Insurance Claims for Flood-Damaged Vehicles : दर्शकांना पूर्ण महाराष्ट्रभर पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाने आपले रुद्ररूप दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना आलेला पूर आणि मोठमोठ्या पुणे-मुंबई शहरामध्ये साचलेले पाणी यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे तसेच अनेकदा कार , दुचाकी किंवा इतर वाहने पाण्यात अडकतात आणि त्या वाहनांचे इंजिन , इलेक्ट्रिकल सिस्टीम , इंटेरियर तसेच इतर महत्त्वाचे भाग खराब होतात अशा परिस्थितीत वाहन मालकासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे विमा दावा (insurance claim) कसा करायचा?
दर्शकांना योग्य माहिती आणि योग्य वेळी केलेली हालचाल यामुळे तुमचा विमा दावा सहज मंजूर होऊ शकतो. या लेखात पूरग्रस्त वाहनांसाठी विमा दावा कसा करायचा याची संपूर्ण प्रक्रिया , त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे , दावा मंजूर होण्यासाठी घ्यायची काळजी आणि इतर महत्त्वाच्या टिप्स याबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली जाणार आहे. चला सुरू करूया..

पुरामुळे वाहनांचे नुकसान कसे होते?
पुराच्या पाण्याच्या तुमच्या वाहनाच्या विविध भागावर गंभीर परिणाम होऊ शकतो जसे की इंजिन मध्ये पाणी शिरल्यास इंजिन जाम होऊ शकते. याशिवाय बॅटरी , वायरिंग , सेन्सर्स , ECU , ब्रेक सिस्टीम , गिअर बॉक्स आणि वाहनातील इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही मोठे नुकसान होऊ शकते तसेच वाहनाच्या आतील इंटेरियर , आतील सीट्स , कार्पेट , डॅशबोर्ड आणि इतर भागांनाही ओलावा आणि चिखलामुळे खूप हानी पोहोचू शकते.
यामुळेच पुरानंतर वाहन सुरू करण्याची घाई न करता खालील प्रमाणे योग्य प्रक्रिया अवलंबून पुढील भूमिका घेणे अत्यंत आवश्यक असते.
पूर आल्यास काय करावे आणि काय करू नये?
पूर आल्यास किंवा तुमच्या कार मध्ये पाणी भरल्यावर तर कालच्या सुरक्षेसाठी व विमाच्या दाव्यासाठी काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
काय करावे
- सर्वप्रथम घटनेची माहिती त्वरित कॉल किंवा ॲपवरून विमा कंपनीशी संपर्क साधून सांगावे
- कालच्या आजूबाजूला पाणी साचल्याचे , पुराची पातळी आणि कारचे नुकसान झाल्याचे फोटो व व्हिडिओ वेगवेगळ्या कोनातून काढून पुरावे गोळा करावे.
- पुरामध्ये कार सुरक्षित असल्यास कारची बॅटरी त्वरित काढून टाका जेणेकरून शॉर्ट सर्किट टळेल.
- स्वतः कार चालवण्याची किंवा पाण्यामध्ये ढकलण्याची प्रयत्न करू नका विमा कंपनीच्या मदतीने किंवा मेकॅनिकल कडून कार टो करून अधिकृत सर्विस सेंटरला पाठवा.
- तुमच्याकडे गाडीचे आरसी , ड्रायव्हिंग लायसन्स आणि मुळे पॉलिसीचे कागदपत्र तसेच ह्या लेख मध्ये खाली सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र तयार करून ठेवा.
काय करू नये
- तुमची गाडी अजिबात चालू करू नका जेणेकरून इंजिन मध्ये पाणी जाऊन ते कायमचे खराब होऊ शकते ज्याला आपण इंजिन सीज असे म्हणतो
- विमा कंपनीच्या सर्वेअरची तपासणी होण्याआधी कारचे कोणते भाग उघडू नका किंवा दुरुस्त करू नका स्वतःला सर्व कळते असं म्हणून पुढे पुढे स्टंटबाजी करू नका.
- जर रस्त्यावर पाणी साचले असेल तर त्यातून कार नेण्याचा प्रयत्न करू नका. जाणूनबुजून पाण्यातून कार नेल्यास कंपनी त्यास ड्रायव्हरचा निष्काळजीपणा मानून क्लेम नाकरू शकते.
- पूर्णतः थर्ड पार्टी विमा पॉलिसीवर अवलंबून राहू नका पुर किंवा नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीसाठी कॉम्प्रेसिव्ह पॉलिसी असणे गरजेचे आहे थर्ड पार्टी असल्यास पुराच्या नुकसानीचा क्लेम मिळत नाही.
