[गुपित उघड] पाऊस कितीही असो, ‘या’ ३ ट्रिक्स वापरल्या तर बाईक कधीच घसरणार नाही!

Monsoon Riding Tips for motorcycle  : दर्शकांनो तुम्हाला मोटरसायकल चालवण्याची आवड असेल तर येणाऱ्या पावसाळ्यात तुम्ही खूप लांबच्या पाल्यांसाठी मोटरसायकल चालण्याचे लक्ष ठेवून आहात तर या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला विस्तार मध्ये तुम्ही मोटरसायकल कशी चालवावी त्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरावे हे सविस्तरपणे सांगणार आहोत…

पावसाळ्यात सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मुख्यतः बाईकचे नियमित सर्विसिंग , टायरचा योग्य दाब , चांगल्या गुणवत्तेचा रेनकोट इतक्या साऱ्या मुख्य गोष्टींची सांगड घालून तुम्हाला पावसाळ्यात सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी कोणत्याही संकटांची काळजी न करता चिंतामुक्त बाईक चालण्याचा आनंद लुटता येईल…

 

Monsoon Riding Tips for motorcycle 
[गुपित उघड] पाऊस कितीही असो, ‘या’ ३ ट्रिक्स वापरल्या तर बाईक कधीच घसरणार नाही!

१ ) बाईकची पूर्वतयारी

 

) ब्रेकची तपासणी

पावसाळ्यात मोटरसायकल चालवण्यासाठी सर्वप्रथम बाईकचे ब्रेकची तपासणी करणे गरजेचे असते कारण रस्ते निसरडे असल्यामुळे टायस॑ची ग्रिप चांगली असावी लागते तसेच ब्रेक पॅड तपासून घेणे आणि अचानक ब्रेक मारण्या-ऐवजी म्हणजे हळूहळू ब्रेक लावण्याची सवय असावी.

) टायर्सची स्थिती

मुख्यतः बाईक मध्ये टायर सर्वात महत्त्वाचा एक बिंदू मानला जातो आणि त्या टायरची स्थिती अर्थात ग्रीप मजबूत असणे रायडर साठी चांगले असते जसे की टायर जर जास्त घासलेले असेल तर गाडी घसरण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे तुम्ही ते टायर कमीत कमी वेळात बदलून घेणे गरजेचे असते तसेच हवेचा दाब नेहमी कंपनीने दिलेल्या निर्देशानुसार टायर मध्ये भरणे आवश्यक आहे.

) चेन लुब्रिकेशन

पावसाच्या पाण्यात मोटर सायकलची चेन लवकर कोरडी पडते आणि गंज चढण्याची शक्यता जास्त असते यासाठी चेन साखळी वेळेवर स्वच्छ करून लुब्रिकेट करा.

) लाईट आणि इंडिकेटर्स

पावसाळ्यात किंवा धुक्यामध्ये कमी दृश्यमानेतेमुळे हेडलाईट , टेललाईट आणि इंडिकेटर व्यवस्थित काम करतायेत का नाही हे तपासा जेणेकरून मागील व पुढील वाहनाला आपण कोठे आहोत याचा अंदाज येतो त्यामुळे तुमची सुरक्षितता वाढते.

) हेल्मेटच्या काचेची निगा

हेल्मेट ची पुढील पारदर्शक काचेची निगा , देखभाल सर्विसिंग व स्क्रॅच न पडू देणे इतक्या गोष्टी कराव्या लागतात कारण हेल्मेटची पुढील पारदर्शक काच डोळ्याचे रक्षण करण्यासाठी असते

) सर्विसिंग वेळेवर करावे

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाईकची सर्विस वेळोवेळी करणे गरजेचे असते सर्विस करण्यामुळे बाईक मधली छोटी मोठी त्रुटी निघून जाते तसेच सर्विस मुळे इंजिन ओयल , एअर फिल्टर , चेंज , आणि ब्रेक्स सर्व गोष्टी ठीक होऊन जातात

Monsoon Riding Tips for motorcycle 
[गुपित उघड] पाऊस कितीही असो, ‘या’ ३ ट्रिक्स वापरल्या तर बाईक कधीच घसरणार नाही!

२ ) पावसाळ्यात बाईक चालवताना घ्यायची काळजी

 

) आंतर राखा

प्रत्येक रायडरने पुढील वाहनांपासून नेहमी जास्त अंतर ठेवणे गरजेचे असते यामुळे अचानक समोरच्या वाहनाने ब्रेक लावल्यास तुम्हाला गाडी थांबवायला पुरेसा वेळ मिळतो.

) पाण्याचे खड्डे टाळा

प्रत्येक रायडरने जर खड्डा खोल असेल तर गाडी बंद पडू शकते किंवा अपघात होऊ शकतो तसेच पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज बहुदा येत नाही त्यामुळे पाण्याचे खड्डे टाळाने योग्य राहील.

