नवीन कार की जुनी कार – कोणती अधिक फायदेशीर?

New Car vs Used Car which is Better? : दर्शकांनो प्रत्येक कुटुंबाच्या प्रमुखाला आपल्या कुटुंबासाठी कार खरेदी करण्याचा एक स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठा आर्थिक निर्णय हा घ्यावा लागत असतो आणि पूर्वीसारखे आता नवीन कार म्हणजेच घरात प्रतिष्ठा असा भ्रम येणाऱ्या युवा पिढीने संपुष्टात आनलेला आहे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या बजेटनुसार गरजेनुसार व वापरानुसार आणि या गाडीमुळे होणाऱ्या भविष्यातील खर्च या सर्वांगीण विचार करूनच नवीन किंवा वापरलेल्या कारमध्ये खरेदी करण्याचा निर्णय घेत असतो.

दर्शकांनों तुम्हालाही नवीन किंवा सेकंड हॅन्ड कार घेण्यामध्ये कोणती कार तुमच्यासाठी योग्य राहील असा तुमच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल तर आज तो कायमचा नाहीसा होणार आहे आज आम्ही तुम्हाला दोन्ही कारमधील तुलनात्मक गोष्टी सांगून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार , बजेटनुसार व वापरानुसार कोणती कार खरेदी करावी या विषयावर आजचा लेख असणार आहे चला सुरू करूया..

नवीन कार की सेकंड-हँड कार: तुमच्यासाठी कोणता पर्याय अधिक योग्य? विस्तारमध्ये माहिती खालील प्रमाणे

New Car vs Used Car which is Better?
नवीन कार की जुनी कार – कोणती अधिक फायदेशीर?

१ ] नवीन कार म्हणजे काय?

नवीन कार म्हणजे जी थेट अधिकृत शोरूम मधून खरेदी केलेली वाहन यात शून्य किलोमीटर धावलेल्या ताजा साठा असतो या नवीन कार मध्ये कंपनीची मूळ वॉरंटी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला मिळते

नवीन कार खरेदी केल्याने तुम्हाला मार्केटमधील सर्वात नवीनतम तंत्रज्ञान आणि फीचर्स अनुभवायला मिळतात जसे की ६ एअरबॅग , इन्फोटेनमेंट सिस्टीम , एप्पल कार , प्ले अँड्रॉइड ऑटो , डिजिटल डिस्प्ले आणि खूप सारे आरामदायी फिचर्स अनुभवायला मिळू शकतात तसेच नवीन गाड्यांमध्ये लोक अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) , इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग (TPMS) यांसारख्या अत्याधुनिक सुविधा सुरक्षितेचे मानक म्हणून दिलेले असतात.

तसेच उच्च सुरक्षेसाठी भारत Bncap रेटिंग देखील दिलेले असतात त्यामुळे गाडीची सुरक्षा किती मजबूत आहे ते समजते. थेट कंपनीतून आल्यामुळे गाडीत कोणती जुनी झीज नसते तसेच ५ ते ७ वर्षाची मूळ वारंटी मिळाल्यामुळे सुरुवाती काळात देखभालीचा खर्च जवळपास शून्य असतो

२ ] नवीन कार चे फायदे

नवीन कार खरेदी करणे हा एक उत्तम निर्णय असतो ज्यामुळे तुम्हाला अनेक दीर्घकालीन फायदे मिळतात नवीन कार खरेदी करण्याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे दिलेले आहेत.

पूर्ण वॉरंटी नवीन कारला कंपनीकडून १ ते ५ वर्ष किंवा ठराविक किलोमीटरपर्यंतची (उदाहरणात १,००,००० किमी) संपूर्ण वारंटी मिळते यामुळे सुरुवातीच्या काळात कारच्या दुरुस्तीचा खर्च जवळ जवळ शून्य असतो.
कमी देखभाल खर्च नवीन कारचे सुट्टे भाग नवीन आणि उत्तम स्थितीत असतात त्यामुळे सुरुवातीला काही वर्षे केवळ नियमित सर्विसिंग व्यतिरिक्त मोठा कोणताही खर्च तुमच्या अंगावर येत नाही.

नवीनतम सेफ्टी फीचर्स आज कालच्या नवीन कार मध्ये एअर बॅग , एबीएस (EBS) , एबीडी (EBD) , इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि प्रगत ADAS (Advanced Driver Assistance System) यांसारखे आधुनिक सुरक्षा फिचर्स तुमच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यासाठी उपलब्ध असतात.
कार खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आवडीने कार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळून जाते जसे की तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कारचा रंग , व्हेरियंट आणि फीचर्स निवडू शकता तसेच कार एकदम नवीन असल्याने तुमच्या आवडीची कस्टमायझेशन करणे शक्य होते.

