EV Driving Range कशी वाढवावी? प्रत्येक EV मालकाने जाणून घ्याव्यात अशा 15 भन्नाट टिप्स

How to improve EV Driving Range : दर्शकांनों सध्याच्या काळात वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमती आणि भारत सरकारचे E-20 पेट्रोल विक्रीचे धोरण व सामान्य जनतेचे आपल्या पर्यावरणाची काळजी यामुळे इलेक्ट्रिक वाहनाची (EV) लोकप्रियता वेगाने वाढत आहे. मात्र या गाड्या वापरताना किंवा खरेदी करताना ड्रायव्हिंग रेंज हा सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरतो.

ड्रायव्हिंग रेंज म्हणजे बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर वाहन किती अंतर धावू शकते याला आपण ड्रायव्हिंग रेंज म्हणतो तसेच प्रवासाचे नियोजन करण्यासाठी आणि रस्त्यात गाडी थांबण्याची भीती टाळण्यासाठी तुमच्या वाहनाचे रेंज किती आहे हे समजणे गरजेचे आहे ह्या लेखमध्ये आम्ही तुम्हाला रेंज म्हणजे काय? ती महत्त्वाची का आहे? आणि ती कोण कोणत्या उपायाने वाढवायचे हे सविस्तरपणे सांगणार आहोत. चला सुरू करूया..

How to improve EV Driving Range
EV Driving Range कशी वाढवावी? प्रत्येक EV मालकाने जाणून घ्याव्यात अशा 15 भन्नाट टिप्स

EV Driving Range म्हणजे काय?

EV Driving Range म्हणजे एखादी इलेक्ट्रिक वाहन त्याची बॅटरी एकदा पूर्ण १००% चार्ज केल्यावर एकूण जितके अंतर (किलोमीटर) कापू शकते त्या क्षमतेला आपण EV Driving Range असे म्हणतो. सोप्या भाषेत सांगायच झाल्यास एका सिंगल चार्जमध्ये तुमची गाडी किती किलोमीटर जाऊ शकते यालाच ड्रायव्हिंग रेंज म्हणतात.

ड्रायव्हिंग रेंज वर परिणाम करणारे खूप सारे घटक असतात जसे की बॅटरीची क्षमता जितकी जास्त तितकी वाहनाची ड्रायव्हिंग रेंज अधिक असते व ड्रायव्हरची ड्रायव्हिंग स्टाईल व ज्या हवामानात गाडी चालवायचे ते वातावरण आणि रस्त्यांची परिस्थिती या सर्व प्रमुख घटकांवर ड्रायव्हिंग रेंज अवलंबून असते.

EV Driving Range कशी वाढवावी? इलेक्ट्रिक वाहनांची रेंज सुधारण्यासाठी खालील 11 प्रभावी उपाय

How to improve EV Driving Range
EV Driving Range कशी वाढवावी? प्रत्येक EV मालकाने जाणून घ्याव्यात अशा 15 भन्नाट टिप्स

१) योग्य ड्रायव्हिंग सवयी अंगीकारा

सुरक्षित आणि बॅटरीची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी योग्य ड्रायव्हिंग सवयी अंगीकारणे खूप गरजेचे असते चांगल्या ड्रायव्हिंग मुळे केवळ अपघातांचा धोका टळत नसतो तर वाहनाचे आयुष्य वाढवून बॅटरीमध्ये मोठी बचत होत असते.

इलेक्ट्रिक वाहनांना जागच्या जागी झटपट टॉर्क मिळत असतो त्यामुळे एक्सीलेटर अचानक दाबल्यास गाडी वेगाने पुढे धावते पण यामुळे बॅटरी खूप लवकर संपते व नेहमी संथ आणि हळूहळू वेग वाढवल्यास बॅटरीवर जास्त ताण पडत नाही. व ईव्हीमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग तंत्रज्ञान असते जेव्हा तुम्ही अचानक ब्रेक न दाबता हळूहळू गाडीचा वेग कमी करतात तेव्हा ब्रेक लावताना तयार होणारी ऊर्जा पुन्हा बॅटरीत साठवली जाते अचानक ब्रेक दाबल्यास ही ऊर्जा वाया जाते आणि ब्रेक पॅड झिजतात.

