ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS Features explained  : दर्शकांना आजच्या काळात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण नियंत्रणाच्या बाहेर वाढल्याने तुमच्या कारमध्ये चांगल्या प्रकारचे सुरक्षा तंत्रज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे.

त्याच प्रगतशील सुरक्षा तंत्रज्ञानाचा भाग म्हणून आपल्या वाहनांमध्ये ADAS (Advanced Driver Assistance Systems) ही प्रगत ड्रायव्हर-सहाय्यप्रणाली आता तुमची सुरक्षा करण्यासाठी गाडीमध्ये मिळत असते. ही प्रणाली कॅमेरे , रडार आणि सेन्सरचा वापर करून कारच्या सभोवतालाचे सतत निरीक्षण करत असते आणि संभाव्य धोका ओळखून ड्रायव्हरला सतर्क करते किंवा अपघात टाळण्यासाठी आपोआप ब्रेक लावून कार नियंत्रित करण्याचेही काम करत असते.

भारतात रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्यामुळे व सुरक्षिततेबाबतीत ग्राहकांची वाढती जागरूकता यामुळे ही ADAS प्रणाली भारतीयांच्या मनामध्ये लोकप्रिय बनत चाललेले आहे. पूर्वी फक्त महागड्या लक्झरी गाड्यांमध्येच हे तंत्रज्ञान मिळत होते मात्र लोकांच्या वाढती मागणीमुळे हे तंत्रज्ञान आता Mahindra XUV 7X0 , Hyundai Creta , Kia seltos आणि Honda City सारख्या सर्वसामान्यांच्या बजेट मधल्या गाड्यांमध्येही उपलब्ध झालेले आहे.

आजचा लेखामध्ये सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी ADAS तंत्रज्ञान कसे वापरले जाते तसेच ADAS म्हणजे काय? ADAS चे प्रकार , ADAS मध्ये फीचर्स , ADAS वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात , ADAS चे फायदे ,ADAS चे तोटे यांसारख्या प्रश्नांची उत्तरे ह्या लेखमध्ये तुम्हाला आज विस्तारमध्ये मिळणार आहेत. चला सुरू करूया..

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS म्हणजे काय?

अशी प्रगत इलेक्ट्रॉनिक प्रणाली जे की वाहनाची सुरक्षा वाढवून चालकाला सुरक्षितपणे वाहन चालवण्यास मदत करते. व कॅमेरे , रडार आणि सेन्सर्सच्या मदतीने ही प्रणाली धोके ओळखून चालकाला सतर्क करते किंवा आणीबाणीच्या प्रसंगी स्वतःहून ब्रेक लावून अपघात टाळण्यास मदत करते अशा प्रणालीला आपण ADAS म्हणतो.

ADAS चे कार्य आणि विविध उपकरणाची भूमिका

कॅमेरे (Cameras) वाहनाच्या पुढील काचेजवळ बसवलेले कॅमेरा लेन मार्किंग , इतर वाहने , पादचारी मार्ग आणि ट्रॅफिक चिन्ह ओळखतात

रडार (Radar) पुढील वाहनाचे अंतर आणि वेग मोजण्यासाठी रडार सेन्सर्स खूप महत्त्वाचे असतात

अल्ट्रासोनिक सेन्सर्स (Ultrasonic Sensors) हे ध्वनी लहरींचा वापर करून अतिशय कमी अंतरावरील वस्तू , भिंत , खांब शोधून काढतात.

LiDAR प्रगत वाहनामध्ये लेझर किरणाच्या मदतीने सभोवतालीच्या 360 डिग्री त्रिमितीय(3D) नकाशा तयार करण्यासाठी LiDAR चा वापर केला जातो

ADAS हे केवळ ड्रायव्हरला मदत करण्यासाठी बनवलेले तंत्रज्ञान आहे. ड्रायव्हरची पूर्ण जागा घेणार नाही ADAS सिस्टीमचा मूळ उद्देश ड्रायव्हरचा ताण कमी करणे आणि रस्त्या सुरक्षा सुधारणे हा असणार आहे.

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS चे प्रकार (ADAS Levels)

भारताच्या कारच्या बाजारपेठेत सध्याच्या स्थितीमध्ये फक्त Level 1 आणि Level 2 हे ADAS प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आणि उपलब्ध असणारे आहेत जे की Mahindra XUV 7X0 , Hyundai Creta , आणि TATA Harrier यांसारख्या अनेक गाड्यांमध्ये हे तंत्रज्ञान पाहायला मिळते.