मानसिक शांतता मिळते जसे की जुन्या कारच्या तुलनेत नवीन कार म्हणजे ते आधी कशी वापरली गेली होती , तिचा काही अपघात झाला होता का किंवा इंजिनमध्ये काही लपलेले दोष आहेत का अशी कोणती चिंता खरेदी करताना मनात राहत नाही.

New Car vs Used Car which is Better?
नवीन कार की जुनी कार – कोणती अधिक फायदेशीर?

३ ] नवीन कारचे तोटे

नवीन कार खरेदी करण्याचे अनेक फायदे जरी असले तरी त्याचे काही मोठे तोटे देखील तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात जसं की वेगाने होणारे मूल्य घटन (Depreciation) नवीन कार खरेदी केल्यानंतर पहिल्याच वर्षात तिचा मूळ किमतीच्या २० ते ३०% पर्यंत मूल्य कमी होते पुढील ३ ते ५ वर्षात ही कार तिच्या अर्ध्या किमतीवर येऊन उभा राहते.

जास्त सुरुवातीचा खर्च जसं की नवीन कारचे किमती व्यतिरिक्त तुम्हाला रस्ता कर (Road Tax) , नोंदणी शुल्क (Registration) आणि वितरक शुल्क (Dealer Handling Charges) हे जास्तीचे कर भरावे लागत असतात
महाग इन्शुरन्स म्हणजे नवीन कारचा सर्वसमावेशक विमा (Comprehensive insurance) जुना कारचे तुलनेत खूप महाग असतो तसेच झिरो डिप्रेशन (Zero depreciation) किंवा इतर ॲडआन्स जोडल्यास हा खर्च दरवर्षी वाढत जातो.

कारची उत्पादक वॉरंटी (Manufacturing Warranty) संपल्यानंतर इंजिन गिअरबॉक्स किंवा इतर पार्ट्स खराब झाल्यास दुरुस्तीचा खर्च खूप जास्त येत असतो आणि नवीन कार साठी घेतलेले वाहन कर्जावर जास्त व्याज द्यावे लागते ज्यामुळे गाडीचे एकूण किंमत मूळ किमती पेक्षा बरेच जास्त होऊन जाते.

४ ] वापरलेली / सेकंड हॅन्ड कार म्हणजे काय?

वापरलेले किंवा सेकंड हॅन्ड कार म्हणजे असे वाहन जे तुमच्या आधी इतर कोणत्याही व्यक्तीने किंवा कंपनीने वापरलेले असते या गाड्या आधीचे मालकाकडून डीलर ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा लिलावाद्वारे परत विकल्या जातात अशा प्रकारच्या वाहनांना सेकंड हॅन्ड कार म्हणतात.

यामध्ये नवीन कार च्या तुलनेत सेकंड हॅन्ड कार खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध असते तसेच जुन्या वाहनाचे विमा प्रीमियम नवीन कारच्या तुलनेत खूप कमी असतात आणि नवीन कार खरेदी केल्यावर पहिल्या काही वर्षात तिची मूळ किंमत वेगाने कमी होते तशी वापरलेली कार घेताना मोठा आर्थिक फटका तुम्हाला सोसावा लागत नाही आणि कमी बजेटमध्ये तुम्ही एका चांगल्या ब्रँडची किंवा मोठ्या मॉडेलची कार खरेदी करू शकता.

New Car vs Used Car which is Better?
नवीन कार की जुनी कार – कोणती अधिक फायदेशीर?

५ ] सेकंड हॅन्ड कार चे फायदे

सेकंड हॅन्ड जुनी कार खरेदी केल्याने बजेटमध्ये उत्तम कार मिळते आणि कमी घसरा , कमी विमा हप्ता आणि रोड टॅक्स मधील बचत असे अनेक आर्थिक फायदे तुम्हाला होतात तसेच नवीन शिकणाऱ्या चालकासाठी स्क्रॅच पडण्याची किंवा डेंट येण्याची चिंता नसते.

सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे जसे की नवीन कारचा तुलनेत जुनी कार खूपच कमी किमतीत किंवा अर्ध्या दरात उपलब्ध होते आणि नवीन कार शोरूमधून बाहेर काढतात त्याची किंमत झपाट्याने कमी होत असते पण सेकंड हॅन्ड कारच्या बाबतीत हा फटका आधीच्या मालकाला बसलेला असतो.

