६ एअरबॅग्ज आणि ३६०° कॅमेरा! नवीन 2026 Tata Tiago चा हा लुक पाहून मारुती स्विफ्टचे टेन्शन वाढणार?

2026 Tata Tiago : भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबाचा आयुष्यातील पहिली गाडी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण टाटा मोटर्स कंपनीने आपली मध्यमवर्गीय कुटुंबाची वरदान असलेली टाटा टियागो या गाडीचे फेसलिफ्ट सुधारित मॉडेल २०२६ टाटा टियागो २८ मे २०२६ रोजी भारतीय बाजारात लॉन्च केलेले आहे आणि या वाहनाची किंमत ₹४,६९ लाख एक्स शोरूम या किमतीने सुरू होते त्यामुळे सामान्य त्या सामान्य लोकांना आयुष्याची पहिली कार खरेदी करायची असेल तर ह्या संधीचे सोने करावे.

सुधारित 2026 टाटा टियागो हे वाहनांच्या बाहेरील डिझाईन ची परिभाषा बदलून तसेच अद्यावत इंटरियर केबिन करण्यावर भर आणि फीचर्स म्हणून कार मध्ये ६ एअर बॅग सुरक्षा यंत्रणाचे फीचर्स म्हणून देण्यात आलेले आहेत व १०.२५ इंच एंन्फोटेनमेंट सिस्टीम कॅबिनचे आकर्षण वाढवते चला विस्तार मध्ये जाणून घेऊया या ब्लॉगमध्ये हे वाहन तुमच्या कुटुंबासाठी योग्य ठरेल का?…

2026 Tata Tiago
६ एअरबॅग्ज आणि ३६०° कॅमेरा! नवीन 2026 Tata Tiago चा हा लुक पाहून मारुती स्विफ्टचे टेन्शन वाढणार?

इंजन

टाटा टियागो मध्ये 1.2 लिटर तीन सिलेंडर नॅचरल अस्पिरेटेड इंजन असणार आहे हे इंजिन ८६hp ची ताकद आणि 113nm चा टॉर्क निर्माण करते. तशी बघायला गेली तर ही गाडी ज्यांना वेगाने वाहन चालवायची सवय आहे त्यांच्यासाठी हे वाहन बनलेले नाही कारण हे वाहन दैनंदिन लोक जे की एका ठिकाणी निवांतपणे जाण्याची इच्छा बाळगतात त्या लोकांसाठी खास करून ही गाडी बनलेली आहे

गाडी हातात असताना ड्रायव्हरने गिअर अप शिफ्ट किंवा डाऊन शिफ्ट केले तर ते सहजपणे हाताळता येतात. तसेच जसे आपण गाडीचे रेव वाढवेल तसे केबिनमध्ये थोडाफार व्हायब्रेशन जाणवण्याची शक्यता असू शकते. तसेच इंजिनच्या भरोशावर गाडी जसे आपण स्पीड वाढवेल तसे इंजन च्या भरवशावर गाडी हायवेवर खूप स्मूथ आणि ड्रायव्हरला आत्मविश्वास देण्याचे काम करते. हे वाहन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते

एक्स्टेरियल डिझाईन

या वाहनाची स्टायलिंग मागील वने तुलनेत खूप धारदार टोकदार व अग्रेसिव करण्यात आलेली आहे तसेच या वाहनांमध्ये पुढे एलईडी हेडल्माप व डी आर एल मिळतात वाहन समोरून पाहायला गेल्यास काळया रंगांमध्ये वरील ग्रील पाहण्यास मिळते व त्याच्या मधोमध टाटा कंपनीचा लोगो बघण्यास मिळतो तसेच खालील भागात रेडिएटर ग्रील ही समोरून काळया रंगांमध्ये खूप आकर्षक दिसतात तसेच त्याच्यासोबत दिलेले एलईडी फॉगल्याम गाडीला शोभून दिसतात त्याच्यासोबत गाडीमध्ये १५ इंच अलॉय व्हील्स पाहायला मिळतात जे की खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केलेले आहेत

इंटरियर डिझाईन

टियागो कारची मागील मॉडेल सोबत तुलनेमध्ये हे मॉडेल खूप आधुनिकतेवर आधारित असलेले दिसून येते तसेच या वाहनाचे इंटिरियर फॅब्रिक काळया आणि पांढऱ्या रंगाच्या दोन ट्यून थीम मध्ये पाहायला मिळते तसेच गाडीचा डॅशबोर्ड हा पहिल्यापेक्षा पूर्णतः वेगळ्या प्रकारच्या डिझाईन सोबत येतो आणि हे डिझाईन मध्ये दोन वेगळ्या स्क्रीनमध्ये पाहायला मिळतात जसे की पहिली स्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व दुसरी एंन्फोटेनमेंट सिस्टीम यासाठी बनलेली आहे.

