When and Why Should You Service Your Car? : दर्शकांनो माणसाला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी रोज कसरत करावी लागते त्याचप्रमाणे कारला रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीची चिंता न करता रोजच्या वापरासाठी किंवा लांबच्या प्रवासामध्ये चांगली धावण्यासाठी कारची वेळच्यावेळी तज्ञाकडून सर्व्हिसिंग करून घेणे हे तितकेच आवश्यक असते. आजच्या लेखमध्ये आपण कार सर्व्हिसिंग कधी आणि का करावी? या विषयावर विस्तार मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
कारची सर्व्हिसिंग कधी आणि का करावी ह्या विषयावर नवीन चालकांना किंवा नवीन तरुण कारप्रेमींना कमी किंवा चुकीची माहिती असते. त्यामुळे भविष्यात त्यांच्या कारमध्ये इंजिनच्या किंवा गाडीचे मायलेज व पिकअप कमी होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला चालक म्हणून वेळच्या वेळ सर्व्हिसिंग का आणि कधी करावी या विषयावर तुमच्या ज्ञानात भर पाडण्याचा आजचा प्रयत्न असणार आहे मुख्यतः कारची सर्व्हिसिंग ही इंजिनचे आयुष्य वाढवण्यासाठी तसेच तुमच्या गाडीला मायलेज आणि पिकअप चांगले देण्यासाठी व भविष्यातील वेळच्यावेळी सर्व्हिसिंग न केल्यामुळे होणाऱ्या अचानक मोठ्या खर्चापासून वाचवण्यासाठी कार सर्व्हिसिंग करायची असते. चला सुरू करूया..
कार सर्व्हिसिंग म्हणजे काय?

कार सर्व्हिसिंग म्हणजे तुमच्या कारचे इंजिन , ब्रेक , टायर आणि इतर यंत्रणा सुरळीत चालत आहेत का , याची नियमित तपासणी व देखभाल करणे या सर्वांगीण गोष्टीला कार सर्व्हिसिंग असे म्हणतात यामध्ये इंजिन ऑईल बदलणे , खराब झालेले फिल्टर्स बदलणे , ब्रेक अँड फ्लुइड्सची तपासणी करणे यांचा समावेश होतो. हे तुमच्या वाहनासाठी नियमित आरोग्य तपासणीसारखे असते.
कार सर्व्हिसिंग चे मुख्य प्रकार साधारणपण दोन असतात यात बेसिक सर्व्हिस म्हणजे ऑइल बदलणे , साधी तपासणी आणि मेजर सर्व्हिस जे की जास्त भागांची सखोल तपासणी व दुरुस्ती असे प्रकार असतात. नियमित सर्विसिंग केल्याने कारचे मायलेज खूप चांगले राहते व अचानक रस्त्यात गाडी बंद पडण्याची शक्यता नाहीसी होऊन जाते तसेच नेहमी सर्व्हिसमुळे कारचे आयुष्य वाढते आणि गंभीर व महागड्या समस्या वेळेत लक्षात आल्यावर पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते.
नियमित सर्व्हिसिंग का महत्वाची आहे?
कोणत्याही वाहनाचे नियमित सर्व्हिसिंग करणे खूप महत्त्वाचे असते यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते , इंधनाची बचत होते आणि रस्त्यावर अचानक होणारे ब्रेक डाऊन पूर्णपणे टाळतात. नियमित सर्विसिंगमुळे लहान सहान समस्या आधीच मेकॅनिकलच्या लक्षात येतात त्यामुळे अचानक होणारा मोठा खर्च वाचतो आणि गाडीची सुरक्षा सुनिश्चित होत राहते
नियमित सर्व्हिसिंग केल्यामुळे खालील फायदे होतात जसे की ब्रेक , स्टिअरिंग , सस्पेंन्शन आणि टायरची तपासणी केल्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. जुने इंजिन ऑइल बदल्याने आणि फिल्टर्स साफ केल्याने गाडी सुरळीत चालते आणि मायलेज चांगली होते तसेच वाहनाचे महत्वाचे भाग व्यवस्थित लुब्रिकेटेड राहतात, ज्यामुळे त्यांची झीज कमी होते आणि गाडीच्या सर्विसिंगचा योग्य रेकॉर्ड ठेवल्यास भविष्यात गाडी विकताना तिची चांगली किंमत मिळते.
