ABS , EBD and ESC Explained : दर्शकांनों सध्याच्या युगात रस्त्यांची व वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे ज्यामुळे गाडीच्या प्रवासाचाही वेग वाढलेला दिसून येतो व त्यामुळे अपघाताचाही धोका त्याच पटीने वाढलेला आहे अशावेळी तुमच्या जीवाची आणि वाहनाची सुरक्षितता सांभाळण्यासाठी गाडीमध्ये सुरक्षा फीचर्स असणे काळाची गरज बनलेली आहे यात सुरक्षा फीचर्स बद्दल आपणाच्या लेखमध्ये विस्तारमध्ये पाहणार आहोत.
बरेच ग्राहकांना असा मोठा गैरसमज असतो की वाहनात एअरबॅग असले म्हणजे पूर्ण सुरक्षा मिळाली परंतु एअरबॅग ही एक पॅसिव्ह सेफ्टी (Passive safety) प्रणाली आहे याचा अर्थ असा होतो की जेव्हा अपघात होतो तेव्हा ती केवळ प्रवाशांना दुखापत होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण अपघात होऊच नये म्हणून जी यंत्रणा काम करते त्याला ॲक्टिव्ह सेफ्टी (Active safety) प्रणाली म्हणतात गाडीवरील नियंत्रण सुटल्यास एअरबॅग अपघात रोखू शकत नाही तिथे आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासत असते.

याच आधुनिक तंत्रज्ञानामध्ये अपघात टाळण्यासाठी वाहनात ABS , EBD आणि ESC यांसारख्या सक्रिय सुरक्षा प्रणालीचा वापर केला जातो. जागतिक आकडेवारीनुसार रस्त्यावरील एकूण वाहनांपैकी भारतात केवळ १% वाहने आहेत परंतु जगातील एकूण रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये भारताचा वाटा तब्बल ११% च्या आसपास आहे ही खूप भयंकर गोष्ट आहे भारतातील रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण खूप भयंकर आहे. खराब हवामान , ओले रस्ते , अनपेक्षित वळणे आणि अतिवेग ह्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय वाहनांमध्ये केवळ एअर बॅग असून चालत नाही तर ABS , EBD आणि ESC हे प्रगत सुरक्षा पिक्चर्स असणे अनिवार्य आहे हे तंत्रज्ञान भविष्यात तुमचा अपघात वेळेतच रोखून तुमचा प्राण वाचवू शकते. चला सुरू करूया..
ABS म्हणजे काय?
ABS म्हणजे वाहनाची एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा जे की अचानक किंवा जोरात ब्रेक मारल्यावर गाडीची चाके जाम होण्यापासून ही यंत्रणा रोखते त्यामुळे गाडी घसरण्याऐवजी चालकाचे वाहनावर पूर्ण नियंत्रण राहते अशा प्रणालीला आपण ABS म्हणतो थोडक्यात म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगी ब्रेक लावला असता वाहनाची चाके पूर्णपणे थांबूण्यापासून रोखते आणि गाडी स्थिर ठेवण्यास मदत करते.
ABS कसे काम करते?
ABS यंत्रणा प्रामुख्याने ३ भागाच्या समन्वायाने काम करत असते जसे की हिल स्पीड सेन्सर हे प्रत्येक चाकाचा फिरण्याचा वेग मोजत असतात दुसरे ECU हा ABS चा मेंदू आहे जो सेन्सरकडून आले डेता तपासत असतो आणि तिसरे हायड्रोलिक मॉड्युलेटर हा भाग मुख्य ब्रेकचा दाब वाढवतो किंवा कमी करत असतो.

जोरात ब्रेक मारल्यावर चाके लॉक होण्यापासून कशी रोखते?
- जेव्हा तुम्ही अचानक ब्रेक दाबता तेव्हा चाके अचानक थांबण्याची शक्यता असते.
- व्हील स्पीड सेन्सर हे लगेच ओळखतात आणि ECU ला सिग्नल पाठवतात.
- ECU समजून घेते की चाक लाॅक होणार आहे.
- ते त्वरित हायड्रोलिक मॉड्युलेटरला ब्रेकचा दाब कमी करण्याचा संदेश देते.
- दाब कमी होतात चाक पुन्हा फिरू लागते.
- ही प्रक्रिया एका सेकंदात 15 ते 30 वेळा होते.
- यामुळे चाके लाॅग न होता गाडी सुरक्षितपणे थांबते.
ABS चे फायदे
ब्रेक मारलेला असतानाही तुम्ही गाडी सहज वळवू शकता व स्टेयरिंगवर नियंत्रण राहते.
गाडी रस्त्यावरून घसरत नाही.
पावसाळ्यात किंवा ओल्या रस्त्यावर गाडीवरचे नियंत्रण सुटत नाही
ABS च्या मर्यादा
ABS मुळे गाडी नेहमीच लवकर थांबेल असे नाही काही वेळा अंतर वाढूही शकते.
बर्फ , खडी आणि वाळू असलेल्या रस्त्यावर ABS चा परिणाम वेगळा किंवा कमी असू शकतो
EBD म्हणजे काय?
EBD म्हणजे इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन ही वाहनांमधील एक आधुनिक आणि अत्यंत महत्त्वाची सुरक्षा प्रणाली आहे याप्रणालीचा मुख्य उद्देश वाहनाच्या प्रत्येक चाकावर त्यांच्या गरजेनुसार आणि वजनानुसार अचूक ब्रेक दाब देणे असतो.