ईव्ही चालवताना वारंवार वेग बदलणे टाळावे हायवे किंवा रिकाम्या रस्त्यावर एक स्थिर वेग राखल्यास बॅटरीचा वापर नियंत्रित राहतो आणि गाडी उत्तम मायलेज म्हणजेच रेंज देते तसेच वारंवार ओव्हरटेक करण्यासाठी गाडीचा वेग अचानक वाढवावा लागतो यामुळे बॅटरीतील ऊर्जा वेगाने खर्च होते. सुरक्षित अंतर राखून आणि संयमाने वाहन चालवणे ईव्हीसाठी फायदेशीर ठरते.

ईव्हीमधील इको मोड हा रेंज वाढवण्याचा सर्वात उत्तम मार्ग असतो हा मूळ वाहनाचा वेग आणि बॅटरीचा वापर मर्यादित करतो ज्यामुळे शहरात किंवा गर्दीच्या ठिकाणी ड्रायविंग करताना बॅटरीची खूप बचत होते.

२) योग्य वेग ठेवल्यास रेंज वाढते

जास्त वेगाने वाहन चालवल्यास हवेचा रोध(Aerodynamic Drag) वाढतो यामुळे मोटरला जास्त ताकद लावावी लागते आणि बॅटरी वेगाने संपते.

गाडीची रेंज वाढवण्यासाठी योग्य वेग हा शहरामध्ये रहदारी आणि सिग्नलमुळे वारंवार थांबावे लागते अशावेळी ४० ते ५० किमी/तास हा वेग आदर्श मानला जातो. या वेगामुळे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग द्वारे बॅटरी पुन्हा चार्ज होण्यास मदत होते तसेच हायवेवर वाहनाचा वेग हा ७० ते ८० किमी/तास राखल्यास बॅटरीचा वापर मर्याद राहतो आणि सर्वोत्तम रेंज मिळते जर 100 किमी/तास पेक्षा जास्त वेग ठेवल्यास रेंज कमालीची घटत जाते.

महामार्गावर क्रूज कंट्रोलचा वापर केल्याने वाहनाचा वेग स्थिर राहतो यामुळे नको असलेले प्रवेश हालचाल टळते. परिणामी, बॅटरीचा वापर नियंत्रित राहून वाहनांची रेंज खूप जास्त प्रमाणात वाढते.

How to improve EV Driving Range
EV Driving Range कशी वाढवावी? प्रत्येक EV मालकाने जाणून घ्याव्यात अशा 15 भन्नाट टिप्स

३) Regenerative Braking चा योग्य वापर

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग हे इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांमधील एक आधुनिक तंत्रज्ञान आहे जिथे नेहमीच्या गाड्यांमध्ये ब्रेक लावल्यावर गतीचे रूपांतर उष्णतेत होते आणि ती ऊर्जा वाया जाते मात्र या तंत्रज्ञानामुळे ब्रेक लावताना वाया जाणारी ऊर्जा वाया न जाता तिचे विजेमध्ये रूपांतर होत असते आणि ह्यालाच आपण रीजनरेटिव्ह ब्रेकिंग असे म्हणतो.

जेव्हा तुम्ही चालत्या गाडीवरून पाय काढता किंवा ब्रेक दाबता, तेव्हा गाडीची इलेक्ट्रिक मोटर उलट दिशेने फिरू लागते या प्रक्रियेत मोटर एका जनरेटर सारखे काम करते गाडीच्या गतीचा वापर करून ही मोटर वीज तयार करत असते ही तयार झालेली वीज थेट गाडीच्या मुख्य बॅटरी पॅक मध्ये पाठवली जाते ज्यामुळे बॅटरी पुन्हा चार्ज होते आणि अशाप्रकारे ब्रेक लावताना बॅटरी चार्ज होते

४) बॅटरीची योग्य देखभाल करणे

बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि तिची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्या बॅटरीची योग्य देखभाल करणे खूप गरजेचे असते आज काल बहुतांश उपकरणांमध्ये Lithium ion बॅटरी वापरली जाते या बॅटरीची योग्य काळजी घेतल्यास ती दीर्घकाळ चांगली टिकून राहते.

बॅटरी कधीही पूर्णपणे संपू देऊ नये किंवा सतत पूर्ण चार्ज करू नये इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी नेहमी २०% ते ८०% च्या दरम्यान ठेवावी ही सर्वात उत्तम पर्याय मानली जाते तसेच जेव्हा चार्जिंग २०% च्या खाली येईल तेव्हा गाडी चार्जिंगला लावावे आणि ८०% झाल्यावर काढावे यामुळे बॅटरीच्या सेल्सवर जास्त ताण पडत नाही आणि तिची कार्यक्षमता टिकून राहते.

