इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? योग्य वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शक

How often Should You change Engine Oil : दर्शकांनो इंजिन ऑइल हे कोणत्याही वाहनाचे रक्त मानले जाते तुमचे वाहन सुरळीत आणि कार्यक्षमतेने चालण्यासाठी हे खूप आवश्यक असते प्रामुख्याने इंजिन ऑइल इंजिनच्या अंतर्गत फिरणाऱ्या भागांमधील घर्षण कमी करण्याचे काम करत असते ऑइल वापरल्याने भागांची झीज रोखली जाते आणि इंजिनचा कार्यकाळ वाढत जातो ह्याव्यतिरिक्त ते इंजिनमधील उष्णता शोषून घेऊन इंजिनला थंड ठेवण्यास आणि अंतर्गत कचरा व कार्बन साफ ठेवण्यात ही इंजिन ऑइल मदत करत असते.

दर्शकांनों योग्य वेळी इंजिन ऑइल बदलणे खूप आवश्यक असते ठराविक कालावधीनंतर चिकटपणा कमी होतो त्यामुळे इंजिनमध्ये घर्शन कमालीचे वाढते व ऑइल न बदलल्यास इंजिन कमानीचे गरम होऊ शकते तसेच इंजिनचे भाग एकमेकांना जाम होऊन इंजिन पूर्णपणे निकामी होण्याचा धोका वाढतो परिणामी तुमच्या वाहनाचे मायलेज घटू शकते आणि हजार रुपयांचा नाहक खर्च तुमच्या उरावर येऊ शकतो.

या लेखांमध्ये आम्ही इंजिन ऑइल नक्की काय करते , ते कधी आणि कसे बदलावे आणि वेळेवर ऑइल न बदलल्यास इंजिनवर कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत.

How often Should You change Engine Oil
इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? योग्य वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शक

इंजिन ऑइल म्हणजे काय?

इंजिन ऑइल हे वाहनाच्या इंजिन मध्ये वापरले जाणारे एक आवश्यक वंगण आहे जे प्रामुख्याने बेस ऑइल आणि विविध रासायनिक घटकापासून बनवले जाते. इंजिनचे आरोग्य आणि कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे असते.

इंजिन सुरळीत चालण्यासाठी हे ऑइल खालील प्रमाणे काम करत असते जस की इंजिन मधील फिरणाऱ्या धातूच्या भागावर हे ऑइल एक पातळ थर तयार करते यामुळे भागामधील थेट संपर्क टाळतो आणि घर्षण व झीज कमी होते त्यानंतर कम्बशन प्रक्रियेमुळे इंजिनमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत असते ऑइल ही उष्णता शोषून घेते आणि फिरताना ती पसरवून इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवते.

त्यानंतर इंजिन चालताना निर्माण होणारे कार्बनचे कण , कचरा आणि धातूचे बारीक कण ऑइल स्वतः मध्ये सामावून घेते त्यामुळे इंजिन आतून स्वच्छ राहते.

How often Should You change Engine Oil
इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? योग्य वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शक

इंजिन आणि किती वेळाने बदलावे?

वाहनाचे इंजिन सुरळीत करण्यासाठी आणि त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी वेळेवर इंजिन ऑइल बदलणे अत्यंत महत्त्वाचे असते इंजिन ऑइल कधी बदलावे हे प्रामुख्याने तुम्ही वापरत असलेल्या ऑईलच्या प्रकारावर व वाहनाचा वापरावर आणि त्याच्या कालावधीवर अवलंबून असते.

ऑईलच्या प्रकारानुसार बदलण्याचे कालावधी

MINERAL Oil हे कच्चे खनिज तेल असते याची कार्यक्षमता मर्यादित असल्याने दर ३,००० ते ५,००० किलोमीटर किंवा तीन महिन्यांनी बदलावे

Semi-Synthetic Oil हे मिनरल आणि सिंथेटिक ऑइल चे मिश्रण असते हे मध्यम वापरासाठी उत्तम असून दर ५,००० ते ७,५०० किलोमीटर अंतराबाहेर बदलले योग्य ठरते

Fully Synthetic Oil हे उच्च दर्जाचे प्रयोगशाळेत तयार केलेले ऑइल असते हे इंजिनला सर्वोत्तम सुरक्षा देते हे दर ८,००० ते १५,००० किलोमीटर किंवा १ वर्षांनी बदलले पाहिजे.