कार किती किलोमीटरनंतर सर्व्हिस करावी?
साधारणपणे कार उत्पादक कंपन्या १०,००० किलोमीटर किंवा १२ महिने यापैकी जे आधी पूर्ण होईल त्यानुसार सर्विसिंग करण्याची शिफारस करत असतात.
तथापि कारच्या प्रकारानुसार आणि वापराच्या परिस्थितीनुसार यात खालील प्रमाणे तक्त्यात सांगितल्याप्रमाणे बदल होत असतात.
| कार प्रकार | सर्व्हिसिंग अंतर |
|---|---|
| पेट्रोल कार | दर १०,००० किमी किंवा १ वर्षाने |
| डिझेल कार | दर ७,५०० ते १०,००० किमी किंवा ६–१२ महिन्यांनी |
| CNG कार | दर ५,००० ते ७,००० किमी किंवा दर ६ महिन्यांनी |
| नवीन कार (पहिली सर्व्हिस) | साधारणपणे १,००० किमी किंवा १ महिन्यानंतर |
पेट्रोल कार मुख्यतः दर १०,०० किलोमीटर किंवा १ वर्षाने सर्व्हिसिंग करायची असते. डिझेल कार दर ७,५०० ते १०,००० किलोमीटर किंवा ६ ते १२ महिन्यांनी सर्व्हिसिंग करायची असते. सीएनजी कार दर ५,००० ते ७,००० किलोमीटर किंवा दर ६ महिन्यांनी सर्व्हिसिंग करायची असते आणि नवीन कार घेतलेली असेल तर पहिली सर्व्हिस साधारणपणे १,००० किलोमीटर किंवा १ महिन्यानंतर करायचे असते.
जर तुम्ही गाडी प्रामुख्याने जास्त ट्रॅफिक मध्ये किंवा खराब रस्त्यावर चालवत असाल तर दर ६ महिन्यांनी किंवा ५,००० ते ६,००० किलोमीटरवर सर्व्हिसिंग करणे. इंजिनच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर राहत असते. गाडीचे अचूक सर्व्हिसिंग वेळापत्रक पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या कार सोबत मिळालेले (Owner) मॅन्युअल तपासू शकता.

कार सर्व्हिसिंगची गरज दर्शवणारी लक्षणे
तुमच्या कारची कार्यक्षमता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी ठरावीक वेळेत सर्व्हिसिंग करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच डॅशबोर्डवर चेकिंग लाईट लागणे , इंजिनचा आवाज बदलणे , मायलेज कमी होणे , ब्रेक दाबताना किंवा गाडी चालवताना कंपन जाणवणे ही कार सर्व्हिसिंग ची गरज दर्शवणारी प्रमुख लक्षणे आहेत.
१) डॅशबोर्डवरील वाॅर्निंग लाईट्स
डॅशबोर्डवर पिवळ्या रंगाची ‘चेक इंजिन’ लाईट लागणे हे गाडीत काहीतरी बिघाड असल्याची सर्वात मोठी लक्षणे असते. अनेक गाड्यांमध्ये ठराविक किलोमीटर धावल्यानंतर आपोआप सर्विस किंवा पाना (Spanner) आयकॉन येतो
२) असामान्य आवाज आणि कंपन
ब्रेक लावण्यासाठी पेडल दाबताना किंचाळल्यासारखा किंवा धातू घासल्याचा आवाज येणे ब्रेक पॅड संपल्याची लक्षण आहे तसेच इंजिन चालू असताना खटखट किंवा पूर्वीपेक्षा मोठा आवाज येणे हे इंजिनमध्ये बिघाड असल्याचे लक्षण आहे व गाडी चालवताना किंवा ब्रेक मारताना स्टेरिंग व्हील किंवा कारच्या बॉडीला धक्का बसणे हे व्हील अलाइनमेंट असमान लक्षण आहे.