वाहन पाण्यात अडकल्यास सर्वप्रथम काय करावे?
वाहन पाण्यात अडकल्यास सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गाडीचे इंजिन अजिबात सुरू करू नका आणि तुम्ही तुमच्या कार मध्ये असल्यास गाडी अजिबात सुरू करू नका तसेच जर पाण्याचा दाब जास्त असेल दरवाजे उघडत नसतील तर पावर विंडो खाली करण्याचा प्रयत्न करा किंवा बाजूच्या खिडकीचे काच जोरात मारून फोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतर पाणी कमी झाल्यावर आणि शक्य असल्यास गाडी न्यूट्रल गियर मध्ये टाकून ढकलत सुरक्षित किंवा उंचीवरच्या जागेवर या तसेच तुम्हाला तांत्रिक समज असेल तर कारचे बॅटरी कनेक्शन डीस्कनेक्ट करा ज्यामुळे शॉर्ट सर्किट टळेल.
सर्वात महत्त्वाचे लगेचच विमा कंपनी आणि रोड साईड असिस्ट ला कॉल करा आणि क्रेन द्वारे गाडी सर्विस सेंटरला पाठवा त्यातून पुढे तुम्हाला विमाचा क्लेम कसा मिळवायचा हे खाली सांगितले आहे.

क्लेम करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालील प्रमाणे
तुम्हाला विमा क्लेम करण्यासाठी खालील प्रमाणे आठ ते नऊ गोष्टी करणे महत्त्वाचे असते त्या आम्ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालील प्रमाणे सांगितलेले आहे ते तुम्ही पालन करावे जेणेकरुन तुमचा क्लेम नाकारला जाऊ नये.
१ ] सर्वप्रथम नुकसानाचे फोटो आणि व्हिडिओ काढा
विमा कंपनी प्रत्येक क्लेमचा बारकाईने तपासणी करतात कारण ती किती पाण्यात बुडाली होती आणि नुकसान कशामुळे झाले याचा थेट आणि निर्विवाद पुरवा म्हणजेच तुमचे फोटो आणि व्हिडिओ आहेत त्यामुळे कंपनीला क्लेम नाकारण्याची संधी मिळत नाही आणि तुमचा तुमच्याकडे ठोस पुरावा राहतो
फोटो आणि व्हिडिओ काढल्यामुळे तुमच्या कारच्या टायर पर्यंत , बोनेट पर्यंत किंवा छतापर्यंत पाणी होते हे स्पष्ट होते त्यामुळे इंजिन मध्ये किंवा कारच्या आतील भागात पाणी कसे शिरले हे सर्व समजायला सोपे जाते आणि क्लेम प्रक्रियेला गती मिळते
जर तुम्ही जाणून-बुजून साचलेल्या पाण्यात गाडी घातली तर विमा कंपनी चालकाच्या निष्काळजीपणा म्हणून क्लेम करू शकते पण जर तुमच्या पार्किंग मध्ये किंवा अचानक आलेल्या पुरात गाडी अडकली असेल तर तिथल्या व्हिडिओ आणि फोटोमुळे हे सिद्ध होते आणि तुमची चूक नव्हती या मुळे तुमच्यावरचा निष्काळजीपणाचा आरोप टळतो.
अनेकदा विमा कंपन्यांना वाटते की जुने झालेले नुकसान पुराचे कारण सांगून क्लेम केला जात आहे घटनेच्या ठिकाणाचा फोटो काढल्यास नुकसानीचा आणि पुरात थेट संबंध जोडता येतो आणि तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला जात नाही
सर्विस सेंटर किंवा अधिकृत गॅरेजमध्ये गाडी नेण्यापूर्वी तुमच्याकडे फोटो असल्यास गॅरेजवाले तुम्हाला मूर्ख समजून मूळ नुकसानापेक्षा जास्त बिल लावून फसवू शकत नाहीत तसेच इन्शुरन्स सर्वेअर येण्यापूर्वी गाडीची स्थिती काय होती याची नोंद राहते
फोटो आणि व्हिडिओ काढताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा:
- कारचा नंबर प्लेट स्पष्ट दिसेल असा फोटो काढा
- कालच्या चारही बाजूने पुढून मागून दोन्ही बाजूने फोटो घ्या
- कालच्या आत डॅशबोर्ड सीड्स पाणी गेले असल्यास तिथले फोटो काढा.
