Tubeless vs Tube Tyres: फरक, फायदे आणि तोटे

Tubeless vs Tube Tyres : वाचकांनो तुमच्या वाहनाचा थेट जमिनीशी संपर्क असणारा एकमेव भाग म्हणजे टायर.  त्यामुळे गाडीचा वेग , नियंत्रण आणि तुमची सुरक्षा पूर्णपणे टायराच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. आजकाल बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारचे टायर उपलब्ध आहेत ट्यूब टायर आणि ट्यूबलेस टायर.

ट्यूब टायर मध्ये हवेसाठी आत मध्ये एक वेगळी रबरी ट्यूब असते. याच्याविरुद्ध ट्यूबलेस टायर मध्ये कोणतीही वेगळी ट्यूब नसते हवा थेट टायर आणि रिमच्या मध्येच घट्ट बंदिस्त केलेली असते. आज प्रत्येक वाहन चालकासमोर एकच मुख्य प्रश्न उभा राहतो या दोन्हीपैकी कोणता टायर अधिक सुरक्षित आणि किफायतशीर आहे.

दर्शकांना तुम्ही असो किंवा तुमचे मित्र असो प्रत्येक जण अनेकदा मित्रांच्या सल्ल्यानुसार टायर निवडतात पण ते तुमच्या प्रवासाच्या गरजेनुसार असणे गरजेचे आहे आजच्या लेखांमध्ये आपण या दोन्ही टायर मधील मूलभूत फरक समजून घेणार आहोत तसेच कोणत्या परिस्थितीमध्ये आणि रस्त्यावर कोणता टायर वापरणे अधिक फायदेशीर ठरेल याचे सविस्तर विश्लेषणही तुम्हाला सांगणार आहोत..

Tubeless vs Tube Tyres
Tubeless vs Tube Tyres: फरक, फायदे आणि तोटे

Tubeless Tyres म्हणजे काय?

Tubeless Tyres म्हणजे असा टायर ज्याच्या आत मध्ये वेगळा tube नसतो यामध्ये टायर आणि रिम एकत्र येऊन हवा रोखून धरत असतात. हवा थेट टायरमध्ये भरली जाते. त्यामुळे आधुनिक गाड्यांमध्ये याचा वापर खूप प्रमाणात वाढला आहे तसेच टायर पंक्चर झाल्यास हवा पटकन जात नाही आणि गाडी नियंत्रित ठेवणे सोपे जाते.

ट्यूबलेस टायरची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे या टायरच्या आत मध्ये स्वतंत्र inner Tube नसते. टायर आणि wheel rim मिळून एक Airtight Chamber तयार करत असतात यामध्ये हवा थेट टायरच्या आत मध्ये भरली जाते. आज कालच्या आधुनिक बाइक्स आणि कार मध्ये ट्यूबलेस टायर मोठ्या प्रमाणात वापरले जातात व पंचर झाल्यावर हवा तुलनेने हळू कमी होते त्यामुळे अचानक अपघात टाळतो.

Tube Tyres म्हणजे काय?

ट्यूब टायर म्हणजे असा टायर असतो ज्याच्यात रबरची एकच स्वतंत्र इनर ट्यूब असते यामध्ये हवा थेट टायर मध्ये भरली न जाता त्या ट्यूब मध्ये भरली जाते आणि टायर आणि ट्यूब हे दोन वेगळे भाग एकत्र येऊन ट्यूब टायर बनते.

तू टायरची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे यात टायर आणि रबरचे ट्यूब हे दोन वेगवेगळे भाग असतात हवा थेट ट्यूबच्या आत भरली जाते. जुन्या बाईक्स , (Spoke Wheels) स्पोक व्हील्स आणि काही वैशिष्ट्य वाहनांमध्ये हे अजूनही वापरले जातात व पंचर झाल्यावर ट्यूब बाहेर काढून ती दुरुस्त करावी लागते किंवा नवीन ट्यूब टाकावी लागते.