३) कार्यक्षमतेतील घट
इंजिन ऑइल जुने होणे , एअर फिल्टर खराब होणे किंवा टायरचा दाब कमी असणे यामुळे गाडीचे मायलेज अचानक कमी होते. तसेच एक्सेटर दाबल्यानंतर गाडी पूर्वीसारखा वेग घेत नसेल किंवा इंजिन बंद पडत असेल तर पिकअप कमी झाले आहे असे अर्थ असतो आणि गाडी चालवताना एका बाजूला झुकणे याला अलाइनमेंट खराब असल्याचे समस्या असते
४) गळती आणि धूर
गाडीखाली तेलाचे किंवा कूलंडचे डाग आढळणे. याला द्रवपदार्थाची गळती असे म्हणतो. तसेच एक्झॉस्टम्हणून काळा , पांढरा किंवा निळा धुर येणे हे गंभीर इंजिन समस्येचे संकेत असते.
५) ब्रेक आणि गिअर मधील बदल
ब्रेक दाबताना ते खूप खाली जाणे किंवा गाडी थांबायला जास्त अंतर लागने याचा ब्रेकमध्ये बिघाड झालेला आहे असा अर्थ होतो आणि ऑटोमॅटिक गाड्यांमध्ये गिअर बदलताना हिसके बसणे याला गिअर मधला समस्या आली आहे असं म्हणता येईल.

सामान्य कार सर्व्हिसिंगमध्ये काय तपासले जाते?
सामान्य कार सर्व्हिसिंगमध्ये प्रामुख्याने इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर बदलणे, फ्लूइड टाॅप-अप करणे , टायर प्रेशर व झीज तपासणे आणि ब्रेक सस्पेन्शन व बॅटरीची तपासणी करणे या सर्वांचा समावेश होत असतो. मुख्यतः कारची कार्यक्षमता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी केलेल्या गाडीच्या महत्त्वाच्या भागाची तपासणी आणि देखभाल याला आपण सामान्य कार सर्व्हिस म्हणतात.
याच्यामध्ये मुख्य तपासणी खालील प्रमाणे केली जाते:
१) इंजिन आणि ऑइल संबंधित तपासणी
इंजिन ऑइल ठराविक अंतराने जुने इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर बदलली जातात. तसेच एअर व एसी फिल्टर हे साफ केले जातात किंवा घाण असल्यास नवीन बसवले जातात. व स्पार्क प्लग व थ्रोटल बॉडी इंजिनच्या चांगल्या पिकअप आणि मायलेजसाठी हे भाग साफ करून वेळोवेळ तपासले जातात.
२) फिल्टर्स
ऑइल फिल्टर नवीन ऑइल टाकताना इंजिन ऑइल फिल्टर बदलणे बंधनकारक असते.
एअर फिल्टर हवेतील धूळ इंजिनमध्ये जाऊ नये म्हणून एअर फिल्टर स्वच्छ केले जाते किंवा खराब असल्यास बदलला जातो.
केबिन किंवा एसी फिल्टर कारच्या हवा स्वच्छ राहण्यासाठी एसी फिल्टर तपासला जातो.
३) ब्रेक आणि टायर
ब्रेक पॅड्स आणि ब्रेक शू यांची झीज तपासली जाते व आवश्यक असल्यास ब्रेक ऑईल टॉप केली जाते तसेच सर्व चाकामधील सामान्य हवेचा दाब तपासला जातो आणि टायरची स्थिती पाहून टायर रोटेशन , व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग केले जाते.
४) बॅटरी आणि फ्लूइड्स तपासणी
बॅटरीचे व्होल्टेज आणि टर्मिनल्स गंजले आहेत का हे तपासले जाते व बॅटरीचे पाणी टाॅप-अप जाते. तसेच रेडिएटिव्ह कूलंटची पातळी तपासली जाते जेणेकरून इंजिन ओव्हरहीट होणार नाही. आणि ब्रेक आणि क्लच फ्लूइडमधील द्रव्यांची पातळी आणि गुणवत्ता तपासली जाते त्याचबरोबर विंडशील्ड वॉशर फ्लूइड मध्ये वायपर साठी लागणारे पाणी भरले जाते.

अधिकृत सर्व्हिस सेंटर की स्थानिक गॅरेज?
जर वाहन वारंटी मध्ये असेल किंवा इंजिनचे मोठे काम असेल तर अधिकृत कंपनीच्या सेंटरचमध्येच जावावे.
