Wheel Alignment vs Wheel Balancing : दर्शकांनों महाराष्ट्रातील अनेक वाहन चालकांचा मोठा गैरसमज असातो की व्हील अलाइनमेंन्ट आणि व्हील बॅलन्सिंग दोन्ही एकच आहे, पण प्रत्यक्षात ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या प्रक्रिया आहेत तसेच व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग बद्दल खूप साऱ्या गोष्टी सामान्य वाहन चालकाला माहिती नसतात.
सामान्य गाडीचा ड्रायव्हरला या दोन्ही गोष्टी विस्तार मध्ये सांगण्यासाठी आजचा लेख असणार आहे व दोन्ही सेवा वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि टायरचे आयुष्य वाढण्यासाठी असतात आणि आम्ही ह्या लेखांमध्ये तुम्हाला व्हील अलाइनमेंट म्हणजे काय? , व्हील बॅलन्सिंग म्हणजे काय? , दोन्ही संकल्पनेतील फरक काय आहे? , तसेच व्हील अलाइनमेंट कधी करावी? , व्हील बॅलन्सिंग कधी करावी? आणि जर अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग केले नाही तर त्याचे नुकसान काय होईल यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या दोन्ही संज्ञांच्या बाबतीत विस्तारामध्ये ह्या लेख मध्ये माहिती मिळणार आहे तसेच या दोन्ही गोष्टी करायला किती खर्च येतो? हे आम्ही तुम्हाला या लेखात मिळणार आहे.तर चला सुरू करूया..

व्हील अलाइनमेंट म्हणजे काय?
Wheel alignment अशी प्रक्रिया आहे जिथे कारच्या चाकांचा कोन(Angles) कंपनीचा मानकांनुसार योग्य स्थितीत सेट करणे ज्यामुळे गाडी चालवताना सर्व चाके एकमेकांना समांतर राहवे आणि रस्त्याशी त्यांचा समान योग्य संपर्क रहावा ह्या प्रक्रियेला आपण व्हील अलाइनमेंट असे म्हणतो.
या व्हील अलाइनमेंट प्रक्रियेत मुख्य तीन अलाइनमेंट अंगल्स (Angles) असतात जसे की
१) Camber (कॅंबर) यामध्ये गाडीच्या समोरील बाजूस पाहताना चाकाचा वरचा भाग आत किंवा बाहेर चुकलेला असणे यालाच कॅंबर असे म्हणतात. चाकजर जास्त झुकल्यास टायर एका बाजूने जास्त घासली जातो.
२) Caster (कॅस्टर) यामध्ये जर बाजूने पाहताना स्टीयरिंगचा अक्ष पुढे किंवा मागे झुकलेला असणे म्हणजेच याला कॅस्टर असे म्हणतात. यामुळे गाडी सरळ चालताना स्थैर्य मिळते आणि वळल्यानंतर स्टीयरिंग आपोआप सरळ होते.
३) Toe (टो) यामध्ये वरून पाहताना चाके एकमेकांच्या दिशेने(Toe-in) किंवा बाहेरील दिशेने (Toe-out) किती वळलेली आहेत हे दर्शवते. हे जर योग्य कोणात नसेल तर टायर खूप वेगाने खराब होण्याची शक्यता असते.
अलाइनमेंट कशी केली जाते व मशीन कोणती वापरली जाते:
अलाइनमेंट करण्यासाठी कॅम्पुटरायझेड ‘व्हील अलाइनमेंट मशीन’ चा वापर मुख्यतः केला जातो. यात गाडीला हायड्रोलिक लिफ्टवर उभे करून चाकांना सेन्सर्स लावले जातात आणि संगणकावर सर्व अँगलचे अचूक मोजमाप दिसते त्यानुसार मेकॅनिक सस्पेन्शनमधील नट बोल्ट सैल किंवा घट्ट करून हे अँगल्स अचूक फॅक्टरी स्पेसिफिकेशननुसार सेट करतात.

