कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

Car Battery Maintenance tip and tricks वाचकांनो कारची बॅटरी गाडीचा मुख्य प्राण असते ती स्टार्टर मोटर , दिवे , संगणक प्रणाली (ECU) आणि इतर उपकरणांना वीज पुरवायचे काम करते. बॅटरी कुमकुवत झाल्यास गाडी अचानक बंद पडू शकते तसेच जर बॅटरीची नियमित काळजी घेतल्यास बॅटरीचे आयुष्य वाढते आणि गाडीचा प्रवास सुरक्षित राहतो.

तसेच आजच्या लेखांमध्ये कार बॅटरी खराब होण्याची प्रमुख कारणे , कार बॅटरी मेंटेनेस कशी करावी? , बॅटरी टर्मिनल वर गंज का होते? , कार बॅटरी फेल होण्याची मुख्य कारणे ,  कार बॅटरी कशी टेस्ट करावी? ,  बॅटरी कशी रिप्लेस करावी? , नवीन बॅटरी घेताना काय पाहावे? , बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे?  हा सर्व गोष्टींवर आज पडदा दूर करण्याचे काम आम्ही करणार आहोत एकदा लेख वाचला की आयुष्यभर तुम्हाला बॅटरीच्या संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे शोधावी लागणार नाहीत. चला सुरू करूया..

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

कारची Battery इतकी महत्त्वाची का?

कारची बॅटरी प्रामुख्याने कारच्या इंजिनला सुरुवातीचा ‘स्टार्ट’ देण्यासाठी लागणारी वीज पुरवते.   चावी फिरवतात किंवा स्टार्ट बटन दाबताच बॅटरी स्टार्टर मोटरला हाय व्होल्टेज करंट देते व कार चालू होते.

कार बंद असताना हेडलाइट्स , इंडिकेटर , केबिन लाईट्स आणि म्युझिक सिस्टीम बॅटरीवर चालतात. तसेच कारचे मुख्य कॅम्पुटर (ECU) आणि सेन्सर्सना बॅटरी अखंड वीज पुरवठा करत असते व बॅटरी कमजोर किंवा डेड झाल्यास कारण त्यात कुठे अचानक बंद पडू शकते या सर्व गोष्टींमुळे कार बॅटरी इतकी महत्त्वाची असते.

Car Battery चे साधारण आयुष्य किती असते?

कार बॅटरीचे साधारण आयुष्य ३ ते ५ वर्षे असते.  

कार बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम करणारे घटक हे भारतातील उष्ण हवामान ज्यामुळे बॅटरी मध्ये लिक्विड वेगाने सुकते व अतिउष्णतेमुळे बॅटरीच्या अंतर्गत भागांचे गंजणे वाढते त्यामुळे देखील बॅटरीचे आयुष्य परिणाम होतो तसेच तुम्ही तुमच्या गाडीचा अनेक दिवस वापर न केल्यास बॅटरी स्वतःहून रिचार्ज होते व जास्त वेळ डिस्चार्ज राहिल्याने बॅटरी कायमची निकामी होते अशा छोट्या मोठ्या कारणांमुळे बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम करत असतात.

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

Car Battery खराब होण्याची मुख्य कारणे

कारची बॅटरी अति उष्णता मुळे किंवा उन्हाळ्यातील अति उष्णतेमुळे बॅटरी मधील पाण्याचे बाष्पीभवन होते यामुळे बॅटरीच्या आतील रचना खराब होते आणि तिचे आयुष्य वेगाने कमी होण्यास सुरुवात होते. व जर तुम्ही तुमच्या गाडीचा वापर वारंवार कमी अंतराचा प्रवासासाठी करत असेल तर त्या प्रवासात अल्टरनेटरला बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे बॅटरी हळूहळू पूर्ण डिस्चार्ज होते.

जर तुम्ही कार वापरात नसले तरी क्लॉक , अलार्म सिस्टीम आणि इतर इलेक्ट्रॉनिक्समुळे बॅटरी हळूहळू संपते तसेच दीर्घकाळ गाडी उभी राहिल्याने बॅटरी कायमची खराब होण्याची शक्यता असते. व गाडी बंद केल्यानंतरही हेडलाइट्स , केबिन लाइट्स किंवा म्युझिक सिस्टीम सुरू राहिल्यास बॅटरी रातभरात पूर्ण उतरून जाते.

