पावसात समोरचं स्पष्ट दिसत नाही? विंडशील्डची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी करा हे उपाय

How to improve Windshield Visibility During Heavy Rain : दर्शकांना मुसळधार पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या पावसाळ्यात दिवसात तुम्ही जर तुमच्या कुटुंबासोबत प्रवास करत असाल तर तुमच्या गाडीमध्ये समोरच्या काचेमधून चांगली व्हिजिबिलिटी असणे हे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढील रस्ता आणि रस्त्यावरील वाहनांच्या बरोबर अंदाज घेऊन गाडी चालवता येईल चांगली विजीबिलिटी असल्याने तुमचा प्रवास सुरक्षित आणि कोणत्याही संकटाचा विचार न करता टेन्शन फ्री होऊ शकेल

जसे की समोरच्या काचेमधून दृश्यमानता कमी होण्याला विजिबिलिटी जाणे असे म्हणतात ही दृश्यमानता कमी कशी होते? का होते? आणि याची कारणे काय? तसेच ही कमी झालेली दृश्यमानता कशी वाढवावी? ह्या सर्वांगीण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा ऑटोगुरुकडून लेख असणार आहे तर चला सुरू करूया.

मुसळधार पावसात विंडशील्डची दृश्यमानता खालील दिलेल्या टिप्सचा वापर करून सुधारावी:

How to Improve Windshield Visibility During Heavy Rain
पावसात समोरचं स्पष्ट दिसत नाही? विंडशील्डची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी करा हे उपाय

१) विंडशील्डची नियमित आणि योग्य स्वच्छता

कारची विंडशील्ड नियमित योग्य प्रकारे स्वच्छ ठेवण्यासाठी अमोनिया मुक्त ग्लास क्लीनर आणि मायक्रो फायबर कापडांचा वापर करावा तसेच सरळ रेषेत उभ्या आणि आडव्या दिशेने काच कोरडी करा आणि नेहमीच सावलीत स्वच्छता करा हे सुरक्षित ड्रायव्हिंग साठी अत्यंत महत्त्वाचे आहे

विंडशिल्ड स्वच्छ करण्याची योग्य पद्धत ही दोन प्रकारे असते बाहेरील भागाची स्वच्छता आणि गाडीच्या आतील भागातील स्वच्छता

बाहेरील भागाच्या स्वच्छतेमध्ये सुरुवातीला कोरड्या मायक्रो फायबर कापडाने विंडशील्डवरील धुळ पुसून घ्या. जेणेकरून धुळीचे कण विंडशील्डवर राहणार नाहीत तसेच साफसफाई करताना वायपरचे ब्लेड काचेपासून दूर उभे करून ठेवा आणि काचेवर समान प्रमाणात क्लीनर फवारा थेट काचेवर फवारण्याऐवजी कापडावर क्लीनर फवारल्यास डॅशबोर्ड वर डाग पडत नाहीत.

काच पुसण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरून एका बाजूने उभ्या आणि नंतर आडव्या रेषांमध्ये पुसा. यामुळे काचेवर रेषा किंवा डाग राहणार नाहीत तसेच कापडावर थोडे क्लिनर फवारून वायपरच्या रबर पट्ट्या देखील खालच्या दिशेने पुसून घ्यावे

गाडीच्या आतील भागाची स्वच्छता ही खालील प्रमाणे करावी जसे की आतील बाजूस श्वासोच्छवासामुळे किंवा धुरामुळे काचेवर एक चिकट थर तयार होतो. तो काढण्यासाठी काचेचा क्लिनरचा किंवा सौम्य रबिंग अल्कोहोलचा वापर करा‌ तसेच आतील काच पुसताना कापडावर क्लिनर घेऊन हलक्या हाताने गोलाकार हालचालीत पुसा आणि नंतर लगेच दुसऱ्या कोरड्या कापडाने काच पूर्णपणे कोरडी करून घ्या.

२) योग्य विंडशील्ड वॉशर फ्लूइडचा वापर

कारच्या विंडशिल्डवर असलेली धूळ , चिखल आणि कीटक सहज स्वच्छ करण्यासाठी आणि ड्रायव्हिंग करताना सुरक्षित पुढील दृश्य दिसण्यासाठी योग्य विंडशील्ड फ्लूइडचा वापर करणे अत्यंत आवश्यक असते कारच्या काचेसाठी योग्य वाॅशर फ्लूइड निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवा जसे की
(रेडी-टू-यूज Pre-mixed) फ्लुइड्स बाजारात मिळणारे हे फ्लूइड थेट वापरासाठी तयार असतात यामध्ये काच स्वच्छ करणारे घटक आणि पाण्याचे योग्य प्रमाण असते.
(कंन्सन्ट्रेट Concentrate) किंवा पावडर हे पाण्यात मिसळून तयार करावे लागते.

