Hyundai Creta Review: नवीन क्रेटा खरेदी करावी की नाही? जाणून घ्या सविस्तर रिव्ह्यू

Hyundai Creta review  : दर्शकांना तुम्ही जर एक तुमच्या कुटुंबासाठी फॅमिली कार आणि तुमच्या ड्रायव्हिंगच्या आवड पूर्ण करण्यासाठी एक खतरनाक परफॉर्मन्स असलेली कार च्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आज ऑटो गुरु घेऊन आलाय मिडसाईज SUV सेगमेंटचा किंग होंडाई क्रेटा.

हुंडाई क्रेटा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विकली जाणारी मिड-साइज SUV आहे. आपल्या आधुनिक डिझाईन प्रीमियम केबिन आणि अद्यावत फीचर्स मुळे या कारने भारतीय बाजारात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे आणि आपल्या नावाचा वेगळाच दबदबा भारतीय बाजारात निर्माण केलेला आहे.

तसेच या माहितीसोबतच Hyundai creta N Line स्पोर्ट  व्हेरियंटबद्दल आपण सामान्य क्रेटा पेक्षा का वेगळी आहे तसेच त्यांचे स्पेसिफिकेशन , किंमत , फायदे , तोटे यांसारख्या गोष्टी पण प्रामुख्याने या सर्व गोष्टी या लेखमध्ये पाहणार आहोत.

हुंडाई क्रेटाचा सविस्तर मराठी रिव्ह्यू खालील प्रमाणे

Hyundai Creta Review
Hyundai Creta Review: नवीन क्रेटा खरेदी करावी की नाही? जाणून घ्या सविस्तर रिव्ह्यू

एक्स्टरियर डिझाईन

हुंडाई क्रेटा आपल्या बोल्ड समोरच्या लुक साठी खूप लोकप्रिय आहे जसे की हुंडाईची नवीन पॅरामेट्रिक ब्लॅक क्रोम ग्रील आणि क्वाड्रेपल हेडलाईन्स गाडीला समोरून खूप मस्त लुक देतात.
तसेच कारच्या समोरील आणि मागील भागात connected LED DRLs आणि Tail Lamps मिळतात. जे रात्रीच्या वेळी कारला खूप आकर्षक लुक देण्याचे काम करतात
बाजूंना १७ ते १८ इंची डायमंड कट ऑलाय व्हील्स , रूप रेल्स , शार्प फिन अँटिना आणि मागील बाजूस स्पाॅयलरमुळे कार दिसण्यास खूप स्पोर्टी वाटते.

इंटरियर डिझाईन

या होंडाई क्रिटाचे इंटरियर डिझाईनमध्ये केबिन ड्युअल टोन फिनिशिंग आणि सेमि-लेदरेट सीट्स मिळतात जे की प्रेमियममध्ये पाहायला मिळतात तसेच डॅशबोर्ड अतिशय आधुनिक आणि सुटसुटीत आहे.
या वाहनामध्ये 10.25 इंचाची टच स्क्रीन आणि तितकीच मोठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्क्रीन एकत्र जोडलेले दिसते
पुढच्या आणि मागच्या दोन्ही रांगेत प्रवाशांसाठी उत्तम लेकरूम आणि हेडरूम उपलब्ध आहे आणि पुढच्या केबिनमध्ये ६ फूट उंच व्यक्तीला सुद्धा चांगल्या प्रकारे बसता येते.
तसे पाहायला गेल्यावर इंटेरियर डिझाईन साधारण व्यक्तीला आवडेल अशीच आहे आणि तुम्हाला ज्या सारख्या एसी असो किंवा कोणत्याही सेटिंग्स सारखे वापरायचे आहेत त्या तुम्हाला सहजपणे वापरता येतात आणि गाडीची टच स्क्रीन ही खूप स्पीडी आणि लगेच प्रतिसाद देणारी आहे.

