

Android Auto फायदे आणि तोटे
Android Auto फायदे
- तुम्हाला अचूक नेवीगेशन आणि रियल टाईम ट्रॅफिक अपडेट्स गुगल मॅप द्वारे मिळतात
- व्हाईस कमेंट्स अत्यंत अचूक आणि हुशार आहेत
- युजर्सना त्यांच्या आवडीनुसार इंटरफेस अधिक कष्टमायझेशन करण्याचे स्वातंत्र्य मिळते
- गुगल प्ले स्टोअर वरील अनेक ॲप्सचा सपोर्ट मिळतो
Android Auto तोटे
- तुमचा बजेटमधील किंवा जुना अँड्रॉइड फोन असेल तर स्क्रीन लॅग होण्याची शक्यता आहे
- वायरलेस कनेक्टिव्हिटी मुळे फोनची बॅटरी वेगाने संपते
Apple Carplay फायदे आणि तोटे
Apple Carplay फायदे
- ॲपलचा इंटरफेस अत्यंत वेगवान आणि स्मूथ परफॉर्मन्स असलेला आहे
- आयफोनची इकोसिस्टीम अतिशय सुरक्षित आणि खात्रीशीर आहे
- युजर इंटरफेस अत्यंत साधा , सुंदर आणि वापरण्यास सोपा आहे
Apple Carplay तोटे
- हा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी फक्त आयफोन असणे बंधनकारक असते
- Android च्या तुलनेत होम स्क्रीन बदलण्याची किंवा अनेक बाकीचे कष्टमायझेशन करण्याची मुभा यात मिळत नाही

Android Auto vs Apple Carplay कोणता निवडावा
जर तुमचा Android फोन असल्यास Android Auto निवडणे तुम्हाला बंधनकारक आहे व त्यात तुम्हाला गुगल असिस्टंट आणि गुगल मॅपचा उत्तम समन्वय साधता येतो तसेच Android auto चा गुगल मॅप अधिक अचूक आणि माहिती पूर्ण चालतो व Android Auto चा वापर करताना यात रियल टाईम ट्रॅफिक आणि पर्यायी मार्गाचे उत्तम पर्याय उपलब्ध असतात.
जर तुमचा iPhone असल्यास Apple Carplay तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे यात इंटरफेस अत्यंत गुळगुळीत आणि सुरक्षित आहे व Apple Carplay चा ऑडिओ इंटरफेस आणि सिरी संगीत नियंत्रणासाठी अधिक सोयीस्कर ठरते तसेच रोजच्या प्रवासासाठी हा खूप चांगला आहे ज्यात कलेंडर सिंक कामावर जाताना रोजचे शेड्युल आणि मार्ग झटपट दाखवते.
निष्कर्ष
वाचकांनो ह्या स्मार्ट ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाचा विचार केला तर Android auto आणि Apple carplay ह्या दोन्ही सिस्टीम आपापल्या जागी अत्यंत उत्कृष्ट आणि प्रगतशील आहेत तुमच्या प्रवास दरम्यान नेवीगेशन , कॉलिंग , म्युझिक आणि मेसेजिंग यांसारख्या सेवा सुरक्षितपणे पुरवण्यात दोन्ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे या दोन्हीमध्ये कोणती सिस्टीम सरस आहे किंवा कोणती कमी आहे ह्यांपेक्षा तुमची निवड पूर्णपणे तुमच्या स्मार्टफोनवर अवलंबून असते.
जर तुम्ही Android स्मार्टफोन वापरत असाल, तर गुगल असिस्ट आणि गुगल मॅपचा उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी साठी Android Auto हा तुमच्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय ठरतो या उलट जर तुम्ही iPhone वापरत असाल तर सिरी आणि एप्पल च्या सुरक्षित इकोसिस्टीमचा सुरळीतपणे अनुभव घेण्यासाठी Apple carplay तुम्ही निवडावा.
तसेच या माहिती बरोबर आम्ही इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? त्याचे योग्य मार्गदर्शन व ADAS म्हणजे काय? याच्यावरही लेख लिहिलेला आहे आणि तुमच्या गाडीचे कार मायलेज कसे वाढवावे? ह्या सारख्या विविध विषयांवर लेख लिहिलेले आहे तरी तुम्ही यांसारखे लेख वाचू शकता आणि हे लेख वाचून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल हीच अपेक्षा. धन्यवाद!!!




Leave a Reply