Top 10 bike under 1.5 lakh : दर्शकांनो तुम्ही जर नवीन बाईक घेण्याच्या भूमिकेत असाल आणि तुमचे बजेट जर ₹१.५ लाख किमतीपेक्षा कमी आहे तर आज आम्ही तुम्हाला विस्तार मध्ये दीड लाख रुपये पेक्षा कमी किमतीमध्ये येणाऱ्या टॉप दहा बाईकची संपूर्ण माहिती विस्तार मध्ये देणार आहोत.
जसं की वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या बजेटच्या अनुसरून टॉप 10 बाईकची माहिती मध्ये आम्ही तुम्हाला बाईकची किंमत , इंजिन , मायलेज , फीचर्स , फायदे-तोटे आणि तुम्ही ती का खरेदी करावी या सर्वांगीण गोष्टींचा विचार करून आम्ही तुम्हाला उपाय आणि पर्याय देणार आहोत तर चला सुरू करूया.
बजेटच्या अनुसरून टॉप 10 बाईकची यादी

१) बजाज पल्सर N१६० (Bajaj Pulsar N160)
वीस वर्षे तरुणापासून ते पन्नास वर्षाच्या बापापर्यंत सर्वांची कॉलेजचे किस्से गाजवणारे ही अशी बजाज पल्सर एक नंबरला यादीमध्ये येते
जसं की ही १६०cc सेगमेंट मधली एक उत्कृष्ट दर्जाची ऑल राऊंडर स्ट्रीट बाईक मानली जाते ही मॉडेल तिच्या दमदार लुक , प्रगत सुरक्षा आणि दररोजच्या वापरासाठी सर्वोत्तम कम्फर्ट देणारी ही बाईक आहे
या बाईची सुरुवाती किंमत ₹१.३१ लाख ते ₹१.४० लाख शोरूम पर्यंत जाते तसेच बाईक मध्ये इंजिन हे 164.82cc एअर ऑईल कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन जे की १६ psची पावर आणि 14.65 nmचा टाॅर्क निर्माण करते
हे इंजिन 45 ते 50 किलोमीटरचे मायलेज देते जे की सामान्य ग्राहकाला परवडणारे आहे
बाईकमध्ये फीचर्स सांगायचे झाल्यास ड्युअल चॅनल ABS , एलईडी प्रोजेक्ट हेडलॅम्प , USB चार्जिंग पोर्ट , डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
बाईकचे फायदे तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम सुरक्षा आणि चालवायला इंजिन खूपच स्मूथ आहे.
बाईकचे तोटे हायवेवर टॉप स्पीडला थोडे बाईकमध्ये व्हायब्रेशन जाणवू शकतात
तुम्हीही बाईक का खरेदी करावी जर तुम्हाला दिसायला स्पोर्टी चालवायला सुरक्षित आणि रोजच्या वापरासाठी स्मूथ इंजन ची सर्वोत्तम बाईक हवी असेल तर हा पर्याय तुम्ही अनुभवायला हरकत नाही.
२) टीव्हीएस आपाची RTR१६० ४V (TVS Apache RTR 160 4V)
टीव्हीएस कंपनीची ही बाईक सेगमेंट मधील सर्वोत्तम परफॉर्मन्स देणारी एक लोकप्रिय स्पोर्ट्स कम्प्युटर बाईक आहे ही बाईक रेसिंग ट्रॅकच्या अनुभवातून विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे ह्या बाईकचा परफॉर्मन्स इतर बाईकला मागे टाकतो
या बाईकची सुरुवाती किंमत ₹१.२४ लाख ते ₹१.३८ लाखापर्यंत जाते तसेच बाईक मध्ये इंजिन 159.7cc चे ऑइल कुल्ड असलेले इंजिन असणार आहे तसेच ही बाईक 45 किमी/लिटर इतके मायलेज देते.
फीचर्स सांगायचे झाल्यास ह्या बाईकमध्ये तीन राइडिंग मोड्स (अर्बन , रेन, स्पोर्ट) ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी , GTT टेक्नॉलॉजी जे की ट्रॅफिक मध्ये क्लच सोडल्यावर गाडी स्वतः चालते
बाईकचे फायदे सेगमेंट मध्ये सर्वात जास्त पिक-अप आणि ताकद देणारी ही बाईक आहे तसेच बाईक मध्ये आधुनिक फीचर्सचे समावेश केलेला दिसून येतो.