साध्या पाण्याचा वापर टाळावे जसे की साध्या पाण्याने काचेवरील तेलकट डाग किंवा कीटकांचे अवशेष साफ होत नाहीत तसेच जास्त थंडीच्या ठिकाणी साधे पाणी गोठून पाईपलाईन खराब होण्याची शक्यता असते.

फ्लुइड भरताना घ्यायची काळजी

कारचे बोनेट उघडून वॉशर फ्लेवरचा कंटेनर शोधा, ज्यावर सामान्यता विंडशील्ड आणि वायपरचे चिन्ह असते. त्या कंटेनरमध्ये फ्लूइड भरताना ते पूर्ण काटोकाठ भरू नका, थोडे अंतर सोडा आणि फ्लूइडमध्ये पाणी मिसळायचे असल्यास नेहमी डिस्टिल्ड वॉटर चा वापर करा जेणेकरून काचेवर पांढरे डाग पडणार नाहीत.

फ्लुइड चे तीन प्रकार असतात ते प्रत्येक हंगामानुसार वापरायचे असतात जसे की ऑल सीजन हे फ्लूइड सामान्य हवामान साठी उत्तम असते दुसरे बग-रिमूव्हर फ्लूइड पावसाळ्यात किंवा लांबच्या प्रवासात काचेवर चिकटलेले कीटक साफ करण्यासाठी हे विशेष उपयुक्त ठरते आणि तिसरे डी-आइसर फ्लूइड अति थंडीच्या प्रदेशात काचेवर गोठलेल्या बर्फाचा थर वितळण्यासाठी याचा वापर करतात.

How to Improve Windshield Visibility During Heavy Rain
पावसात समोरचं स्पष्ट दिसत नाही? विंडशील्डची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी करा हे उपाय

३) विंडशील्डवरील पाणी दूर करण्यासाठी वॉटर-रिपेलेंट ट्रीटमेंट

विंडशील्डवरील पाणी दूर करण्यासाठी वॉटर-रिपेलेंट ट्रीटमेंट अत्यंत प्रभावी आहे यामुळे पाण्याचे थेंब काचेवर साठत नाही आणि गाडी चालवताना पुढील दृश्य एकदम चांगल्या प्रकारे दिसते

वॉटर-रिपेलेंट ट्रीटमेंट चे फायदे असे की पाण्याचे थेंब काचेवर न राहता गोल मन्या सारखे बनून खाली वाहून जातात. जास्त वेगाने गाडी चालवताना हवेच्या दाबाने पाणी उडून जाते, ज्यामुळे वायपर सतत चालण्याची गरज पडत नाही‌. काचेवर धूळ , माती , कीटक चिकटत नाही.

वॉटर-रिपेलेंट ट्रीटमेंट वापरण्याची पद्धत पहिला विंडशील्ड चांगल्या ऑटोमेटिव्ह ग्लास क्लिनरने आणि मायक्रोफायबर कापडाने पूर्णपणे पुसून कोरडी व स्वच्छ करा. दुसरा वॉटर रिपेलेंट लिक्विड कापडावर घेऊन काचेवर गोलाकार किंवा क्रॉस पद्धतीने लावा. आणि तिसरा लिक्विड सुकल्यावर दुसऱ्या कोरड्या मायक्रोफायबर कापडाने काच स्वच्छ पासून चमकवा.

४) विंडशील्डवरील धुके टाळण्यासाठी डिफॉगर आणि एसीचा योग्य वापर

कारच्या विंडशिल्डवर साचलेले धुके साफ करण्यासाठी एसी आणि डिफॉगरचा योग्य वापर करणे खूप आवश्यक असते जसे की पावसाळ्यात बाहेरील आणि आतील तापमानातील फरकामुळे काचेवर वाफ जमा होते यासाठी डिफाॅगर मोड , एसी आणि हीटर यांचा समतोल वापर करून काही सेकंदात काच स्वच्छ करता येते.