Hyundai Creta Review
Hyundai Creta Review: नवीन क्रेटा खरेदी करावी की नाही? जाणून घ्या सविस्तर रिव्ह्यू

सामान्य क्रेटा आणि N Line मधील फरक

  • N Line वेरियंट मध्ये नवीन फ्रंट ग्रील , लाल रंगाचे इन्सर्टस , स्पोर्टी बंपर , ड्युअल टिप एक्झॉस्ट आणि १८ इंचाचे मोठे अलाॅय व्हील्स मिळतात. ज्यात लाल रंगाचे ब्रेक कॅलिपर आहेत.
  • इंटिरियर पूर्णपणे ऑल ब्लॅक थीम मध्ये असून , स्टीअरिंग , सीट्स आणि गिअर नॉबवर लाल रंगाचे स्टिचिंग आणि N लोगो पाहायला मिळतो.
  • हायवेवर हाय स्पीड ड्रायव्हिंग करताना उत्तम पकड मिळवण्यासाठी याचे सस्पेन्शन थोडे कडक आणि स्टेरिंग जड केले आहे ज्यामुळे सामान्य कार पेक्षा ही कार चालवताना थरारक अनुभव मिळतो

 

इंजिन

या हुंडाई क्रेटा वाहनामध्ये कंपनीकडून तीन शक्तिशाली इंजिन पर्याय उपलब्ध केलेले आहेत

जसं की पहिला १.५ लिटर MPi पेट्रोल इंजिन जे की ११५ ps पावर आणि १४४ nm चा टॉर्क निर्माण करते हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सोबत उपलब्ध असेल.

१.५ लिटर MPi पेट्रोल इंजिन

वैशिष्ट्यतपशील
इंजिन प्रकार४-सिलेंडर, नॅचरली एस्पिरेटेड
इंजिन क्षमता (Displacement)१४९७ cc
कमाल पॉवर (Max Power)११५ PS @ ६३०० rpm
कमाल टॉर्क (Max Torque)१४४ Nm @ ४५०० rpm
मॅन्युअल गिअरबॉक्स६-स्पीड मॅन्युअल (MT)
ऑटोमॅटिक गिअरबॉक्सIVT (CVT) ऑटोमॅटिक
अंदाजे मायलेज (Mileage)~ १७.४ किमी/लिटर

 

दुसरा पर्याय १.५ U2 Cardi डिझेल इंजिन जे की ११६ ps पावर आणि २५० nm चा टॉर्क निर्माण करते हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सोबत उपलब्ध असेल.

१.५ U2 Cardi डिझेल इंजिन

वैशिष्ट्यतपशील
इंजिन प्रकार४-सिलेंडर, टर्बो डिझेल
इंजिन क्षमता (Displacement)१४९३ cc
कमाल पॉवर (Max Power)११६ PS @ ४०००० rpm
कमाल टॉर्क (Max Torque)२५० Nm @ १५००-२७५० rpm
मॅन्युअल गिअरबॉक्स६-स्पीड मॅन्युअल (MT)
ऑटोमॅटिक गिअरबॉक्स६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर (AT)
अंदाजे मायलेज (Mileage)~ २१.८ किमी/लिटर

 

 

तिसरा पर्याय १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. जे की १६० ps पावर आणि २५३ nm चा टॉर्क निर्माण करते हे इंजन फक्त ७ स्पीड DCT ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सोबत आपल्याला मिळेल.

१.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन

वैशिष्ट्यतपशील
इंजिन प्रकार४-सिलेंडर, गॅसोलीन डायरेक्ट इंजेक्शन
इंजिन क्षमता (Displacement)१४८२ cc
कमाल पॉवर (Max Power)१६० PS @ ५५०० rpm
कमाल टॉर्क (Max Torque)२५३ Nm @ १५००-३५०० rpm
मॅन्युअल गिअरबॉक्सउपलब्ध नाही
ऑटोमॅटिक गिअरबॉक्स७-स्पीड DCT (ड्युअल क्लच)
अंदाजे मायलेज (Mileage)~ १८.४ किमी/लिटर

 