व्हील बॅलन्सिंग म्हणजे काय?
व्हील बॅलन्सिंग अशी प्रक्रिया ज्यात वाहनाच्या टायर आणि रिमचे वजन सर्व बाजूंनी समान करण्याची एक तांत्रिक प्रक्रिया असते यामध्ये जेव्हा टायर आणि रिमचे वजन पूर्ण चक्रात सारखे नसते तेव्हा वाहन चालवताना चाकांमध्ये व्हायब्रेशन जाणवते हे व्हायब्रेशन दूर करण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी व्हील बॅलन्सिंग करणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी हे केले जाते.
व्हील बॅलन्सिंग मशीन कसे काम करत असते?
या प्रक्रियेत टायरला एक अत्याधुनिक ‘व्हील बॅलन्सिंग मशीन’ वर बसवले जाते. हे मशीन टायरला अतिशय वेगाने फिरवते टायर फिरत असताना मशीन मधील सेन्सर्स चाकाच्या कोणत्या भागात वजन कमी किंवा जास्त आहे ते अचूकपणे शोधून काढतात. मशीनच्या स्क्रीनवर कोणत्या बाजूला किती वजनाची कमतरता आहे याची अचूक माहिती ग्रॅम मध्ये दिसते.
बॅलन्स वजन म्हणजे काय
मशीनने दाखवलेले माहितीनुसार टायरचा असंतुलित भाग संतुलित करण्यासाठी रिमच्या कडेवर लहान धातूचे तुकडे जोडले जातात त्यांना बॅलन्स वजन म्हणतात हे सहसा शिसे(Lead) किंवा जस्त (Zinc) या धातूचे बनलेले असतात हे वजन लावल्यामुळे चाकाचे वजन सर्व बाजूंनी अगदी समान होते
Statice आणि Dynamic Balancing मधला फरक
स्टॅटिक बॅलन्सिंग मध्ये चाक केवळ एकाच अक्षावर संतुलित केले जाते जेव्हा टायर मध्ये फक्त एकाच ठिकाणी वजनाचा असंतुलन असते तेव्हा ही पद्धत वापरली जाते
डायनॅमिक बॅलन्सिंग मध्ये चाक फिरत असताना तिन्ही बाजूंनी संतुलित केले जाते आधुनिक वाहनांमध्ये याच पद्धतीचा वापर प्रामुख्याने केला जातो कारण यामुळे चाकाची उजवी आणि डावी बाजू ही अचूक संतुलित होते.

व्हील अलाइनमेंट कधी करावी?
चालकांनो व्हील अलाइनमेंट ही वाहनाचे नियंत्रण व्यवस्थित राहण्यासाठी आणि टायरचे आयुष्य वाढवण्यासाठी करावे लागते तुमच्या वाहनात खालील कोणतेही दिलेले लक्षणे किंवा परिस्थिती जाणवल्यास ताबडतोब तुम्ही व्हील अलाइनमेंट करून घ्या
जसे की वाहन एका बाजूला खेचले जाणे जर सरळ रस्त्यावर गाडी चालवताना जर वाहन स्वतःहून डाव्या किंवा उजव्या बाजूने ओढले जात असेल तेव्हा करावी. दुसरे कारण स्टेरिंग सरळ न राहण्यामुळे गाडी सरळ रेषेत चालत असतानाही स्टेरिंग व्हील तिरपे किंवा मध्यभागी न राहते यावेळी करावी.
तिसरे टायर असमान झिजणे टायरची एक बाजू दुसऱ्या बाजूचे तुलनेत जास्त वेगाने घासली गेल्यावर करावी. चौथे मोठ्या खड्ड्यातून गेल्यानंतर जर गाडी वेगात असताना मोठ्या खड्डा किंवा गतिरोधकचा तीव्र फटका बसल्यास अलाइनमेंट बिघडते तेव्हा करावी.
पाचवे कारण सस्पेन्शनचे पार्ट बदल्यानंतर वाहनाचे सस्पेन्शन , स्टेरिंग किंवा शॉक ऑब्झर्व्हर्स नवीन पार्ट बदलल्यास अलाइनमेंट करणे सक्तीचे आहे आणि शेवटचा पर्याय वाहनात कोणती समस्या न दिसल्यास सुरक्षिततेसाठी दर ८,००० ते १०,००० किलोमीटर नंतर किंवा वर्षभरातून एकदा अलाइनमेंट तपासून घेणे गरजेचे आहे

