2026 Maruti Brezza Launched: नवीन डिझाइन, फीचर्स आणि किंमतीची माहिती

2026 maruti Brezza Launched : दर्शकांनों भारतीय वाहन बाजारात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट मध्ये आपली ओळख निर्माण करणारी Maruti Suzuki brezza आता 2026 मध्ये पहिल्यापेक्षा अधिक दणकट आणि आधुनिक अपडेट्स लॉन्च करण्यात आलेले आहे. ग्राहकांना आवडणाऱ्या कारणा कंपनीने Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवून देत देशातील सर्वात सुरक्षित गाड्यांच्या पंक्तीमध्ये उभा केलेले आहे तसेच या गाडीमध्ये नव्या आकर्षण डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही गाडीपूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आणि अपडेटेड वाटते. 

Maruti Brezza 2026 ही विशेषता मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबासाठी तरुण नोकरदारांसाठी आणि हायवे सुरक्षित व कुटुंबासोबत प्रवास करणारे लोकांसाठी एक उत्तम पर्याय असणार आहे जे ग्राहक पहिल्यांदा वाहन खरेदी करणार आहेत त्यांच्यासाठी हा एक नंबर पर्याय असेल ही गाडी आपल्याला उत्तम मायलेज , कमी देखभालीचा खर्च आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्स देते यामुळेही कार तुमच्यासाठी योग्य राहील. आजच्या लेखमध्ये आम्ही तुम्हाला नवीन लॉन्च झालेल्या Maruti Suzuki brezza बद्दल विस्तार मध्ये सांगणार आहे चला सुरू करूया..

2026 maruti Brezza Launched
2026 Maruti Brezza Launched: नवीन डिझाइन, फीचर्स आणि किंमतीची माहिती

एक्स्टेरियर डिझाईन

Maruti Suzuki brezza समोरच्या भागात आकर्षक डार्क रूम फिनिशमध्ये सोन्याचे एलिमेंट्स असलेली नवीन ग्रील देण्यात आलेली आहे तसेच समोरून दिसणारे री-डिझाईन केलेले बंपर जे की स्पोर्टी लुक देते त्यासोबतच बंपरच्या खाली फॉक्स स्किड प्लेट्स देण्यात आलेले आहेत. आणि गाडीच्या समोर L-शेप मध्ये DRLs देण्यात आलेले आहेत जे की दिसायला स्टाईलिश दिसतात अशाप्रकारे नवीन हेडलॅम्प सेटअप पाहायला मिळते. गाडीच्या साईडच्या बाजूने डोअर ड्युअल टोन ग्लायडिंग देण्यात आलेले आहे तसेच 16 इंच चे अलाय व्हील्स जे की नवीन डिझाईन मध्ये पाहायला मिळतात आणि गाडीच्या पाठीमागच्या भागात कोणत्याही प्रकारचे नवीन बदल करण्यात आलेला नाहीत तीच जुनी टेल-लॅम्प आणि बंपर डिझाईन पाहायला मिळते.

2026 maruti Brezza Launched
2026 Maruti Brezza Launched: नवीन डिझाइन, फीचर्स आणि किंमतीची माहिती

इंटेरियर डिझाईन

नवीन Maruti Suzuki brezza गाडीचे इंटेरियर पूर्वीपेक्षा अधिक प्रेमियम हायटेक आणि प्रशस्त वाटेल असे बनवण्यात आलेले आहे मारुतीने या कारचे डॅशबोर्ड पासून ते तुम्ही बसायचा जागेचा कंफर्ट पर्यंत अनेक मोठे बदल केलेले आहेत.