जर साधारण सर्विसिंग करायचे असेल आणि पैशाची बचत करायची असेल तर लोकल गॅरेज तुमच्यासाठी योग्य राहणार आहे
अधिकृत सर्विस सेंटर ( Authorised Service Centre)
फायदे
येथे नेहमी कंपनीचे (OEM) अस्सल आणि खात्रीशीर स्पेअर पार्ट मिळतात.
कंपनीच्या गाड्यांची विशेष माहिती असणारे प्रशिक्षित मेकॅनिकल काम करत असतात.
नवीन वाहनांची वॉरंटी आणि मोफत सर्विसिंग चा लाभ घेण्यासाठी येथे जाणे बंधनकारक असते.
तुमच्या वाहनाच्या सर्विसिंगचा डिजिटल रेकॉर्ड कंपनीच्या सर्व्हवर सुरक्षित राहतो ज्यामुळे भविष्यात रिसेल व्हॅल्यू चांगली मिळू शकते.
तोटे
लेबर चार्ज आणि पार्टसच्या किमती खूप जास्त असतात.
गर्दी जास्त असल्यामुळे सहसा दिवसभर गाडी गॅरेजवरच ठेवावी लागते.
स्थानिक गॅरेज (Local Garage)
फायदे
सर्विसिंग आणि पार्ट चा खर्च अधिकृत सेंटर पेक्षा ३० ते ४०% पर्यंत कमी असतो.
छोटे मोठे काम अगदी कमी वेळात आणि तातडीने पूर्ण करून मिळते.
थेट मेकॅनिकलशी बोलता येत असल्याने नेमकी काय समस्या आहे हे समजावणे सोपे जाते आणि संवादही सरळ असतो.
तोटे
अनेकदा डुप्लिकेट किंवा लोकल बनावटीचे पार्ट्स वापरले जाण्याची शक्यता दाट असते.
वॉरंटी कालावधीत बाहेर काम केल्यास कंपनी वॉरंटी नाकरू शकते.
इंजिन मधील डिजिटल समस्या शोधण्यासाठी आवश्यक असणारे हायटेक स्कॅनर किंवा टूल्स सर्वच गॅरेज मध्ये उपलब्ध नसतात.

सर्व्हिसिंग टाळल्यास काय होऊ शकते?
तुमच्या गाडीचे नियमित सर्विसिंग टाळल्यास तुमच्या गाडीचे इंजिन खराब होणे , मायलेज कमी होणे , ब्रेक निकामी होऊन अपघातात धोका वाढणे आणि दुरुस्तीचा मोठा खर्च तुमच्या डोक्यावर येणे यांसारख्या समस्या सामना करावा लागू शकतो.
१) इंजिनचे नुकसान
वेळेवर इंजिन ऑइल न बदलल्यास ते घट्ट होते आणि इंजिन मधील भागांची झीज वाढवते यामुळे इंजन चा आवाज वाढतो आणि गाडी भविष्यात बंद पडू शकते.
२) मायलेज आणि कार्यक्षमता कमी होते
घाण झालेले एअर फिल्टर किंवा जुने स्पार्क क्लब इंधनाचा वापर वाढवतात परिणामी गाडीचे मायलेज कमी होते आणि पिकप वर ही याचा बेक्कार परिणाम पडतो.
३) सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो
सर्विसिंग दरम्यान ब्रेक , स्टेरिंग आणि सस्पेन्शनची तपासणी केली जाते हे दुर्लक्षित राहिल्यास अचानक ब्रेक निकामी होणे किंवा गाडीवरील नियंत्रण सुटणे यांसारखे जीव घेणे प्रकार तुमच्या बरोबर घडू शकतात
४) वॉरंटी रद्द होते
नवीन वाहनाच्या बाबतीत जर तुम्ही कंपनीने ठरवून दिलेल्या अंतरावर किंवा वेळेत सर्विसिंग केले नाही तर कंपनीची मूळ वारंटी रद्द होऊन जाते.