फ्रंट विंडशील्डवरील धुके हटवण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा जसे की पहिला एसी चालू करा कार मध्ये एसी चालू केल्याने हवेतील ओलावा कमी होतो आणि काचेवरील धुके वेगाने नाहीसे होतात दुसरी स्टेप डॅशबोर्डवरील (Front Defrost) बटन सुरू करा. यामुळे हवेचा प्रवाह थेट काचेकडे वळवला जातो. तिसरी स्टेप बाह्य हवा(Fresh Air Mode) निवडा. हवेचे रीसर्क्युलेशन मोड बंद करा आणि फ्रेश एअर मोड चालू करा त्यामुळे बाहेरील कोरडी हवा आत येईल. आणि चौथी स्टेप तापमान नियंत्रित करा जर बाहेर जास्त थंडी असेल तर ब्लोअरच तापमान गरम हवेवर सेट करा. थोड्याच वेळात काच पूर्णपणे साफ होऊन जाईल.

रियर विंडशील्डवरील धुके हटवण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा पहिली स्टेप रियर डिफाॅगर बटन दाबा. जसं की मागील काचेसाठी डॅशबोर्डवरील चौकोनी चिन्हाचे Rear Defogger बटन असते ते दाबा. दुसरी स्टेप हे बटन सुरू करतात काचेवरील बारीक तारा (electric coils) गरम होतात आणि वाफ लगेच बाष्पीभवन होऊन उडून जाते. तसेच आधुनिक कारमध्ये डीफॉगर ऑटोमॅटिक बंद होते अन्यथा तुमची जुनी कार असेल तर १०-१५ मिनिटांनी ते बंद करावे.

How to Improve Windshield Visibility During Heavy Rain
पावसात समोरचं स्पष्ट दिसत नाही? विंडशील्डची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी करा हे उपाय

५) विंडशील्डवरील दृश्यमानता वाढवण्याचे ऑटो गुरुचे देशी उपाय/जुगाड

विंडशील्डवर पाणी साचणे किंवा पावसाळ्यात धोक्यांची समस्या दूर करण्यासाठी आम्ही मराठी ऑटो गुरु इंस्टाग्राम पेजवर आणि खूप असे दृश्यमानता वाढवण्यासाठी देशी जुगाड सांगितलेले आहेत ते तुम्हाला सांगतो खालील प्रमाणे

१)बटाट्याचा उपाय

महाराष्ट्रात सर्वात प्रथम हा जुगाड मराठी ऑटोगुरुने सांगितला जसे की एक कच्चा बटाटा मधोमध कापून घ्या त्यानंतर बटाट्याचा कापलेला भाग विंडशील्डच्या बाहेरील काचेवर गोलाकार फिरवून चांगला घासून घ्या बटाट्यातील स्टार्च काचेवर एक अदृश्य थर तयार करतो ज्यामुळे पाण्याचे थेंब काचेवर न सांडता लगेच खाली वाहून जातात त्यामुळे तुमची काच स्वच्छ राहते.

२) शेव्हिंग फोम

काचेच्या आतील बाजूस फाॅग जमा होऊन धुकट दिसत असल्यास हा उपाय करून पहा जसे की
काच स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्या त्यानंतर थोडासा शेव्हिंग फोम काचेवर लावून मायक्रोफायबर कापडाने चांगले घासून घ्या. शेव्हिंग फोम काचेवर असा थर तयार करतात ज्यामुळे आतून काच धुकट होत नाही आणि तुम्हाला कारच्या काचे मधून पुढील दृश्य स्पष्ट दिसते.

३) पांढरा चुना आणि वृत्तपत्र

ही एक जुनी आणि अत्यंत परिणामी पद्धत आहे आम्ही आमच्या पेजवरही याचा व्हिडिओ आहे तोही तुम्ही पाहू शकता हे कसे करावे पहिला काचेवर थोडे पाणी शिंपडून मऊ चुना लावा आणि जुन्या वृत्तपत्राने गोलाकार फिरवून काच साफ करा हे केल्याने काचेवरील चिकट डाग , ऑइल फिल्म पूर्णपणे निघून जाते आणि काच अतिशय स्वच्छ होते लक्षात असू दे चुना हा मऊ आणि खूप छोटा असावा कडक चुना लावल्यास स्क्रॅच पडण्याची शक्यता असते.

६) मुसळधार पावसात हेडलाईट्स आणि वाहनांच्या दिव्यांचा योग्य वापर

मुसळधार पावसात वाहन चालवताना दृश्यमानता कमी होते त्यामुळे समोरील रस्ता स्पष्ट चालकाला दिसत नाही आणि मागून किंवा समोरून येणाऱ्या वाहनांना आपले वाहन स्पष्ट दिसावे यासाठी लो-बीम हेडलाइट्स आणि फाॅग लॅम्प चा वापर चालू ठेवावा.

