How to improve car’s Mileage : दर्शकांना सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे दर ₹१११.८०/लिटर आणि डिझेल ₹९७/लिटर इतके इंधनांचे दर गगनाला भिडलेले आहेत तसेच वाढती महागाई यामुळे तुमच्या वाहनाचे मायलेज अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे. जसं की चांगल्या मायलेजमुळे इंधनावरील मासिक खर्चात मोठी बचत होत असते हा लेख प्रामुख्याने सामान्य वाहन चालकासाठी तसेच नवीन कार खरेदीदार व बजेटच्या नियोजनात गाडी घेणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त असणार आहे.
सध्याच्या काळात हे पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर व आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किमती आणि देशांतर्गत करामधील बदलामुळे पेट्रोल व डिझेलचे हे दर मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत अशा परिस्थितीत तुमच्या वाहनाची चांगले मायलेज अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे मायलेज म्हणजे एक लिटर इंधनात वाहन किती किलोमीटर जाऊ शकते जर तुम्हाला चांगले मायलेज हवे असेल तर आजचा लेख तुमच्यासाठीच आहे आजच्या लेखात आम्ही तुम्हाला विस्तार मध्ये खूप सार्या टिप्स आणि गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या गाडीचे मायलेज चांगले होऊ शकेल चला सुरू करूया..
कार मायलेज म्हणजे काय?

कार मायलेज म्हणजे वाहनाने वापरलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे प्रत्यक्ष गतीमध्ये किंवा प्रवासात किती कार्यक्षमतेने रूपांतर केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर पार करण्याची क्षमता. इंधन कार्यक्षमता अधिक असल्यास कमी खर्चात जास्त प्रवास होतो आणि प्रदूषण कमी होते या सर्वांगीण गोष्टीला आपण कार मायलेज म्हणतो.
मायलेज मापाची दोन प्रकार
km/l (किलोमीटर प्रति लिटर) हे मोजमाप भारत आणि इतर अनेक देशात वापरले जाते यामध्ये १ लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये वाहन किती किलोमीटर जाऊ शकते हे पाहिले जाते(२०/km/l) हा आकडा जितका जास्त तितकी गाडी जास्त मायलेज देते असा अर्थ होतो.
l/100 km (लिटर प्रति 100 (किमी) हे युरोपियन देशाचे मोजमाप आहे यामध्ये १०० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तुमच्या गाडीला किती लिटरचे इंधन वापरले जाते हे मोजले जाते हा आकडा जितका कमी तितकी गाडी जास्त मायलेज तेथे असा होतो.
नियमित सर्व्हिसिंगचे महत्व
तुमच्या कारची आयुष्यमान वाढण्यासाठी आणि सुरळीत रस्त्यावर चालण्यासाठी नियमित सर्व्हिसिंग करणे हे अत्यंत आवश्यक असते.
या नियमित सर्विसिंग मध्ये ४ मुख्य: मुद्द्यांचा समावेश असतो पहिला इंजिन ऑइल बदलणे यामध्ये इंजिन मधील फिरणाऱ्या भागांना ऑइल वंगण पुरवते, ज्यामुळे घर्षण आणि झीज कळते. वेळेवर ऑइल न बदलण्यास इंजिनचे तापमान वाढून नुकसान होण्याची शक्यता असते. दुसरा एअर फिल्टर स्वच्छ ठेवणे यामध्ये फिल्टर इंजिन मध्ये जाणारी धूळ रोखतात ते स्वच्छ किंवा बदलले असल्यास इंजिनला शुद्ध हवा मिळते ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि मायलेज वाढते.