Tubeless vs Tube Tyres
Tubeless vs Tube Tyres: फरक, फायदे आणि तोटे

Tubeless vs Tube Tyres मुख्य फरक

ट्यूबलेस आणि ट्यूब टायर मधील मुख्य फरक पुढील प्रमाणे ट्यूब टायर मध्ये हवा स्वतंत्र ट्यूब मध्ये भरली जाते ट्यूबलेस टायर मध्ये हवा थेट टायर आणि रिमझिम मध्ये कोंडली जाते , ट्यूब टायर मध्ये खिळा रुतल्यास ट्यूब लगेच फाटते आणि हवा सेकंदात बाहेर पडते ट्यूबलेस मध्ये हवा खूप हळूहळू बाहेर पडते ज्यामुळे वाहन थांबवण्यास पुरेसा वेळ मिळतो , ट्यूबलेस टायर हलके असतात यामुळे इंजिनवर कमी ताण पडतो आणि वाहनाचे मायलेज ही वाढते , 

वेगवान प्रवासात ट्यूब टायर पंचर झाल्यास गाडीचा ताबा सुटण्याचा मोठा धोका असतो , ट्यूबलेस टायर हायवेवर जास्त सुरक्षित मानले जाते व ट्यूबलेस टायरचे पंचर टायर गाडीला जोडलेले असतानाही सहज काढता येते पण ट्यूब टायरसाठी पूर्ण चाक बाहेर काढावे लागत असते.

Tubeless vs Tube Tyres
Tubeless vs Tube Tyres: फरक, फायदे आणि तोटे

Tubeless Tyres चे फायदे

  1. ट्यूबलेस  टायर पंचर झाल्यावर हवा त्याने जात नाही गाडी नियंत्रणात राहत असते
  2. ट्यूबलेस टायर पंचर झाल्यास पंचर काढणे सोपे आणि जलद होते
  3. ट्यूबलेस टायरचा रोलिंग रेजिस्टन्स कमी असल्यामुळे मायलेज वाढते.
  4. ट्यूबलेस टायर मध्ये ट्यूब नसल्याने टायरचे वजन कमी राहते.
  5. हे टायर चालताना टायर गरम होण्याची प्रमाण खूप कमी असते.
  6. टायरमधील दाब जास्त वेळ टिकून राहत असतो.

Tubeless Tyres चे तोटे

  1. ट्यूबलेस टायर खरेदी करण्याचे आणि ते बसवण्याची सुरुवातीची किंमत सामान्य टायर पेक्षा जास्त असते.
  2. ट्यूबलेस टायर साठी योग्य आणि ट्यूबलेस-कंपॅटिंबल रिम असणे बंधनकारक असते.
  3. जर वाहनाची रीम खराब असेल , वाकलेली असेल , किंवा गंजलेली असेल तर टायर मधून सतत एअर लिकेज होत राहते.
  4. टायरच्या बाजूचा भाग (Sidewall) खराब झाल्यास तो रिपेअर करणे अत्यंत कठीण किंवा अनेकदा अशक्य असते अशावेळी टायर बदलण्याचा पर्याय राहतो.
  5. ट्यूबलेस टायर रिमूवर अचूक बसवण्यासाठी विशेष मशीन आणि कुशल मेकॅनिकल ची गरज पडते.
  6. प्रत्येक प्रकारचा पंचर प्लग दुरुस्त करता येत नाहीत मोठा कट असल्यास टायर निरूपयोगी ठरतो.
Tubeless vs Tube Tyres
Tubeless vs Tube Tyres: फरक, फायदे आणि तोटे

Tube Tyres चे फायदे

  1. ट्यूब टायर आणि त्याची दुरुस्ती ट्यूबलेस टायरच्या तुलनेत खूप स्वस्त असते.
  2. ट्यूब पंचर झाल्यास ती दुरुस्त करणे किंवा बदलणे कोणत्याही छोट्या गॅरेजमध्ये सहज शक्य होते आणि ते करता येते.
  3. अनेक स्पोक वेल्स मोटरसायकलसाठी ट्यूब टायर हाच एकमेव आणि सर्वात प्रॅक्टिकल पर्याय ठरत असतो
  4. ग्रामीण किंवा दुर्गम भागात ट्यूबलेस टायरचे साहित्य न मिळाल्यास नवीन अगदी सहजपणे उपलब्ध होत असते.
  5. जुन्या गाड्या किंवा विशिष्ट व्हील सेटअप असलेल्या गाड्यांसाठी हे टायर आजही अत्यंत योग्य आणि खात्रीशीर मानले जाते.

Tube Tyres चे तोटे

  1. ट्यूब टायर मध्ये पंचर झाल्यावर आतील हवा अतिशय वेगाने बाहेर जाते त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून मोठा अपघाताचा धोका वाढतो.
  2. खराब रस्ते किंवा खड्ड्यामुळे अनेकदा टायर आणि वेलरेंच्या मध्ये ट्यूब  पिंच होऊन फाटण्याची शक्यता असते.
  3. टायर पंचर झाल्यास प्रत्येक वेळी संपूर्ण टायर व्हील वरून बाहेर काढावी लागते या प्रक्रियेला जास्त वेळ आणि श्रम हि जास्त लागते.
  4. वाहन चालवताना ट्यूब आणि टायर यांच्यात सतत संघर्ष होतो यामुळे टायरमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होऊन टायर लवकर खराब होऊ शकते.
  5. ट्यूब टायर मधील हवेचा दाब योग्य राखण्यासाठी नियमित प्रेशर चेकिंग करणे खूप महत्त्वाचे असते.
  6. टायरच्या क्षमतेपेक्षा चुकीच्या आकाराची ट्यूब वापरल्यास टायर निकामी होऊ शकते किंवा ब्लास्ट होण्याचा धोका असतो.
Tubeless vs Tube Tyres
Tubeless vs Tube Tyres: फरक, फायदे आणि तोटे

