पहिल्यांदाच हायवेवर गाडी चालवणार? या 15 टिप्स तुमचा आत्मविश्वास वाढवतील!

Highway Driving Tips for beginners : दर्शकांनों तुम्ही जर नवीनच गाडी चालवायला शिकलेला असाल आणि तुम्हाला हायवेवर गाडी चालवायला भीती वाटत असेल तर तुमची भीती कमी करण्यासाठी तसेच हायवेवर तुम्ही गाडी कशी चालवली पाहिजे? तसेच हायवेवर प्रवेश करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी , लेन्स शिस्त , योग्य वेग आणि सुरक्षित ओव्हरटेकिंग चे नियम सर्व गोष्टी ह्या लेखमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत.

शहरातील रस्त्यांपेक्षा हायवे गाडी चालवली हे पूर्णपणे वेगळे असते जसे की महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो त्यामुळे नवीन शिकणाऱ्या चालकांना तिथे गाडी चालवताना भीती वाटते परंतु तुम्ही योग्य पूर्वतयारी वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित अंतराचे पालन केल्यास हायवे ड्रायविंग तुमच्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि सोपे होऊन जाते आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हायवे ड्रायव्हिंग बद्दल भीती कशी कमी करावी तसेच हायवे ड्रायव्हिंग चांगल्या प्रकारे कशी करता येते हे सांगणारा उत्तरा सुरू करूया.

Highway Driving Tips for beginners विस्तारमध्ये खालील प्रमाणे

Highway Driving Tips for beginners
पहिल्यांदाच हायवेवर गाडी चालवणार? या 15 टिप्स तुमचा आत्मविश्वास वाढवतील!

१) हायवेवर जाण्यापूर्वीची तयारी

दर्शकांनों कोणत्याही लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी तुमची त्या हायवे वर प्रवासापूर्वीची तयारी अत्यंत अचूक आणि परिपूर्ण असली पाहिजे जेणेकरून तुमचा प्रवास हा सुरक्षित आणि आनंददायी होईल हायवेवर प्रवासाच्या तयारीचा एक सोपी चेकलिस्ट खाली दिलेले आहे.

मेकॅनिकल आणि इंजिन तपासणी करावी ज्यामध्ये इंजिन ऑइलची पातळी योग्य आहे का ते तपासा तसेच कूलंडची पातळी पण बघून घ्या व सर्व टायर मधील हवा योग्य असल्याची खात्री करा आणि स्टेफनी व्यवस्थित फुगलेली व वापरणे योग्य स्थितीत आहे का ते त्यापासून घ्या.

ब्रेक ऑईल तपासा आणि ब्रेक व क्लच व्यवस्थित काम करत आहे का नाही याची खात्री करून घ्या व हेडलाइट्स , टेललाईट्स , ब्रेक लाईट्स , हॅझाड लाइट्स आणि इंडिकेटर्स व्यवस्थित सुरू आहेत का हे तपासावे.

कागदपत्रे आणि नियोजन मध्ये जसं की प्रवास करताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स(driving licence) , आरसी बुक(RC book) , विमा , पीयूसी(PUC) आणि हार्ड कॉपी किंवा mParivahan ॲपवर डिजिटल प्रत तुमच्या सोबत ठेवा तसेच प्रवासाचा मार्ग आधीच गुगल मॅप सेट करून रस्त्यातील टोल व ट्रॅफिकचे माहितीचा अंदाज बघून नियोजन करा.

इंधन प्रवासाच्या सुरुवातीलाच गाडी टाकी फुल करून घ्या जेणेकरून हायवे वर इंधन शोधण्याची वेळ येणार नाही तसेच तुमचा FASTag खात्यात पुरेसे पैसे आहेत का ते तपासून नसेल तर ते रिचार्ज करा व गाडीच्या आणि इतर आवश्यक अवजारे आहेत का ते पाहूनच प्रवासाला निघण्याची तयारी ठेवा.

Highway Driving Tips for beginners
पहिल्यांदाच हायवेवर गाडी चालवणार? या 15 टिप्स तुमचा आत्मविश्वास वाढवतील!

२) हायवेवरील वेग मर्यादा समजून घ्या

हायवेवर गाडी चालवताना सुरक्षिततेसाठी वेग मर्यादा पाहणे अत्यंत गरजेचे असते महाराष्ट्र शासनाचे नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेळेवर कार साठी कमाल वेग अनुक्रमे १०० किमी/तास ते १२० किमी/तास असतो.