तिसरा पर्याय फ्युएल फिल्टर तपासणी यामध्ये इंजिनातील घाण आणि कचरा इंजिन मध्ये जाण्यापासून हा फिल्टर थांबवतो तो चांगल्या स्थितीत असल्यास इंजिनला इंजिनचा योग्य पुरवठा होत असतो व चौथा पर्याय स्पार्क प्लगची देखभाल यामध्ये स्पार्क प्लग इंधनाचे ज्वलन करण्यासाठी ठिणगी पाडतात. त्यात जर खराब स्पार्क ब्लड असेल तर तो गाडीचे पिकअप कमी करतो आणि मायलेज कमी होत राहते या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे गाडीमध्ये झाल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची गाडी मध्ये खराबी किंवा मायलेज मध्ये कमतरता येत नाही.

टायरची योग्य काळजी घ्या
टायरचे आयुष्य वाढीसाठी नियमितपणे काळजी घेणे हे गरजेचे असते व त्यासाठी टायरचे नियमितपणे 30 ते 35 PSI योग्य हवेचा दाब ठेवा. तसेच गाडी चालवताना होणारे कंपन टाळण्यासाठी दर ५,००० किलोमीटरवर Wheel Alignment आणि Wheel Balancing करणे अत्यंत आवश्यक आहे. जास्त झिझलेले टायर बदलणे ही गंभीर अपघात होण्यापासून वाचवत असतात.
तुमचा टायरची योग्य काळजी घेण्यासाठी पहिला वाहनामध्ये कंपनीने निश्चित केलेले हवेचे प्रमाण असते त्याप्रमाणे वाहनांमध्ये हवेचा दाब भरा आणि जर टायर मध्ये कमी हवा असेल तर त्यामुळे गाडीचे मायलेज कमी होते आणि टायरच्या कडा झिजतात तसेच जर जास्त हवा असेल तर टायरचा मधला भाग खराब होतो व दर पंधरा दिवसांनी एकदा टायर्स थंड असताना हवा नक्कीच तपासा.
दुसरा पर्याय रस्त्यावरील खड्डे आणि स्पीड ब्रेकरवर टायर जोरात आढळतात त्यामुळे टायर फुटण्याचे किंवा व्हील अलाइनमेंट चुकण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे टायर असमान दिसतात आणि गाडी एका बाजूला खेचली जाऊ शकते हे टाळण्यासाठी तुम्ही Wheel Alignment नियमितपणे करून घेत जावा.
तिसरा पर्याय चाकाच्या वजनातील असंतुलनामुळे गाडी मध्ये किंवा स्टेरिंग मध्ये कंपन होऊ शकते ते टाळण्यासाठी योग्य Wheel Balancing करणे आवश्यक असते तसेच चौथा पर्याय झिजलेले टायर बदलणे हे गरजेचे असते आणि आम्ही तुम्हाला पावसाळ्यात टायरची योग्य काळजी कशी घ्यायची यावरील लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पहावा

योग्य ड्रायव्हिंग सवयी लावा
मायलेज वाढवण्यामध्ये चालकाचा चांगल्या प्रकारची ड्रायविंग सवय असणे हे खूप गरजेचे असते त्यामुळे गाडीच्या इंधन मध्ये बचत होते आणि मायलेज ही सुधारते.
वाहन चालताना खालील सवयीचा समावेश केल्याने तुमच्या गाडीचे मायलेज चांगले होणार आहे जसे की
पहिली सवय अचानक वेळ वेग वाढवणे टाळावे गाडीचा वेग हळूहळू आणि सहजतेने वाढवावा अचानक ‘एक्सेलेटर’ दाबल्याने इंजिनिअर ताण येतो आणि जास्त इंजिन जाळते. दुसरी सवयी अचानक ब्रेक मारणे टाळावे अचानक ब्रेक मारल्याने आधी खर्च झालेली ऊर्जा वाया जाते. दूरचे रहदारीचे अंदाज घेऊन वाहन हळूहळू थांबवावे. तिसरी सवय ही गाडीचा वेग स्थिर ठेवावा जसे की गाडीचा वेग एकाच पातळीवर ठेवल्यास इंधन ची कार्यक्षमता वाढत जाते आणि वारंवार वेग कमी जास्त केल्याने मायलेजवर विपरीत परिणाम होतो.