ADAS लेव्हलचे भारतात प्रामुख्याने 5 प्रकार पाहायला मिळतात :

Level 1 (Driver Assistance) यात गाडीचा वेग किंवा स्टेअरिंग यापैकी एकावर नियंत्रण मिळते ड्रायव्हरला दोन्ही गोष्टीवर एकाच वेळी नियंत्रण ठेवता येत नाही

Level 2 ( Partial Automation) या लेवल मध्ये गाडी स्वतः स्टिअरिंग , प्रवेग आणि ब्रेक एकाच वेळी नियंत्रण करू शकते.

Level 3 ( Conditional Automation) या लेवल मध्ये कार विशिष्ट परिस्थितीत स्वतः सर्व निर्णय घेते. मात्र भारतात कायदेशीर मान्यता आणि आपल्या रस्त्यावरील गुंतागुंतीची रहदारी यामुळे हे तंत्रज्ञान अद्यापी भारतात उपलब्ध नाहीये.

Level 4 आणि Level 5 ( Fully Autonomous) या लेवल मध्ये आपल्याला ड्रायव्हरची अजिबात गरज भासत नाही हे पूर्णपणे स्वायत्तत्व ड्रायविंग आहे जिथे गाडी स्वतःहून चालत असते या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भारतात कोणत्याही प्रकारची सुविधा अजून विकसित नाहीये.

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS मधील महत्वाची फीचर्स

ADAS हे तंत्रज्ञान ड्राइव्हिंग सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी कॅमेरे आणि सेन्सर चा वापर करत असते यामध्ये कोणकोणत्या प्रकारची फीचर्स वापरण्यात येतात हे खालील प्रमाणे दिलेले आहे:

१ ] Automatic emergency breaking (AEB – ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग)

कारच्या पुढील कॅमेरा आणि रडारच्या मदतीने पुढील वाहनाची किंवा माणसाशी टक्कर होण्याचा धोका ओळखला जातो. व चालक वेळेवर ब्रेक लावण्यात अयशस्वी ठरला तर सिस्टीम ब्रेक लावून कार थांबवते किंवा तिचा वेग कमी करते अशा प्रकारे हे फीचर्स चालते

२ ] Forward collision warning (FCW – फॉरवर्ड कोलिजन वार्निंग)

जर तुमची कार पुढील वाहनाच्या खूप वेगाने आणि धोकादायक अशा स्थितीमध्ये जात असेल तर सिस्टीम स्क्रीनवर सूचना आणि बीप चा आवाज देऊन तुम्हाला सतर्क करते अशाप्रकारे हे फीचर्स चालते

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

३ ] Lane departure warning (LDW – लेन डिपार्चर वार्निंग)

हायवेवर गाडी चालवताना इंडिकेटर न देता कार जर एका लेन मधून दुसऱ्या लेनमध्ये जात असेल तर हे फीचर स्टिअरिंगला वायब्रेशन देऊन किंवा बीप वाजून चेतावणी देते अशाप्रकारे हे फीचर्स चालते

४ ] Lane keep assist (LKA – लेन कीप असिस्ट)

हे फीचर्स जर कार लेनच्या बाहेर जात असेल तर आपोआप स्टेरिंगला हलकेच फिरवून गाडीला पुन्हा लेनच्या मध्यभागी आणायचे काम करते व सहसा ठराविक वेगावर आणि रस्त्यावर स्पष्ट लेन मार्किंग असतानाच हे फीचर्स काम करत असते.

५ ] Adaptive cruise control (ACC – ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल)

पारंपारिक क्रूज कंट्रोल मध्ये गाडी एकाच वेगाने धावत असते व वाहन पाहून वेग बदलत नसते पण या ACCमध्ये तुम्ही ठरवलेल्या वेगाशिवाय पुढील वाहनाचे अंतर आणि वेग पाहून तुमची कार आपोआप वेग कमी किंवा जास्त करत असते अशा प्रकारे हे फीचर्स चालते

६ ] Blind spot Monitoring (BSM – ब्लाइंड स्पाॅट माॅनिटरिंग)

जेव्हा एखादे वाहन तुमच्या ब्लाइंड स्पॉट मध्ये असते तेव्हा आरशावर एक इंडिकेटर पेटतो यामुळे लेन बदलताना बाजूच्या वाहनांना धडक बसत नाही.

