10 Monsoon Car Care Tips : जून महिना सुरू झालेला आहे आणि आता लवकरच पावसाळा सुरू होईल त्यामुळे येणाऱ्या काळात आपले वाहन या मान्सून पावसाळ्यात चालण्यासाठी सुरक्षित आहे का नाही याची दक्षता घेणे. तसेच वाहनाची कोणकोणत्या प्रकारे काळजी चालक घेऊ शकतो याबद्दल आणि सुरक्षित वाहन ठेवण्यासाठी काय काय करावे याचे 10 प्रमुख मुद्दे तुम्हाला या ब्लॉगमध्ये विस्तार मध्ये पाहायला मिळतील तर चला सुरू करूया…
येणारे काही महिने पावसाळा ऋतुचा नावावर असणार आहे त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची प्रवास करताना तुमचा प्रवास चिंतामुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची दक्षता घेणे गरजेचे आहे हे खालील माहिती सांगितलेले आहे जेणेकरून तुमची रस्त्यावर कोठे घसरगुंडी किंवा पाणी साचण्याच्या समस्यावर अपघातात धोका निर्माण होऊ नये तसेच गाडीचे टायर , वायपर ब्रेक , बॅटरी , रबर योग्य स्थितीत असल्यास तुमचा प्रवास सुखकर होईल

१) टायरची स्थिती आणि ग्रिप
वाहनांमध्ये मुख्यतः टायरचा जमिनी सोबत संबंध असल्यामुळे टायर्स ची स्थिती व पकड मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे.
टायर जर घासलेले असतील तर गाडी घसरण्याचा धोका वाढत जातो त्यामुळे टायरवरील ट्रेड कमीत कमी १.६mm असणे आवश्यक आहे ते नसेल तर तुम्ही ते बदलून घ्यावे तसेच हवेचा दाब नेहमी कंपनीच्या जो नियमित निदर्शन दिलेले आहेत त्यानुसार ठेवावे.
२) वायपर ब्लेड्सची तपासणी
मानसून पावसात गाडी चालवण्यासाठी मुख्यतः पावसात स्पष्ट दिसणे आवश्यक आहे त्यासाठी वायपरची स्थिती उत्तम असणे अनावर्य आहे त्यामुळे जर उन्हामुळे वापरचे रबर खराब झाले असतील किंवा वायपर काचेवर डाग सोडत असतील आणि त्या डागामुळे वायपर आवाज करत असतील तर लगेच नवीन वायपर बसवण्याचा योग आणावा.
जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यात गाडी चालताना पूर्ण चांगला स्वच्छ रस्ते दिसतील. त्याचबरोबर वायफर वॉशर फिलिव्हड नेहमी भरून ठेवावे.
३) ब्रेकची तपासणी
ओल्या रस्त्यावर ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे ब्रेक लागण्याचे अंतर वाढते त्यामुळे ब्रेक पॅड आणि ब्रेक ऑइल तपासून घेणे गरजेचे आहे तसेच जर ब्रेक दाबताना आवाज येत असेल किंवा पॅडल जास्त खाली जात असेल तर त्वरित आपल्या जवळच्या मेकॅनिक जाऊन सर्विसिंग करून घेणे गरजेचे आहे.