Safety मध्ये Tubeless vs Tube Tyres

सुरक्षेच्या दृष्टीने ट्यूबलेस टायर हे ट्यूब टायर पेक्षा खूप सुरक्षित आणि ड्रायव्हरला आत्मविश्वास वाढवेल असे आहे. समजा मुख्य हायवेवर ट्यूबलेस टायर पंचर झाल्यास हवा हळूहळू बाहेर पडत असल्याने चालकाला वाहन नियंत्रणात आणण्यासाठी खूप जास्त वेळ मिळतो

जो हाय स्पीड हायवे रायडींग मध्ये खूप महत्त्वाचा ठरतो मात्र टायरची चांगली स्थिती आणि योग्य एअर प्रेशर राखणे तितकेच गरजेचे असते एकूण सुरक्षा ही टायरचा प्रकार , स्थिती , हवा आणि ड्रायव्हिंग पद्धती या सर्वांगीण गोष्टीवर अवलंबून असते

Mileage वर काय परिणाम होतो?

तुमचा टायरचा प्रकार वाहनाच्या मायलेजवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे परिणाम करत असतो ट्यूबलेस टायरमध्ये स्वतंत्र इनर ट्यूब नसल्यामुळे टायरचे एकूण वजन काही प्रमाणात कमी होते तसेच ट्यूब आणि टायरच्या आतील भागांमध्ये होणारे घर्षण ट्यूबलेस टायर मध्ये टळते. या मुख्य घटकांमुळे रोलिंग रेजिस्टन्स कमी होण्यास मदत होतो ज्याचा सकारात्मक परिणाम इंधन बचतीवर दिसून येतो.

मात्र तुमच्या वाहनाची मायलेज केवळ ट्यूबलेस किंवा ट्यूब टायर असण्यावर पूर्णपणे अवलंबून नसते ट्यूबलेस टायर वापरतानाही योग्य हवेचा दाब राखणे अत्यंत महत्त्वाचे असते याशिवाय टायरच्या कंपाऊंड ,  ट्रेड पॅटर्न , वाहनांवरील एकूण भार आणि तुमची ड्रायव्हिंग स्टाईल या सर्व गोष्टी मायलेज ठरवण्यात तितकीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

Tubeless vs Tube Tyres
Tubeless vs Tube Tyres: फरक, फायदे आणि तोटे

Puncture Repair कोणता सोपा?

ट्यूबलेस टायरचा पंचर काढण्यामध्ये सर्वात सोपा आणि जलद कार्यक्रम असतो ट्यूबलेस टायर हे टायर न काढता पंचर काढता येते व पंचर कीट आणि प्लग वापरून पाच मिनिटात दुरुस्ती होते.

ट्यूब टायर पंचर काढण्यासाठी खूप कठीण असते पहिला संपूर्ण टायर आणि ट्यूब बाहेर काढावी लागते त्यानंतर ट्यूब शोधणे आणि पॅच लावणे यात जास्त वेळ आणि मेहनत जाते इतके झाल्यावर तूप जास्त खराब असल्यास ते बदलणे हाच एक सुरक्षित पर्याय राहतो.

त्यामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये स्वतः दुरुस्त करण्यासाठी ट्यूबलेस टायरचा पर्याय सर्वोत्तम आणि प्रॅक्टिकल आहे.

Bike साठी कोणता चांगला?

जर मित्रांनो तुम्ही शहरामध्ये बाईक चालवणार असाल तर ट्यूबलेस टायर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे यात पंचर झाल्यावरही हवा लगेच जात नाही त्यामुळे तुम्ही सहज गॅरेज पर्यंत बाईक चालू मिळू शकतात व हायवेवर वेगात गाडी चालवताना सुरक्षेसाठी ट्यूबलेस टायर सर्वोत्तम ठरते हा टायर कमी गरम होतो आणि अचानक गावात निघून जाण्याचा धोकाही निर्माण होत नाही. 