कारचा विमा हा तिच्या सध्याच्या बाजारभावावर अवलंबून असतो त्यामुळे जुन्या कारचा विमान नवीन कार च्या तुलनेत खूप स्वस्त होऊन जातो आणि जुन्या कारची आरटीओ रजिस्ट्रेशन व रोड टॅक्स आधीच भरलेला असतो त्यामुळे अतिरिक्त खर्चाची बचत होते. नवीन कारला किरकोळ स्क्रॅच जरी लागला तरी मनस्ताप होतो जुन्या कारमध्ये अशी कोणतीही काळजी होत नाही किंवा कारची किंमत कमी असल्यामुळे कमी रकमेची कर्ज घ्यावे लागते ज्यामुळे व्याजापोटी होणारी मोठी बचत देखील तुम्हाला करता येते.

६ ] सेकंड हॅन्ड कारचे तोटे

सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना प्रमुख तोटा हा देखभालीचा वाढता खर्च , अपूरी वाॅरंटी , लपविलेले दोष आणि अपघाताची अनिश्चितता या सर्वांगीण गोष्टी संकट म्हणून उभे राहतात तसेच जुन्या वाहनावर कर्जाचे व्याजदर ही नवीन कार अपेक्षा जास्त असतात.

सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना पुढील प्रमुख तोटे लक्षात घेतले पाहिजे जसे की जुन्या गाड्यांच्या झीज झाल्यामुळे त्यांच्या अनेक भागावर वारंवार दुरुस्ती करावी लागते ज्यामुळे देखभालीचा खर्च वाढतो आणि सेकंड हॅन्ड कार वर कंपनीची मूळ वारंटी सहसा संपलेली असते किंवा अतिशय मर्यादित स्वरूपात मिळते त्यामुळे सर्व दुरुस्तीचा खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो तसेच नवीन कालच्या तुलनेत जुन्या कार वरील कर्जाचे व्याजदर सामान्यता अधिकच असते.

कारच्या मागील मालकाने अपघाताची माहिती लपवल्यास किंवा मीटर मध्ये फेरफार केल्यास खरेदी दाराचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते व जुन्या गाड्यांमध्ये आजच्या आधुनिक सुरक्षा प्रणाली आणि इंधनाची बचत करणारी तंत्रज्ञान नसण्याची शक्यता जास्त असते

New Car vs Used Car which is Better?
नवीन कार की जुनी कार – कोणती अधिक फायदेशीर?

७ ] खर्चाची तुलना

नवीन कार आणि सेकंड हॅन्ड कारच्या खर्चाची तुलना करताना कारची खरेदी किंमत , डाऊन पेमेंट , ईएमआय , इन्शुरन्स , मेंटेनन्स , इंधन आणि पूर्ण विक्री मूल्य (Resale Value) या ७ मुख्य मुद्द्यांच्या आधारावर यांची तुलना करू शकतो तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य निर्णय घेण्यासाठी खालील मुद्द्यांचा आधार घ्यावा.

१) खरेदी किंमत

नवीन कारची किंमत खूप जास्त असते पण नवीन गाडीत कोणती जुनी समस्या नसते आणि कंपनीची थेट वॉरंटी मिळून जाते

सेकंड हॅन्ड कार मध्ये नवीन कार च्या तुलनेत जवळपास ४० ते ५०% कमी किमती चांगल्या कंडिशनची कार मिळते कमी बजेटमध्ये मोठ्या सेगमेंटची कार खरेदी करणे शक्य होऊन जाते

२) डाऊन पेमेंट

नवीन कार मध्ये ऑन रोड किमतीच्या साधारण १० ते २०% रक्कम डाऊन पेमेंट म्हणून स्वतः भरावी लागते

सेकंड हॅन्ड कार मध्ये अनेकदा डाऊन पेमेंट नवीन कारपेक्षा कमी असते किंवा काही फायनान्स कंपन्या ग्राहकाच्या प्रोफाईलनुसार झिरो डाउन पेमेंट वर देखील जुन्या गाड्या देतात.

३) ईएमआय (EMI)

नवीन कार मध्ये कर्जाची रक्कम जास्त असल्यामुळे इमआय चा बोजा अधिक असतो पण नवीन कारवर बँकेचे व्याजदर कमी (उदा. ८% ते १०%) असतात

सेकंड हॅन्ड कार मध्ये कर्जाची रक्कम कमी असल्याने मासिक हप्ता आकाराने लहान असतो. मात्र जुन्या कार वरील कर्जाचा व्याजदर नवीन कार पेक्षा (उदा. ११% ते १५%) जास्त शकतो.

