Tire Maintenance During Rainy season: दर्शकांनो मुसळधार पावसाचे दिवस चालू आहेत आणि या पावसाळ्यात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर तुमच्या कार गाडीच्या टायरची योग्य देखभाल करणे हे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अपघाती संकटांना सामोरे जाऊ लागू नये तर आम्ही सविस्तर प्रमुख मुख्य मुद्द्यांद्वारे तुम्हाला कसे
पावसाळ्यात टायरची योग्य देखभाल करावी याबद्दल सविस्तरपणे खालील लेख मध्ये माहिती सांगितलेली आहे तसेच पावसाळ्यात टायर मेंटेनन्स चेकलिस्ट ही दिलेली आहे तेही तुम्ही पाहून तुमच्या गाडीची पावसाळ्यात टायर मेंटेनन्स करू शकता. चला सुरू करूया..
पावसाळ्यात टायरची योग्य देखभाल कशी करावी ह्याच्यावर प्रमुख मुद्दे:

टायर ट्रेड (खाचा) डेप्थची नियमित तपासणी करा.
टायरच्या ट्रेड डेप्थची असे नियमित तपासणी केल्याने रस्त्यावरील पकड चांगली राहून अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात टळतो. कायद्यानुसार किमान मर्यादा १.६ mm आहे आणि सुरक्षिततेसाठी खोली ३ mm पेक्षा जास्त असावी
तुम्ही तुमच्या गाडीचा टायरची ट्रेड तपासण्याचे काही सुलभ पद्धती खालील प्रमाणे वापरू शकता जसे की
टायर ट्रेड डेप्थ गेज या मोजमाप यंत्राची पिन टायरच्या मुख्य खाचेमध्ये दाबून अचूक खोली मिलिमीटरपर्यंत मोजता येते.
टायर वेअर इंडिकेटर ह्या पद्धतीप्रमाणे सर्व टायर्सवर खाचांच्या आत काही लहान उंचवटे असतात. जेव्हा टायरच्या पृष्ठभाग गुळगुळीत होवून या उंचवटीच्या लेवल ला येतो तेव्हा तयारी बदलण्याची वेळ आली आहे समजावे
नाणे चाचणी हा एक प्रकार तुम्ही १० रुपयाचे नाणे वापरूनही तपासू शकता. नाण्यावरील अशोक स्तंभाचा भाग खाचेमध्ये बुडवून पहा. जर तो पूर्णपणे दिसत असेल, तर ट्रेड डेप्थ कमी झाले आहे आणि टायर बदलणे आवश्यक आहे असे समजावे अशाप्रकारे टायरची स्थिती अचूक तपासण्यासाठी हे सुलभ पद्धती तुम्ही वापरू शकता
१ ] टायरचा हवेचा दाब योग्य ठेवा
पावसाळ्यात वाहनाचे मायलेज सुरक्षेचा आणि टायरचे आयुष्य वाढवण्यासाठी टायर्स मधल्या हवेचा दाब योग्य ठेवणे खूप गरजेचे असते बहुतेक कार आणि दुधाकीसाठी हवेचे आदर्श दाब ३२ ते ३६ PSI दरम्यान असतो
टायर मधील हवेचा दाब योग्य ठेवण्यासाठी खालील तीन-चार बाबी महत्त्वाचे आहेत जसे की तुमच्या कारच्या किंवा बाईकच्या मालकाच्या मॅन्युअल मध्ये किंवा चालकाच्या बाजूच्या दरवाज्यावर दिलेल्या शिफारस केलेला दाब तपासा.
गाडी चालवण्यापूर्वी किंवा टायर थंड असतानाच हवेचा दाब तपासावे तसेच हवेचा दाब अचूक मोजण्यासाठी Digital Tier Pressure Gauge चा वापर करा
हवा जास्त असल्यास गाडीचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असते त्यामुळे टायरचा स्फोट होण्याचा धोका वाढतो त्यामुळे हवेचा जास्त दाब ठेवू नये

२ ] टायरमध्ये कट , क्रॅक आणि फुगवटा तपासा
पावसाळ्याच्या दिवसात टायर्स सुरक्षेसाठी त्यांची नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते जसे की टायरच्या बाजूला दिसणारे कट , खोल क्रॅक आणि फुगवटा हे टायरच्या कुमकुवत संरचनेची लक्षणे असतात ज्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो
या सर्व गोष्टींची तपासणी खालील प्रमाणे करावे जसे की भुगावटा टायरच्या बाहेरील बाजूस कुठे फुगा किंवा फुगवता दर्शनास आहे का हे बारकाईने तपासा जर फुगवटा असेल तर टायरच्या आतील धागे तुटलेले आहेत आणि टायर कधी फुटू शकतो असा अर्थ होतो.