Hyundai creta N Line स्पोर्ट  व्हेरियंट

वैशिष्ट्यतपशील
इंजिन प्रकार१.५L टर्बो-पेट्रोल (Turbo GDi)
कमाल पॉवर (Max Power)१५८ bhp (१६० PS) @ ५५०० rpm
कमाल टॉर्क (Max Torque)२५३ Nm @ १५००-३३०० rpm
गिअरबॉक्स पर्याय६-स्पीड मॅन्युअल (MT) / ७-स्पीड DCT
अंदाजे मायलेज (ARAI)१८ ते १८.२ किमी/लिटर
लांबी x रुंदी x उंची४३३० मिमी x १७९० मिमी x १६३५ मिमी
बूट स्पेस (Boot Space)४३३ लिटर

 

Hyundai Creta Review
Hyundai Creta Review: नवीन क्रेटा खरेदी करावी की नाही? जाणून घ्या सविस्तर रिव्ह्यू

फीचर्स

हुंडाईचा काही कार आधुनिक आणि सेगमेंट फर्स्ट फीचर्समुळेच ओळखली जाते या कारमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे फीचर्स पाहायला मिळतात जसे की व्हॉईस कमांड वर चालणारे पॅनोरॅमिक सनरूप , उन्हाळ्यात सीटला थंडावा देण्यासाठी फ्रंट वेंटलिटेट  सीड्स तसेच ८-वे पाॅवड॔ ड्रायव्हर सीट , ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मागील प्रवाशासाठी सनशेड्स फीचर्स मिळतात.

परिस्थितीनुसार गाडी चालण्यासाठी तीन प्रकारचे ड्रायव्हिंग मोड्स दिले आहेत इको , कम्फर्ट आणि स्पोर्ट तसेच तीन प्रकारचे ट्रॅक्शन मोड दिलेले जसे की snow ,Sand आणि Mud दिलेले आहेत.

सुरक्षेचे फीचर्स

आतील प्रवासासाठी सुरक्षित रहावे यासाठी क्रेटामध्ये 19 पेक्षा जास्त लेवल 2 ADAS फीचर्स मिळतात जसं की अडॅप्टीव क्रुझ कंट्रोल , लेन कीप असिस्ट , फॉरवर्ड कोलिजन वाॅर्निंग आणि ऍडव्हान्स , ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक , सर्व व्हेरियटमध्ये स्टॅंडर्ड ६ एअर बॅग , 360 डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड स्पोर्ट मॉनिटर , इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि वेहिकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट सिस्टीम यांसारखे सेफ्टी फीचर्स या हुंडाई क्रेटा मध्ये आतील प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेले आहेत.

व्हेरियंट

हुंडाई क्रेटा वाहनामध्ये प्रामुख्याने ७ मुख्य ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे

  • E बेस मॉडेल
  • EX आणि EX(O)
  • S आणि S(O)
  • SX आणि SX Tech
  • SX(O) आणि King /Knight Edition टॉप-स्पेक मॉडेल
Hyundai Creta Review
Hyundai Creta Review: नवीन क्रेटा खरेदी करावी की नाही? जाणून घ्या सविस्तर रिव्ह्यू

स्पेसिफिकेशन्स

हुंडाई क्रेटा चे स्पेसिफिकेशन खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.

आकारमान (Parameter)मोजमाप (Measurement)
गाडीची एकूण लांबी (Length)४,३३० मिमी (mm)
गाडीची एकूण रुंदी (Width)१,७९० मिमी (mm)
गाडीची एकूण उंची (Height)१,६३५ मिमी (mm)
व्हीलबेस (Wheelbase)२,६१० मिमी (mm)
ग्राउंड क्लिअरन्स (Ground)१९० मिमी (mm)

 

कलर्स

हुंडाई क्रेटा ६ मोनोटोन आणि १ ड्युअल टोन रंगात उपलब्ध आहे

ॲटलास व्हाईट , एबीएस ब्लॅक , टायटन ग्रे , फिअरी रेड , रेंजर खाकी आणि रॉबर्ट एमराल्ड पर्ल