वेगमर्यादा पाहिल्यामुळे अचानक येणाऱ्या अडथळ्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते तसेच वेग वाढवल्यास अपघातात जिवितहानी होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी वाढते. तसेच जास्त वेगात अचानक ब्रेक लावल्यास गाडी घसरते आणि नियंत्रण सुटते व हायवेवर अवजड वाहनाच्या तुलनेत खूप हळू वाहन चालवणेही मागील वाहनांच्या धडकेचे कारण ठरू शकते.

हवामान नुसार तुम्ही तुमच्या गाडीचा वेग कमी करणे गरजेचे आहे जसे की रस्त्यावर पाऊस किंवा धुक्यात विजीबिलिटी कमी होते आणि रस्ता निसर्डा होतो अशावेळी वेग सामान्य मर्यादा पेक्षा कमी ठेवणे गरजेचे असते. आणि अपघातांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातील महामार्गावर सीसीटीव्ही आणि स्पीड कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत हे कॅमेरे वाहनाची सरासरी वेग मोजतात व वेगवेगळ्या केल्यास थेट तुमच्या वाहनाचा E-challan दंड आकारला जातो

३) योग्य लेनमध्ये गाडी चालवा

रस्त्यावर सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी लेन शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे असते तुमच्या सोयीनुसार तिन्ही लेन्सची माहिती आणि शिस्तीचे फायदे तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत जसे की लेनची रचना मुख्यतः तीन प्रकारच्या लेन असतात.

डावी लेन , मध्यम लेन , उजवी लेन त्यामध्ये डावी लेन धिम्या वेगाने चालणाऱ्या वाहनासाठी , जड वाहने आणि सायकलस्वारांसाठी असते ही लेन जेव्हा तुम्हाला वळायचे असेल किंवा हळू गाडी चालवायची असेल तेव्हा या लेनमध्ये राहा.

दुसरी मध्यम लेन ही लेन स्थिर आणि मध्यम वेगाने चालणाऱ्या वाहनांसाठी उत्तम मानली जाते ही लेन सामान्य प्रवासासाठी आणि डाव्या लाईनवरील वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी या लेनचा वापर केला जातो.
तिसरी लेन ही उजवी लेन ही लेन ओव्हरटेक करण्यासाठीच वापरले जाते ओव्हरटेक पूर्ण झाल्यावर लगेच मध्यम लेन मध्येह परत यावे विनाकारण उजव्या लेनमध्ये गाडी चालवणे कायदेबाह्य आणि धोकादायक ठरू शकते.

लेन शिस्त पाळण्याचे फायदे असे असतात की अचानक लेन बदलल्यामुळे किंवा चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केल्यामुळे होणाऱ्या अपघाताचा प्रमाण कमी होते व सर्व वाहने आपापल्या लेनमध्ये शिस्तीत चालल्यास रस्त्यांची क्षमता पूर्ण वापरली जाते आणि ट्रॅफिक सुरळीत राहते.

वारंवार ब्रेक लावणे आणि गिअर बदलणे कमी झाल्यामुळे इंधनाची बचत होते आणि शिस्तीत गाडी चालवल्यामुळे चालकाचा मानसिक ताण कमी होतो आणि प्रवासाचा आनंद घेता येतो तसेच पाठीमागून येणाऱ्या रुग्णवाहिका किंवा इमर्जन्सी वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता दिने सोपे जाते.

Highway Driving Tips for beginners
पहिल्यांदाच हायवेवर गाडी चालवणार? या 15 टिप्स तुमचा आत्मविश्वास वाढवतील

४) सुरक्षित अंतर (Safe Following Distance) ठेवा

अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी पुढील वाहनापासून योग्य सुरक्षित अंतर राखणे अत्यंत आवश्यक असते यामध्ये सामान्य दिवसांमध्ये तुमच्या पुढील वाहनाने एखाद्या निश्चित बिंदू पार केल्यानंतर तुम्ही त्या बिंदूपर्यंत पोहोचायला कमीत कमी ३ सेकंद वेळ घेतला पाहिजे याला ३ सेकंदांचा नियम असे म्हणतात.

यामध्ये पावसाळ्यात रस्ते निसरडे असतात आणि वाहनांची ब्रेक डिस्टन्स वाढते त्यामुळे पावसात हे अंतर वाढवून ५ ते ६ सेकंद ठेवावे. आणि ट्रक किंवा अवजड वाहनांच्या अगदी मागे जाऊ नका त्यांच्या मागे ब्लाइंड स्पॉट असतो तसेच अचानक ब्रेक लागल्यास किंवा टायर फुटल्यास मागे असलेल्या वाहनाला धोका निर्माण होतो.