वाहनाची बॅटरी सतत १००% पर्यंत चार्ज करणे टाळावे जसे की रोज १००% चार्ज केल्याने बॅटरीच्या अंतर्गत घटकांचा ऱ्हास वेगाने होतो लांबच्या प्रवासाला निघतानाच फक्त पूर्ण चार्जिंग करावे. रोजच्या वापरासाठी ८०% चार्जिंग पुरेसे असते.

बॅटरी पूर्णपणे शून्य होईपर्यंत गाडी चालवणे म्हणजे डिस्चार्ज करणे अत्यंत धोक्याचे आहे बॅटरी पूर्ण रिकामी झाल्याने तिची चार्ज साठवून ठेवण्याची क्षमता कायमची कमी होऊ शकते. तसेच उष्ण तापमान व तीव्र उन्हात गाडी थेट सूर्यप्रकाशात उभे न करता सावलीत पार्क करावी तसेच गाडी चालवून आल्या आल्या लगेच ती चार्जिंगला लावू नये बॅटरी थोडी थंड झाल्यावरच प्लग करावे सतत फास्ट चार्जिंगचा वापर टाळावा कारण यामुळे बॅटरी खूप गरम होऊ शकते.

How to improve EV Driving Range
EV Driving Range कशी वाढवावी? प्रत्येक EV मालकाने जाणून घ्याव्यात अशा 15 भन्नाट टिप्स

५) टायर प्रेशर आणि वाहनाची देखभाल करणे

वाहनाची नेहमी देखभाल आणि टायर मधील हवेचा योग्य प्रेशर हे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी खूप महत्त्वाचे असते अनेकदा वाहन चालक यांसारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे भविष्यात त्यांच्या उरावर मोठा खर्च आणि अपघाताचा धोका निर्माण होतो.

कार उत्पादकाने सांगितलेल्या मापकाप्रमाणे योग्य टायर प्रेशर राखल्याने वाहनावरील नियंत्रण उत्तम राहत असते. व टायर्स मध्ये हवा कमी असल्यास टायर आणि रस्ता यांच्यातील घर्षण वाढते यामुळे इंजिनवर अतिरिक्त ताण पडतो व इंधनाचा वापरही वाढतो ज्याचा थेट परिणाम वाहनाच्या रेंजवर होऊ शकतो

टायरच्या देखभालीमध्ये व्हिल अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि अलाइनमेंट बिघडल्यास वाहन एका बाजूला ओढले जाते आणि टायर एका बाजूने जास्त घासले जाते. ठराविक किलोमीटर नंतर अलाइनमेंट करणे खूप गरजेचे असते आणि व्हिल अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग याच्यावर आम्ही लेख विस्तार मध्ये लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता.

६) अतिरिक्त वजन कमी ठेवा

प्रवास करताना किंवा दैनंदिन वापरामध्ये तुमच्या गाडीमध्ये अतिरिक्त वजन असणे हे चांगले चिन्ह नाहीये गाडीतील अनावश्यक सामान काढून टाकल्यास गाडीच्या रेंजमध्ये बचत होत असते अनेकदा आपण गाडीच्या डिक्की मध्ये किंवा सीटवर न लागणाऱ्या जड वस्तू ठेवून देतो यामुळे गाडीचे वजन विनाकारण वाढते.

ईव्हीमध्ये वजन वाढल्याने मोटरला गाडी पुढे ढकलण्यासाठी ऊर्जा जास्त लागते जितकी ऊर्जा जास्त लागेल तितकीच बॅटरी वेगाने संपते आणि एका चार्जमध्ये मिळणारे अंतर लक्षणीयरित्या कमी होते.

How to improve EV Driving Range
EV Driving Range कशी वाढवावी? प्रत्येक EV मालकाने जाणून घ्याव्यात अशा 15 भन्नाट टिप्स

७) एअर कंडिशनर आणि इतर इलेक्ट्रिक फीचर्स चा वापर करणे

इलेक्ट्रिक वाहनामध्ये एअर कंडिशनर आणि हिटर चा वापर थेट गाडीच्या ड्रायव्हिंग रेंज वर परिणाम करत असतो केबिनचे तापमान नियंत्रित करण्यासाठी बॅटरी मधील ऊर्जा वापरली जाते त्यामुळे रेंज लक्षणीयरित्या कमी होऊ शकते.