Maruti Suzuki brezza च्या इंटिरियरची थेट झलक तुम्ही खालील फोटोमध्ये पाहू शकता:

गाडीचा डॅशबोर्डच्या मध्यभागी नवीन 10.1 इंच मोठी टच स्क्रीन पाहायला मिळते जे की SmartPlay Pro+ इम्पोर्टेन्ट सिस्टीम आहे जी वायरलेस Apple carplay आणि Android auto ला सपोर्ट करते. लांबच्या प्रवासात जाण्यासाठी तुम्हाला पुढील केबिनमध्ये व्हेंटिलेटेड सीड्स देण्यात आलेले आहेत त्यासोबतच गाडीमध्ये ६४ कलर अॅम्बियंट लाइटिंगमध्ये पाहायला मिळते त्यासोबतच स्पोर्टी लुक देण्यासाठी स्टेरिंग व्हीलवर ऑडिओ कंट्रोल आणि क्रूज कंट्रोल उपलब्ध असणार आहेत

इंजिन आणि परफॉर्मन्स

या Maruti Suzuki brezza गाडीचे सर्वात मोठे अपडेट तिच्या बोनेटच्या खाली असलेल्या इंजिन मध्ये आहे. २०२६ मॉडेल मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे 1.0 टर्बो पेट्रोल(Boosterjet) इंजिन हे इंजिन ११० hp पावर आणि १७० nm टाॅर्क जनरेट करते यामुळे गाडीला हायवेवर दमदार परफॉर्मन्स मिळणार आहे तसेच कंपनीचे जुने १.५ लीटर नॅचरली अस्पीरेटेड पेट्रोल इंजिन जे की १०३ hp पाॅवर आणि १३९ nm टॉर्क निर्माण करते हे देखील ग्राहकांसाठी कायम ठेवण्यात आलेले आहे 

टर्बो व्हेरियंटमध्ये ५-स्पीड एवजी आता नवीन ६-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात येणार आहे. त्यासोबतच सीएनजी मॉडेलमध्ये आता कारच्या खाली सिलेंडर बसण्यात आलेले आहे ज्यामुळे ३२८ लीटर डीग्गीची जागा सामान ठेवण्यासाठी पूर्णपणे मोकळी येणार आहे.

मायलेज

नवीन Maruti Suzuki brezza ची मायलेज आधीचे मॉडेल पेक्षा बऱ्याच पैकी सुधारलेले आहे मारुतीने इंजिन ट्यूनिंग आणि स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानामध्ये बदल केल्यामुळे ही कार आता सेगमेंट मधील सर्वाधिक मायलेज देणारी गाड्या पैकी एक होणार आहे.

 नवीन मारुती ब्रेजा चे इंजिन आणि गिअर बॉक्स नुसार अधिकृत मायलेज खालील प्रमाणे तक्त्यात अधोरेखित केलेले आहे:

 इंजिन गिअरबॉक्स अधिकृत मायलेज
1.5L पेट्रोल5-स्पीड मॅन्युअल19.89 km/l
1.5L पेट्रोल6-स्पीड ऑटोमॅटिक19.80 km/l
1.5L CNG5-स्पीड मॅन्युअल25.51 km/kg

 

सेफ्टी फीचर्स

सुरक्षेच्या बाबतीत मारुतीने ह्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेले आहे जसे की Bharat NCAP कडून प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षासाठी या गाडीला ५-स्टार रेटिंग मिळाले आहे.

 सुरक्षा फीचर्स म्हणून गाडीमध्ये ६ एअरबॅग , टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम , ब्लाइंड-स्पॉट वार्निंग , रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट आणि फ्रंट पार्किंग सेन्सर यांसारखे सुरक्षा फीचर्स देण्यात आलेले आहेत ज्यामुळे तुमचे कुटुंब प्रवास करताना सुरक्षित राहील

2026 maruti Brezza Launched
2026 Maruti Brezza Launched: नवीन डिझाइन, फीचर्स आणि किंमतीची माहिती