व्हील बॅलन्सिंग कधी करावी?
चालकांनो जर तुमच्या कारच्या चाकांचे वजन सर्व बाजूने सामान नसले तेव्हा व्हील इनबॅलन्स ची समस्या निर्माण होते त्यावेळी समस्याचे निराकरण करण्यासाठी व्हील बॅलन्सिंग करावी तसेच खालील परिस्थितीमध्ये व्हील बॅलन्सिंग करणे खूप महत्त्वाचे आहे
जर तुमच्या गाडी चालवताना अचानक स्टेरिंगचे व्हील किंवा सीट मध्ये थरथराट जाणू लागल्यास चाकांचे संतुलन बिघडते तेव्हा स्टेरिंग मध्ये कंपन जाणवतो तेव्हा करावे तसेच जर गाडीचा वेग ७० चे १०० किलोमीटरच्या दरम्याने असताना गाडी जास्त प्रमाणात व्हायब्रेट होत असेल तर ताबडतोब बॅलन्स करून घेणे गरजेचे आहे
जर तुम्ही तुमच्या गाडीला नवीन टायर लावताना प्रत्येक वेळी बॅलन्सिंग करणे अनिवार्य आहे यामुळे टायरचे आयुष्य वाढण्यास मदत होते आणि पंचर काढताना किंवा टायर मधून बाहेर काढताना त्याचे मूळ वजन संतुलन बदलते त्यामुळे दुरुस्तीनंतर बॅलन्सिंग करणे गरजेचे असते.
तुमची गाडी प्रत्येकी ८,००० ते १०,००० किलोमीटर वर कोणत्याही समस्या नसेल तरीही सुरक्षित प्रवासासाठी एवढे अंतर पार केल्यानंतर व्हील बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट करणे गरजेचे आहे व लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून तुमच्या गाडीच्या चाकांची बॅलन्सिंग करून घ्यावी.

अलाइनमेंट न केल्यास काय नुकसान होते?
व्हील अलाइनमेंट गाडीचे वेळेवर न केल्यास खालील प्रमाणे नुकसान होण्याची समस्या उद्भवते जसे की अलाईनमेंट चुकल्यामुळे टायर असमान घासले जातात परिणामी टायरचे आयुष्य मर्यादा संपण्याआधी ते गुळगुळीत होऊन लवकर बदलावे लागतात आणि टायर रस्त्यावर योग्य प्रकारे फिरत नसल्यामुळे गाडीवर जास्तीचा भार पडतो त्यामुळे इंजिनला जास्त ताकद लावावे लागते ज्यातून गाडीचे मायलेज कमी होण्याची शक्यता असते.
तुमची गाडी एक्सप्रेस चालवताना स्टेअरिंग एका बाजूला ओढते त्यामुळे वाळण्यावर किंवा जास्त वेगावर गाडी चालवताना स्टेरिंगवर नियंत्रण कमी होऊ शकते आणि चारही चाके योग्य दिशेने नसल्यास ब्रेक लावताना गाडी नियंत्रित राहणे कठीण होते
ब्रेकिंग मध्येही अंतर वाढत जाते व रस्त्यावरील धक्के शोषण घेणारी सस्पेन्शन आणि बॉल जाॅइंट्सवर अतिरिक्त ताण येतो ज्यामुळे ते लवकर खराब होऊन तुमच्यावर मोठा खर्च येण्याची शक्यता वाढते वरील सर्व समस्या एकत्र करून गाडीवरील नियंत्रण सुटते ज्यामुळे अपघातला धोका अनेक पटीने वाढतो इत्यादी गोष्टी अलाइनमेंट न केल्यास होऊ शकतात.

बॅलन्सिंग न केल्यास काय नुकसान होते?
गाडीचे व्हील बॅलन्सिंग वेळेवर न केल्यास चाकांचे असंतुलनामुळे अनेक मोठमोठ्या गंभीर समस्या तुमच्यापुढे निर्माण होऊ शकतात त्याचा परिणाम गाडीच्या मायलेज वर आणि सुरक्षेवर पडतो खाली दिलेल्या बाबी तुम्ही नाकारल्यास किंवा लक्ष न दिल्यास तुम्हाला नुकसानचा सामना करावा लागू शकतो.
स्टेअरिंग मध्ये कंपन जाणवते जसे की गाडी ठराविक वेगाने धावत असताना किंवा वेग वाढवताना स्टेअरिंग व्हीलमध्ये जोरदार व्हायब्रेशन जाणू लागतात. व टायरवर स्पॉट वेअर असंतुलित चाकामुळे टायरवर असमान वजन पडते त्यामुळे टायराच्या पृष्ठभागावर विशिष्ट जागी खोलगट किंवा स्पॉट वेअर तयार होतो
सस्पेन्शन मध्ये मोठे नुकसान होऊ शकते जसे की चाके फिरताना वर खाली होतात ज्यामुळे सस्पेन्शनच्या भागावर अतिरिक्त ताण पडतो आणि सस्पेन्शन अकाली खराब होण्याची दाट शक्यता वाढते व सततच्या कंपनामुळे वाहनाचे मुख्य व्हील बेरिंग देखील या आधीच झिजून खराब होऊ शकते.
या सर्व समस्यामुळे प्रवासातील आराम कमी होतो आणि विशेषता लंबा पल्ल्याच्या प्रवासात चालकाचा थकवा वाढू शकतो.