बाईकचे तोटे मागची सीट फॅमिली साठी थोडी गैरसोयीची आहे (विशेषतः साडी नेसणाऱ्या महिलांसाठी)
ही बाईक तुम्ही का खरेदी करावी जर तुम्हाला वेगाची आवड असेल आणि ट्रॅक-इन्स्पायड॔ स्पोर्ट परफॉर्मन्स असणारी बाईक हवी असेल तर ही बाईक तुमच्यासाठी आहे
३) टीव्हीएस रोनिन (TVS Ronin)
टीव्हीएस कंपनीची बाईक या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येते. या बाईकची किंमत बेस मॉडेल १.४९ लाख पासून सुरुवात होते. इंजिन बद्दल सांगायचं झाल्यास बाईकमध्ये 225.9cc चे ऑइल कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन मिळते जे की 40 ते 42 किमी/लीटर मायलेज देते
फीचर्स ह्या बाईकमध्ये पूर्ण डिजिटल कन्सोल , ब्लूटूथ नेवीगेशन , असिस्ट आणि स्लीपर क्लच , ड्युअल चॅनेल ए बी एस , जे के टॉप मॉडेल मध्ये फीचर मिळते असे फीचर्स आहेत
बाईकचे फायदे असे की बसण्याची पोझिशन अत्यंत आरामदायक आहे आणि गाडी चालवताना इंजिन मध्ये खूप चांगला टॉर्क मिळतो.
बाईकचे तोटे ह्या बाईकच्या डिझाईन सर्वांनाच आवडेल असे नाहीये
तुम्ही का खरेदी करावी सर तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी किंवा वीकेंडला लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी एक आरामदायक क्रूजर बाईक हवी असेल तर ही तुमच्यासाठीच आहे
४) बजाज पल्सर NS२०० (Bajaj Pulsar NS 200)
चौथ्या क्रमांकावर यादीमध्ये बजाज कंपनीची बजाज पल्सर NS200 ही बाईक येते या बाईकची सुरुवाती किंमत 1.49 लाख रुपये आहे आणि बाईकमध्ये 199.5cc चे लिक्विड कुल्ड ट्रिपल स्पार्क इंजिन मिळते जे की 35 ते 40 किमी/लिटर मायलेज देते.
बाईक मध्ये फीचर्स ड्युअल चॅनेल ए बी एस , इन्वर्टर फ्रंट फोर्स , नवीन डिजिटल मीटर ते पण ब्लूटूथ सोबत असे फीचर्स उपलब्ध आहेत
बाईक चे फायदे जबरदस्त टॉप अँड स्पीड आणि कॉलेजच्या तरुणांसाठी ही बाई खूप चांगली डिझाईन नुसार ठरू शकते
बाईक चे तोटे मायलेज इतर 160 बाईक पेक्षा साधारणपणे कमी मिळते
ही बाईक तुम्ही का खरेदी करावी जर तुमचे बजेट कडकडीत दीड लाख आहे आणि तुम्हाला या किमतीत सर्वात जास्त पावरफुल 200cc इंजिन हवे असेल तरी बाईक तुमच्यासाठी आहे
५) हीरो एक्स्ट्रीम १६०R ४V (Hero Xtreme 160R 4V)
पाचव्या क्रमांकावर यादीमध्ये हिरो कंपनीची हिरो एक्स्ट्रीम 160R ही बाईक येते ह्या बाईकची सुरुवाती किंमत 1.27 लागते 1.26 लाख दरम्यान आहे बाईकमध्ये 163.2cc चे ऑइल कुल्ड इंजिन मिळते जे की 45 ते 48 किमी/लिटर मायलेज देते
बाईक मध्ये फीचर्स सांगा झाल्यास KYB इन्व्हर्टेड फ्रेंट सस्पेन्शन , एलईडी लाइटिंग आणि डिजिटल कन्सोल सारखे पिक्चर्स उपलब्ध आहेत