- आजूबाजूच्या परिसराचा छोटा व्हिडिओ बनवा जेणेकरून पुराची भीषणता कंपनीला समजेल.
२ ] विमा कंपनीला त्वरित माहिती द्या
विमा कंपनी अथर्वित माहिती देणे गरजेचे आहे आणि ती कशी द्यावी याची माहिती खालील प्रमाणे
सर्वप्रथम वाहन पाण्यात अडकल्यास किंवा नुकसान झाल्यापासून 24 ते 48 तासाच्या आत विमा कंपनीला मिळवणे बंधनकारक असते.
उशिरा माहिती दिल्यास विमा कंपनी क्लेम नाकारू शकते
माहिती कशी द्यावी
तुमच्या विमान पॉलिसीच्या कागदावर वरच्या बाजूला कंपनीचा टोल फ्री नंबर असतो त्यावर कॉल करू शकता
आज काल सर्व कंपन्यांच्या ॲप किंवा वेबसाईटवर रजिस्टर ऑफ क्लेमचा पर्याय असतो तेथे तुम्ही थेट क्लेम नोंदवू शकता
जर तुम्ही पॉलिसी एकाद्या विमा एजंट करून घेतली असेल तर त्यांना फोन करून घटनेची त्वरित माहिती द्या.
फोनवरून नेमकी माहिती काय द्यावी?
फोनवरून तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर किंवा गाडीचा नंबर तसेच घटना घडली ते नेमके ठिकाण तारीख वेळ आणि गाडीची सध्याची स्थिती उदाहरणात गॅरेज मध्ये आहे पार्किंग मध्ये बुडाले आहे किंवा रस्त्यावर अडकली आहे आणि तुमचा चालू मोबाईल नंबर देणे.
त्वरित माहिती दिल्यामुळे कंपनी तुम्हाला क्लेम रेफरन्स नंबर देते हा नंबर पुढील सर्व कामांसाठी महत्त्वाचा असतो तसेच अनेक कंपन्या त्यांच्या रोडसाइड असिस्ट अंतर्गत गाडी गॅरेज पण देण्यासाठी मोफत क्रेन किंवा टोइंग व्हॅन पाठवतात आणि कंपनी लवकर सर्वर पाठवते ज्यामुळे गाडीची तपासणी होऊन दुरुस्तीचे काम लवकर सुरू होते.
३ ] वाहन टो करून अधिकृत गॅरेज मध्ये पाठवा
विमा कंपनीच्या रोडसाइड असिस्टंट चा वापर करा कंपनीला फोन करून त्यांच्याकडून क्रेन ड्रॉईंग सर्विस मागवा हे बहुतांश वेळा मोफत असते किंवा वशिष्ठ अंतरापर्यंत यासाठी वेगळ्या खर्च द्यावा लागत नाही
विमा कंपनीच्या नेटवर्क गॅरेज मध्येच गाडी नेल्यास दुरुस्तीचा खर्च विमा कंपनीत थेट गॅरेजला देते तुमच्या स्वतःचा खिशातून मोठी रक्कम भरावी लागत नाही अधिकृत सर्विस सेंटर मध्ये पुराच्या पानाचे नुकसान तपासणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असते त्यामुळे इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्स योग्य प्रकारे दुरुस्त होतात.
वाहन टो करताना गाडी न्यूट्रल गियर मध्ये ठेवून क्रेनवर ओढावी तसेच जर तुम्ही स्वतःचे पैसे देऊन खाजगी क्रेन बोलावली असेल तर त्याचे पक्के बिल आणि पावती जपून ठेवा कॉम्प्रेसिव्ह पॉलिसी अंतर्गत विमा कंपन्या ठराविक मर्यादा पर्यंत खर्च परत करतात
गाडी गॅरेज मध्ये पोचल्यावर तिथे जॉब कार्ड किंवा अकनॉलेजमेंट पावती बनवून घ्या ज्यावर गाडी पुराच्या पाण्यातून आल्याची नोंद असेल.