४) इन्शुरन्स

नवीन कार मध्ये इन्शुरन्स महाग असतो तसेच पहिल्या तीन वर्षासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स कायद्यानुसार सक्तीचा असतो

सेकंड हॅन्ड कार मध्ये गाडीचे वय आणि आयडीबी (Insured Declared Value) कमी झाल्यामुळे इन्शुरन्सचा हप्ता दरवर्षी स्वस्त होत जातो.

५) सर्विसिंग व मेंटेनन्स

नवीन कार मध्ये सुरुवातीच्या ३ ते ५ वर्ष मोफत सर्विसिंग आणि वॉरंटी असते त्यामुळे मेंटेनन्स चा खर्च खूप कमी असतो

सेकंड हॅन्ड कार मध्ये जुन्या गाड्यांना स्पेअर पार्ट बदलणे किंवा नियमित मोठ्या सर्विसिंग ची गरज पडू शकते ज्यामुळे मेंटेनेस चा खर्च नवीन कारपेक्षा दर महिना अधिक असतो

६) इंधन खर्च

नवीन कार मध्ये इंजिन नवीन असल्याने मायलेज खूप चांगले मिळून जाते.

सेकंड हॅन्ड कार मध्ये जुन्या इंजिनची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे काही वेळा मायलेज किंचित कमी मिळू शकते.

७) पुनविक्रीमूल्य (Resale Value)

नवीन कार मध्ये नवीन गाडी शोरूम मधून बाहेर काढतात तिचे मूल्य २० ते ३०% घसरते दर ५ ते ६ वर्षानंतर गाडी विकताना डाऊनलोड झालेली किंमत खूप कमी मिळते

सेकंड हॅन्ड कार मध्ये जुन्या गाडीचे अवमूल्यन (Depreciation) आधीच झालेले असते त्यामुळे तुम्ही ३ ते ४ वर्षांनी गाडी विकल्यास तुलनेने खूप कमी तोटा सहन करावा लागत असतो.

कोणासाठी नवीन कार योग्य?

तुम्ही जर नियमित कारचा वापर करणारे असाल , लांब पलल्याचा प्रवास करणारे असाल किंवा मोठे कुटुंब असेल आणि उत्तम सुरक्षा व तंत्रज्ञान पाहिजे असेल तर तुमच्यासारख्या लोकांसाठी ही नवीन कार सर्वात योग्य ठरू शकते.

तुम्हाला कार निवडताना तुमच्या वैयक्तिक गरजेनुसार खालील प्रकारे विचार करावा जसे की जर तुमचे बजेट कमी असेल आणि गाडीचा वापर प्रामुख्याने शहरात असेल तर हॅजबॅक अगदी योग्य राहू शकते. पण ७ ते ८ लोकांच्या कुटुंबासाठी MPV किंवा SUV उत्तम पर्याय ठरतो व तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर ५ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी कोणतीही गाडी तुमच्यासाठी योग्य राहणार आहे.

New Car vs Used Car which is Better?
नवीन कार की जुनी कार – कोणती अधिक फायदेशीर?

८ ] कोणासाठी सेकंड हॅन्ड कार योग्य?

तुम्ही जर नवीन शिकणारे ड्रायव्हर असाल , मर्यादित बजेट असणारे कुटुंब असेल आणि लवकरच कार अपग्रेड करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सेकंड हॅन्ड कार हे उत्तम पर्याय राहते.

तुम्हाला कार निवडताना तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण व्हाव्यात या हिशोबाने कार निवडावे जसे की नुकतेच ड्रायव्हिंग शिकले आहे आणि गाडीला लहान मोठे ओरखडे पडण्याची भीती असते त्यांच्यासाठी ही जुनी कार उत्तम पर्याय ठरू शकते व ज्यांचे बजेट कमी आहे पण त्याच्या चार चाकी स्वप्न पूर्ण करायचे आहे ते कमी किमतीत चांगल्या कंडिशनची हॅजबॅक किंवा सिडान खरेदी करू शकतात.

ज्यांना दररोज ऑफिसला जाण्यासाठी किंवा गर्दीचे रस्त्यावर गाडी चालवायचे आहे त्यांच्यासाठी कमी देखभाल असणारी सेकंड हॅन्ड कार योग्य राहील व ज्यांना काही वर्षांनी चांगल्या मॉडेलमध्ये अपग्रेड करायचे आहे ते सध्या जुनी कार वापरून नंतर ती चांगल्या व्हॅल्यूला विकू शकतात.