बाईकचे फायदे असे की वजन खूप कमी असल्याने ट्रॅफिक मध्ये तुम्हाला हँडलिंग करायला खूप सोपी जाणार आहे
बाईकचे तोटे मागच्या सीटवर बसणाऱ्या पिलियन साठी सीट खूप लहान आह
ही बाईक तुम्ही का खरेदी करावी जर तुम्हाला गर्दीच्या शहरात रोज गाडी चालवायची असेल आणि वजनाने हलकी पण स्पोर्ट बाईक हवी असेल तरी बाईक तुमच्यासाठीच आहे

६) यामाहा FZ-S Fi V4 (Yamaha FZ-S Fi V4)
सहाव्या क्रमांकावर या यादीमध्ये यामा कंपनीची बाईक येते या बाईकची सुरुवाती किंमत 1.29 लाख ते १.३० लाख असणार आहे आणि बाईक मध्ये १४९cc चे एअर कुल्ड ब्लू कोर इंजिन आहे जे की 50 ते 55 किमी/लीटर मायलेज देते
बाईक मध्ये फीचर्स म्हणून ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम ब्लूटूथ कनेक्ट आणि एलईडी इंडिकेटर दिले जातात
बाईकचे फायदे सांगायचे झाल्यास ह्या बाईकचे इंजिन अत्यंत शांत आणि रिफाईंड आहे तसेच बसण्यासाठी सीट खूप मोठी व आरामदायक आहे
बाईकचे तोटे सांगायचे झाल्यास इतर 160 सीसी बाईकच्या तुलनेत हिचा पिकअप गाडी चालवताना थोडा कमी वाटतो
तुम्हीही बाईक का खरेदी करावी जर तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे कमी देखभालीची आणि तुमच्या फॅमिली साठी सोयीस्कर बाईक हवी असेल तरी बाईक तुमच्यासाठी आहे
७) रॉयल एनफिल्ड हंटर ३५० (Royal Enfield Hunter 350)
सातव्या क्रमांकावर या यादीमध्ये आम्ही रॉयल एनफिल्ड हंटर या बाईकचा समावेश केलेला आहे दिसायला एकदम शहरी लोकांसाठीच बनलेली आणि रॉयल एनफिल्ड कंपनीचे नाव यामुळे ही बाईक खतरनाक वाटते या बाईकची सुरुवाती किंमत 1.50 लाखापासून सुरू होते तसेच बाईकमध्ये 349cc चे एअर ऑइल कुल्ड जे सिरीज इंजिन मिळते जे की 35 ते 38 किमी/लीटर मायलेज देते
बाईक मध्ये फीचर्स म्हणून डिजिटल मीटर 60 स्पोक व्हील्स किंवा अलाय व्हील्स आणि ज्यासाठी रॉयल एनफिल्ड नाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे उत्तम एक्साॅस्ट साऊंड
बाईकचे फायदे जसे की बुलेट चालण्याचा फील , वजन इतर बुलेट पेक्षा कमी असल्याने शहरात चालवायला खूप सोपी जाते
बाईचे तोटे शॉकप्सर थोडे कडक वाटतात ज्यावेळी खराब रस्त्यावर जाताना झटके बसू शकतात
तुम्हीही का हि बाईक खरेदी करावी जर तुमचे स्वप्न रॉयल एनफिल्ड ब्रँडची बाईक घेण्याचे असेल आणि तुमचे बजेट पन खूप मर्यादित असेल तर ही बाईक तुम्ही घेऊन तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
८) होंडा SP १६० (Honda SP 160)
आठव्या क्रमांकावर होंडा कंपनीची SP160 ही बाईट येते ह्या बाईकची सुरुवाती किंमत 1.18 लागते 1.23 लाखाच्या दरम्यान आहे बाईकमध्ये 162.7cc चे एअर कुल्ड होंडा इंजिन मिळते जे की 50 ते 55 किमी/लिटर मायलेज देते.