कट टायरच्या मुख्य खाचामध्ये आणि विशेषता नाजूक मानल्या जाणाऱ्या साईड वॉल वर खोल कट किंवा काप आहेत तपासणे जर कट इतका खोल असेल की आतील धागे दिसत असतील तर त्वरित टायर बदलणे गरजेचे असते
३ ] टायर रोटेशन आणि व्हील अलाइनमेंट वेळेवर करा
टायरचे आयुष्य वाढवण्यासाठी दर ८,००० ते १०,००० किमी किंवा ६ महिन्याने टायर रोटेशन आणि व्हील अलाइनमेंट करणे खूप आवश्यक असते. यामुळे टायरची झीज समान पद्धतीने होते इंधनाची बचत होते आणि गाडी चालवताना नियंत्रण मजबूत राहते.
टायर रोटेशनमध्ये पुढील चाकावर इंजिनाचे वजन आणि स्टेरिंग चा जास्त ताण असतो त्यामुळे ती लवकर झिजतात टायर. रोटेशन प्रक्रियेत पुढील आणि मागील चाकांचे अदलाबदल केली जाते यालाच आपण टायर रोटेशन म्हणतो
पावसाच्या खड्ड्यामधून गाडी गेल्यामुळे किंवा वेगाने स्पीड ब्रेकर ओलांडल्यामुळे चाकांचे अचूक कोन बिघडतात. व्हील अलाइनमेंट करून हे कोन मूळ स्थितीत आणले जातात त्यामुळे गाडी एका बाजूला खेचले जात नाही आणि स्टेरिंग सरळ राहते
४ ] जुने आणि झिजलेले टायर वेळेवर बदला
पावसाळ्यात जुने आणि झिजलेले टायर वापरणे हे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात गाडीचे नियंत्रण सुटणे किंवा ब्रेक लागण्यास वेळ लागणे आणि गाडी घसरणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात ट्रेड डेप्थ किमान १.६ mm असणे आवश्यक आहे अन्यथा त्वरित टायर बदलणे गरजेचे असते
जुने आणि झिजलेले टायर वेळेवर बदलल्यामुळे नवीन टायरवरील ट्रेड्स रस्त्यावरील पाणी बाजूला सारण्यास काम करतात आणि टायर झिजल्यावर या ट्रेड नस्ट होतात त्यामुळे टायर आणि रस्त्याच्या मध्ये पाण्याचा थर तयार होतो आणि गाडीवर नियंत्रण सुटते.
पावसाळ्यात रस्ते ओले आणि निसरडे असतात जुन्या टायरचे रबर कडक झाल्यामुळे ते रस्त्याला योग्य पकड देऊ शकत नाहीत
झिजलेल्या टायरमुळे इमर्जन्सी ब्रेक लावल्यास गाडी थांबायला जास्त अंतर लागते त्यामुळे अपघाताची शक्यता काही पटीने वाढते तसेच जुन्या किंवा घासलेल्या टायरचे रबराची जाडी कमी झाल्यामुळे खड्डे किंवा काचेमुळे टायर फुटण्याची किंवा पंचर होण्याची शक्यता खूप असते.

५ ] स्पेअर टायरचीही तपासणी करा
प्रत्येक वेळी ग्राहक रोज वापरत असलेल्या त्या टायर्स वर लक्ष केंद्रित करत असतो आणि आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडणाऱ्या स्पेअर तयार करणे खूप दुर्लक्ष करतो ज्यामुळे पंचर झाल्यास गाडीमध्ये अडकून न राहण्यासाठी स्पेअर टायरची तपासणी करणे खूप महत्त्वाचे असते.