५) ओव्हरटेक करताना घ्यायची काळजी

सुरक्षित प्रवासासाठी रहदारीच्या नियमानुसार ओव्हरटेक करताना खालील गोष्टींची काटकरपणे काळजी घ्या जेणेकरून तुमचा प्रवास हा अचूक आणि सुरक्षित होईल यामध्ये लेन बदलल्या पूर्वी किंवा ओव्हरटेक करताना नेहमी योग्य दिशेचा इंडिकेटर द्या व मागील बाजूस येणाऱ्या वाहन पाहण्यासाठी आणि ब्लाइंड स्पाॅट तपासण्यासाठी आरशांचा योग्य वापर करा.

नियमानुसार नेहमी वाहनाला उजव्याकडूनच ओव्हरटेक करावे आणि कधीही डावीकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका तसेच ओव्हरटेक पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या मूळ देशामध्ये येताना पुढील वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवावे इतक्या गोष्टींचे पालन केल्यास तुमचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

Highway Driving Tips for beginners
पहिल्यांदाच हायवेवर गाडी चालवणार? या 15 टिप्स तुमचा आत्मविश्वास वाढवतील!

६) आरशाचा (Mirrors) योग्य वापर करा

ड्रायव्हिंग करताना आरशांचा योग्य वापर करणे हे सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असते प्रत्येक आठ ते दहा सेकंद आणि सर्व असे पाण्याची सवय लावून ठेवा जेणेकरून आजूबाजूच्या वाहनांची सतत माहिती मिळत राहील.
लेन बदलण्यापूर्वी किंवा वळवताना नेहमी मिरर + इंडिकेटर + शोल्डर चेक या सूत्राचा वापर करा.

तसेच हायवे ड्रायव्हिंग करताना खालील दोन आरश्यांच्या प्रकाराची मुख्य भूमिका असते जसे की

१) ORVM (outside Rear View Mirror)

ह्या मिररला आपण बाहेरील आरसे असे म्हणतो हे असे दोन्ही बाजूने असतात आणि लेन बदलताना तसेच ओव्हरटेक करताना बाजूच्या व मागच्या वाहनांचा अंदाज घेण्यासाठी वापरले जातात.
आरसा अशा प्रकारे सेट करा की त्यात तुमचा कारचा केवळ दहा टक्के भाग दिसेल जर आरशात जास्त प्रमाणात स्वतःचीच कार दिसत असेल तर आरसा जास्त आत वळलेला आहे आणि आरसा बाहेरच्या बाजूला ठेवल्यास ब्लाइंड स्पाॅट कमी होतो.

डावीकडील लेन बदलताना किंवा डाव्या बाजूने येणाऱ्या दुचाकी स्वार पाहण्यासाठी डावा ORVM वापरतात तसेच उजवीकडील लेन बदलताना किंवा ओव्हरटेक करताना उजवा ORVM वापरतात.

२) IRVM (Inside Rear View Mirror)

ह्या मिरर ला आपण आतील असं म्हणतो हार सरकारच्या आत मध्यभागी असतो याचा मुख्य उद्देश तुमच्या अगदी मागे काही ट्रॅफिक आहे हे पाहणे असतो.
हा आरसा अशा प्रकारे सेट करा की मागील काच (Rear Windshield) पूर्णपणे दिसेल आणि मागून येणाऱ्या वाहनांची अचूक माहिती मिळेल.

७) ट्रक आणि बसच्या जवळ ड्रायव्हिंग

अवघड वाहनाच्या आजूबाजूला सुरक्षित अंतर राखूनच प्रवास करावा जेणेकरून अपघाताचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकेल आणि ते तुम्ही कसे करावे हे खालील सांगितले आहे जसे की ट्रक आणि बस चालकांना त्यांच्या आरशा मधून आजूबाजूची सर्वच वाहने दिसतात असे नाही जर तुम्ही अवजड वाहनाच्या अगदी मागे किंवा बाजूला विशेषता ब्लाइंड स्पॉटला गेला तर तुमचा अपघात होऊ शकतो.

मोठ्या वाहनांच्या मागे चालताना ४ सेकंदाचे अंतर ठेवा यामुळे अचानक ब्रेक लागल्यास तुम्हाला थांबण्यासाठी किंवा बाजूला घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ट्रक किंवा बसचे वजन जास्त असल्यामुळे त्यांना थांबायला खूप जास्त अंतर लागते त्यांच्यासमोर अचानक गाडी आणून ब्रेक मारल्यास मागून धडक बसण्याची शक्यता जास्त असते.

उतारावर अवजड वाहनांचा वेग अनियंत्रितपणे वाढू शकतो अशावेळी घाई गडबड न करता वाहन कमी गिअर मध्ये ठेवावे आणि योग्य अंतरावरूनच वाहनावर नियंत्रण ठेवावे.