दोन्ही सेवा एकाच वेळी करणे आवश्यक आहे का?
व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग या दोन्ही सेवा एकाच वेळी करणे आवश्यक असे काही नसते जर नवीन टायर बसवल्यावर किंवा गाडीचा टायरला मोठा धक्का बसल्यास दोन्ही करणे फायदेशीर ठरू शकते. तसेच या दोन्ही सेवा दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत जसे की व्हील अलाइनमेंट हे कारचे सस्पेन्शन आणि टायरचा जमिनीशी असलेले कोण अचूक ठरवते व व्हील बॅलन्सिंग मध्ये टायर आणि रिम मधील वजनांचे वितरण समान पातळीवर आणले जाते
तसे बघायला गेल्यास जेव्हा तुम्ही गाडीला नवीन टायर बसवतात तेव्हा दोन्ही सेवा एकाच वेळी करणे अत्यंत फायदेशीर ठरते यामुळे नवीन टायर दीर्घ काय टिकतात तसेच प्रवासादरम्यान गाडीला मोठा धक्का बसल्यास अपघात झाल्यास किंवा खड्ड्यात आढळल्यास दोन्ही गाडीची तर तपासणी करून घ्यावी व गाडी चालवताना स्टेरिंग ला व्हायब्रेशन जाणवणे किंवा गाडी एका बाजूला ओढली जाणे अशी लक्षणे जाणवल्यास जवळील मेकॅनिकल सोबत संपर्क साधून पुढील निर्णय घ्यावा.
खर्च किती येतो?
गाडीचे व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंगचा भारतातील अंदाजे खर्च खालील प्रमाणे आहे जसे की व्हील अलाइनमेंट मध्ये भारतातील सर्वसाधारण गॅरेज किंवा अधिकृत सर्विस सेंटर मध्ये खर्च ₹५०० ते ₹१,५०० दरम्यान येतो व व्हील बॅलन्सिंगचा खर्च हा साधारणपणे ₹३०० ते ₹८०० पर्यंत येतो यामध्ये वजन लावण्याचा खर्च अतिरिक्त असतो.
हॅजबॅग किंवा लहान कारच्या तुलनेत एसयूव्ही , लक्झरी कार आणि मोठ्या गाड्यांसाठी हा खर्च जास्त असतो तसेच स्थानिक गॅरेजच्या तुलनेत अधिकृत कंपनीच्या सर्विस सेंटर मध्ये शुल्क थोडे जास्त असणार आहे व मेट्रो शहरांमध्ये लहान शहरात तुलनेत लेबल चार्ज ही जास्त असणार आहे हे तुम्ही जाणून घ्यावे.
निष्कर्ष
दर्शकांना व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत अलाइनमेंट मुळे वाहनाचे स्टेरिंग आणि रस्त्यावरील पकड मजबूत राहते तर बॅलन्सिंग मुळे चाकाच्या असंतुलनामुळे होणारे वायब्रेशन थांबते या दोन्ही प्रक्रिया नियमितपणे केल्यास तुमच्या गाडीच्या टायरचे आयुष्य वाढते व मायलेजही चांगले मिळते
ह्या सेवा केल्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव तुम्हाला अधिक सुरक्षित व आत्मविश्वास देणारा ठरू शकतो तुमच्या गाडीच्या चांगल्या कामगिरीसाठी आणि टायरांची झीज होऊ नये यासाठी तुम्ही दर १०,००० किलोमीटर नंतर किंवा तुमच्या गाडीमध्ये कोणती समस्या जाणवल्यास मेकॅनिकल कडून तपासणी करून घ्यावे.
आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग ह्या विषयावर विस्तारपणे सांगितलेले आहे ते तुम्ही तुमच्या भावी जीवनात स्वतःच्या क्षड्रायव्हिंग किंवा गाडीची देखभाल करणाऱ्या कलेमध्ये याची भर पडेल. धन्यवाद!!!




Leave a Reply