हेडलाइट्स आणि इंडिकेटर चा योग्य वापर केल्याने आपल्याला मुसळधार पावसात ही गाडी व्यवस्थित चालवता येऊ शकते जसे की लो-बीम हेडलाईट हे नेहमी मुसळधार पावसात चालू ठेवा. दिवसा पाऊस पडत असताना हेडलाइट्स लावल्यास मागच्या टेललाईट सुरु होतात त्यामुळे इतर वाहन चालकांना तुमची गाडी कोठे आहे हे लक्षात येते तसेच हाय बीम हेडलाइट्स पावसात पूर्णपणे टाळा.

हाय बीम हेडलाईट मुळे समोरील चालकाची व तुमची स्वतःची दृष्टी काही सेकंदासाठी पूर्णपणे ब्लॉक होऊ शकते. तसेच इंडिकेटर हे फक्त वळवताना किंवा लेन बदलताना वापर करा जेणेकरून आजूबाजूच्या गाड्यांना तुमची हालचाल समजू शकेल. अशाप्रकारे हेडलाइट्स आणि इंडिकेटरचा योग्य वापर केला तर तुम्हाला मुसळधार पावसातही कोणत्याही अपघाताचा किंवा आणीबाणीचा प्रसंग येणार नाही.

How to Improve Windshield Visibility During Heavy Rain
पावसात समोरचं स्पष्ट दिसत नाही? विंडशील्डची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी करा हे उपाय

७) वाहनाचा वेग कमी ठेवणे आणि सुरक्षित अंतर राखणे

पावसाळ्याच्या दिवसात रस्ते निसरडे होतात आणि विजिबिलिटी खूप कमी असते त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहनाचा वेग नेहमी मर्यादित ठेवा आणि पुढील वाहनाशी नेहमी ४ सेकंदाचे सुरक्षित अंतर राखा असे केल्याने अचानक ब्रेक लावताना गाडी घसरणार नाही आणि समोरील वाहनाला धडकणार नाही.

पावसाळ्यातील सुरक्षित ड्रायव्हिंग साठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा जसे की वेग मर्यादित ठेवणे , पुढील वाहनाशी नेहमी सुरक्षित अंतर राखून ठेवणे , कमी दृश्यमानेतेत लाईटचा वापर योग्य प्रमाणे करणे , टायर आणि ब्रेकची वेळच्या वेळ तपासणी करत राहणे आणि निसरड्या रस्त्यावर अचानक ब्रेक लावण्याचे टाळणे असे केल्यास दैनंदिन प्रवासामध्ये तुम्ही धोकादायक संकट टाळू शकता.

८) रात्रीचा पावसात चमक आणि प्रतिबिंबामुळे होणाऱ्या अडचणी

रात्रीच्या प्रवासात वाहन चालवताना किंवा रस्ता ओलांडताना दिव्याची चमक आणि पाण्यावरील प्रतिबिंबामुळे दृश्यमानता खूप कमी होते समोरच्या वाहनाची हेडलाईट रस्त्यावरील दिवे यांच्यामुळे पाण्यात परावर्तन होऊन प्रकाश डोळ्यावर आढळतो परिणामी चालकांना रस्ता किंवा खड्डे स्पष्ट दिसत नाहीत आणि अपघाताचा धोका वाढू शकतो.

हे कमी करण्यासाठी तुम्ही आरसे नेहमी स्वच्छ ठेवा तसेच अँटि-ग्लेअर कोटिंग असलेला चष्मा वापरावा आणि हाय-बीमचा वापर कमी करून त्या ऐवजी लो-बीमचा वापर करावा असकेल्याने प्रखर प्रकाश परिवर्तित होण्याचा प्रमाण खूप कमी होते अशा प्रमाणे तुम्ही सुरक्षितपणे रात्रीच्या वेळी गाडी पावसात चालू शकतात.