४) दिवे आणि वायरिंग
मुसळधार पावसात समोरचे वाहन व रस्ता स्पष्ट दिसण्यासाठी गाडीमधले सर्व दिवे अर्थात हेडलाइट्स , तेललाइट्स , इंडिकेटर्स आणि फॉगलाइट्स यांची चालू स्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच उघड्या किंवा तुटलेल्या वायरिंग मुळे पावसाच्या पाण्यात शॉर्टसर्किट होऊ शकते त्यामुळे पावसाळ्यात गाडी बाहेर काढण्याआधी वायरिंगची तपासणी करून घ्यावे.
५) बॅटरी आणि इलेक्ट्रिकल पार्ट्स
पावसाळ्यात वायपर , लाइट्स आणि गाडीचा एसी चा वापर जास्त वाढल्यामुळे बॅटरीवर ताण पडू शकतो त्यामुळे बॅटरीचे टर्मिनल्स गंजमुक्त आणि टाईट आहेत की नाही हे तपासावे.
तसेच कोणत्याही समस्येपासून वाचवण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कारचे मान्सून चेकअप करून घेणे खूप फायदेशीर ठरते.
६) ड्रेनेज सिस्टीम आणि रबर सील्स
आपल्या वाहनाच्या काचांच्या कडेला असणारे रबर सील्स तपासा जेणेकरून कारच्या आत पाणी झिरपणार नाही याची दक्षता घेता येते आणि कारच्या संदर्भात आणि बोनेटच्या जवळील ड्रेनेज पाईप घाण किंवा झाडांच्या पानामुळे ब्लॉक होतात ते साफ ठेवा अन्यथा पाणी कारमध्ये साचून डॅशबोर्ड किंवा कारचे फ्लोरिंग चे नुकसान होण्याची शक्यता मोठी असते.
७) एसी आणि डी फॉगर
वाहनाच्या आत दमट वातावरणामुळे काचांवर फॉग जमा होते ज्यामुळे बाहेर पाहणे कठीण होते हे टाळण्यासाठी कारची एसी आणि फ्रंट/ रियर डी फाॅगर योग्य प्रकारे काम करते की नाही हे मेकॅनिकल जाऊन खात्री करून घ्यावी.
८) रबर मॅट्सचा वापर
पावसाळ्यात पायाला लागलेली चिकल-पाणी गाडीत आल्याने आतील कार्पेट खराब होते त्यामुळे कपड्याच्या मॅट्स ऐवजी रबर किंवा ऑल वेदर मॅट्स जे बाजारात मिळतात त्यांचा वापर कार मधी करावा जेणेकरून ते सहज धुता आणि वाळवता येतात.

९) गंज-रोधक कोटिंग आणि वॉश
पावसाळ्याच्या पाण्यातील क्षार आणि चिखलामुळे कारच्या खालील भागाला गंज चढण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे गाडीला गंज लागू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी अंडर-बाॅडी अँटी-रस्ट कोटिंग करून घेणे गरजेचे आहे तसेच कारच्या पेंटचे संरक्षण करण्यासाठी वॅक्स पॉलिश नक्की लावून घ्यावे
१०) सुरक्षित ड्रायव्हिंगची सवय
पावसाळ्यात गाडी चालवताना सुरक्षित ड्रायव्हरच्या सवयी असणे खूप आवश्यक आहे जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षित प्रवास होऊ शकतो त्या कोणत्या बाबी आहेत त्या खालील प्रमाणे
पावसात गाडीचा वेग मर्यादित ठेवा , पुढील गाडी पासून सुरक्षित अंतर ठेवा जेणेकरून अचानक ब्रेक लागल्यास अपघात टळेल , तसेच पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्यांतून गाडी नेणे टाळा कारण यामुळे हायड्रो प्लॅनिंगचा धोका असतो.
तसेच अनपेक्षित कोठे थांबावे लागल्यास त्या दृष्टीने पण तयार राहावे जसे की तुमच्याकडे छत्री असावी , वाळलेले कपडे असावेत , वाळलेले खाण्याचे साहित्य असावे , प्यायला पाणी असावे , फर्स्ट एड किट असावे यांसारख्या गोष्टी सोबत असणे गरजेचे आहे जेणेकरून कोठे अडचण आली तर ती दूर व्हावी.
महत्त्वपूर्ण अधिकच्या सूचना
- नवीन चालकाने पावसाळ्यात एकटा प्रवास करू नये सोबतीला कोणीतरी अनुभवी सोबती संगे असावे जेणेकरून कोणत्याही अडचणीत मात करून पुढे जाता यावे.
- पावसाळ्यात गाडीला कुठे इजा झाली तर इन्शुरन्स कसा मिळवावा व कोणते कागदपत्रे त्यासाठी लागतात याची पूर्व सूचना तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.
- जास्त खोलीच्या पाण्यात गाडीला घेऊन जाऊ नये जेणेकरून वाहनाचे पुढील नुकसान टाळता यावे.

निष्कर्ष
वरील दिलेल्या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की सर्वात दहा महत्त्वाचे मुद्दे जे की मान्सूनच्या पावसात गाडी चालवताना ग्राहकांनी काळजी किंवा दक्षता कशी घ्यावी आणि कोणत्या प्रकारे अडचणीवर मात करता यावे याची पूर्णपणे माहिती या ब्लॉगमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही पण जर येथे पर्यंत वाचत असाल तर वरील सर्व गोष्टींची आपल्या जीवनात अवलंबन करून आपण किती चांगल्या प्रकारे वाहन हाताळू शकतो याचे उदाहरण द्यावे…




Leave a Reply