गाडीच्या केबिनमध्ये प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केलेला दिसून येतो आणि हे केबिनला चांगला लुक देण्याचे काम करते तुम्ही हात लावला तर तुम्हाला ते सहजपणे समजू शकेल की किती चांगल्या प्रकारचे मटेरियल वापरण्यात आलेले आहे

 

2026 Tata Tiago
६ एअरबॅग्ज आणि ३६०° कॅमेरा! नवीन 2026 Tata Tiago चा हा लुक पाहून मारुती स्विफ्टचे टेन्शन वाढणार?

 

व्हेरियंट

ही गाडी एकूण ६ व्हेरियंट-मध्ये ग्राहकांना उपलब्ध असणार आहे खालील दिलेल्या तक्त्यामध्ये आपण पाहू शकता की कोणते किमतीमध्ये आपल्याला कोणते व्हेरियंट मिळू शकते

व्हेरिएंटचे नावइंजिन / गिअरबॉक्स पर्यायअंदाजित एक्स-शोरूम किंमत
Smart (बिल्कुल बेस व्हेरिएंट)१.२L पेट्रोल (मॅन्युअल)₹ ४,६९,००० पासून सुरू
Pure१.२L पेट्रोल / iCNG (मॅन्युअल)₹ ५,४९,००० पासून सुरू
Pure+१.२L पेट्रोल / iCNG (मॅन्युअल / AMT)₹ ६,१९,००० पासून सुरू
Pure+ A१.२L पेट्रोल (AMT) / EV (इलेक्ट्रिक)₹ ६,६९,००० पासून सुरू
Creative१.२L पेट्रोल / iCNG (मॅन्युअल / AMT)₹ ७,१९,००० पासून सुरू
Creative+ (टॉप व्हेरिएंट)पेट्रोल, iCNG आणि EV (सर्व प्रीमियम फीचर्ससह)₹ ७,९९,००० पर्यंत

 

फीचर्स

आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे फीचर्स मिळून जातात जसे की चावीच्या शिवाय पण गाडीमध्ये एन्ट्री तसेच क्रूज कंट्रोल , डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर  , 360 डिग्री कॅमेरा असणार आहे वायरलेस चार्जिंग ,  क्लायमेट कंट्रोल ,  कार प्ले कनेक्टिव्हिटी तसेच ऑटो एलईडी हेडलैंप व टेललैंप आणि पावसासाठी रेन सेंसिंग वायपर्स व हे सर्व असूनही अधिकचे 35 पेक्षा जास्त कारच्या आधारित IRA ऐप मध्ये फीचर्स मिळणार आहेत

 

2026 Tata Tiago
६ एअरबॅग्ज आणि ३६०° कॅमेरा! नवीन 2026 Tata Tiago चा हा लुक पाहून मारुती स्विफ्टचे टेन्शन वाढणार?

 

 

सुरक्षितता

टाटा टियागो येथे सर्व व्हेरिएंट हे सहा एअरबॅग सोबत मिळणार आहेत तसेच ABS अधिक EBD आणि CSC यासारखे सुरक्षेसाठी फीचर्स पाहायला मिळतील तसेच लहान मुलांना सेफ्टी देण्यासाठी ISOFIX चाइल्ड सीट माउंट बसलेले मिळणार आहेत. ज्यामुळे लहान मुलांना सुरक्षा प्रदान होईल.

सर्वात वरील टॉप वरिएंट मध्ये ऑटो हेड लॅम्प , रेन सेंसिंग वायपर्स , 360 डिग्री कॅमेरा , पार्किंग सेन्सर्स ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर , ट्रॅक्शन कंट्रोल , हील होल्ड असिस्ट यांसारखे सुरक्षेचे फीचर्स पाहायला मिळतील

२०२६ टाटा टियागो हे (GNCAP) ग्लोबल एंड कॅप सेफ्टी रेटिंग मध्ये ४ स्टार रेटिंग ची सुरक्षा या हजबॅक वाहनाला मिळालेली आहे.

टेक्नॉलॉजी

या वाहनांमध्ये टेक्नॉलॉजी साठी १०.२५ इंच टच स्क्रीन देण्यात आलेली आहे तसेच 360 डिग्री कॅमेरा जो की ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर सोबत मिळतो व सेगमेंट मध्ये सर्वात पहिला फर्स्ट पेडल शिफ्टर जे के AMT वेरियट मिळणार आहे.