ABS सोबत EBD कसे कार्य करते?
- EBD हे नेहमी ABS सोबत मिळून काम करत असते.
- चाकांमध्ये असलेले सेंसर प्रत्येक चाकाचा वेग आणि वाहनाचे भार मोजत असतात.
- ही माहिती वाहनाच्या मुख्य संगणकाला पाठवली जाते.
- वजनानुसार कोणत्या चाकावर जास्त ब्रेक दाब हवा आणि कोणत्या चाकावर कमी हे EBD ठरवते.
- अचानक ब्रेक दाबल्यास चाके जाम होऊन गाडी घसरणार नाही याची काळजी ABS घेते.
- थोडक्यात EBD आधी योग्य ब्रेक फोर्स विभागून देते आणि ABS चाके लॉक होण्यापासून वाचवत असते.
- पुढील आणि मागील चाकामध्ये ब्रेकिंग फोर्सचे योग्य वितरण:
- ब्रेक लावताना पुढच्या बाजूवर जास्त भार आल्यामुळे, EBD पुढच्या चाकांना जास्त ब्रेकिंग फोर्स देते.
- मागच्या बाजूचा भार कमी झाल्यामुळे तिथे कमी ब्रेकिंग फोर्स दिला जातो जर मागच्या बाजूला जास्त फोर्स दिला तर मागचे चाके लॉक होऊन गाडी गोल फिरू शकते.
गाडीत प्रवासी किंवा सामान असल्यास EBD चे महत्त्व
वजनाचा अंदाज असा असतो की जर गाडीच्या मागच्या सीटवर ३ प्रवासी बसले असतील किंवा डिक्कीमध्ये जड सामान असेल तर मागच्या चाकावर भार वाढतो.
अशावेळी EBD मागच्या चाकावरील भार ओळखून तिथे लागणार ब्रेक फोर्स स्वयंचलितपणे वाढवते. यामुळे गाडी लोड असतानाही अगदी सुरक्षितपणे थांबते.

EBD चे मुख्य फायदे
वाहनाचा भार कसाही असला तरी गाडी एका बाजूला न झुकता सरळ रेषेत आणि संतुलितपणे थांबते.
अचानक ब्रेक लावल्यावर किंवा वळणावर ब्रेक दाबल्यास गाडीवरील नियंत्रण सुटत नाही आणि वाहनाची स्थिरता टिकून राहते.
प्रत्येक चाकाला गरजेइतकाच ब्रेक फोर्स मिळत असल्यामुळे, चाके रस्त्यावर घसरत नाही यामुळे टायरची झीज कमी होते आणि टायर जास्त काय टिकतात.
ESC म्हणजे काय?
ESC ही एक संगणकीकृत तंत्रज्ञान प्रणाली आहे, जी वाहनाचा ताबा सुटल्यास किंवा वाहन घसरू लागल्यास ते स्वयंचलितपणे नियंत्रित करून चालकाला सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