स्मार्ट टेक्नॉलॉजी

२०२६ मारुती सुझुकी ब्रेझ्झा मध्ये प्रगत सुझुकी कनेक्ट तंत्रज्ञान दिले गेले आहे जे प्रामुख्याने कारच्या टाॅप स्पेसिफिकेशन Zxi आणि Zxi+ व्हेरियंट्मध्ये समाविष्ट आहे

रिमोट इंजिन स्टार्ट आणि एसी कंट्रोल(Remote Engine Start) हे फिचर्स केवळ ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणाऱ्या पेट्रोल मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे मॅन्युअल किंवा सीएनजी मॉडेलमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव रिमोट इंजिन स्टार्ट मिळत नाही व सुझुकी कनेक्ट द्वारे तुम्ही दूरवरूनच कारचे इंजन सुरू करू शकता आणि नवीन 10.1 इंचाच्या स्क्रीनशी लिंक असलेल्या केबिन एअर प्युरिफायर आणि एसी चालू करून गाडी आधीच थंड करू शकता.

व्हेईकल ट्रेकिंग आणि सेफ्टी(Vehicle Tracking) यामध्ये मारुती सुझुकी कनेक्ट च्या माध्यमातून तुम्ही कारचे लाईव्ह लोकेशन आणि अचूक हालचालींना नकाशावर पाहू शकता व जर गाडीत अनधिकृत प्रवेश झाला किंवा चोरीचा प्रयत्न झाला तर तुम्ही ॲपवरून रिमोट मोबाईल जर कमांड देऊन इंजिन रिस्टार्ट होण्यापासून रोखू शकतात व गाडी ठरवून दिलेल्या भौगोलिक सीमा ओलांडल्यास तसेच ओवर स्पीड किंवा कार टो केल्यास त्वरित मोबाईल नोटिफिकेशन येते.

ओव्हर-द-एअर अपडेट्स (OTA Updates) २०२६ ब्रेजा मध्ये दिलेल्या नवीन १०.१ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम (OTA) पूर्णपणे सपोर्ट करते यामध्ये मॅप्स , इन-कार ॲप्स आणि सिस्टीम सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी सर्विस सेंटरला जाण्याची गरज नाही, कारमधील इंटरनेट कनेक्टव्हिटीद्वारे ते थेट अपडेट होत.

व्हाईस कमांडस (Voice Commands) ब्रेजामध्ये इनबिल्ड Hi Suzuki व्हाॅईस असिस्ट मिळतो. याशिवाय टॉप मॉडेलमध्ये Alexa Auto सपोर्ट देखील जोडण्यात आलेला आहे व तुम्ही आवाजाद्वारे गाणी बदलले , कॉल करणे , नेवीगेशन सेट करणे आणि घराबाहेरून अलेक्सा उपकरणांना कमांड देऊन कार लाॅक/अनलाॅक किंवा ट्रॅक करू शकता.

2026 maruti Brezza Launched
2026 Maruti Brezza Launched: नवीन डिझाइन, फीचर्स आणि किंमतीची माहिती

व्हेरिएंट्स

226 मारुती सुझुकी ब्रेझ्झा भारतात 7.5 सुरुवातीला किंमत मध्ये बजेट फ्रेंडली लोकांसाठी लोन झाले आहे या नवीन अपडेट मॉडेलमध्ये इंजिनचे तीन पर्याय 1.5 लिटर पेट्रोल नवीन 1.0  लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर सीएनजी देण्यात आले असून ते LXi , VXi , ZXi आणि ZXi+ या चार मुख्य ट्रिममध्ये उपलब्ध आहेत

यात महत्त्वाची बाब म्हणजे २०२६ मारुती ब्रेजामध्ये CNG चा पर्याय LXi , VXi , आणि ZXi या तीन व्हेरियंटमध्ये मिळतो तर सर्वात टॉप मॉडेल फक्त ZXi+ पेट्रोलचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

कोणते व्हेरियंटसाठी कोणते इंजिन पर्याय असेल यांचा तक्ता खालील दिलेला आहे : 