या तपासणीमध्ये हवेचा दाब तपासणी खूप गरजेचे असते जसे की आपण स्पेअर टायर वापरत नसल्यामुळे कालांतराने त्यातील हवा कमी होते म्हणून महिन्यातून एकदा किंवा लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्याचा हवेचा दाब नक्की तपासा फक्त स्पेअर टायर असून चालत नाही तर तो बदलण्यासाठी लागणारे जॅक , पाना आणि इतर आवश्यक साधने गाडीत योग्य स्थितीत असल्याची खात्री करा.
तुमच्याकडे स्पेअर टायर्स कोणत्या प्रकारचा आहे ते तपासा जसे की फक्त तात्पुरत्या वापरासाठी असलेला डोनेट आहे की पूर्ण आकाराचा रेग्युलर टायर आहे हे आधी तपासून घ्या.
६ ] हायड्रोप्लॅनिंग म्हणजे काय आणि ते कसे टाळावे?
पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी साचलेले असते जेव्हा गाडी वेगात असते तेव्हा टायराच्या खाचा हे पाणी बाजूला सारून रस्त्यावरील पकड निर्माण करतात परंतु पाण्याचा वेग व प्रमाण जास्त असेल आणि गाडीचा वेग देखील जास्त असेल तर टायर्स हे पाणी पूर्णपणे बाजूला करू शकत नाहीत. परिणामी टायर व रस्ता यांच्यामध्ये पाण्याची एक पातळी तयार होते आणि गाडी रस्त्यावरून तरंगल्यासारखी होऊन चालकाच्या गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटते या गोष्टीलाच आपण हायड्रोप्लॅनिंग म्हणतो
आणि हे हायड्रो प्लॅनिंग टाळण्यासाठी तुम्ही खालील सुरक्षित गोष्टी करू शकता जसे की ओल्या किंवा पावसाळी रस्त्यावर गाडीचा वेग नेहमी कमी ठेवा जास्त वेगात हायड्रो प्लॅनिंगचा धोका सर्वाधिक असतो
तुमच्या गाडीच्या टायरची ग्रिप चांगली असल्याची खात्री करा गुळगुळीत टायर रस्त्यावरील पाणी व्यवस्थित बाहेर काढू शकत नाहीत
टायर्समध्ये हवा नेहमी कंपनीने सांगितल्याप्रमाणे योग्य प्रमाणात असावी कमी हवेमुळे टायर्स चा आकार बदलतो आणि पाणी विस्थापित करणे खूप कठीण होते. तसेच पावसात गाडी चालवताना क्रूज कंट्रोल चा वापर करू नका हायड्रो प्लॅनिंग झाल्यास अचानक वेग वाढू शकतो.
जर तुमची गाडी हायड्रोप्लॅनिंग करू लागले तर घाबरून न जाता तुम्ही अक्सिलेटर वरून पाय हळुवारपणे बाजूला घ्या. स्टेरिंग घट्ट पकडून ठेवा आणि अचानक ब्रेक लावणे टाळा. टायर्सना पुन्हा रस्ता पकडू देण्याची वेळ द्या हे केल्याने तुमचा हायड्रोप्लॅनिंगचा धोका कमी होऊन जातो.

७ ] पाण्याने भरलेल्या खड्ड्यापासून सावध राहा
पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यास वाहनाच्या थेट चाकावर आघात होऊन टायर फुटणे अलाॅय व्हील्स किंवा रिमला चट्टे पडणे/वाकणे आणि सस्पेन्शनचे गंभीर नुकसान होऊन अलाइनमेंट बिघडणे यासारख्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात.
वरील समस्या आणि त्याचे नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही खबरदारीच्या टिप्स घेणे खूप गरजेचे आहे जसे की पाण्याने भरलेल्या खड्ड्याची खोली अंदाज येत नसेल तर तिथे गाडीचा वेग नेहमी मंद ठेवा.
कंपनीच्या नियमानुसार टायरमध्ये योग्य दाब असावा कमी किंवा जास्त हवेमुळे खड्ड्याचा आघात सहन करण्याची क्षमता खूप कमी होते.