चौथी सवयी क्रूज कंट्रोल चा वापर करण्याची जर तुमच्या गाडीमध्ये क्रूज कंट्रोलचा पर्याय उपलब्ध असेल तर हायवेवर किंवा लांब पाल्याच्या प्रवासात याचा वापर जरूर करावा यामुळे गाडीचा वेग स्थिर राहतो आणि इंधन जास्त जळत नाही. पाचवी सवय योग्य गिअर वापरणे गाडीच्या वेगाप्रमाणे योग्य गिअरचा वापर करणे गरजेचे असते गिअर बदलताना इंजिनचा RPM सामान्य ठेवा, ज्यामुळे इंजिनिवर अतिरिक्त भार पडत नाही. सहावी सवय अशी की Engine Idle कमी ठेवावे जर गाडी ४५ सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबायची असेल तर इंजिन बंद करा विनाकारण इंजिन चालू ठेवल्याने इंधन विनाकारण जळून जाते या सर्व तांत्रिक बाबी तुम्ही लक्षात घेऊन तुमच्या वाहन चालवायला सवयीमध्ये समावेश करावा जेणेकरून तुमची मायलेज हे वाढेल.
कारमध्ये अनावश्यक वजन ठेवू नका
कार मध्ये अनावश्यक वजन ठेवल्यास इंजिनवर जास्तीत जास्त ताण पडतो त्यामुळे गाडीचे Fuel Consumption वाढते तसेच Roof Carrier चा वापर करताना हवेच्या विरोध वाढल्याने मायलेजवर मोठा परिणाम होतो तसेच जास्त क्षमतेसाठी डिक्की स्वच्छ ठेवून केवळ आवश्यक साहित्य ठेवावे.
कार मध्ये विनाकारण जड सामान किंवा वस्तू ठेवल्याने प्रति ४५ ते ५० किलो वजनासाठी इंधनची कार्यक्षमता कमी होते. वजन वाढल्यामुळे कार सुरू करताना , वेग घेताना किंवा चढावर चालवताना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. आणि छतावर रॅक किंवा कॅरिअर बसवल्याने कारचे ‘एरोडायनॅमिक्स’ बिघडते हायवेवर गाडी चालवताना हवेच्या दाबामुळे कारच्या वेगाला अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच गरज नसल्यास रूफ कॅरिअर काढून ठेवणे हिताचे ठरू शकते.
डिक्कीमध्ये अनेकदा जुने साहित्य, अनावश्यक अवजड साधने किंवा अतिरिक्त वस्तू वर्षानुवर्ष पडून राहत असतात ही सवय बदलून तुम्ही डिक्की नियमित स्वच्छ केल्याने कारचे वजन कमी राहते व इंधनाचे बचत होते आणि तुमचे मायलेज सुधारते

एसीचा योग्य वापर करा
कारच्या एसीचा योग्य वापर कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या गाडीचे मायलेज वाढते
शहरात आणि हायवेवर AC वापरण्याचे नियम
शहरातील ट्रॅफिकमध्ये गाडीचा वेग कमी असतो. अशावेळी खिडक्या उघड्या ठेवून एसी बंद ठेवल्यास इंधनाची बचत होते. मात्र जर तुम्ही हायवेवर जास्त वेगाने गाडी चालवत असाल आणि त्यात गाडीच्या खिडक्या उघड्या असेल तर हवेचा विरोध वाढतो आणि ह्यामुळे तुमच्या गाडीचे इंधन जास्त जळते यामुळे हायवेवर खिडक्या बंद करूनच एसी चालू ठेवणे अधिक फायदेशीर ठरते.