अल्टरनेटर चालू गाडीत बॅटरी चार्ज करण्याचे काम करत असतो अल्टरनेटर खराब असल्यास बॅटरीला योग्य व्होल्टेज मिळत नाही व ती निकामी होण्याची शक्यता वाढते तसेच बॅटरीच्या धन (+) आणि ऋण (-) टर्मिनसवर पांढरा किंवा निळ्या गंज जमा होतो यामुळे विद्युत प्रवाह अडथळा येतो आणि बॅटरी चार्ज होण्यामध्ये अडचण येते.

कारच्या कंपनीने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची बॅटरी बसवल्यास ती लोड सहन करू शकत नाही ज्यामुळे बॅटरी खराब होऊ शकते तसेच सामान्यतः कार बॅटरीच्या आयुष्य ३ ते ५ वर्षे असते. काळानुरूप बॅटरीची क्षमता नैसर्गिक रित्या कमी होते व ती बदलावी लागत असते.

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

Car Battery Maintenance कशी करावी?

तुमच्या कारच्या बॅटरीचे दोन्ही टर्मिनल्स सैल तर नाहीत ना हे नेहमी तपासा व टर्मिनल्सवर पांढरा किंवा निळा गंज जमा झाल्यास, खाण्याचा सोडा (Baking soda) आणि पाण्याचे मिश्रण वापरून जुन्या टूटप्रेशने ते साफ करून घ्या नंतर स्वच्छ कपड्याने देत बसून घ्या व  बॅटरी तिच्या जागेवर घट्ट बसलेली असावी सैल बॅटरी गाडी चालवताना हलते ज्यामुळे अंतर्गत नुकसान किंवा शॉर्टसर्किट होऊ शकते.

बॅटरीच्या बाहेरील भागावर कुठे क्रॅक आहे का किंवा बॅटरी फुगली आहे का हे तपासून घ्या जर बॅटरी फुगलेली दिसल्यास ती त्वरित बदला. तसेच तुमची बॅटरी नॉन मेंटेनन्स फ्री असेल तर त्यातील पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवा आणि गरजेनुसार फक्त डिस्टिल्ड वॉटर भरून घ्या.

जर तुमची कार अनेक दिवस एका जागेवर उभी राहणार असेल तर बॅटरीचे टर्मिनल्स काढून ठेवा किंवा आठवड्यातून एकदा गाडी दहा ते पंधरा मिनिटे चालू करून ठेवा तसेच केवळ दोन-तीन मिनिटाच्या अगदी लहान फेऱ्या मारणे टाळा यामुळे बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकत नाही व आठवड्यातून किमान एकदा तरी गाडी १५ ते २० मिनिटे सलग चालवा.

कारचे प्रत्येक सर्विसिंगच्यावेळी मेकॅनिकलकडून बॅटरीचे होल्टेज आणि अल्टरनेटर तपासून घ्या.

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

Battery terminals वर Corrosion का होते?

तुमची गाडीची बॅटरी चार्ज आणि डिस्चार्ज होताना त्यातून हायड्रोजन गॅस बाहेर पडतो हा गॅस टर्मिनल च्या धातूशी संपर्क आल्यावर केमिकल रिएक्शन होऊन पांढरा थर बनत असतो. व बॅटरी जुनी झाल्यावर किंवा ओव्हरचार्ज झाल्यावर टर्मिनल्सच्या बाजूने ऍसिडिटी होते यामुळे हिरवट किंवा निळा थर जमा होतो.

बॅटरीच्या केबलमध्ये तांबे असते. सेल्फ्युरिक ऍसिडच्या वाफेमुळे तांब्याचे कॉपर सल्फेटमध्ये रूपांतर होते ज्यामुळे हिरवा थर दिसत असतो तसेच हवेतील ओलावा टर्मिनल्सवर गंज पकडण्यासाठी मदत करत असतात.

हा पांढरा किंवा हिरवा थर विजेचा कुलवाहक असतो यामुळे बॅटरी आणि गाडीच्या वायर्समधील संपर्क तुटतो किंवा कमजोर होतो. कनेक्शन कमजोर झाल्यामुळे इंजिन सुरु करण्यासाठी लागणारा पुरेसा करंट स्टार्टर म्हणून पर्यंत पोहोचत नाही परिणामी गाडी चालू करताना खटखट आवाज येतो किंवा गाडी अजिबात स्टार्ट होत नाही. अशा कमजोर कनेक्शन मुळे गाडीच्या बॅटरी व्यवस्थित चार्ज होत नाही त्यामुळे अल्टरनेटर वर खूप अतिरिक्त ताण पडतो.