७ ] Rear Cross Traffic Alerts ( RCTA – रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट )

पार्किंग मधून गाडी मागे काढताना बाजूने येणारी वाहन दिसत नाही हे रडार सेंसर त्या वाहनांना ओळखतात व जर एखाद्या वाहन येत असेल तर RCTA तुम्हाला आवाजाद्वारे अलर्ट करण्याचे काम करते ज्यामुळे अपघातांचा धोका टळतो अशा प्रकारे फिचर्स काम करत असते.

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

८ ] Driver attention monitoring (ड्रायव्हर अटेंशन मॉनिटरिंग)

ड्रायव्हरच्या डोळ्यांची हालचाल आणि बसण्याची पद्धत कॅमेरा द्वारे तपासली जाते जर ड्रायव्हरला डुलकी येत असेल किंवा लक्ष विचलित असेल तर अलार्म वाचतो आणि सिस्टीम इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर कॉफीचा कप किंवा Take a Break चा मेसेज दाखवून विश्रांती देण्याची सूचना देते अशाप्रकारे हे फीचर्स चालते.

९ ] Traffic sign recognition (TSR – ट्रॅफिक साईन रिकग्रेशन)

पुढील कॅमेरा रस्त्यावरील स्पीड लिमिटचे बोर्ड किंवा इतर चिन्हे वाचत असते हे चिन्ह कारच्या मुख्य स्क्रीनवर किंवा डिस्प्ले वर दाखवून तुम्हाला सूचित करते हे फीचर्स असे काम करते.

१ ० ] Automatic high Beam assist (ऑटोमॅटिक हाय बीम असिस्ट)

रात्रीच्या वेळी हाय-बीम वर गाडी चालवताना समोरून एखादे वाहन आल्यास हे फीचर्स आपोआप हाय-बीम बंद करून लो-बीम करते अशा प्रकारे हे फीचर्स काम करते‌.

१ १ ] Parking assist ( पार्किंग असिस्ट)

हे सिस्टीम कारला स्वतःहून पार्किंगच्या जागेत पार्क करते तुम्हाला फक्त गिअर आणि ब्रेक नियंत्रित करावे लागतात जर जागा अरुंद असली तर हे फीचर कारला रस्त्याला समांतर किंवा काटकोनात सहज पार करते अशा प्रकारे हे फीचर्स काम करते

१ २ ] 360 degree camera ( ३६०-डिग्री कॅमेरा)

कारच्या चारही बाजूंना कॅमेरे असतात स्क्रीनवर कार आणि तिच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंचा वरून स्पष्ट नजारात दिसत असतो व शहरात छोट्या गल्ल्यामधून गाडी काढताना किंवा गर्दीच्या ठिकाणी पार्क करताना खड्डे , दगड किंवा लहान मुले असल्यास कॅमेरा द्वारे लगेच समजते अशाप्रकारे हे फीचर काम करते.

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

ADAS वापरताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित होईल

ADAS केवळ सुरक्षेसाठी दिलेली मदत आहे सिस्टीम सुरू असली तरीही ड्रायव्हरने पूर्णपणे सतर्क राहणे आणि रस्त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा ADAS कार आपोआप स्टीयरिंग नियंत्रित करते परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी आपले हात नेहमी स्टेअरिंगवर असावेत.

कारच्या पुढील आणि मागील भागात बसवलेले रडार आणि कॅमेरा सेन्सर्स धूळ , चिखल किंवा बर्फापासून स्वच्छ ठेवण्याचे काम करा अन्यथा सिस्टीम योग्य प्रकारे काम करणार नाही.

मुसळधार पाऊस , दाट धुके किंवा खराब हवामानात सेंसर ची कार्यक्षमता कमी होते अशावेळी पूर्णपणे सिस्टीमवर अवलंबून न राहता स्वतःहून गाडी चालवावे.

अनेक ADAS सिस्टीम युरोपियन देशानुसार डिझाईन केलेले असतात भारतीय रस्त्यावरील अनपेक्षित रहदारी खड्डे आणि बेशिस्त वाहतूक लक्षात घेता सिस्टीमवर १००% विश्वास ठेवू नका.