उन्हाळ्यात AC सुरू केल्यास बॅटरीवर जास्त ताण पडतो आणि वाहनाचे एकूण रेंज साधारणपणे १५% ते २०% पर्यंत कमी होऊ शकते. कॉम्प्रेसर सतत चालू राहिल्याने ऊर्जा जास्त खर्च होत असते व हिवाळ्यात केबिन हीटरचा वापर रेंज अधिक वेगाने घटवतो. पारंपारिक केबिन हिटर बॅटरीची ऊर्जा थेट उष्णतेत रूपांतरित करतो यामुळे रेंज ३०% पर्यंत घसरू शकते हीट पंप असलेल्या गाड्यांमध्ये हा परिणाम थोडा कमी होतो.

संपूर्ण केबिन गरम करण्यापेक्षा सीट हीटर आणि स्टीअरिंग व्हिल हीटर वापरणे अधिक फायदेशीर ठरत असते सीट हीटर थेट शरीराला उष्णता देतात आणि कॅबिन हिटरच्या तुलनेत खूपच कमी ऊर्जा वापरत असतात यामुळे तुमच्या गाडीची रेंज खूप बचत होऊ शकते आणि रेंज टिकून ठेवण्यासाठी या फीचर्सचा हुशारीने वापर करावा गाडी चार्जिंगला असतानाच प्री-कॉलिंग किंवा प्री-हीटिंग करून घ्यावे प्रवासी दरम्यानिंग गरज नसताना AC किंवा हीटर चालू ठेवू नये.

८) योग्य चार्जिंग सवयी

इलेक्ट्रिक कारची बॅटरी महागडी आणि खूप महत्त्वाची असते तिचे आयुष्य वाढवण्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने चार्जिंग करणे हे खूप गरजेचे असते जसं की रोजच्या वापरासाठी स्लो चार्जिंग सर्वोत्तम असते यामुळे बॅटरी कमी गरम होते आणि बॅटरी सेलचे आरोग्य उत्तम राहते व बॅटरी दीर्घकाळ टिकते.

हायवेवर प्रवास करताना किंवा तातडीच्या वेळी डीसी फास्ट चार्जिंग वापरावे सततच्या फास्ट चार्जिंगमुळे बॅटरीवर ताण येऊ शकतो व ती लवकर खराब होऊ शकते तसेच घरामध्ये रात्री स्लो चार्जिंग करणे खूप चांगली असते मात्र कारमध्ये ऑटो-कट फीचर्स असेल तर बॅटरी नेहमी १००% चार्ज करून रात्रभर सोडू नका.

कार निर्मात्याने दिलेल्या मान्यता प्राप्त चार्जेचे चार्जर वापरा स्थानिक किंवा निकृष्ट दर्जाचे केबल्समुळे शॉर्टसर्किट किंवा आगीचा धोका निर्माण होऊ शकतो व ईवीची बॅटरी नेहमी २०% ते ८०% दरम्यानच ठेवावी ती पूर्ण रिकामी किंवा नेहमी १००% चार्ज करणे टाळावे.

How to improve EV Driving Range
EV Driving Range कशी वाढवावी? प्रत्येक EV मालकाने जाणून घ्याव्यात अशा 15 भन्नाट टिप्स

९) ट्रिपचे नियोजन करा

इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे लांब प्रवासाची नियोजन करताना खूप विचारपूर्वक आणि वेगवेगळ्या निकषांचा वापर करून करावा जसं की प्रवासाला निघण्यापूर्वी मार्गावरील चार्जिंग टेशन आधी शोधून ठेवा यामुळे वाहनाची बॅटरी संपण्याची भीती राहणार नाही इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग पॉईंट्स निश्चित करणे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

प्रवासादरम्यान अचूक मार्गदर्शन साठी Google Maps सारखी आधुनिक Navigation Apps वापरा. हे ॲप्स तुम्हाला सर्वात सोपी आणि कमी वेळेत रस्ता दाखवते व प्रवासात वेळ वाया जाऊ नये म्हणून नेहमी ट्रॅफिक टाळायचा प्रयत्न करा ॲप्स मधील लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स पाहून पर्यायी मार्गाची निवड करा तसेच लांब प्रवासाचे नियोजन करताना वाहनाची तांत्रिक तपासणी करून घ्या प्रवासात ठराविक अंतराने विश्रांतीसाठी ब्रेक निश्चित करून ठेवा.