खड्डा दिसल्यावर अचानक ब्रेक मारल्यास गाडीचे वजन पुढे जाते आणि सस्पेन्शन वर जास्त ताण पडतो त्याऐवजी आधीच वेग कमी करा
खड्ड्यावरील गाडी जोरात गेल्यावर लगेच तुमच्या गाडीच्या किंवा टायरच्या कंपनीच्या अधिकृत केंद्रात जाऊन टायर , रिम आणि सस्पेन्शन ची तपासणी करून घ्या या गोष्टी केल्याने तुमचा खड्ड्यापासून बचाव होऊ शकतो.
८ ] पावसात योग्य वेग आणि सुरक्षित अंतर ठेवा
पावसाळ्याच्या दिवसात रस्ते खूप घसरटी होतात आणि विजिबिलिटी खूप कमी असते त्यामुळे सुरक्षेसाठी वाहनाचा वेग नेहमी मर्यादित ठेवा आणि समोरील वाहनापासून कमीत कमी चार सेकंदाचे अंतर ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून अपघाताच्या स्थितीत ब्रेक लावण्याचा अवधी असावा.
पावसाळ्यात वाहन चालवताना खालील विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे जसे की ओला रस्त्यावर टायरची ग्रुप कमी होते त्यामुळे वेग कमी ठेवल्यास गाडी घसरणे किंवा हायड्रो प्लॅनिंगचा धोका राहत नाही तसेच पुढे चालणाऱ्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवल्यामुळे पावसात ब्रेक लागल्यानंतर गाडी थांबायला कोरड्या रस्त्यापेक्षा जास्त वेळ लागतो
दिवसाही हलक्या किंवा मुसळधार पाऊस असल्यास हेडलाईट चालू ठेवा यामुळे इतरांना तुमचे वाहन स्पष्ट कुठे आहे समजू शकेल तसेच प्रवासाला निघण्याआधी टायरमध्ये योग्य हवा आणि चांगली ग्रिप असल्याची खात्री करा तसेच वायपर्स व्यवस्थित काम करतो का हे तपासा.

९ ] टायर मध्ये अडकलेले दगड चिखल आणि कचरा काढा
पावसाळ्याच्या दिवसात टायरमध्ये अडकलेले दगड चिखल कचरा वेळेवर काढणे हे खूप गरजेचे असते ज्यामुळे ट्रेड ची कार्यक्षमता टिकून राहते
दगड आणि काच काढण्यासाठी तुम्ही लहान स्क्रू ड्रायव्हर , चिमटा यांसारखे विशेष टूर वापरू शकता
चिखल आणि चिकटलेल्या कचरा स्वच्छ करण्यासाठी तो कचरा आधी कोरडा होऊन द्यावा किंवा प्रेशर वॉशर चा वापर करून चिखलाचा थर काढून टाका
कचरा आणि खडे काढल्यानंतर टायरला कुठे भेगा फुगे किंवा खिळे तर टोचलेले नाहीत ना याची बारकाईने तपासणी करा हे केल्यामुळे तुमच्या टायरची ग्रिप पावसाळ्याच्या रस्त्यांवर खूप मजबूत राहील.
१ ० ] पावसाळ्यापूर्वी टायर मेंटेनन्स चेक लिस्ट
पावसाळ्यात सुरक्षित आणि आरामदायी ड्रायव्हिंग साठी तुमच्या गाडीचा टायरची काळजी घेणे खूप आवश्यक असते आम्ही तुम्हाला पावसाळ्यात टायर मेंटेनेस कसे करायचे याबद्दल चेक लिस्ट खालील प्रमाणे दिलेले आहे.
वाहनासाठी सोपी आणि चांगल्या प्रकारची चेकलिस्ट खालील प्रमाणे
| क्र. | वाहनासाठी टायर देखभाल चेकलिस्ट |
|---|---|
| 1 | टायराची ट्रेड डेप्थ तपासणी |
| 2 | टायर प्रेशर तपासणी |
| 3 | अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग |
| 4 | स्पेअर टायर |
| 5 | टायरची स्थिती |
वरील दिलेल्या तक्त्याप्रमाणे सर्व गोष्टी योग्यपणे आणि काळजीपूर्वक खबरदारीने तपासणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यात सुरक्षित आणि टेन्शन फ्री ड्रायव्हिंग करता येईल.