४ ] विमा दावा करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
विमा प्रक्रियेच्या दाव्यादरम्यान खालील कागदपत्रे लागू शकतात
| क्र. | आवश्यक कागदपत्र | उपयोग / उद्देश |
|---|---|---|
| 1 | विमा पॉलिसीची प्रत | विमा संरक्षणाचा अधिकृत पुरावा. |
| 2 | वाहनाची आरसी (Registration Certificate) | वाहनाची मालकी सिद्ध करण्यासाठी. |
| 3 | ड्रायव्हिंग लायसन | चालकाची वैधता तपासण्यासाठी. |
| 4 | आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र | ओळख पडताळणीसाठी. |
| 5 | दावा अर्ज (Claim Form) | विमा दावा नोंदवण्यासाठी. |
| 6 | नुकसानाचे फोटो व व्हिडिओ | नुकसानीचा पुरावा म्हणून. |
| 7 | गॅरेजचे अंदाजपत्रक (Estimate) | दुरुस्तीचा अपेक्षित खर्च दर्शवण्यासाठी. |
| 8 | दुरुस्तीची बिले (लागू असल्यास) | झालेल्या खर्चाचा अधिकृत पुरावा. |
| 9 | बँक खात्याची माहिती (Reimbursement साठी) | क्लेमची रक्कम थेट खात्यात जमा करण्यासाठी. |
वरील सर्व कागदपत्रे योग्य आणि पूर्ण असल्यास दावा प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होते
५ ] सर्वेअरची तपासणी
विमा कंपनीने नियुक्ती केलेला सर्वेअर यांची वाहनाची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी येतो व तो तपासणी करतो तो नुकसानाचे प्रमाण , कारण आणि दुरुस्तीचा संपूर्णतः अंदाज तपासून अहवाल तयार करतो.
सर्वेअरच्या परवानगी पूर्वी वाहनाची मोठी दुरुस्ती सुरू करू नये अन्यथा दावा प्रक्रियेस अडचणी येऊ शकतात.
नुकसान भरपाई कशी ठरवली जाते?
कार इन्शुरन्स क्लेम करताना पूर किंवा पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मुख्यत्वे गाडीचे वय , बदल जाणारे पार्ट्स आणि तुमची पॉलिसी कोणती आहे यावर ठरवली जाते.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) नियमानुसार नुकसान भरपाई ठरवण्याचे प्रमुख निकष खालील प्रमाणे आहेत.
१) घसारा दर (Depreciation Rates) सर्वात महत्त्वाचा घटक
नियमित कॉम्प्रेसिव्ह पॉलिसी असल्यास विमा कंपनी जुना भागाच्या बदल्यात नवीन भाग बसवताना घसरा (Depreciation) वजा करते म्हणजे सुट्ट्या भागाच्या किमतीचा काही हिस्सा तुम्हाला स्वतः भरावा लागतो.
- प्लास्टिक रबर नायलॉन पार्ट्स आणि बॅटरी यावर थेट ५०% घसरा वजा केला जातो. गाडी कितीही नवीन असती तरी
- फायबर ग्लासचे पार्ट्स यावर ३०% घसरा वजा होतो.
- काचेचे भाग (windshield/window) यावर ०% घसरा असतो म्हणजेच याचा १००% खर्च कंपनी देते.
- मेटल पार्टस यावर गाडीच्या वयानुसार ५ ते ५०% पर्यंत घसरा वजा केला जातो.
जर तुमच्याकडे झिरो डिप्रिसिएशन Add-on असेल तर हा घसरा वजा होत नाही आणि संपूर्ण खर्च कंपनी देते
२) अनिवार्य वजावट (Compulsary Deductibles)
IRDAI ज्या नियमानुसार प्रत्येक क्लेमच्या वेळी गाडीच्या इंजिन क्षमतेनुसार ₹१,००० ते २,००० ची निश्चित रक्कम पॉलिसीधारकाला स्वतः भरावी लागते.
३) इंजिन प्रोटेक्शन कव्हर
पुराचे पाणी इंजिन मध्ये गेल्यास होणारा मोठा खर्च सामान्य पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही जर तुमच्याकडे इंजिन प्रोटेक्शन कव्हर असेल तरच इंजिन दुरुस्तीचा किंवा ते बदलण्याचा पूर्ण खर्च विमा कंपनी ठरवून मंजूर करते.
४) टोटल लॉस (गाडी पूर्ण खराब होणे)
जर सर्वेअरच्या अंदाजानुसार गाडी दुरुस्त करण्याचा खर्च गाडीच्या IDV (Insurance Declared Value) विम्याची एकूण किंमतच्या ७५% पेक्षा जास्त होत असेल तर गाडी टोटल लॉस (Constructive Total Loss) घोषित केली जाते.
अशावेळी दुरुस्ती न करता विमा कंपनी तुमच्या पॉलिसी वर लिहिलेल्या पूर्ण IDV (रक्कम काही सरकारी फी आणि भंगार मूल्य वजा करून) तुम्हाला देऊ टाकते आणि गाडी स्वतःकडे जमा करते.