५) दुरुस्तीचा मोठा खर्च येतो
एक छोट्या सर्विसिंगचा खर्च टाळण्याचा नादात कालांतराने वाहनाचा मोठा भाग खराब होण्याची शक्यता असते आणि मेकॅनिकल कडे दुरुस्तीचा खूप मोठा खर्च तुम्हाला भरावा लागू शकतो

सर्व्हिसिंग खर्च कमी करण्याच्या टिप्स
तुमच्या वाहनाची नियमित आणि योग्य काळजी घेतल्यास सर्विसिंगचा मोठा खर्च तुम्ही सहज टाळू शकता यासाठी ऑथराईज्ड सेंटर किंवा तुमचा विश्वासू मेकॅनिकल कडे जाण्याची प्रयत्न करत रहावा , अनावश्यक कामे टाळा आणि पार्ट ची किंमत तपासा आणि छोटी मोठी कामे स्वस्त मध्ये करून घ्या.
१) नियमित देखभाल आणि लहान कामे स्वतः करा
गाडीचे एअर फिल्टर वेळीस काढून स्वच्छ करा तो खराब नसल्याचे प्रत्येक वेळी बदलण्याची गरज नसते तसेच बाईकची चेन वेळोवेळी स्वच्छ आणि लुब्रिकेट करा यामुळे गाडीचा परफॉर्मन्स सुधारतो आणि नुकसान कळते तसेच आठवड्यातून एकदा टायर मधील हवेचा दाब तपासा योग्य दाबामुळे मायलेज चांगले मिळते आणि टायर लवकर झिजत नाही.
२) सर्व्हिसिंग सेंटर मधील फालतू खर्च टाळा
सर्विसिंग च्या नावाखाली अनेकदा इंजिन कोटिंग (Engine Coating) किंवा सिलेंडर फॅशन अशा महागड्या आणि गैर आवश्यक गोष्टी बिलामध्ये जोडल्या जातात त्या स्पष्टपणे नाकारा.
गाडी सर्विसिंग सेंटरला स्वतः घेऊन जा आणि स्वतःला पिकअप आणि ड्रॉप चे अतिरिक्त चार्जेस यामुळे तुमचे वाचतील व काम सुरू करण्यापूर्वी मेकॅनिकल कडे अंदाजे खर्चाचे कोटेशन घ्या काम झाल्यावर बिल आणि जॉब कार्ड नीट तपासा.
३) ऑइल आणि स्पेअर पार्ट ची निवड योग्य करा
इंजिन ऑइल ची पातळी आणि दर्जा नियमित तपासा जर ते चांगले असेल तर फक्त टॉप अप करत रहा पूर्ण बदलण्याची गरज नसते व कंपनीचे ओरिजनल पार्ट चांगले असतात पण काही वेळा नामांकित कंपनीचे आफ्टरमार्केट स्पेअर पार्ट खूप कमी किमतीत मिळतात त्यांची गुणवत्ताही उत्तम असते ते.
४) ड्रायव्हिंगच्या सवयी आणि सुरक्षा
तुम्हाला अचानक वेगाने गाडी वाढवणे किंवा जोरात ब्रेक लावणे यांसारख्या सवयी असतील तर त्या सुधारण्याची गरज आहे कारण यामुळे इंजन आणि ब्रेकपॅड वर ताण येतो व त्यांचे आयुष्य कमी होऊन जाते.
तसेच गाडीची सर्विसिंग कधीही लांबणीवर टाकू नका छोट्या समस्या कडे दुर्लक्ष केल्यास पुढे तुमचा मोठा खर्च होऊ शकतो.
निष्कर्ष
दर्शकांनों आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कार सर्विसिंग बद्दल ती कशी करावी पासून ते कोठे करावी आणि सर्विसिंग केल्यास काय होऊ शकते तसेच तुमचा सर्विसिंग मध्ये खर्च कसा कमी करता येईल यांसारख्या विषयावर उपयुक्त ट्रिक आणि टिप्स या लेख मध्ये विस्तार मध्ये दिलेले आहेत त्यात तुम्ही वाचून तुमच्या रोजंदरीच्या आयुष्यात वापरण्याचा प्रयत्न करा.
पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला रात्रीचा प्रवासात भीती वाटत असेल तर ती कशी दूर करावी याच्यावर Tips for night Driving in Rainy season या नावाने लेख लिहिलेला आहे तसेच पावसाळ्याच्या दिवसात गाडीला गंजण्यापासून वाचवण्यासाठी Tips for Prevent Rust and Corrosion During Monsoons या विषयावरही लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद!!!




Leave a Reply