१ १ ] टायरच्या देखभालीत होणाऱ्या सामान्य चुका
टायरच्या देखभालीमागे अनेकदा छोट्या मोठ्या चुका कडे तुम्ही दुर्लक्ष करता ज्यामुळे टायरचे आयुष्य कमी होते आणि प्रवासावी तुमच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो यामध्ये काही सर्वात सामान्य चुका आम्ही खालील प्रमाणे नमूद केलेले आहेत त्या तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करावा
- हवेच्या दाबाकडे दुर्लक्ष करणे यामध्ये अनेकदा वाहन चालक महिन्यातून एकदा हवेचे दाब तपासत नाहीत हवेचा दाब कमी असल्यास इंजिनवर ताण पडतो ज्यामुळे मायलेज कमी होते आणि टायर लवकर घासले जाते आणि जास्त हवा भरल्यास टायरचा रस्ता वरील संपर्क कमी होऊन ग्रिप कुमकुवत होते
- टायर रोटेशन न करणे सर्व चारही टायर सारखे दिसत नाहीत मॅन्युअल नुसार दर ५,००० ते ८,००० किमी अंतरावर टायरचे रोटेशन न केल्यास टायर असमान दिसतात
- व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग न करणे यामध्ये खड्डे किंवा गतिरोधकमुळे गाडीची अलाइनमेंट चुकते वेळेवर अलाइनमेंट न केल्यास टायरचा एका बाजूने जास्त गुळगुळीत होते
- वाहन क्षमतेपेक्षा जास्त ओझे भरणे गाडीत क्षमतेपेक्षा जास्त वजन टाकल्यास टायरवरील अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन ते फुटण्याचे किंवा वेळेपेक्षा लवकर खराब होण्याची शक्यता दाट असते
- जुने किंवा कालबाह्य टायर वापरणे यामध्ये जरी टायरचा ट्रेड चांगला दिसत असला तरी रबरच्या वयानुसार ते कडक होतात आणि त्यांची पकड कमी होते त्यामुळे जुने टायर बदलणे गरजेचे असते
- खराब रस्त्यावरून बाहेर जाऊ गाडी चालवणे खड्ड्यातून दगडावरून किंवा स्पीड ब्रेकर वरून अति वेगाने गाडी नेल्यामुळे टायर मोठा आघात होऊ शकतो ज्यामुळे अंतर्गत तारे तुटून टायरवर फुगे येतात किंवा टायर फाटू शकतो
निष्कर्ष
महाराष्ट्रातील तमाम मंडळीनो आमचा तुम्हाला असा सल्ला राहील की नियमित वाहन तपासणी आणि सुरक्षित ड्रायव्हिंग हे केवळ अपघातात धोका कमी करत नाहीत तर तुमचा व तुमच्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत रस्ता सुरक्षा ही वैयक्तिक जबाबदारी आहे हे तुम्ही जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
मंडळीनो तुम्ही तुमच्या वाहनाची नियमितपणे ब्रेक टायरचा हवेचा दाब आणि दिवे तपासा यामुळे होणाऱ्या इंजन बिगडामुळे तुम्हाला अपघाताला सामोरे जाऊ लागू नये तसेच सुरक्षित ड्रायव्हिंग साठी वाहतूक नियमांचे काटकरपणे पालन करा. दारू पिऊन गाडी चालवू नका आणि वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर मुख्यपणे टाळा.
या सर्व गोष्टी केल्याने तुमचा प्रवास हा सुरक्षितपणे होणार आहे तसेच गाडीच्या टायरांची ही पावसाळ्यामध्ये योग्य काळजी घेतल्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढणार आहे. आणि तुम्हाला जर पावसाळ्यात गाडीची काळजी कशी घ्यावी याच्या टिप्स पाहिजे असेल तर आम्ही 10 Monsoon Car Care Tips वरही लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहून घ्यावा आणि तुमची गाडी भविष्यात कोणत्या पुरामध्ये खराब झाली तर त्याचा विमा क्लेम कसा करावा याच्यावरही Insurance Claims for Flood-damaged vehicle या नावाने लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहून घ्यावा. धन्यवाद!!!




Leave a Reply