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

Car Battery Fail होण्याची मुख्य Signs

गाडी स्टार्ट करताना जर नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तो बॅटरी कुमकुवत झाल्याचा स्पष्ट संकेत असते यामध्ये स्टार्टर खूप हळू फिरतो आणि क्रॅकिंग एकताना नेहमीसारखे ताकतीचं न वाटता खूप कमजोर वाटते.

जेव्हा बॅटरी पूर्ण चार्ज नसते तेव्हा ती गाडीच्या लाईट्सना पुरेसी वीज देऊ शकत नाही परिणामी हेडलाईट किंवा केबिन लाईटचा ब्राईटनेस कमी होतो आणि डॅशबोर्ड वरील लाईट अंधुक दिसतात.

तुम्ही जेव्हा गाडीची चावी फिरवता किंवा स्टार्ट बटन दाबतात तेव्हा जर इंजिन सुरु न होता फक्त वारंवार क्लिक-क्लिक असा आवाज येत असेल तर समजावे की बॅटरी संपत आली आहे हा आवाज स्टार्टर मोटरला आवश्यक असलेला पुरेसा कंरट न मिळवल्यामुळे येत असतो.

गाडीचा डॅशबोर्ड वरील जर बॅटरीचा आकाराची लाल किंवा पिवळी वॉर्निंग लाईट चमकू लागली तर ते बॅटरी बिघाड असल्याचे लक्षण आहे हा संकेत केवळ बॅटरी खराब असल्याचाच नाहीतर गाडीच्या चार्जिंग सिस्टीम मध्ये समस्या असल्याचाही असू शकतो.

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

बॅटरी कमजोर झाल्यावर गाडीतील इतर इलेक्ट्रिक वस्तूवर त्याचा थेट परिणाम होतो उदाहरणार्थ पावर विंडोज अत्यंत संत गतीने वर खाली होणे , इनपुटमेंट सिस्टीम अचानक रिसेट होणे किंवा अंतर्गत लाइट्स लुकलुकणे अशा समस्या निर्माण होतात.

अतिउष्णतेमुळे किंवा ओव्हरचार्जिंग मुळे कार बॅटरीच्या बाहेरील कव्हर फुगतो जर तुम्हाला बॅटरी नेहमीपेक्षा सुजलेली किंवा फुगलेली दिसली तर हा अत्यंत गंभीर चेतावणीचा इशारा आहे अशी बॅटरी त्वरित बदलणे खूप आवश्यक आहे.

जर बॅटरी लीक होत असेल किंवा ओवर हीट झाली असेल तर गाडीचा बोनेट मधून सल्फर किंवा सडलेल्या अंड्यासारखा तीव्र दुर्गंध येतो हा वास आल्यास बॅटरी किंवा चार्जिंग सिस्टीम मध्ये मोठा दोष असल्याची शक्यता असते.

एखाद्यावेळी चुकीने लाईट चालू राहिल्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होणे वेगळे परंतु तुम्हाला दर दोन-तीन दिवसांनी गाडी सुरू करण्यासाठी वारंवार जंप स्टार्ट करावा लागत असेल तर बॅटरी पूर्णपणे मृत्यू झाले आहे अशी वेळी मुख्य कारण शोधून बॅटरी बदलणे हा तुमचा एकमेव पर्याय उरत असतो.

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

Battery weak आहे की Alternator मध्ये problem?

गाडी स्टार्ट न होणे मागे नेहमीच बॅटरी कारणीभूत नसते. समस्याची मूळ समजून घेण्यासाठी हा दोन्ही गोष्टी मधील फरक माहिती असणे गरजेचे आहे.

जसे की बॅटरीचे काम हे गाडी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक एनर्जी स्टोअर करणे हे असते व अल्टरनेटरचे काम इंजिन चालू असताना बॅटरी सतत चार्ज ठेवणे आणि गाडीच्या इलेक्ट्रॉनिक्सला पावर देणे असते.