एसीचा कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी केबिन एअर फिल्टर(AC Filter) नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यावर धूळ आणि कचरा असल्याने हवेचा प्रवाह मंदावतो दर ५,००० ते १०,००० किलोमीटर अंतराने किंवा दर ६ महिन्यांनी फिल्टर बाहेर काढून व्हॅक्यूम क्लिनर किंवा ब्रशच्या मदतीने तो हलक्या हाताने स्वच्छ करावा खूप जास्त खराब किंवा फाटलेल्या फिल्टर बदलून नवा टाकावा अशी AC फिल्टरची देखभाल करावी.
योग्य दर्जाचे इंधन वापरा
सर्वात महत्त्वाची बाब गाडीचे मायलेज चांगले ठेवण्यामागे योग्य दर्जाचे इंधन वापरणे हे आता काळाची गरज आहे सरकारकडून E-20 , E-100 सारखे इंधन बाजारात उतरवल्यामुळे तुम्ही तुमच्या कारच्या सोयीनुसार योग्य इंधन वापरणे हे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या कार मध्ये कोणत्याही इंधन निगडित नुकसान होऊ नये.
ग्राहकांना तुम्ही केव्हाही इंधन भरताना तुमच्या ओळखीच्या नावाजलेल्या आणि अधिकृत कंपनीचे ( उदा. इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम) पंप निवडा यामुळे अचूक मापे आणि शुद्ध इंधनाची खात्री तुम्हाला मिळून जाते.
दैनंदिन वापराच्या गाड्यांसाठी सामान्य पेट्रोल डिझेल पुरेसे असते पण जर तुमच्या कडे महागड्या स्पोर्ट्स किंवा लक्झरी गाड्या असतील तर कंपनीने Premium Fuel (XP95) किंवा High-Octane इंधन वापरण्याची शिफारस केली असेल तर ते वापरणे आवश्यक आहे.

प्रवासाचे योग्य नियोजन करा
प्रवासाचे योग्य नियोजन केल्यास वेळ आणि इंधन दोन्हीही वाचतात गर्दीच्या वेळेस प्रवास करणे टाळावे. प्रवासाला निघण्यापूर्वी Google Maps किंवा Mappls सारख्या नेवीगेशन ॲप्स वापरून रहदारीचे सद्यस्थिती आणि बाकीचे पर्यायी मार्ग कोणते आहेत हे बघा. तसेच एकाच वेळी अनेक शॉर्ट ट्रिप्स मारणे टाळावे त्याऐवजी एकाच फेरीत सर्व कामे आटोपण्याचा प्रयत्न करावा यामुळे वाहनावरील ताण आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च कमी होऊन जातो.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आजच्या आधुनिक वाहनांमध्ये तंत्रज्ञाचा वापर केल्यामुळे इंजिनाची बचत , सुरक्षेमध्ये वाढ आणि वाहन चालवणे अधिक सुलभ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये इको मोड , स्टार्टअप टेक्नॉलॉजी , इंधन अर्थव्यवस्था मॉनिटर आणि टीपीएमएस(TPMS) यासारख्या आधुनिक प्रगतीचा समावेश केलेला असतो.
इको मोड हा मोड गाडीच्या इंजिनची क्षमता आणि प्रवेग नियंत्रण करतो यामध्ये इंधन चा वापर कमी होत असतो आणि पर्यावरण नाही हानी पोहोचवणाऱ्या वायूंचे उत्सर्जन घटते.
स्टार्ट स्टाॅप टेक्नॉलॉजी ट्रॅफिक किंवा सिग्नलवर गाडी थांबल्यास ही प्रणाली इंजन आपोआप बंद करते किंवा ब्रेक दाबल्यावर इंजिन पुन्हा सुरू होते त्यामुळे इंधन ची बचत होते.
इंधन अर्थव्यवस्था मॉनिटर हे तंत्रज्ञान गाडी किती मायलेज देते हे रियल टाईम माहिती देते आणि ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग सवयीच्या अभ्यास करून हे मॉनिटर इंधन कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.
TPMS ही प्रणाली टायरतील हवेच्या दाबावर सतत लक्ष ठेवत असते हवेच्या दाब कमी असल्यास ही प्रणाली चालकाला त्वरित सतर्क करते, ज्यामुळे अपघाताचा धोका टळतो आणि मायलेज ही उत्तम राहते.