टायटन ग्रे मेट आणि नाईट ऑडिशन मध्ये ऑल ब्लॅक चा पर्याय देखील उपलब्ध आहे

 

हुंडाई क्रेटा चे फायदे

  • या गाडीमध्ये पॅनोरॅमिक सनरूप , 10.25 इंचाची टचस्क्रीन , डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बॉस कंपनीची ८-वे स्पीकर मिळते.
  • केबिनमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची जागा उपलब्ध आहे तसेच फ्रंट व्हेंटिलेटड सीट्स आणि ८-वे पावर ड्रायव्हर सीट दिल्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट दर्जाची तंत्रज्ञान वापरायला मिळते
  • नवीन मॉडेल्समध्ये ६ एअरबॅग, एलेक्ट्रोनिक्स स्टॅबिलिटी कंट्रोल , हिल असिस्ट आणि प्रगत लेवल 2 ADAS चे 19 पेक्षा जास्त फीचर्स या वाहनात तुम्हाला मिळून जातात
  • या वाहनांमध्ये ब्ल्यू लिंक कनेक्टिव्हिटी मुळे तुम्ही इंजिन दुरूनच सुरू करू शकता.

 

हुंडाई क्रेटा‌ N-Line व्हेरियंट फायदे

१६० ps पावर मुळे सेगमेंट मध्ये सर्वात वेगवान कार या गाडीमध्ये टर्बो इंजिन सोबत मॅन्युअल गिअर बॉक्स चा पर्याय मिळतो जो नेहमीच्या क्रेटात मिळत नाही

हुंडाई क्रेटा चे तोटे

  • मारुती ब्रेजा किंवा टाटाच्या काही गाड्यांच्या तुलनेत क्रेटाचा क्रॅश टेस्ट रिपोर्ट (Global Ncap)अजूनही तितका चांगल्या मजबुतीचा नाहीये
  • नवीन फीचर्स आणि वेरेंट्स मुळे या कारची किंमत जुन्या मॉडेलच्या तुलनेत थोडी वाढलेली आहे.
  • लेव्हल 2 ADAS आणि टर्बो इंजिन असलेले टॉप मॉडेलची किंमत इतर मॉडेल पेक्षा खूप जास्त आहे.

 

हुंडाई क्रेटा N-Line व्हेरियंट तोटे

सस्पेन्शन कडक असल्यामुळे खराब रस्त्यावर गाडीत थोडे जास्त झटके जाणवतात नेहमीच्या करता पेक्षा किंमत साधारण १ ते १.५ लाख रुपयांनी जास्त आहे

Hyundai Creta Review
Hyundai Creta Review: नवीन क्रेटा खरेदी करावी की नाही? जाणून घ्या सविस्तर रिव्ह्यू

किंमत

हुंडाई क्रेटा गाडीची एक्स शोरूम किंमत साधारण ₹१०.९१ लाख ते ₹२०.११ लाख व्हेरियंटनुसार किंमत राहते.

खालील तक्ते तुम्हाला प्रामुख्याने पेट्रोल , डिझेल आणि टर्बो पेट्रोल असे तीन इंजिन पर्यायांमध्ये पाहायला मिळतील

हुंडाई क्रिटाची एक्स शोरूम आणि महाराष्ट्र मधील अंदाजे ऑन रोड किंमत मुख्य व्हेरियंटनुसार खालील प्रमाणे दिलेले आहे

पेट्रोल व्हेरियंट्स

व्हेरियंट (Variant)एक्स-शोरूम किंमतऑन-रोड किंमत (महाराष्ट्र अंदाजे)
E (Base Manual)~ ₹१०.९१ लाख~ ₹१२.९० लाख
EX (Manual)~ ₹१२.०७ लाख~ ₹१४.२५ लाख
EX(O) (Manual)~ ₹१३.१४ लाख~ ₹१५.५० लाख
S(O) (Manual)~ ₹१४.२१ लाख~ ₹१६.८० लाख
S(O) Knight Edition (Manual)~ ₹१४.४० लाख~ ₹१७.०० लाख
EX(O) CVT (Automatic)~ ₹१४.५० लाख~ ₹१७.१० लाख
SX (Manual – Most Popular)~ ₹१५.०४ लाख~ ₹१७.८० लाख
King / SX(O) CVT (Automatic)~ ₹१८.७० लाख~ ₹२१.९० लाख