ESC कसे काम करते?
- हे सिस्टीम वाहनातील विविध सेंसर सोडून सेकंदाला शेकडो वेळा डेटा गोळा करते आणि खालील प्रमुख घटकांचे मदतीने काम करत असते.
- स्टेरिंग अँगल सेंन्सर (Steering Angle Sensor) चालक गाडी कोणत्या दिशेला वळवू इच्छितो, हे हा सेन्सर ओळखतो.
- याॅ रेट सेन्सर (Yaw Rate Sensor) गाडी प्रत्यक्षात कोणत्या दिशेला फिरत किंवा घसरत आहे याची नोंद हा सेन्सर घेतो.
- व्हील स्पीड सेन्सर (Wheel Speed Sensor) गाडीचे प्रत्येक चाक किती गतीने फिरत आहे, यावर हा सेंन्सर लक्ष ठेवतो.
- जेव्हा दोन्ही सेंसर च्या डेटा मध्ये फरक दिसतो म्हणजे चालक गाडी एका बाजूला वळवत आहे आणि गाडी दुसऱ्या बाजूला घसरत आहे तेव्हा ESC सक्रिय होतो. व ESC घसरणाऱ्या वाहनाला सरळ करण्यासाठी आवश्यकतेनुसार ठराविक एकाच किंवा दोन चाकावर स्वयंचलितपणे ब्रेक लावते व ब्रेक लावूण्यासोबतच इंजिनची पावर आपोआप कमी करते ज्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित होऊन चालकाच्या ताब्यात येते.
ESC चे फायदे
तीव्र वळणावर जास्त वेगात गाडी नियंत्रणाबाहेर जात असल्यास ESC अपघाताचा धोका टाळते.
पाऊस , चिखल किंवा बर्फाळ रस्त्यावर चाकांची पकड सुटल्यास गाडीला सरळ रेषेत ठेवण्यास मदत करते.
Understeer आणि Oversteer कमी करते.

प्रत्यक्ष उदाहरण
ABS , EBD आणि ESC या प्रणाली 80 किमी/ताशी वेगाने अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवताना आणि स्वतःचा जीव वाचवताना खालील प्रमाणे काम करत असते.
ABS ची भूमिका
जेव्हा तुम्ही ८० किमी/ताशी वेगाने अचानक पूर्ण ब्रेक दाबता तेव्हा चाके पूर्णपणे लॉक होण्याची भीती असते. चाके लॉक झाली तर गाडीवरून ताबा सुटतो आणि ब्रेक दाबून ही गाडी सरळ घसरत पुढे जाते.
चाके लॉक न होण्यासाठी ABS चाकावरील ब्रेकचे प्रेशर सेकंदाला अनेकदा कमी जास्त करते व चाके फेरीती राहत असल्यामुळे ड्रायव्हरला गाडी डावीकडे किंवा उजवीकडे वळवून कुत्र्याला वाचवता येते यामुळे ब्रेक दाबून ही गाडी रस्त्यावरून घसरत नाही.
EBD ची मदत
अचानक ब्रेक दाबल्यामुळे गाडीचे वजन पुढच्या चाकावर जास्त पडते आणि मागचे भाग हलके होतात अशावेळी प्रत्येक चाकाला सारखेच ताकतीने ब्रेक लावल्यास गाडी गरगर फिरू शकते. यामुळे EBS प्रत्येक चाकावरील वजनाचा अंदाज घेऊन योग्य प्रमाणात ब्रेकची ताकत विभागते.
त्यानंतर हलक्या झालेल्या मागच्या चाकावर कमी ब्रेक लावला जातो ज्यामुळे गाडी मागून हवेत उचलली जात नाही किंवा फिरत नाही असे केल्याने सर्व चाकांचा वापर त्यांच्यावरील वजनानुसार योग्य प्रकारे गाडी अत्यंत कमी अंतरात स्थिर थांबते.
ESC वाहन घसरण्यापासून कसे वाचवते?
कुत्र्याला वाचवण्यासाठी जेव्हा तुम्ही ८० किमी/ताशी वेगाने स्टिअरिंग अचानक उजवीकडे किंवा डावीकडे फिरवता तेव्हा गाडी रस्त्यावरून फेकली जाण्याची दाट शक्यता असते.
अशावेळी ESC हे तुम्ही स्टिअरिंग कुठे फिरवले आहे आणि गाडी प्रत्यक्षात कुठे जात आहे यावर बारीक लक्ष ठेवते जर गाडी डावीकडे वळवताना मागचा भाग उजवीकडे घसरू लागला तर ESC तात्काळ फक्त पुढच्या उजव्या बाजूच्या एकाच चाकाला ब्रेक लावते व गरज पडल्यास इंजिनची गती स्वतःहून कमी करते ज्यामुळे गाडी पुन्हा सरळ रेषेत येते आणि पलटी होण्यापासून किंवा रस्त्यावर जाण्यापासून वाचते.