वर दिलेल्या आकडे सामान्य मार्गदर्शक आहेत परंतु प्रत्येक वाहनाची रचना ही वेगळी असते त्यामुळे तुमच्या वाहनासोबत मिळालेल्या उत्पादकाच्या मॅन्युअलमधील मार्गदर्शन तत्त्वाचे पालन करणे हे तुमच्यासाठी उत्तम आणि सुरक्षित मार्ग राहील.

How often Should You change Engine Oil
इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? योग्य वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शक

कमी वापर असला तरी ऑइल का बदलावे?

अनेकदा ग्राहकांचा प्रश्न असतो की आमचा गाडीचा वापर कमी आहे तर आम्ही ऑइल बदलावी का तर याचे उत्तर आहे हो तुमचे वाहन महिन्याभरात कमी चालले तरी ही ६ महिने किंवा १ वर्षाच्या वेळेनुसार ऑइल बदलण्याचा सल्ला पाळला पाहिजे.

हे का करावे याची कारणे खाली प्रमाणे जसं की इंजिन मध्ये असलेले ऑइल हवेच्या संपर्कात आल्यामुळे कालांतराने आपोआप खराब होऊ लागते व तिथे ऑइलची गुणवत्ता खराब होते.

तसेच वाहन शांत उभे असताना इंजिनच्या आत हवेतील ओलसरपणा जमा होतो यामुळे ऑइलमध्ये पाणी मिसळून त्याची वंगण करण्याची क्षमता कमी होऊन जाते आणि खराब झालेल्या ऑइल इंजिनचे भाग घासण्यापासून रोखू शकत नाही.

ज्यामुळे इंजिन लवकर निकामी होऊ शकते याचा अर्थ किलोमीटर पूर्ण झाले नसले तरी ठराविक वेळ नंतर ऑइल बदलणे वाहनाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते

How often Should You change Engine Oil
इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? योग्य वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शक

ऑइल बदलण्याची गरज कधी ओळखावी?

इंजिनची आयुष्य वाढवण्यासाठी आणि तुमची गाडी  चालण्यासाठी वेळेच्या वेळी ऑइल बदलणे खूप गरजेचे असते खालील लक्षणावरून तुम्ही ऑइल बदलण्याची गरज ओळखू शकता जसे की ऑइल खराब झाल्यावर इंजिनच्या भागामधील घर्षण वाढते यामुळे इंजिन मधून नेहमीपेक्षा जास्त मोठा किंवा खडखडात आवाज येऊ लागतो.

नवीन ऑइल हलक्या मधासारख्या रंगाची असते इंजिन मधील कचरा आणि कार्बन शोषून घेतल्यामुळे कालांतराने काळे आणि घट्ट बनते डीपस्टिकने ऑइल तपासताना हे काळे दिसल्यास बदलायची गरज असते.

गाडीचा डॅशबोर्डवर ऑइल चेतावणी देणारा दिवा (Oil Warning Light) लागल्यास इंजिनमध्ये ऑइल कमी आहे किंवा ऑइल प्रेशर कमी झाले आहे समजून घ्यावे व ऑइल जुने आणि घट झाल्यामुळे इंजिनच्या भागांना फिरण्यासाठी जास्त ताकद लावावे लागते यामुळे इंधन जास्त जळते आणि गाडीचे मायलेज कमी होते.

ऑइल इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते ऑइल ची गुणवत्ता खराब झाल्यास इंजिन मधील घर्षण वाढून इंजन वारंवार ओव्हरहीट होते. आणि गाडी चालवताना केबिनमध्ये किंवा बाहेर जळलेला ऑइलचा वास आल्यास व, ऑइल
लिक होऊन ते गरम इंजिन वर पडत असल्याचे किंवा ऑईल पूर्णपणे खराब झाली शक्यता असते.

How often Should You change Engine Oil
इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? योग्य वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शक

इंजिन ऑइल उशिरा बदलल्याचे तोटे

इंजिन ऑइल वेळेवर न बदलल्याने हे वाहनासाठी खूप धोकादायक असू शकते इंजिन ऑइल उशिरा बदलल्याने खालील धोके निर्माण होऊ शकतात जसे की नवीन ऑइल इंजिनच्या अंतर्गत भागांमध्ये गुळगुळीतपणा टिकवून ठेवत असते, ऑइल जुने आणि खराब झाल्यामुळे त्याची चिकटपणा कमी होतो परिणामी इंजिनच्या फिरणाऱ्या पार्ट्स मध्ये प्रचंड घर्षण निर्माण होते आणि पिस्टन , बेरिंग्ज यांसारखे महत्त्वाचे भाग वेगाने झिजतात.