जर तुमची जुनी मोटरसायकल असेल किंवा स्पोक व्हील्स असलेली बाईक असेल तर ट्यूब टायर अधिक प्रॅक्टिकल ठरतो मात्र स्पोक व्हील्स वर ट्यूबलेस बसवण्यापूर्वी मनुफॅक्चर ची सुसंगतता नक्की तापासावी.

Tubeless vs Tube Tyres
Tubeless vs Tube Tyres: फरक, फायदे आणि तोटे

Car साठी कोणता चांगला?

मित्रांनो तुमचा रोजंदरीचा प्रवास हा हायवे किंवा लांबच्या पल्ल्यासाठी असेल तर तुमच्यासाठी ट्यूबलेस टायर हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. हे टायर पंचर झाल्यावर यातील हवा एकदम बाहेर न पडता हळूहळू कमी होते यामुळे हायवेवर तुम्हाला गाडीवर नियंत्रण मिळवण्यास अवघड होणार नाही व नियंत्रण सुटणारी नाही.

ट्यूबलेस टायर वापरल्याने तुमच्या वाहनाचे ट्यूब नसल्यामुळे टायरचे वजन कमी भरते ज्यामुळे गाडी मायलेज आणि परफॉर्मन्स एक नंबर देते. व टायर खरेदी करताना कंपनी सांगितलेल्या टायर साईज आणि स्पेसिफिकेशन फॉलो करणे तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचे आहे.

Tubeless vs Tube Tyres कोणता निवडावा

वाचकांना आतापर्यंतचा लेख तुम्ही वाचला असेल तर याचे उत्तर तुम्हाला माहिती झालेले असेल तरी तुमचा प्रश्न अजून उरत असेल तर या मुख्य भागांमध्ये त्याचेही विवरण आम्ही तुम्हाला देऊ 

जसं की जर तुम्ही ट्यूबलेस टायर निवडावे जर तुम्ही दररोज बाईक  किंवा कार चालवता , तुमचा हायवेवरील प्रवास जास्त प्रमाणात असतो , प्रवासात सुरक्षितता आणि सुविधा तुमची पहिली प्राथमिकता असेल आणि गाडी पंचर झाल्यास गाडी न थांबता झटपट दुरुस्ती हवी असेल.

तुम्ही ट्यूब टायर निवडा जर तुमच्या गाडीला जुना ट्यूब टायर व्हील सेटअप असेल किंवा गाडीला स्पोक व्हील्स असून ते बदलण्याची तुमची इच्छा नाही कमी खर्चात मेंटेनन्स आणि बजेट फ्रेंडली पर्याय हवा असेल व तुमच्या भागात ट्यूब रिपेअर किंवा रिप्लेसमेंट सहज उपलब्ध आहे अशावेळी तुम्ही ट्यूब टायर निवडू शकता

निष्कर्ष 

वाचकांनो  वरील पूर्ण लेख तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असणारे हे आम्ही १००% सांगतो जरी तुम्हाला अजूनही मनात थोडीफार शंका राहिली असेल तर तुम्हाला या शेवटच्या निष्कर्ष भागात त्याचे पूर्ण निराकरण करून देतो.

 जसं की बहुतेक आधुनिक बाइक्स आणि कार साठी ट्यूबलेस टायर हा अधिक किफायतशीर आणि प्रॅक्टिकल पर्याय आहे पण टायर निवडताना फक्त ट्यूबलेस किंवा ट्यूब हा एकच मुद्दा न पाहता तुमच्या गाडीची मॅन्युफॅक्चरिंग ची स्पेसिफिकेशन , टायर साइज , रायडिंग कंडिशन आणि तुमचे बजेट ह्याचा पुरेपूर संपूर्ण विचार करणे खूप आवश्यक आहे संपूर्ण विचार केल्यानंतरही तुम्ही तुमचा पर्याय निवडावा आणि आजकालच्या मॉडर्न कारमध्ये बहुतांश ट्यूबलेस टायरस मिळते त्यामुळे तुम्हाला जास्त विचारही करावा लागू शकणार नाही..

या लेखासोबत तुम्ही आमचे पूर्वीचे माहितीपूर्ण लेख सुद्धा पाहू शकता जसं की इंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे त्याचे पूर्ण मार्गदर्शन , EV Driving Range कशी वाढवावी? , ADAS म्हणजे काय? व सर्वात महत्त्वाचा कार मायलेज वाढवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरावे यांसारख्या माहिती पूर्ण लेख आम्ही लिहीत असतो तुम्हाला वाचायला आवडले असेल तर आमचे अजूनही लेख तुम्ही वाचू शकता धन्यवाद!!!