९ ] सेकंड हॅन्ड कार खरेदीपूर्वी तपासणी

सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना तुमची फसवणूक टाळण्यासाठी तिची कायदेशीर कागदपत्रे , मेकॅनिकल कडून इंजिनची स्थिती आणि सर्विस रेकॉर्ड तपासणी अत्यंत गरजेचे आहे केवळ दिसण्यावर न जाता गाडीचा खरा इतिहास आणि तिची टेस्ट ड्राईव्ह घेणे खूप महत्त्वाचे असते ते या सर्व गोष्टी तुम्ही वाहन खरेदी करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

१) कायदेशीर कागदपत्राची तपासणी

चेसिस आणि इंजिन नंबर आरसी (RC) वरील क्रमांकाशी जुळतात का ते पहा व डिजिटल पोलीस सिटीजन सर्विसेस किंवा परिवहन वेबसाईटवर गाडीचा नंबर टाकून त्यावर कोणती कायदेशीर प्रकरणी किंवा थकीत चलने नाहित ना याची खात्री करा आणि कारचा विमा वैद्य आहे का ते पहा गाडीचे मागील सर्विसिंग बिलावरून फेरफार केला आहे का ते समजण्यास मदत होते

२) बाहेरील आणि आतील भागाची तपासणी

गाडीला कुठे गंज लागला आहे का किंवा अपघातामुळे पेंट बदलेला आहे का ते तपासा व कारमधील एसी , दिवे , म्युझिक सिस्टीम , पावर विंडो आणि सर्व बटन व्यवस्थित काम करत आहे का नाही ते तपासा.

३) इंजिन व मेकॅनिकल तपासणी

गाडी सुरू केल्यानंतर इंजिन मधून काही विचित्र आवाज किंवा काळा धूर येत आहे का हे पहा व टायरची स्थिती आणि ब्रेकची कार्यक्षमता तपासून घ्या

४) टेस्ट ड्राईव्ह

गाडी चालवताना गिअर बदलताना त्रास होत आहे का व स्टेरिंग किंवा ब्रेक लावताना गाडी एका बाजूला खेचली जात आहे का? हे अनुभव घेणे गरजेचे आहे तसेच खराब रस्त्यावरून गाडी घेऊन सस्पेन्शनचा आवाज येतो का हे तपासा.

१ ० ] अंतिम निर्णय घेताना विचारायचे प्रश्न

कार खरेदीचा अंतिम निर्णय घेताना तुम्ही विचारत असलेले प्रश्न अतिशय योग्य आणि महत्त्वाचे आहेत ह्या प्रश्नामुळे तुमची आर्थिक नियोजन अचूक राहते व तुमच्या प्रश्नांच्या आधारे कार खरेदीचा निर्णय कसा घ्यावा याची माहिती मिळते

  • माझे एकूण बजेट किती?
  • महिन्याचा EMI किती परवडेल?
  • कार किती वर्षे वापरणार?
  • रोजचा वापर किती आहे?
  • मेंटेनन्ससाठी किती खर्च करू शकतो?

निष्कर्ष

दर्शकांना वरील सर्व लेख तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला आमचा संदेश असा राहील की सर्वांसाठी एकच पर्याय सर्वोत्तम नसतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य राहील असे वाहन तुम्ही निवडावे.

जसे की नवीन कार ही तुम्हाला मन:शांती , नवीन फिचर्स , वॉरंटी असे गोष्टी देते त्या तुलनेत सेकंड हॅन्ड कार कमी किमतीत आणि चांगली Resale Value तुम्हाला मिळून जाते. वरील सर्व विषयाला अनुसरून अंतिम निर्णय हे तुमच्या वैयक्तिक गरज , बजेट आणि वापरावर सर्वांगीण अवलंबून आहे तो तुम्ही तुमच्या सदबुद्धीने विचार करूनच घ्यावा.

या पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला विंडशील्डची व्हिजेबिलिटी वाढवायची असेल तर आम्ही या विषयावर How to improve Windshield Visibility During Heavy Rain हा लेख लिहिलेला आहे तो तुम्ही पाहावा व मान्सूनच्या पावसात इलेक्ट्रिक वाहनाची कशी काळजी घ्यावी या विषयावरही 10 Monsoon EV car care Tips हा लेख लिहिलेला आहे तोही पहावा. धन्यवाद!!!