९) पावसाळ्यापूर्वी विंडशील्ड आणि संबंधित उपकरणांची तपासणी

पावसाळ्यात सुरक्षेसाठी विंडशील्ड आणि संबंधित उपकरणाची पूर्व तपासणी करने अत्यंत आवश्यक आहे खराब वायपर्स , काचेवरील ओरखडे आणि निकामी डिमस्टर मुसळधार पावसात अपघातांना आमंत्रण देण्याचे काम करू शकते या गोष्टींची पूर्णपणे तपासणी करून घेणे हे तुमचे काम आहे

  1. पहिला वायपर ब्लेड्स काचेवर आवाज करीत असतील तर ते त्वरित बदला साधारणपणे सहा ते बारा महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक पावसाळ्यापूर्वी वायपर ब्लेड बदलणे सुरक्षित मानक मानले जाते.
  2. दुसरा विंडशील्डची स्वच्छता वरील दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या.
  3. तिसरा वाॅशर फ्लूइडचा वापर योग्य प्रमाणे वरील सांगितलेल्या निकषानुसार करावा
  4. चौथा एसी चा वापर वरील सांगितलेल्या निकषाप्रमाणे करावा जेणेकरून कारमध्ये धुके जमा होणार नाहीत.
  5. पाचवा विंडशील्डच्या आणि खिडकीच्या कडेला असलेल्या रबर सील्स तपासा जर ते खराब झाले असतील तर पावसाचे पाणी आज झिरपून केबिन ओले होऊ शकते.
How to Improve Windshield Visibility During Heavy Rain
पावसात समोरचं स्पष्ट दिसत नाही? विंडशील्डची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी करा हे उपाय

मुसळधार पावसात विंडशील्डची दृश्यमानता कमी होण्याची कारणे

मुसळधार पावसात गाडी चालवताना समोरची काचेची दृश्यमानता कमी होण्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत
जसे की खराब किंवा जुने वायपर चा वापर वायपरचे रबर कडक किंवा फाटल्यास ते काचेवरील पाणी पूर्णपणे साफ करत नसतात परिणामी काचेवर पाण्याचे थर आणि पांढरे डाग तसेच राहतात ज्यामुळे समोर जे दिसणे कठीण होऊन जाते.

अंतर्गत काचेवर वाफ जमणे गाडीच्या बाहेर थंड हवामान आणि गाडीच्या आतील उष्ण तापमान यामुळे हवेतील आद्रता काचेवर जमा होते परिणामी विंडशील्डच्या आतून धुक्यांचे किंवा वाफेचा थर तयार होतो ज्यामुळे पारदर्शकता पूर्णपणे संपून जाते.

काचेवरील तेलकट किंवा ग्रीसचा थर रस्त्यावरील प्रदूषण , धूर आणि झाडांमधून पडणारे चिकट पदार्थ विंडशिल्डवर जमा होतात. परिणामी या तेलकट थरामुळे पावसाचे पाणी काचेवरून सहज वाहून जात नाही, उलट ते तिथेच पसरून प्रकाश विखुरते.

रात्रीचे वेळी येणार तीव्र प्रकाश समोरच्या येणाऱ्या वाहनाचे हाय-बीम हेडलाईट्स थेट ओल्या काचेवर पडतात. परिणामी पाशवी प्रकाश ओल्या काचेवर विखुरल्यामुळे चालकाला क्षणभर डोळ्यासमोर अंधार येतो.

डिफाॅगर किंवा एयर कंडीशनिंगचा चुकीचा वापर जसे की पावसाळ्यात गाडी चालवताना एसी बंद ठेवल्यास किंवा हवेचे रोटेशन चुकीचे सेट केल्यास आतील वाफ वेगाने वाढते परिणामी काच स्वच्छ ठेवणारी यंत्रणा वेळेवर काम करत नाही.

निष्कर्ष

दर्शकांनो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या लेख मध्ये वरील माहिती वाचून तुम्हाला मिळाले असेल असे आम्ही गृहीत धरतो जसे की विंडशील्डची नियमित स्वच्छता कशी राखावी , वायपर ब्लेड ची तपासणी , देखभाल व वेळेवर बदल , वॉशर फ्लूइडचा वापर , वॉटर-रिपेलेंट ट्रीटमेंट म्हणजे काय आणि मुसळधार पावसात विंडशील्डची दृश्यमानता कशी सुधरावे या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या लेख मध्ये आम्ही द्यायची पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे

तसेच अजून तुम्हाला कोणते प्रश्न पडले असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि ह्या प्रमाणेच आम्ही पावसाळ्याच्या दिवसात तुमच्या गाडीची टायरची कशी देखभाल करावी ह्या विषयावर Tire Maintenance During Rainy season हा लेख लिहिलेला आहे तसेच तुमची गाडी पुरामध्ये अडकल्यास इन्शुरन्स क्लेम कसा करावा यावर Insurance Claims for Flood-damaged vehicle या नावाने ही लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही वाचू शकता. धन्यवाद!!!