१०) हवामानाचा रेंजवर परिणाम

हवामानाचा इलेक्ट्रिक वाहनाच्या रेंजवर खूप मोठा परिणाम होत असतो वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे बॅटरीवर वेगवेगळ्या पद्धतीने ड्रायव्हिंग टिप्स वापरणे गरजेचे असते जेणेकरून रेंज वर त्याचा परिणाम थेट होणार नाही. जसं की उन्हाळ्यात ‌अति उष्णतेमुळे बॅटरी लवकर गरम होते बॅटरी सुरक्षितता म्हणत ठेवण्यासाठी कारची ‘थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम’ सतत काम करत असते तसेच प्रवासांच्या सुखासाठी केबिनमध्ये AC मोठ्या प्रमाणात वापरला जातो या दोन्ही गोष्टीमुळे बॅटरीची ऊर्जा वेगाने कमी होते आणि गाडीची रेंज अंदाजे १०% ते १५% नी कमी होते.

हिवाळ्यात अति थंडीमुळे बॅटरी मधील रासायनिक प्रक्रिया मंदावते ज्यामुळे तिची ऊर्जा साठवण क्षमता कमी होत असते तसेच केबिन गरम ठेवण्यासाठी वापरले जाणारे हीटर एसी पेक्षा जास्त ऊर्जा खात असते त्यामुळे हिवाळ्यात ईव्हीची रेंच सर्वात जास्त म्हणजे सुमारे 20 ते 30 टक्के पर्यंत घटू शकते.

पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याची खोलीचा अंदाज घेऊन गाडी संथ गतीने चालवणे व निसर्डा रस्त्यावर टायरची पकड राहावी म्हणून रिजेनरेटिव्ह ब्रेकिंगचा योग्य पणाने वापर ठेवा व अचानक येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी बॅटरी आणि पाण्याचा संपर्क टाळावे

११) EV Range वाढवण्यासाठी अतिरिक्त टिप्स

  • कार उत्पादक सातत्याने नवीन सॉफ्टवेअर अपडेट जारी करत असतात त्यामुळे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम सुधारते आणि रेंज वाढण्यास मदत होते त्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट वेळेवर करत जावा.
  • वाहनाचा वेग अचानक वाढवणे किंवा अचानक ब्रेक दाबणे टाळावे इको मोडचा वापर करून आणि रीजेनरेटिव्ह ब्रेकिंगचा फायदा पुरेपूर करून घ्या ज्यामुळे चार्जिंग टिकून राहू शकते.
  • प्रवास सुरू करण्यापूर्वी वाहन चार्जिंगला जोडलेले असतानाच बॅटरी प्री-कंडिशन करा यामुळे बॅटरी योग्य तापमानाला येते आणि प्रवास दरम्याने जास्त ऊर्जा वाया जात नाही.
  • ईव्हीसाठी खास डिझाईन केलेले लो रोलिंग रेजिस्टन्स टायर वापरा. टायरमधील हवेचा दाब नेहमी योग्य प्रमाणात ठेवा ज्यामुळे मोटरवरचा ताण कमी होऊन गाडीची रेंज सुधारते.
  • हायवेवर गाडी चालवताना खिडक्या बंद ठेवा वाहनावरील अतिरिक्त क्षेताचे रॅक किंवा जड सामान काढून टाका ज्यामुळे हवेचा रोज कमी होतो आणि ऊर्जेची बचत होते.

निष्कर्ष

दर्शकांनों वरील सांगितलेल्या सर्व माहितीनुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या सवयी बदलल्या तर भविष्यात तुम्हाला याचा खूप मोठा आणि सकारात्मक फरक दिसणार आहे इलेक्ट्रिक वाहन वापरत असताना आपण घेतलेली काळजी आणि केलेली योग्य देखभाल तुमच्या वाहनाची आयुष्य वाढवण्यास मदत करत असते.

आजच्या काळात इलेक्ट्रिक वाहन हे केवळ एक आधुनिक पर्यायी नाहीये तर ती आर्थिक दृष्ट्या कमालीची किफायतशीर आणि निसर्गासाठी पूर्णपणे पर्यावरण पूरक असलेली गाडी आहे. सरकारचे वेगवेगळे इथेनॉल संबंधित धोरणे आणि पेट्रोलचे वाढत्या दरामुळे तुम्हाला अशा कोणत्याही त्रासाला सामोरे जायचे इच्छा नसेल तर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकता वरील दिलेल्या सर्व माहितीचा तुम्ही तुमच्या आयुष्यात ड्रायव्हिंग करताना वापर करावा. धन्यवाद!!!