भारतातील नियम
भारतामध्ये रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहन सुरक्षेचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने अनेक कठोर नियम लागू केले आहेत ज्यामध्ये ABS आणि ESC सारख्या आधुनिक सुरक्षा फीचर्सचा मोठा वाटा आहे.
ABS बाबतीत नियम असेकी भारतातील सर्व नवीन कार मध्ये ABS अनिवार्य आहे ज्यामध्ये अचानक ब्रेक दाबल्यावर कारचे चाके लॉक होण्यापासून सिस्टीम रोखते याचा फायदा तुम्हाला गाडीवरील नियंत्रण राखण्यासाठी होत असतो.
ESC अनिवार्यकडे सरकारचे पाऊल जसे की अनेक नवीन मॉडेल्समध्ये आता ESC देखील अनिवार्य केले जात आहे लवकरच हे सर्व कारसाठी बंधनकारक होण्याची शक्यता दाट आहे यामुळे गाडी अचानक वळवताना किंवा ओल्या रस्त्यावर घसरताना ही सिस्टीम कारची दिशा स्थिर करते व कार पलटी होण्यापासून वाचवते.
Bharat NCAP आणि Global NCAP मध्ये आता कोणत्याही कारला ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळण्यासाठी ABS आणि ESC असणे अत्यंत आवश्यक आहे Bharat NCAP आणि Global NCAP या दोन्ही संस्था कारच्या सुरक्षेचे मूल्यांकन करताना या फीचर्सला सर्वाधिक प्राधान्य देत असतात ज्यामुळे जर एखाद्या कार मध्ये ESC नसेल तर तिला जागतिक आणि भारतीय मानकानुसार सर्वोच्च सुरक्षा मानधन मिळत नाही.

ABS , EBD आणि ESC बद्दलचे गैरसमज
गैरसमज १ : ABS असल्यामुळे कार जागच्या जागी लगेच थांबते
वास्तव मध्ये ABS चे मुख्य काम गाडी झटक्यात थांबवणे नाहीतर ब्रेक दाबल्यावर चाके लाॅक होण्यापासून रोखणे आहे.
गैरसमज २ : ESC म्हणजे ऑटो पायलट सारखे तंत्रज्ञान आहे
वास्तव मध्ये ESC ही कोणती स्वयंचलित ड्राइविंग सिस्टीम नाहीये ही फक्त जेव्हा गाडी तीव्र वळणावर नियंत्रणा बाहेर जाते किंवा घसरू लागते तेव्हा विशिष्ट चाकाला योग्य प्रमाणात ब्रेक लावून गाडीला पुन्हा योग्य मार्ग आणण्याची मदत करते.
गैरसमज ३ : EBD हे एक स्वतंत्र फिचर्स आहे
वास्तव मध्ये EBD हे स्वतंत्रपणे काम करू शकत नाही ते पूर्णपणे ABS च्या सोबतीनेच काम करत असते.
वाहन खरेदी करताना काय तपासावे?
- गाडीला किमान ४ किंवा ५-स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग असणे आवश्यक आहे
- गाडीमध्ये ABS , EBD , ESC आणि Hill-Hold Assist सारखे ऍक्टिव्ह सेफ्टी फीचर्स आहे का हे चेक करा
- गाडीमध्ये ६ एअरबॅग , ३-पाॅइंट सीटबेल्ट , आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट यांसारखे पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स आहे का हे चेक करा
- बजेट असल्यास लेन कीप असिस्ट आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सारखे फीचर्स तपासावे
- तुमच्या भागात त्या कंपनीचे सर्विस सेंटर आणि सुटे भाग सहज उपलब्ध आहेत का हे तपासावे
- भविष्यात गाडी विकताना चांगली किंमत मिळेल का याचा पूर्णपणे अंदाज घ्यावा
निष्कर्ष
वाचकांनो वरील सर्व माहिती तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान सुरक्षित फीचर्स कसे वापरावे आणि यांचा तुमच्या प्रवासात काय फायदा होईल यावर आम्ही विस्तार मध्ये सांगितलेले आहे.
वरील फिचर्सचा वापर केल्याने तुमचा प्रवासामध्ये अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुमच्या जिवाचा बचाव कसा होईल हे सांगितले आहे तसेच नवीन वाहन खरेदी करताना केवळ गाडीचा लुक , मायलेज किंवा इन्फोटेकमेंट सिस्टीम न बघता तुम्ही ABS , EBD आणि ESC सारख्या तुमच्या जीवनाची रक्षण करणाऱ्या फीचर्सना सर्वोच्च प्राधान्य देणे हे सुजाण चालकाचे मोठे लक्षण आहे तंत्रज्ञान आपल्याला सुरक्षा प्रदान करत असले तरी परंतु रस्ता सुरक्षाही अंतिमतः चालकाच्या सतर्कतेवरचे अवलंबून असते.या माहिती बरोबरच आम्ही ADAS म्हणजे काय व wheel alignment vs Wheel Balancing यांसारख्या विषयावरही लेख लिहिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद!!!




Leave a Reply