जर तुम्ही नुकतीच नवीन बॅटरी बसवली असेल आणि तरी ती वारंवार डिस्चार्ज होत असेल तर समस्येचे कारण बॅटरी नाहीये तर अल्टरनेटर मध्ये दोष , लूज बेल्ट , वायर तुटलेली किंवा गंजलेली असणे किंवा गाडी बंद असतानाही एखादा इलेक्ट्रॉनिक पार्ट बॅटरी चोरून वापरत असतो यामुळे गाडी बंद पडल्यास प्रत्येक वेळी फक्त बॅटरी बदलण्या योग्य उपाय नसतो तर आधी संपूर्ण चार्जिंग सिस्टीम ची तपासणी करणे खूप गरजेचे असते.

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

Car Battery कशी Test करावे?

सर्वात आधी उघड्या डोळ्यांनी बॅटरीची अवस्था तपासून घ्या बॅटरीच्या टर्मिनस वर पांढरा किंवा निळा गंज जमला आहे का ते पहा. बॅटरीच्या प्लॅस्टिक बॉडीला कुठे तडे गेले आहेत  किंवा ती फुगली आहे का ते तपासा. बॅटरीला जोडलेल्या केबल सैल किंवा तुटलेल्या नसाव्यात.

बॅटरी मध्ये किती चार्ज शिल्लक आहे हे मल्टीमीटर (Multimeter) या उपकरणाच्या सहाय्याने मोजून घ्या ही पद्धत अशी आहे की गाडीची इंजिन आणि सर्व लाइट्स बंद करा मल्टीमीटर सेट करा लाल वायर पॉझिटिव्ह आणि काही वायर निगेटिव्ह टर्मिनला जोडा 

 बॅटरीचे अचूक होल्टेज नंबर तुमच्या बॅटरीच्या प्रकारावर आणि गाडीच्या उत्पादकाच्या नियमावर अवलंबून असतात सामान्यतः पूर्ण चार्जिंग केले असलेल्या 12-व्होल्टच्या बॅटरीचे रीडिंग 12.6V किंवा त्यापेक्षा थोडे जास्त दाखवते.

गाडी चालू असताना अल्टरनेटर बॅटरी चार्ज करतो का नाही हे समजून घ्या जसं की गाडीचे इंजिन चालू करा आणि मल्टीमीटरने पुन्हा व्होल्टेज तपासा. इंजिन चालू असताना वोल्टेज वाढले पाहिजे जर व्होल्टेज वाढले नाही तर अल्टरनेटर खराब होऊ शकतो.

कधी कधी बॅटरी वोल्टेज बरोबर दाखवते पण इंजिन सुरू करण्यासाठी लागणारा भार पेलू शकत नाही यासाठी गॅरेज मध्ये एक विशेष ‘लोड-टेस्टर’ उपकरणाचा वापर केला जातो हे उपकरण बॅटरीवर तात्पुरता मोठा भार टाकून ती कार्यक्षम आहे का नाही ते तपासते तसेच वरील चाचणीचे निकाल आणि त्याचे अचूक अर्थ समजून घेण्यासाठी तुमच्या जवळील अनुभवी मेकॅनिकल ची मदत घ्या 

हे सर्व केल्यामुळे मेकॅनिक तुम्हाला बॅटरी फक्त चार्ज करावी लागेल का ती पूर्ण बदलावी लागेल याचा योग्य सल्ला देऊ शकतो.

Battery कधी Replace करावी?

साधारणपणे कार आणि बाईकचे बॅटरी ३ ते ५ वर्षे टिकतात जर तुमच्या बॅटरीला ४ वर्षापेक्षा जास्त काय झाला असेल तर ती कधीही निकामी होऊ शकते तसेच गाडी सेल्फ मारताना अडकत असेल किंवा जास्त वेळ घेत असेल व सकाळी किंवा थंडीच्या दिवसात गाडी सुरू व्हायला जास्त त्रास होत असेल तर रिप्लेस करावी.

गाडी काही दिवस उभी राहिलीस बॅटरी पूर्णपणे उतरून जाणे किंवा वारंवार बॅटरी जम्पर स्टार्ट करावी लागणे तसेच मेकॅनिक किंवा गॅरेजमध्ये बॅटरी टेस्टर ने तपासणी केल्यावर जर निकाल Bad किंवा Replace आला असेल तर रिप्लेस करून घ्यावे.

जास्त उष्णतेमुळे किंवा ओव्हर चार्जिंगमुळे बॅटरीचा आकार बदलतो आणि ती फुगत असते बॅटरीच्या बाहेरील प्लास्टिक बॉडीला क्रॅक गेले असतील किंवा आतील ऍसिड बाहेर गळत असेल व गाडी चालू असताना अल्टरनेटर बॅटरी योग्य प्रकारे चार्ज करतो, पण गाडी बंद करतात काही वेळात बॅटरी पूर्ण डाऊन होते अशावेळी बॅटरी रिप्लेस करावी.