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS चे फायदे

  • ADAS सिस्टीम मधील ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग आणि कॉलिजन वार्निंग मुळे समोर येणाऱ्या धोक्यांची पूरकल्पना आधीच मिळते व अपघात धोका कमी होतो.
  • लेन कीप असिस्ट आणि ब्लाइंड स्पाॅट डिटेक्शन ह्यासारख्या फीचरमुळे गाडी स्वतःच्या लेनमध्ये राहते आणि बाजूने येणाऱ्या वाहनांची माहिती मिळत असते.
  • अडपटिव क्रूस कंट्रोल फीचरमुळे हायवेवर पुढच्या गाडीचा वेग बघून आपली गाडी आपोआप वेग नियंत्रित करते अशामुळे लांबच्या प्रवासात थकवा जाणवत नाही.
  • पार्क असिस्ट आणि 360 डिग्री कॅमेरा मुळे नवीन चालकांना गाडी पार्क करणे किंवा ट्रॅफिक मध्ये चालवली सोपी जाते.
  • सेकंड हॅन्ड मार्केटमध्ये सध्याच्या काळात सुरक्षितेच्या फीचर्सची मोठी मागणी असते त्यामुळे ADAS असलेल्या गाड्यांना भविष्यात चांगली रिसेल व्हॅल्यू मिळणार आहे.
ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS चे तोटे

  • ADAS फिचर्समुळे कार मध्ये महागडे कॅमेरे , रडार आणि सेन्सर्स बसवावे लागतात यामुळे कारची मूळ किंमत ₹१ ते २ लाख आणि वाढते
  • जर कारचा छोटासा अपघात झाला आणि बंपर किंवा काच फुटली तर तिथे असलेल्या सेंसर खराब होतात हे सेंसर बदलण्याचा आणि दुरुस्तीचा खर्च खूप जास्त असतो
  • कारची साधी सर्विसिंग केली किंवा काच बदलली व सस्पेन्शन चे काम केले तरीही सेन्सरचे अलाइनमेंट करावे लागते यासाठी विशेष टेक्निशियन आणि अतिरिक्त पैसे द्यावे लागतात
  • अति पाऊस दाट धुके किंवा रात्रीच्या वेळी समोरील वाहनांमध्ये प्रखर दिवे यामुळे हे सेन्सर्स कधी कधी नीट काम करत नाहीत
  • बहुतांश जागी भारतातील रस्त्यांवर लेन मार्किंग नसते त्यामध्ये अचानक मधून येणारी पायी चालणारी माणसे , बेसिस्त वाहतूक आणि खड्डे यामुळे ADAS अनेकदा गोंधळून जातो व पूर्णपणे काम करू शकत नाही

भारतातील ADAS असलेल्या लोकप्रिय कार

Hyundai Creta Kia Seltos या दोन्ही बहिणी असलेल्या गाड्यांमध्ये Level 2 पॅकेज मिळते.

Honda Elevate यामध्ये होंडाचे होंडा सेन्सिंग हे सुरक्षित ADAS तंत्रज्ञान मिळते.

TATA HarrierTATA Safari या मॉडेल्समध्ये चांगल्या प्रकारचे ADAS सिस्टीम मिळते.

MG hector आणि MG Astor ह्या गाड्यांमध्ये Level 2 सिस्टीम देण्यात येते व भारतात कमी बजेट मधल्या गाड्यांमध्ये ADAS आणनारी पहिली कंपनी MG आहे

Toyota urban cruiser Hyryder या हायब्रीड गाडीच्या टॉप वरिएंट मध्ये ADAS पॅकेज मिळते

Mahindra XUV7X0 भारतात ADAS तंत्रज्ञान लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम या गाडीला जाते

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS खरेदी करताना काय तपासावे?

खरेदी करताना लेवल स्टॅंडर्ड फीचर्स टॉप वरिएंट फीचर्स सेंसर ची देखभाल आणि कॅलिब्रेशन सुविधा तपासणी खूप आवश्यक असते हे तंत्रज्ञान गाडी चालवणे सुरक्षित आणि सोयीस्कर बनवते त्यामुळे संपूर्ण माहिती असणे तुम्हाला खूप गरजेचे असते

कोणता ADAS लेवल आहे हे तपासावे?

लेवल १ यात लेनकीप असिस्ट किंवा अडपट्टी क्रूस कंट्रोल सारखे मूलभूत ड्रायव्हर सहाय्य मिळते यात एका वेळी एकच काम स्वयंचलित होते.

लेवल २ यामध्ये कार एकाच वेळी स्टेरिंग आणि प्रवेश या दोन्हीवर नियंत्रण ठेवू शकते महामार्गावर चालण्यासाठी हे सर्वाधिक लोकप्रिय लेवल आहे

कोणती फीचर्स स्टॅंडर्ड आहेत?