Highway Driving Tips for beginners
पहिल्यांदाच हायवेवर गाडी चालवणार? या 15 टिप्स तुमचा आत्मविश्वास वाढवतील!

८) रात्री हायवेवर ड्रायव्हिंग टिप्स

रात्रीचे वेळी हायवे ड्रायविंग करताना सुरक्षेसाठी तुम्ही नेहमी हायवेवर लो बीम वर गाडी चालवा विशेषता समोरून किंवा मागून इतर वाहने येत असल्यास यामुळे समोरच्या ड्रायव्हरला त्रास होत नाही तसेच जर समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश हाय बीम असल्यास त्या गाडीचा प्रकाश थेट डोळ्यावर पडतो तो रोखण्यासाठी त्या प्रकाशाकडे न बघता तुम्ही नजर रस्त्याच्या डाव्या कडेला वळवा.

रात्रीच्या वेळी गाडी चालवताना थकवा जाणवायला लागल्यास सलग गाडी चालवू नका थकवा किंवा झोप येत असल्याचे जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी गाडी थांबून विश्रांती घ्या तसेच गाडीचे विंडशील्ड , खिडक्या आणि आरसे आतून व बाहेरून नेहमी स्वच्छ ठेवा यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईट चा प्रकाश काचेवर पसरून होणारा त्रास कमी होऊन जातो. तसेच रात्रीचे वेळी गाडी कशी चालवायची याच्यावरही आम्ही लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पहावा.

९) पावसाळ्यात हायवे ड्रायव्हिंग

पावसाळ्यात हायवे गाडी चालवताना नेहमी वेग कमी ठेवावे जेणेकरून कोणत्याही अपघाताचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही तसेच रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता जास्त असते वेग कमी ठेवल्यामुळे तुमची गाडी मर्यादित आणि सुरक्षित वेगाने खड्डे पार करू शकते व प्रवासाला निघण्यापूर्वी वायपर व्यवस्थित काम करत आहेत का नाहीत तसेच काच पूर्णपणे साफ होते ना याची खात्री करून घ्या खराब वायपर्समुळे समोरील दृष्ट स्पष्ट दिसत नाही

मुसळधार पावसात किंवा धुकामुळे समोरील आणि मागील गाड्यांना आपली गाडी स्पष्ट दिसावी यासाठी लो बीम हेडलाईट्स आणि इंडिकेटर चा वापर करा. आणि पावसात रस्ते निसरडे होतात त्यामुळे अचानक ब्रेक लावल्यास गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे इतर वाहनांपासून सुरक्षा अंतर ठेवून हळूच ब्रेक दाबा. तसेच पावसाळ्यात गाडी कशी चालवावी याच्यावरही आम्ही लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पहावा.

Highway Driving Tips for beginners
पहिल्यांदाच हायवेवर गाडी चालवणार? या 15 टिप्स तुमचा आत्मविश्वास वाढवतील!

१०) धुके (Fog) असताना ड्रायव्हिंग

धुके असताना सुरक्षित ड्रायविंग करण्यासाठी योग्य लाईटचा वापर सुरक्षित अंतर आणि लेन ड्राइविंग व इतर छोट्या मोठ्या खबरदारी इत्यादी गोष्टीमुळे तुम्ही धुके असतानाही ड्रायव्हिंग व्यवस्थित करू शकाल

तुमच्या वाहनात फाॅग लॅम्प असतील तर ते नक्की चालू करा ते रस्त्यावर कमी अंतरावर प्रकाश टाकतात आणि धुक्यात पाहणे सोपे करतात तसेच नेहमी लो बीम हेडलाईटचा वापर करा हाय बीम लावल्यास दिव्यांचा प्रकाश धुक्याच्या थेंबावर आढळून परावर्तित होतो ज्यामुळे पांढरे भिंत समोर आल्यासारखी दिसते आणि तुम्हाला काहीच दिसणार नाही

हॅझाड लाइट्स केवळ गाडी खराब झाल्यावर किंवा आपत्कालीन स्थितीत उभी असतानाच लावावे गाडी चालवत असताना हे दिवे सतत चालू ठेवल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना तुम्ही ब्रेक कधी लावत आहात हे समजत नाही आणि अपघात होण्याची शक्यता जास्त असते.