 व्हेरिएंट उपलब्ध इंजिन पर्याय
LXi (Base)• 1.5L पेट्रोल (6MT)
• 1.0L टर्बो-पेट्रोल (6MT)
• 1.5L S-CNG (6MT)
VXi (Mid)• 1.5L पेट्रोल (6MT / 6AT)
• 1.0L टर्बो-पेट्रोल (6MT)
• 1.5L S-CNG (6MT)
ZXi (Top)• 1.5L पेट्रोल (6MT / 6AT)
• 1.0L टर्बो-पेट्रोल (6MT)
• 1.5L S-CNG (6MT)
ZXi+ (Top-End)• 1.5L पेट्रोल (6AT)
• 1.0L टर्बो-पेट्रोल (6MT)
• CNG उपलब्ध नाही

 

किंमत

नवीन मारुती सुझुकी ब्रेझ्झा शोरूम किंमत ₹७.४० लाख रुपयांपासून सुरू होऊन ₹१३.०९ लाख रुपयापर्यंत जाते. ऑन-रोड किमतीमध्ये आरटीओ  रस्ता कर आणि विमा जोडल्यानंतर विविध व्हेरियंटच्या किमतीत लक्षणीय फरक दिसून येतो ब्रेजा प्रामुख्याने चार मुख्य व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे बेस , मिड , अप्पर-मिड आणि टॉप मॉडेल.

२०२६ Maruti Suzuki brezza ची एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किमतीतील फरक खालील तक्त्यामध्ये दिलेला आहे:

 व्हेरिएंट एक्स-शोरूम किंमत अंदाजे ऑन-रोड किंमत (महाराष्ट्र) मूळ व्हेरिएंटपेक्षा फरक
LXi (पेट्रोल मॅन्युअल)₹ 7.40 लाख₹ 8.55 – ₹ 9.10 लाख
VXi (पेट्रोल मॅन्युअल)₹ 9.25 लाख₹ 10.15 – ₹ 10.45 लाखसुमारे ₹ 1.3 – ₹ 1.5 लाख जास्त
ZXi (पेट्रोल मॅन्युअल)₹ 10.40 लाख₹ 11.70 – ₹ 12.00 लाखसुमारे ₹ 3.0 लाख जास्त
ZXi+ (पेट्रोल मॅन्युअल)₹ 11.75 लाख₹ 13.50 – ₹ 13.80 लाखसुमारे ₹ 4.8 – ₹ 5.0 लाख जास्त
ZXi+ AT (ऑटोमॅटिक)₹ 13.09 लाख₹ 14.55 – ₹ 15.50 लाखऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह टॉप व्हेरिएंट

(टीप: ऑन-रोड किमती राज्यानुसार आणि शहरांनुसार बदलू शकतात, खाली मुंबई/महाराष्ट्रातील अंदाजे किमती दिल्या आहेत) 

प्रतिस्पर्धी कार

२०२६ मारुती सुझुकी ब्रेझ्झा ह्या गाडीचे प्रतिस्पर्धी गाड्या ह्या मुख्यतः Tata Nexon , Hyundai Venue , Kia Sonet , Mahindra XUV3XO , Skoda Kylaq , Renault Kiger , Nissan magnite या सात प्रामुख्याने मारुती सुझुकी ब्रेजाच्या प्रतिस्पर्धी गाड्या असणार आहेत.

फायदे

  • २०२६ मारुती ब्रेजा मध्ये मारुतीचा सर्वात जास्त भरवसाचा 1.5 मीटर नॅचरली अस्पिरिटेड पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहे जो ग्राहकांच्या मनात उच्च विषयाचा निर्माण करतो व ग्राहकांना गाडी चालवताना आत्मविश्वास वाढवतो.
  • २०२६ मारुती ब्रेजा सीएनजी कंपनी-फिटेड मिळतअसल्यामुळे ही गाडी  सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी असणार आहे.
  • कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट मध्ये ब्रेजाचा वार्षिक मेंटेनन्स खर्च सेगमेंट मध्ये सर्वात कमी असणार आहे.
  • मारुती सुझुकीचे देशातील सर्वात मोठे नेटवर्क असल्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही शहरात किंवा अगदी ग्रामीण भागातही तुम्हाला अगदी जवळ मारुतीचे अधिकृत सर्विस सेंटर किंवा मेकॅनिक सहज मिळणार  आहे.