तसेच गाडीमध्ये वायरलेस ॲपल कार प्ले व अँड्रॉइड ऑटो ची पण व्यवस्था देण्यात आली आहे तसेच ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे पूर्णपणे डिजिटल असणार आहे सोबत सहा सर्वोत्तम स्पीकर हे साऊंड सेटअप साठी देण्यात आले आहेत.

 

2026 Tata Tiago
६ एअरबॅग्ज आणि ३६०° कॅमेरा! नवीन 2026 Tata Tiago चा हा लुक पाहून मारुती स्विफ्टचे टेन्शन वाढणार?

 

स्पेसिफिकेशन

२०२६ टाटा टियागो वाहनाचे स्पेसिफिकेशन चा तक्ता खालील प्रमाणे दिलेला आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स 

वैशिष्ट्ये (Specifications)तपशील (Details)
इंजिन प्रकार (Engine Type)१.२-लिटर, ३-सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन (Revotron)
इंजिन क्षमता (Displacement)११९९ सीसी (cc)
कमाल पॉवर (Max Power)८६ PS @ ६००० rpm
कमाल टॉर्क (Max Torque)११३ Nm @ ३३०० rpm
गिअरबॉक्स पर्याय (Transmission)५-स्पीड मॅन्युअल (Manual) / ५-स्पीड AMT (ऑटोमॅटिक)
अंदाजित मायलेज (Mileage)~१९ ते २० किमी/लिटर
इंधन टाकी क्षमता (Fuel Tank)३५ लिटर

 डायमेंशन्स आणि वजन 

वैशिष्ट्य (Feature)मोजमाप (Measurement)
एकूण लांबी (Length)३७६५ मिमी (mm)
एकूण रुंदी (Width)१६७७ मिमी (mm)
एकूण उंची (Height)१५३५ मिमी (mm)
व्हीलबेस (Wheelbase)२४०० मिमी (mm)
ग्राउंड क्लिअरन्स (Ground Clearance)१६८ मिमी (mm)
बूट स्पेस / डिकी (Boot Space)२४२ लिटर
टर्निंग रेडियस (Turning Radius)४.९ मीटर

ब्रेक, सस्पेन्शन आणि टायर्स 

भाग (Part)प्रकार / आकार (Type / Size)
पुढील ब्रेक (Front Brake)डिस्क ब्रेक (Disc)
मागील ब्रेक (Rear Brake)ड्रम ब्रेक (Drum)
पुढील सस्पेन्शनमॅकफर्सन स्ट्रट (McPherson Strut)
मागील सस्पेन्शनट्विस्ट बीमसह कॉइल स्प्रिंग
टायरचा आकार (Tyre Size)१४-इंच स्टील (बेस मॉडेल) / १५-इंच हायपरस्टाईल किंवा अलॉय व्हील्स (टॉप मॉडेल)
टायरचा प्रकार (Tyre Type)रेडियल ट्युबलेस (Radial Tubeless)

स्पेस आणि व्यवहारिकता

हे वाहन मुख्यतः पाच लोकांच्या बसण्याची व्यवस्थेसोबत मिळते आणि गाडी मधील बूट स्पेस हा २४० ते २४२ लीटर मिळतो आणि सीएनजी वेरियंटमध्ये हा लगबग १०० ते ११० लिटरचा बूट स्पेस मिळू शकतो

कलर्स

२०२६ टाटा टियागो वाहना हे एकूण सहा कलर स्कीम मध्ये ग्राहकांना मिळणार आहे त्या सहा कलरंची नावे खालील प्रमाणे

  1. वाराणसी व्हायब्रंट्स
  2. पॅंगाॅन्ग पल्स
  3. सोबो सर्ज
  4. डेटोना ग्रे
  5. प्रिस्टीन व्हाईट
  6. प्युअर ग्रे

किंमत

२०२६ टाटा टियागो ची सुरुवाती किंमत ₹४.६९ लाख पासून ते टॉप अँड वेरियंट ₹८.५५ लाख पर्यंत मिळणार आहे.

खालील दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला वेरियंटनुसार किंमत दिलेली आहे ती पहावी :

२०२६ टाटा टियागो व्हेरिएंटनुसार किंमत तक्ता (एक्स-शोरूम)

व्हेरिएंटचे नावगिअरबॉक्स पर्यायअंदाजित एक्स-शोरूम किंमत
Smart (बेस व्हेरिएंट)मॅन्युअल (Manual)₹ ४,६९,०००
Pureमॅन्युअल (Manual)₹ ५,४९,०००
Pure+मॅन्युअल (Manual) / AMT (ऑटोमॅटिक)₹ ६,१९,००० पासून सुरू
Pure+ AAMT (ऑटोमॅटिक)₹ ६,६९,०००
Creativeमॅन्युअल (Manual) / AMT (ऑटोमॅटिक)₹ ७,१९,००० पासून सुरू
Creative+ (टॉप व्हेरिएंट)मॅन्युअल (Manual) / AMT (ऑटोमॅटिक)₹ ८,५५,००० पर्यंत
2026 Tata Tiago
६ एअरबॅग्ज आणि ३६०° कॅमेरा! नवीन 2026 Tata Tiago चा हा लुक पाहून मारुती स्विफ्टचे टेन्शन वाढणार?