धुक्यामध्ये रस्त्यावरील पांढऱ्या किंवा पिवळ्या पट्ट्यावर लक्ष केंद्रित करून गाडी चालवा ह्याला आपण लेन मार्किंग म्हणतो तसेच धुक्यात समोरून येणारे वाहन किंवा विरुद्ध दिशेची ट्रॅफिक स्पष्ट दिसत नाही यामुळे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे टाळा. तसेच वळवताना किंवा लेन बदलताना किमान १० सेकंद आधी इंडिकेटर द्या व खिडकीची काच थोडी खाली ठेवा जेणेकरून बाहेरून येणारी इतर वाहनांची आवाज किंवा हॉर्न तुम्हाला ऐकू येतील

११) थकवा आणि झोप‌ टाळा

दर्शकांना तुम्हाला जर थकवा आणि झोप जाणवत असेल तर प्रत्येक दोन तासांनी ब्रेक घेण्याच्या प्रयत्न करा सलग गाडी चालू नका दर २ तासांनी किंवा प्रत्येक 150-200 किलोमीटर नंतर गाडी थांबून ५ ते १० मिनिटे बाहेर पडा.

प्रवासला निघण्यापूर्वी रात्री कमीत कमी ७ ते ८ तासाची गाढ झोप घ्या अपुऱ्या झोपेमुळे प्रवासात मायक्रोग्लान्स होऊ शकतो तसेच शरीरातील डीहायड्रेशनमुळे थकवा लवकर जाणवतो त्यामुळे प्रवासात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित अंतराने पाणी किंवा ज्यूस घेत राहा व जांभळी येणे हे शरीराकडून झोप येत असल्याचा पहिला सिग्नल असतो अशावेळी गाडी चालवणे लगेच थांबवा आणि थोडी विश्रांती घ्या

प्रवासादरम्यान जास्त जड किंवा तेलकट जेवण टाळावे अन्यथा झोप आणि आळस येऊ शकतो व झोप टाळण्यासाठी तुम्ही एक मर्यादित प्रमाणात कॉफी किंवा चहाचा(Caffeine) वापर करू शकता ज्यावेळी तात्काळ तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

Highway Driving Tips for beginners
पहिल्यांदाच हायवेवर गाडी चालवणार? या 15 टिप्स तुमचा आत्मविश्वास वाढवतील

१२) Emergency परिस्थितीत काय करावे

हायवेवर अचानकपणे तुमची गाडी बंद पडल्यास किंवा टायर पंचर झाल्यास घाबरून जाता खालील ६ ते ७ गोष्टी काळजीपूर्वक करा जसे की
१) सुरक्षित ठिकाणी गाडी उभी करा शक्य असल्यास गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला किंवा सर्विस रोडवर घ्या स्टेरिंग सरळ ठेवून गाडी सुरक्षित ठिकाणी थांबवा.
२) Hazard लाईट चालू करा मागील व समोरील वाहनांना तुमच्या गाडीची स्थिती समजावी म्हणून लगेच इंडिकेटर बटन चालू करून ठेवा
३) Reflective त्रिकोण लावा ह्यामुळे इतर गाड्यांना सावध करण्यासाठी गाडीचे मागे साधारण 50 ते 100 मीटर अंतरावर रिफ्लेक्टिव त्रिकोण ठेवा.

४) गाडीतून उतरून स्वत: आणि इतर प्रवाशांना रस्त्याच्या कडेला रेलिंगच्या मागे सुरक्षित ठिकाणी उभे रहा चालू रस्त्यावर उभे राहू नका.
५) तुमच्या कार कंपनीच्या किंवा विमा कंपनीच्या रोडसाइड असिस्ट (RSA) हेल्पलाइन नंबर वर कॉल करून मदतीसाठी विनंती करा
६) टायर बदलता येत असल्यास आणि जागा सुरक्षित असल्यास jack आणि स्पेअर टायर वापरून टायर बदलून घ्या अन्यथा मदतीची प्रतीक्षा करत राहा
७) पोलिसांसाठी 112 किंवा 108 वर इमर्जन्सी नंबर संपर्क करा.

निष्कर्ष

दर्शकांनों या लेखामध्ये आम्ही तुम्हाला विस्तार मध्ये हायवेवर तुम्ही जर नवीन असाल तर हायवेवर जाण्यापूर्वी काय तयारी करावी तेथून ते हायवेवर कोणकोणत्या चुका टाळाव्यात आणि गाडी चालवत असताना कोण कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या सर्व गोष्टी विस्तार मध्ये या लेखमध्ये सांगण्याचे काम केलेले आहे आम्हाला आशा असेल की हा लेख वाचून तुमच्या ज्ञानात भर झालेली असेल आणि तुम्ही स्वतःमध्ये गाडी हायवर चालवताना बदल कराल आणि स्वतःला आणि इतरांना इजा पोहोचण्याचे काम करणार नाहीत. धन्यवाद!!!