खराब ऑइलमुळे इंजिनमधील अंतर्गत घर्षण आणि ताण वाढतो हा ताण कमी करण्यासाठी इंजिनला जास्त ताकद लावावी लागते ज्यामुळे वाहनाचा इंजिनचा वापर कमालीचा वाढतो आणि मायलेज कमी होते व ऑइल केवळ वंगण म्हणून काम करत नाही तर ते इंजिन मधील उष्णता शोषण भाग थंड ठेवण्यासही मदत करते जुन्या ऑइल उष्णता शोषण्याची क्षमता गमावून बसते ज्यामुळे इंजिन वारंवार ओव्हरहीट होते.

ऑइल खूप जास्त दिवस न बदलल्यास त्याचे रूपांतर काळया घट्ट गाळामध्ये होते हा गाळ ऑइलचे मार्ग बंद करतो इंजिनला ऑइल न
मिळाल्यामुळे त्याचे भाग एकमेकांना लाॅक होतात ज्याला इंजिन सीज होणे म्हणतात. व इंजिन सीझ झाल्यास किंवा त्याचे पार्ट खराब झाल्यास इंजिन पूर्णपणे उघडून दुरुस्त करावे लागते या मोठ्या दुरुस्तीचा खर्च प्रचंड असतो जो वेळेवर ऑइल बदलल्याच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो.

How often Should You change Engine Oil
इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? योग्य वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शक

योग्य इंजिन ऑइल कसे निवडावे?

ग्राहकांनो तुमच्या वाहनाचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि इंजिनचे रक्षण करण्यासाठी योग्य इंजिन ऑइल निवडणे खूप महत्त्वाचे असते आणि ऑल निवडताना खालील गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा जसं की इंजिन ऑइल वर ‘’5W-30’ किंवा ‘’10W-40’ असे ग्रेड असतात. ‘W’ म्हणजे Winter. त्याआधीच अंक थंड हवामानात ऑइल किती पातळ राहील हे दर्शवतो दुसरा अंक उष्ण तापमानातील ऑइलचा घट्टपणा दर्शवतो अति थंड हवामानासाठी 5W-30 आणि उष्ण हवामानासाठी 10W-40 किंवा 20W-50 सारखे ऑइल योग्य ठरते.

API आणि ACEA मानके ही ऑइलची गुणवत्ता तपासण्यासाठी ही जागतिक मानके आहेत अमेरिकन मानकानुसार (API) पेट्रोल इंजिनसाठी ‘S’ (उदा.SP) आणि डिझेल इंजिनसाठी ‘’C’ (उदा. (CK-4) सिरीज असते युरोपियन मानकांनुसार (ACEA) पेट्रोल आणि डिझेल साठी A/B सिरीज आणि आधुनिक वाहनासाठी C सिरीज वापरली जाते.

पेट्रोल आणि डिझेल इंजिनची कार्यपद्धती वेगळी असते डिझेल इंजिनमध्ये जास्त काजळी तयार होते. त्यामुळे डिझेल ऑइलमध्ये विशेष क्लिनिंग एजंट्स असतात. पेट्रोल गाड्यांमध्ये डिझेलचे आणि डिझेल गाड्यांमध्ये पेट्रोलचे ऑइल वापरणे 100% टाळावे.
व सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमच्या वाहनासोबत मिळणारे युजर मॅन्युअल वाचा आणि वाहन उत्पादकाने सुचवलेले ग्रेड आणि मानकेच नियमित वापरावीत त्यामुळे इंजनचे कार्यक्षमता उत्तम राहते आणि वॉरंटी ही सुरक्षित राहते.

ENGINE OIL बदलताना OIL FILTER का बदलावा?

इंजिन ऑइल बदलताना प्रत्येक वेळी ऑइल फिल्टर बदलणे गाडीचे आरोग्यासाठी खूप चांगले असते जसं की ऑइल फिल्टर इंजिन ऑइल स्वच्छ ठेवण्याचे काम करते इंजिन चालताना त्यामध्ये जमा होणारी धूळ धातूचे बारीक कण आणि कार्बन फिल्टर स्वतःमध्ये शोषून घेतो आणि शुद्ध ऑइल इंजिनला पुरवत असतो.