ही गाडी तुम्ही का खरेदी करावी

  • २०२६ टाटा टियागो ही कमी बजेटमध्ये सुरक्षित आणि शहरात चालण्यासाठी सोपी काढ शोधणाऱ्यां ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे.
  • आकाराने लहान असल्यामुळे आणि हलके स्टेरिंग यामुळे गरजेच्या रस्त्यावर चालवण्यासाठी व पार्किंग करण्यासाठी ही गाडी खूप सोपी आहे.
  • याचे सस्पेन्शन खड्डे आणि खराब रस्ते उत्तम प्रकारे झेरु शकतात त्यामुळे ही बजेट मधली कार चालण्यासाठी उत्तम आराम देते.
  • टॉप मॉडेलमध्ये असलेली मोठी टच स्क्रीन , ३६० डिग्री कॅमेरा , वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि ऑटोमॅटिक एसी यांसारख्या उत्तम फीचर्स मुळे हे वाहन तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.
  • हे कार विविध इंजिन पर्याय सोबत येते जसे की पेट्रोल , सीएनजी , ऑटोमॅटिक प्रकारातही उपलब्ध आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक अशा तिन्ही पर्याय मध्ये हे वाहनाचे इंजन उपलब्ध असणार आहे
  • टाटाची मजबूत बांधणी आणि स्टॅंडर्ड मिळणारे सहा एअर बॅग यामुळे प्रवाशांना सुरक्षेची हमी मिळणार आहे.

ही गाडी तुम्ही का खरेदी करू नये

  • जर तुम्हाला जास्त केबिन स्पेस , हायवेवर धावण्यासाठी वेगवान इंजिन असणारे गाडी किंवा स्मूथ ऑटोमॅटिक गेअर बॉक्स हवा असेल तर ही गाडी तुमच्यासाठी मुळातच नाहीये तुम्ही दुसरा पर्यायचा विचार करू शकता.
  • जर तुम्ही ऑटोमॅटिक मॉडेल घेणार असाल तर गिअर बदलताना गाडी थोडी झटके मारू शकते कारण गाडीमध्ये स्लो ऑटोमॅटिक गेअर बॉक्स असलेल्या जाणवते
  • मागच्या सीटवर लेगरूम आणि रुंदी थोडी कमी आहे त्यामुळे तिथे तीन ऐवजी दोन प्रौढ व्यक्ती आरामात बसू शकतात
  • 1.2 लिटर पेट्रोल इंजिन शहरात चांगले चालते पण हायवेवर ओव्हरटेक करताना ते थोडे कमी पावर चे किंवा संथ वाटू शकते
  • हायटेक फीचर्स असूनही मागच्या सीट साठी ऍडजेस्टेबल हेडरेस्ट आणि रियल सीट वेट सेन्सर्स ह्यांसारख्या काही सोयी ह्या गाडीमध्ये नाहीयेत त्यामुळे आपल्याला काही छोट्या गोष्टींची कमतरता भासू शकते.

 

ऑटो गुरुचा निष्कर्ष

ग्राहक लोकांनो तुम्ही जर आयुष्यात पहिल्यांदा वाहन खरेदी करायचा विचार करून हा ब्लॉग बघत असाल तर हे वाहन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे असे आमचे विधान आहे कारण ह्या सेगमेंटमध्ये मिळणाऱ्या सुरक्षितता आणि फीचर्स टाटा टियागो सोडून बाकीच्या कोणत्याही कारमध्ये मिळू शकत नाहीत व तुम्ही नवीन ड्रायव्हर असल्यामुळे तुम्हाला हे वाहन चालवण्यासाठी सुलभ आणि उत्तम राहील.

जर कोणी पहिल्यापासून कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये वाहन आहे आणि नव्याने वाहन खरेदी या हेतूने हा ब्लॉग बघत असाल तर तुमच्या गरजा जास्त असतील तर हे वाहन तुमच्यासाठी नाहीये या वाहनात जास्त केबिन स्पेस मिळू शकत नाही तसेच हायवेवर हे वाहन थोडे संथ वाटणार आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्स हा स्मूथ नसल्यामुळे तुम्हाला चालवायला मजा येणार नाही यांसारख्या गोष्टी विचारात घेऊन आपण आपले वाहन खरेदी करावे. धन्यवाद!