 

डिझेल व्हेरियंट्स

व्हेरियंट (Variant)एक्स-शोरूम किंमतऑन-रोड किंमत (महाराष्ट्र अंदाजे)
E Diesel (Base Manual)~ ₹१२.५३ लाख~ ₹१५.१० लाख
EX Diesel (Manual)~ ₹१३.६५ लाख~ ₹१६.४० लाख
EX(O) Diesel (Manual)~ ₹१४.७५ लाख~ ₹१७.७० लाख
EX(O) Diesel AT (Automatic)~ ₹१६.१० लाख~ ₹१९.२० लाख
S(O) Diesel (Manual)~ ₹१५.८५ लाख~ ₹१८.९० लाख
King Diesel AT (Automatic)~ ₹१९.७८ लाख~ ₹२३.८० लाख

 

टर्बो पेट्रोल व्हेरियंट्स

व्हेरियंट (Variant)एक्स-शोरूम किंमतऑन-रोड किंमत (महाराष्ट्र अंदाजे)
King Turbo DCT (Automatic)~ ₹१९.९१ लाख~ ₹२३.९५ लाख
Knight Edition Turbo DCT~ ₹२०.११ लाख~ ₹२४.२० लाख

N-Line व्हेरियंट मॅन्युअल व्हेरियंट्स

व्हेरियंट (Variant)एक्स-शोरूम किंमतऑन-रोड किंमत (महाराष्ट्र अंदाजे)
N8 MT (Base Manual)~ ₹१६.८२ लाख~ ₹१९.६० लाख
N10 MT (Top Manual)~ ₹१९.०३ लाख~ ₹२१.९५ लाख

N-Line ऑटोमॅटिक व्हेरियंट्स

व्हेरियंट (Variant)एक्स-शोरूम किंमतऑन-रोड किंमत (महाराष्ट्र अंदाजे)
N8 DCT (Base Auto)~ ₹१७.८३ लाख~ ₹२०.४० लाख
N10 DCT (Top Auto)~ ₹१९.९५ लाख~ ₹२४.०० लाख

 

तुम्ही का खरेदी करावी

ग्राहकांनो जर तुम्हाला एक अशी कुटुंबासाठी कार हवी आहे जी दिसायला रुबाबदार असेल आणि ज्यामध्ये सर्व आधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्स असतील आणि तिचा प्रवास लांबच्या अंतरासाठी अतिशय आरामदायिक असेल तसेच तुमच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करेल तुम्ही क्रेटा खरेदी केली पाहिजे.

निष्कर्ष

वरील प्रमाणे सविस्तर सांगितलेल्या माहितीनुसार हुंडाई क्रेटा हे बजेट मधल्या ग्राहकांपासून ते 25 लाखाचे बजेट असलेल्या ग्राहकापर्यंत सर्वांना आकर्षित करणारी कार आहे. जरी बाजारात टाटा सफारी , हॅरिअर किंवा महिंद्रा XUV700 सारखे पर्याय असले तरी फीचर्स , इंजिनमधील पर्याय आणि होंडाई कंपनीचे पूर्ण भारतामधील सर्विस नेटवर्क यामुळे क्रेटा ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. तसेच जर तुम्हाला ड्रायव्हिंगची आवड असेल (Enthusiast Driver), हायवेवर वेगवान परफॉर्मन्स आणि रस्त्यावर लोकांचे लक्ष वेधून घेणारा स्पोर्टी लुक हवा असेल, तर क्रेटा एन लाईन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.धन्यवाद…