) दिवे सुरू ठेवा

जेव्हा पाऊस चालू असेल आणि तुम्ही गाडी चालवत असाल तर तेव्हा प्रत्येक वेळी हेडलाईट चालू ठेवणे गरजेचे आहे यामुळे समोरच्या व मागच्या वाहनांना तुमची बाईक कोठे आहे हे स्पष्ट दिसेल.

) रंगीत रेनकोट घालावे

रायडर ने नेहमी गडद किंवा चमकदार रंगाचा रेनकोट वापरणे गरजेचे आहे ज्यामुळे इतर वाहन चालकांना तुम्ही सहज दिसणार.

) नियमित वेग ठेवणे

रायडरने पावसाळ्यात जास्त वेगाचा वापर करणे योग्य नाही कारण रस्ते निसरडे असल्यामुळे जास्त वेगाने बाईक चालवल्यास अपघात होण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे तुम्हाला पावसाची आदर करून नियमित वेगाने आपला प्रवास पार केला पाहिजे

) वळणावर हळू जाणे

पावसाळ्यात प्रत्येक वळणावर तुम्ही गाडीचा वेग कमी करून तुम्हाला जसे साजेल त्याप्रमाणे गाडी हाताळून त्या वळणावरून गाडी पुढे नेणे तुमचे काम आहे आणि ते करताना गाडीचा वेग हा कमी असावा जेणेकरून गाडीच्या टायरांना पकड घेण्यास वेळ मिळेल आणि गाडी घसरणे असे प्रकार घडणार नाहीत.

 

Monsoon Riding Tips for motorcycle 
[गुपित उघड] पाऊस कितीही असो, ‘या’ ३ ट्रिक्स वापरल्या तर बाईक कधीच घसरणार नाही!

३ ) काय टाळावे

 

) पांढऱ्या पट्ट्यावरून जाणे

रस्त्यावरील पांढरे पट्टे जसे की झेब्रा क्रॉसिंग किंवा लेन मार्किंग हे ओले असताना खूप निसरडे होतात आणि गाडी घसरण्याची शक्यता खूप दाट असते त्यामुळे त्यावरून जाताना गाडी वळवणे किंवा ब्रेक मारणे शक्यतो टाळावे.

) अचानक वेग वाढवणे

पावसाळाचे दिवस असल्यामुळे ओल्या रस्त्यावर रेस अचानक वाढवू नये जेणेकरून गाडी स्लीप होण्याची शक्यता जास्त होते तसेच आपल्याला जेवढी गाडीचा वेग आवाक्यात वाटतो त्यानुसार आपण बाईकचा वेग आवाक्यात ठेवावा.

) खराब ब्रेकचा वापर

कधीही पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये कायम बाईकचा मागील ब्रेकचा वापर जास्त करावा आणि पुढील ब्रेक हळुवारपणे दाबावे जेणेकरून गाडी कमी वेळात जागेवर थांबणार नाही आणि रायडरचा आत्मविश्वास टिकून राहील.

 

Monsoon Riding Tips for motorcycle 
[गुपित उघड] पाऊस कितीही असो, ‘या’ ३ ट्रिक्स वापरल्या तर बाईक कधीच घसरणार नाही!

मोटरसायकल रायडींग झाल्यावर

 

बाईकच्या चेनची काळजी करणे

या पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक ठिकाणी रायडर बाईकच्या चेन उघडे ठेवतात कारण बाईकच्या चेनची पावसाळ्यात जास्त काळजी घेणे गरजेचे असते गाडी धुवून झाल्यानंतर गाडीच्या चेन वर लुब्रिकेशन करणे हे गरजेचे असते त्यामुळे गाडीच्या चेनचे जीवनमान वाढते व रायडरला उत्कृष्ट दर्जाची बाईक चालण्याची भावना देते

बाईक स्वच्छ करणे

पावसाळ्याच्या दिवसात गाडीची चांगल्या प्रकारे बाईक धुवून घेणे गरजेचे असते कारण या पावसाच्या दिवसात गाडी खूप वेगळ्या ठिकाणी फिरल्यामुळे आणि गाडीवर माती पढल्यामुळे गाडीचे काही भाग डॅमेज होण्याची शक्यता असते.
ते न व्हावे यासाठी गाडी दैनंदिन पावसाच्या सिझनमध्ये धुणे गरजेचे आहे जेणेकरून गाडीच्या विविध भागांचे पार्टचे जीवन वाढेल.

निष्कर्ष

वरील सांगितलेल्या सर्व मान्सून रायडींग टिप्स आणि ट्रिक चा वापर करून आपण चांगल्या प्रकारे सुरक्षित आणि चिंतामुक्त रायडिंग कराल याची खात्री आहे. वरील माहितीला अनुसरून आम्ही  १ ०  मान्सून कार केअर  टिप्स याबद्दलही लोकांना जागृत केलेले आहे ती ब्लॉग आपण पाहू शकता

तसेच वरील माहिती नुसती वाचून सोडून देणे टाळावे आणि ते आपण बाईक चालवत असताना प्रत्यक्षात करणे गरजेचे आहे ज्यामुळे आपण सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करू शकता…