Battery अजून चालू आहे मग replace का करावी?

बॅटरी चालू असतानाही ती बदलण्याचा विचार करणे अगदी योग्य आहे कारण चालू असणारी बॅटरी सुद्धा अचानक कधीही दगा देऊ शकते ऐनवेळी होणारा मनस्ताप आणि खर्च टाळण्यासाठी तुम्ही बॅटरी चालू असताना रिप्लेस करावे आणि जर तुमच्या बॅटरीमध्ये वरील सर्व खराब लक्षणे दिसत असेल तेव्हाही तुम्ही बॅटरी रिप्लेस करून घ्यावे.

वाचकांनो केवळ तुमच्या बॅटरीचे वय ३ ते ५ वर्ष झाले आहे म्हणून ती थेट बदलण्याची कोणतीही गरज नाही तुम्ही फक्त दोन-तीन निकषावर बॅटरी बदलणे योग्य आहे की नाही ते तपासू शकतात जसे की जवळच्या मेकॅनिकल कडे जाऊन किंवा सर्विस सेंटरवर जाऊन बॅटरीची होल्टेज आणि सीसीए टेस्ट (Cold Cranking Amps) करून घ्या तसेच जर टेस्ट रिझल्ट मध्ये बॅटरीची क्षमता 40% पेक्षा कमी दाखवत असेल तर ती बदला क्षमता चांगली असल्यास फक्त चार्ज करून ती वापरू शकता.

नवीन Car Battery घेताना काय पाहावे?

सर्वात आधी तुमच्या कारचे ओनर मॅन्युअल  वाचा आणि त्यामध्ये तुमच्या कार साठी कंपनीने सुचवलेले अचूक तपशील दिलेले असतात ते पहा व तुमच्या कारच्या बॅटरी ट्रेनमध्ये ती व्यवस्थित बसली पाहिजे तसेच बॅटरीची लांबी रुंदी उंचीचा आकार निवडा.

तुमच्या कारला जितक्या एंपियर आवरची बॅटरी आवश्यक आहे तितक्याच क्षमतेची बॅटरी घ्या तसेच बॅटरी खरेदी करताना बॅटरी सहा महिन्यापेक्षा जास्त जुनी नसावे बॅटरीवर मॅन्युफॅक्चरिंग चा महिना आणि वर्ष लिहिलेले असते ते तपासा.

नेहमी जास्त वॉरंटी कालावधी असणारी बॅटरी निवडा व वॉरंटी मध्ये फ्री रिप्लेसमेंट आणि प्रोरॅटा असे दोन भाग असतात फ्री रिप्लेसमेंट चा काळ जितका जास्त तितका फायदा तुम्हाला मिळणार आहे.

Car Battery Maintenance tip and tricks
कार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स

Battery चे आयुष्य वाढवण्यासाठी ८ टिप्स

  1. लाईट्स आणि ॲक्सेसरीज बंद ठेवणे.
  2. दीर्घकाळ पार्क करताना बॅटरी तपासणे.
  3. नियमित ड्राईव्ह करणे.
  4. बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ ठेवणे.
  5. नियमित कारची सर्विसिंग करणे.
  6. वार्निंग साईन्सकडे दुर्लक्ष न करणे.
  7. योग्य बॅटरी स्पेसिफिकेशन वापरणे.
  8. अतिउष्णतेमध्ये बॅटरीची तपासणी करणे.

निष्कर्ष

वाचकांनो तुमच्या कार बॅटरी बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मध्ये मिळाली असतील अशी आशा करतो आणि वरील सांगितलेल्या तुम्हाला प्रत्येक टिप्स आणि तुमच्या बॅटरीची काळजी तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता याचे उपाय तुम्ही वाचून तुमच्या रोजंदारीच्या आयुष्यामध्ये योग्यपणे वापरू शकता जेणेकरून तुम्हाला बॅटरी विषयी कोणतेही अडचण भविष्यात येणार नाही

तसेच तुम्हाला आमचा हा लेख आवडला असल्यास तुम्ही आमचे Tubeless vs Tube Tyres फरक , फायदे , तोटेइंजिन ऑइल किती दिवसांनी बदलावे याचे योग्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे लेख पाहू शकता.धन्यवाद!!!