फॉरवर्ड कॉलिजन वार्निंग , ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग ,लेन डिपार्चर वार्निंग यांसारखे फीचर्स स्टॅंडर्ड मिळतात

कोणती फीचर्स फक्त टॉप वेरियटमध्ये मिळतात?

टॉप वेरियटमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग , ३६० डिग्री कॅमेरा , रियल क्रॉसिंग ट्रॅफिक अलर्ट सारखे फीचर्स मिळतात

सर्विस सेंटर मध्ये कॅलिब्रेशन सुविधा

खरेदी करण्यापूर्वी जवळच्या सर्विस सेंटर मध्ये अचूक कॅलिब्रेशन मशीन व प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध आहे का यांची खात्री करा.

टेस्ट ड्राईव्हमध्ये ADAS अनुभवणे

टेस्ट ड्राईव्ह घेताना ट्रॅफिक मध्ये अडॅप्टिव क्रूज कंट्रोल आणि लेन असिस्ट चा वापर करून पहा व सिस्टीम कशाप्रकारे बीप किंवा वायब्रेशन द्वारे सूचना देते ती स्वतः अनुभव पाहावे.

ADAS Features explained
ADAS म्हणजे काय? प्रत्येक कार खरेदीदाराने जाणून घ्याव्यात अशा 10 स्मार्ट सुरक्षा फीचर्स

ADAS बद्दलचे सामान्य गैरसमज

गैरसमज‌ : ADAS म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार
वास्तव : ADAS मुळे कार पूर्णपणे सेल्फ ड्रायव्हिंग होत नाही हे फक्त ड्रायव्हरला सहाय्य करणारे डिजिटल तंत्रज्ञान आहे.

गैरसमज : प्रत्येक ADAS रस्त्यावर सारखेच काम करते
वास्तव : ADAS हे फक्त चांगल्या लेन मार्किंग रस्त्यांवर व शिस्तबद्ध वाहतूक असणाऱ्या महामार्गावर चांगल्या प्रकारे अचूकपणे काम करते हे अनपेक्षित वाहतूक असणाऱ्या महामार्गावर व छोट्या रस्तावर आणि कोंडी असलेल्या ठिकाणी याच्या काम करण्यामध्ये अडथळा येतो व व्यवस्थित अचूकपणे काम करू शकत नाही.

गैरसमज : खराब हवामानात पूर्णपणे सुरक्षित असते
वास्तव : मुसळधार पाऊस दाट धुके किंवा कमी प्रकाशात कार वरील कॅमेरे आणि सेंसर ब्लॉक होतात किंवा त्यांना स्पष्ट दिसत नाही अशावेळी ADAS मर्यादित काम करत असते व त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

गैरसमज :ADAS कार मध्ये असल्याने अपघात होणारच नाही
वास्तव : ADAS मुळे अपघाताची शक्यता नक्कीच कमी होत असते पण ते अपघात पूर्णपणे टाळू शकत नाही ड्रायव्हरच्या छोट्याशा चुकीमुळे किंवा यंत्रणेच्या मर्यादामुळे अपघात घडू शकतात.

कोणासाठी ADAS योग्य आहे?

ग्राहकांनो जर तुमचा रोजचा प्रवास महामार्गावर जास्त वेळ असेल आणि प्रवास करताना तुम्हाला थकवा जाणवत असेल तर हे ADAS तुमच्यासाठी आहे.

ज्यांना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करायची नाही त्यासाठी ADAS आहे.

नवीन शिकणाऱ्या कारचालकाला रस्त्याचा अंदाज घेणे आणि अचानक येणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे सोपे जाऊ यासाठी ADAS उपयुक्त असते.

जे व्यावसायिक रोज कामासाठी शहरात किंवा लांबच्या प्रवासात तासनतास गाडी चालवत असतात त्यांच्यासाठी ADAS एक उत्तम सहाय्यक म्हणून काम करते

निष्कर्ष

दर्शकांनों आजच्या लेखामध्ये ADAS ह्या प्रगत ड्रायव्हर सहाय्यक प्रणाली वर विस्तार मध्ये लेख लिहिलेला आहे वरील माहिती वाचल्यामुळे तुम्हाला ADAS म्हणजे काय? तसेच च्या बाबतीत खूप सारे प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये मिळाली असतील अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तुम्ही ADAS असणाऱ्या कार खरेदी करून सुरक्षित प्रवास करू शकता. धन्यवाद!!!