फीचर्स बद्दल सांगायचं झाल्यास बाईकमध्ये डिजिटल मीटर , इंडियन स्टॉप स्विच , सिंगल चैनल abs , लांब आणि रुंद सीट असे फीचर्स उपलब्ध आहेत
बाईकचे फायदे असे आहेत की होंडाचा वर्षंन-वर्षाचा भारतीय ग्राहकांचा विश्वास , इंजिनचा आवाज अतिशय शांत आहे आणि उत्तम मायलेज देऊ शकते
बाईकचे तोटे असे आहेत की डिझाईन खूप साधी वाटते आणि तरुण पिढीला आकर्षित करेल असे या बाईकडे डिझाईन नाहीये
ही बाईक तुम्ही का खरेदी करावी जर तुम्हाला भटकेबाजपणा नको असेल फक्त एक मजबूत जास्त मायलेज देणारी कुटुंबासाठी योग्य अशी बाईक हवी असेल तरी बाईक तुमच्यासाठी आहे
९) टीव्हीएस रायडर १२५ (TVS Rider 125)
नव्या क्रमांकावर या यादीमध्ये आम्ही टीव्हीएस रायडर 125 या बाईकचा समावेश केलेला आहे दिसायला स्पोर्टी तरुणांच्या गळ्यातला ताईत असे म्हणणे योग्य ठरू शकते कारण ह्या बाईकची सुरुवाती किंमत 95 हजार ते १.०५ लाख रुपये दरम्यान आहे बाईकमध्ये 124.8cc चे एअर लिक्विड कुल्ड इंजिन जे 55 ते 60 किमी/लीटर मायलेज देते
बाईकमध्ये फीचर्स म्हणून पाच इंच डिस्प्ले , व्हॉइस असिस्टंट , ब्लूटूथ , इको आणि पावर मोटर्स यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत
बाईकचे फायदे असे की कमी किमतीमध्ये 150cc बाईक इंजिन्स मध्ये स्पोर्ट आणि भन्नाट फीचर्स यामुळे गाडी खूप मार्केटमध्ये इतरांपेक्षा सरस ठरते
ही बाईक तुम्ही का खरेदी करावी जर तुमचे बजेट १ ते १.१० लाखाच्या आसपास असेल आणि तुम्हाला कमी खर्चात आधुनिक फीचर्स आणि जबरदस्त स्पोर्ट पाहिजे असेल तर तुमच्यासाठी बाईक आहे
१०) हिरो एक्सट्रीम १२५ R (Hero Xtreme 125R)
दहाव्या क्रमांकावर या यादीमध्ये हिरो एक्स्ट्रीम १२५ आर या बाईकचा समावेश होतो या बाईकची सुरुवाती किंमत 95 हजार ते एक लाख दरम्यान आहे बाईकमध्ये 124.7 cc चे एअर कुल्ड इंजिन मिळते जे की 60 ते 66 किमी/लिटर मायलेज देते
बाईकमध्ये फीचर्स सांगायचे झाल्यास सिंगल चैनल abs , पूर्ण एलईडी लाइटिंग , मस्कुलर टॅंक यांसारखे फीचर्स बाईक मध्ये उपलब्ध आहेत
बाईचे फायदे सांगायचे झाल्यास सर्वात चांगले मायलेज आणि दिसायला मोठ्या स्पोर्ट्स बाईक सारखी दिसणारी बाईक आहे
बाईकचे तोटे असे की नवीन मॉडेल असल्याने काही शहरांमध्ये वेटिंग पिरियड जास्त असू शकतो
तुम्हीही हि बाईक का खरेदी करावी जर तुमचे मुख्य उद्दिष्ट पेट्रोलचे पैसे वाचवणे असे असेल पण तुम्हाला साधी कम्युटर मोटरसायकल नको असेल आणि तुम्ही जर तरुण असाल तर तुमच्यासाठी सर्वोत्तम योग्य पर्याय ही बाईक ठरते
निष्कर्ष
₹१.५ लाख रुपयाच्या बजेटमध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम बाईक सांगण्याचे काम आम्ही या लेख मध्ये केलेले आहे सर्व बाईक्स वेगळ्या गरजा पूर्ण करतात त्यामुळे वरील लेख वाचून तुम्ही तुमच्या निवड आणि आवडीनुसार तुमची गरज पूर्ण होईल ह्या हिशोबाने तुम्ही तुमची बाईक निवडू शकता
आमच्या मते तुम्हाला जर सुरक्षितता आणि पूर्ण ऑल राऊंड परफॉर्मन्स पाहिजे असेल तर तुम्ही Bajaj Pulsar N160 या बाईककडे जाऊ शकता तसेच जर तुम्ही कॉलेजमध्ये आहात आणि तुम्हाला बाईक हवी असेल तर तुम्ही TVS Apache RTR 160 4V ह्या बाईकडे जाऊ शकतात.
तसेच जर तुम्ही फक्त मायलेज आणि पैसे वाचवायचे हिशोबाने बाईक घेणार असाल तर तुम्ही TVS Raider 125 किंवा Hero Xtreme 125R ह्या बाईककडे जाऊ शकता.
आमचा मुख्य सल्ला असा राहणार आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या शहरांमधील शोरूम मध्ये जाऊन Bajaj Pulsar N160 किंवा TVS Apache RTR 160 4V या दोन्ही गाड्यांची टेस्ट राईड नक्की घ्या जी बाईक चालवताना तुम्हाला जास्त आनंद आणि कम्फर्टेबल वाटेल ती बाईक तुम्ही फायनल करा. धन्यवाद!!!




Leave a Reply