5) कन्झ्युमेबल्स खर्च (Consumables)
इंजिन ऑइल , गिअर ऑइल , कुलर , नट बोल्ट यांसारख्या गोष्टी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या किंवा बदलाव्या लागल्या तर त्यांचा खर्च सामान्य विम्यात मिळत नाही कन्झ्युमेबल्स कव्हर असेल तरच हा खर्च भरपाई जोडला जातो
कॅशलेस आणि रिइम्बसमेंट क्लेममध्ये फरक
कॅशलेस क्लेम
जर वाहन विमा कंपनीच्या नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्त केले तरी विमा कंपनी पात्र खर्च थेट गॅरेजला देते वाहन मालकाला फक्त पॉलिसीनुसार लागू असलेली रक्कम भरावी लागते
रिइम्बसमेंट क्लेम
जर वाहन इतर गॅरेजमध्ये दुरुस्त केले असेल तर प्रथम संपूर्ण खर्च वाहन मालकाला भरावा लागतो त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि बिले सादर केल्यावर विमा कंपनी पात्र रक्कम परत देते.

दावा नाकारला जाण्याची सामान्य कारणे
अनेक वाहन मालकांच्या छोट्या चुका दावा नाकरण्याचे कारण बनू शकतात ही कारणे खालील प्रमाणे
- पुरानंतर वाहन सुरू करण्याचा प्रयत्न करणे
- वेळेवर विमा कंपनीला माहिती न देणे
- चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे
- वैध विमा पॉलिसी नसणे
- पॉलिसीमध्ये नैसर्गिक आपत्तीचे संरक्षण नसणे
- आवश्यक कागदपत्रे न सादर करणे.
दावा मंजुरी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
दावा मंजूर होण्यासाठी खालील महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा जसे की.
दावा मंजूर होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
| क्र. | दावा मंजूर होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स |
|---|---|
| 1 | 🛑 अत्यंत महत्त्वाचे: पाण्यात अडकलेली गाडी चुकूनही स्टार्ट (इंजिन सुरू) करू नका. असे केल्यास इंजिनचे नुकसान वाढू शकते आणि काही प्रकरणांमध्ये विमा दावा नाकारला जाऊ शकतो. |
| 2 | घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत तुमच्या विमा कंपनीकडे क्लेमची नोंदणी करा. |
| 3 | विमा कंपनीचा सर्वेअर येण्यापूर्वी स्वतः गाडी दुरुस्त करण्याचा किंवा पार्ट बदलण्याचा प्रयत्न करू नका. |
| 4 | घटनेबाबत विमा कंपनीला कोणतीही खोटी माहिती देणे टाळा. अन्यथा तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. |
| 5 | दावा अर्ज (Claim Form) आणि इतर सर्व कागदपत्रांमध्ये अचूक माहिती असणे आवश्यक आहे. |
| 6 | गॅरेजकडून घेतलेली पक्की बिले, पावत्या आणि खर्चाचे सर्व पुरावे व्यवस्थित जतन करून ठेवा. |
वरील दिलेल्या सर्व महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवून दावा 100% मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करा.
निष्कर्ष
काही लोक पुरामुळे वाहनाचे नुकसान झाल्यामुळे घाबरून जातात त्यांना सांगायचे आहे की पुरामुळे वाहनाचे नुकसान झाल्यास घाबरून जाने योग्य नाही तुम्ही योग्य पद्धतीने विमा दावा करणे अत्यंत महत्त्वाचे असते जेणेकरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाचा दावा विमा कंपनीकडून मंजूर होण्याची शक्यता वाढेल.
दर्शकांनो तुम्ही योग्य वेळी विमा संरक्षण आणि वेळेवर केलेले पॉलिसीचे नूतनीकरण तसेच आवश्यक Add-on यामुळे तुमचा भविष्यातील आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करता येते.
त्यामुळे प्रत्येक वाहन मालकांनी आपल्या विमा पॉलिसी ची माहिती समजून घेऊन सजग राहणे आवश्यक आहे तसेच पावसाळ्याच्या पाण्यापासून इलेक्ट्रिक वाहनाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही 10 Monsoon EV car care Tips या विषयावर लेख लिहिलेला आहे तसेच तुम्ही नवीन गाडी खरेदी करताना PDI चेक कसा करावा याबद्दलही Top 10 PDI checks for new cars या विषयावरही आम्ही लेख लिहिला आहे तोही तुम्ही पहावा. धन्यवाद!!!





Leave a Reply