जर नवीन ऑइल टाकूनही जुनी फिल्टर वापरल्यास त्यातील साठलेले घाण नवीन ऑइल मध्ये मिसळते ज्यामुळे नवीन ऑइल लगेच दूषित होते. चोक-अप झालेला जुना फिल्टर ऑईलचा प्रवाह रोखतो ज्यामुळे इंजिनचे भाग एकमेकावर घासून इंजिन खराब होऊ शकते.

फिल्टर बदलण्याचे फायदे

  • स्वच्छ ऑइल मुळे इंजिनचे अंतर्गत भाग सुरक्षित राहतात व इंजिनच्या आयुष्य वाढते.
  • इंजिनला अखंडित ऑइल मिळाल्याने गाडी सुरळीतपणे चालते व उत्कृष्ट परफॉर्मन्स देते.
  • भविष्यातील इंजिन दुरुस्तीचा मोठा खर्च करतो आणि मोठे पैशाची बचत होते.
How often Should You change Engine Oil
इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे? योग्य वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शक

इंजिन ऑइल बदलण्याबाबत सामान्य गैरसमज

काळे होईल म्हणजे खराब होईल जसं की ऑइल काळे पडणे म्हणजे ते खराब झाले असे नाही इंजिन मधील कचरा आणि कार्बन साफ करण्याचे काम ऑइल करते त्यामुळे ते काळे पडते म्हणजे ते आपले काम नीट करत आहे.

सिंथेटिक ऑइल कधीच बदलावे लागत नाही जसं की सिंथेटिक ऑइल जास्त काय टिकते हे खरे आहे परंतु ते कधीच बदलावे लागत नाही हा समज चुकीचा आहे एका ठराविक किलोमीटर नंतर किंवा वेळेनंतर तेही बदलावेच लागते.

कमी चालवलेल्या गाडीला गरज नसते जसं की गाडी पडून राहिली तरी ऑइल हवेतील दमटपणामुळे आणि ऑक्सीडेंशमुळे खराब होते त्यामुळे गाडी कमी चालली तरी वर्षातून एकदा ऑइल बदलणे गरजेचे आहे.

कोणते ऑइल वापरले तरी चालते जसं की प्रत्येक इंजिनची रचना वेगळी असते कंपनीने सुचवलेल्या ग्रेडचेच ऑइल वापरावे. चुकीचे ऑइल वापरल्यास इंजिनचे आयुष्य कमी होऊ शकते.

इंजिन ऑइल बदलण्यासाठी उपयुक्त टिप्स

दर महिन्याला डीपस्टिकच्या मदतीने ऑइलची पातळी आणि त्याचा रंग तपासावे.

तुमच्या वाहनाच्या मॅन्युअल मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच योग्य ग्रेडचे ऑइल निवडा.

ऑइल जास्त दिवस राहिल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे ठराविक किलोमीटर पूर्ण झाल्यावर किंवा निश्चित वेळेत ऑइल बदला.

इंजिनच्या सुरक्षेसाठी नेहमी नामांकित आणि चांगल्या दर्जाच्या ब्रँडचेच ऑइल वापरावे.

ऑइल कधी बदलले आणि पुढील सर्विस कधी करायची याची तारीख आणि किलोमीटरची नोंद तुमच्या डायरीत किंवा मोबाईल ॲप मध्ये सेव करून ठेवा.

निष्कर्ष

दर्शकांनों आजचा लेखमध्ये आपण इंजिन ऑइल आपल्या गाडीवर काय प्रभाव करते ते कशाप्रकारे चालते? आणि त्याचे किती प्रकार? तसेच ते का वापरावे? आणि त्याचे फायदे काय? या सर्वांगीण प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला समाधानकारक देण्याचे काम या लेखमध्ये करण्यात आलेले आहे हा लेख तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला परत ऑइल बद्दल कोणते प्रश्न उद्भवणार नाहीत याची खात्री आहे तसेच आम्ही गाडीचे मायलेज कसे वाढवायचे तसेच गाडी हायवेवर कशी चालवायची या विषयावर ही विस्तारपणे लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद!!!