तोटे

  • 2026 मारुती ब्रीजा गाडीमध्ये तुम्हाला डिझेल पर्याय उपलब्ध नसणार आहे मारुतीने या फेसलिफ्टमध्येही डिझेल इंजिन दिलेले नाही ज्या ग्राहकांचे रनिंग जास्त आहे त्यांच्यासाठी डिझेल सर्वोत्तम पर्याय असतो परंतु मारुतीने हा दिला नाही.
  • मारुतीने प्रेमियम फीचर्स फक्त टॉप मॉडेलपुरतेच मर्यादित ठेवलेले आहे जसं की व्हेंटिलेटर सीट्स , ३७० डिग्री कॅमेरा ,१०.१-इंचाचा मोठा स्क्रीन हे फीचर्स मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात महागडे करावे लागणार आहे यामुळे बजेट मधल्या व मध्यम बजेट मधल्या ग्राहकांसाठी नुकसानाची गोष्ट आहे.
  • गाडीचे इंटिरियर चे प्लास्टिक कॉलिटी आणि फिट फिनिश क्वालिटी अजून प्रीमियम लेवलची नाही.
  • नवीन फीचर्स , टर्बो इंजिन आणि ५-स्टार सेफ्टी रेटिंग मुळे किंमत खूप महाग झाली आहे.

कोणासाठी योग्य आहे?

ज्या ग्राहकांची कुटुंब संख्या ५ आहे व ज्यांना पुरेशी लेगरूरू ,हेडरूम आणि आरामदायिक सीट हव्या आहेत त्यांच्यासाठी ही परफेक्ट फॅमिली कार असणार आहे ज्यामध्ये फॅमिली ट्रिप चे सामान ठेवण्यासाठी 328 लिटरचा मोठी डिक्की मिळते.

ज्या लोकांना शहरांमध्ये गर्दीच्या ट्राॅफिक मध्ये गाडी चालण्यासाठी व कमी जागेत गाडी पार्क करणे सोपे जावे यासाठी ४ मीटरपेक्षा कमी लांबी असलेली गाडी हवी असेल जे की शहरात उत्तम आणि कंपनीचे सर्विस नेटवर्क पण जवळ असेल त्यांच्यासाठी ही कार योग्य आहे.

जे ग्राहक पहिल्यांदा SUV खरेदी करणार आहेत त्यांच्यासाठी ही कार योग्य असणार आहे कारण नवीन गाडी शिकणाऱ्या चालकांना बोनेट स्पष्ट दिसत असल्यामुळे चालकांना जजमेंट घेणे खूप सोपे जाते व छोट्या गल्ल्यांमध्ये किंवा छोटी पार्किंग जागेमध्ये गाडी पार्क करणे सोपे जाते.

 

निष्कर्ष

दर्शकांनों २०२६ मारुती सुझुकी ब्रेझ्झा ही गाडी ₹ 7.40 लाख किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे जे की बजेट मधल्या किंवा पहिल्यांदा गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य किंमत आहे.

जर तुम्हाला कमी देखभालीचा खर्च , मारुती सुझुकीचे विस्तीर्ण सर्विस नेटवर्क , उत्तम मायलेज आणि ५-स्टार सुरक्षेचा भरोसा हवा असेल तर २०२६ मारुती ब्रेजा हे तुमच्या कुटुंबासाठी एक सर्वोत्तम आणि प्रॅक्टिकल पर्याय असू शकतो. धन्यवाद!!!