मायलेज बद्दल मोठे गैरसमज
तुमच्या गाडीचे मायलेज आणि इंधनाची बचत याविषयी अनेक लोकांमध्ये मोठमोठे गैरसमज आहेत जस की प्रीमियम इंधनामुळे नेहमी मायलेज वाढते हा एक मोठा गैरसमज असून सामान्य इंजिन साठी ते फायद्याचे नसते तसेच न्यूट्रल गिअरमध्ये गाडी चालवणे किंवा सकाळी इंधन भरणे यातून कोणतेही विषय इंधन बचत होत नाही.
इंधन मायलेजबद्दल प्रमुख गैरसमज खालीलप्रमाणे
प्रीमियम फ्यूलचा ऑक्टेन नंबर सामान्य इंधनापेक्षा जास्त असतो, परंतु जर तुमची गाडी सामान्य इंधनासाठी बनवली असेल तर महाग प्रेमियम इंधन वापरल्याने मायलेज कोणत्याही प्रकारे वाढत नाही याचा फायदा केवळ स्पोर्ट्स किंवा टर्बोच्या इंजिन असलेल्या गाड्यांना होत असतो. तसेच न्यूट्रलमध्ये गाडी चालवणे म्हणजेच उतार किंवा ट्रॅफिक मध्ये गाडी न्यूट्रल केल्याने इंधन वाढते हा सर्वात मोठा समज आहे यावर आधुनिक इंजनमध्ये न्यूट्रल असताना इंधन चालू ठेवण्यासाठी इंधन लागते आणि गाडीवरील नियंत्रण ही कमी होते.
सकाळीच फ्यूल भरणे पेट्रोल थंड वातावरणात जास्त घनतेचे असते आणि सकाळी इंधन भरल्यास जास्त फायदा होतो असा दावा केला जातो वास्तविकपणे पेट्रोल पंपाचे टॅंक जमिनीखाली तीन मीटर खोल असतात त्यामुळे दिवसभरात तापमान स्थिर असते आणि वेळेचा मायलेज वर कोणताही परिणाम होत नाही तसेच इंधन बंद चालू केल्याने नुकसान बऱ्याचदा ट्रॅफिक मध्ये इंजिन बंद चालू केल्याने जास्त इंधन खर्च होतो आणि इंधन खराब होते असा मोठा गैरसमज आहे तज्ञांच्या मते जर तुम्ही दहा सेकंदापेक्षा जास्त काळ थांबणार असाल तर इंजिन बंद केल्याने इंधनाची बचत होते आधुनिक गाड्यांमध्ये येणारा ऑटो स्टार्ट स्टॉप हे फीचर ह्या तत्त्वावर काम करते आणि मायलेजही वाढवते.
निष्कर्ष
दर्शकांनों तुमच्या दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या सवयी गाडीच्या बाबतीत तुम्ही किती चांगल्या प्रकारे करता यावर तुमच्या गाडीचे इंजिन कार्यक्षमता व मायलेज चे भविष्य ठरते जसे की आपल्या लहान सवयीच्या आपल्या पैशावर आणि निसर्गावर मोठा प्रभाव पडत असतो तसेच तुम्ही तुमच्या वाहनाचे आणि उपकरणाचे कशी देखभाल करता यावरही तुमच्या गाडीचे मायलेज आधारलेले असते.
तुमच्या वाहनाची नियमित देखभाल केल्यास त्याचे कार्य सुरळीत चालते आणि वेळेवर ऑइल बदलले , हवेचे दाब योग्य ठेवणे आणि खराब झालेले भाग वेळेच्या वेळ बदलणे तसेच नियमित सर्विसिंगमुळे इंजिनची कस लागत नाही आणि तुमच्या वाहनाची आयुष्य आणि मायलेज ही वाढते




Leave a Reply