बुलेटप्रेमींचा थरार! Royal Enfield Sales May 2026 चा हा आकडा पाहून प्रतिस्पर्धी कंपन्याही चक्रावल्या

Royal Enfield sales may 2026 : भारतीय बाजारामध्ये एकाच कुटुंबात आजोबापासून ते नातूपर्यंत सर्वांचे आवडते मोटरसायकल ब्रँड रॉयल इन्फिल्ड याच रॉयल एनफिल्ड वर लोकांचे प्रेम मोटरसायकलच्या विक्री च्या आकड्यात दिसून येत आहे.

कंपनीने मे महिन्यात विकले तब्बल १,०३,२३१ युनिट्स मोटरसायकल आणि ही संख्या मागच्या वर्षासाठी सोबत तुलना केली तर १५% जास्त आहे. चला जाणून घेऊया ब्लॉगमध्ये कंपनीनेही विक्री कशी साध्य केली? ,

त्याच सोबत जाणून घेऊया कंपनीने हा आकडा कसा साध्य केला आणि त्याच्या मागचे पूर्वनियोजन काय असेल चला जाणून घेऊया या ब्लॉग मध्ये..

 

 Royal Enfield Sales May 2026
बुलेटप्रेमींचा थरार! Royal Enfield Sales May 2026 चा हा आकडा पाहून प्रतिस्पर्धी कंपन्याही चक्रावल्या

 

जाणून घेऊया नेमके आकडे काय सांगू इच्छितात :

येथे रॉयल एनफिल्डच्या मे २०२६ विरुद्ध मे २०२५ मधील विक्री अहवालाचा संक्षिप्त तक्ता खालीलप्रमाणे आहे

रॉयल एनफिल्ड विक्री अहवाल (मे २०२६ विरुद्ध मे २०२५)

श्रेणी (Category)मे २०२६ (संख्या)मे २०२५ (संख्या)वार्षिक बदल / वाढ (YoY %)
देशार्गत विक्री (Domestic)९४,११५७५,८२०📈 +२४%
निर्यात (Exports)९,११६१३,६०९📉 -३३%
एकूण विक्री (Total Sales)१,०३,२३१८९,४२९📈 +१५%

 

हे आकडे दर्शवतात की कंपनी कोणत्या दिशेमध्ये कुच करायला लागलेले आहे बोलायचे गेले तर कंपनी 350cc मॉडेल्सच्या खांद्यावरच कंपनीचा भार जास्त करून आहे. अन त्यात ३५० सीसी मॉडेल्समध्ये येतात क्लासिक 350 , बुलेट 350 , हंटर 350 , मेटर 350 या मोटर सायकलच्या जीवावरच कंपनीचा उदारनिर्वाह दिसून येतो कंपनीच्या एकूण महिन्याच्या विक्रीमध्ये या 350cc मोटरसायकलचा 88 टक्के वाटा आहे.

कंपनीच्या 350cc च्या वरील मोटर सायकलचा विचार केला तर या सेल्स आकडे मध्ये यांची संख्या खूप कमी आहे म्हणजे एकूण १२,४४७ युनिट्स मोटरसायकल 350cc च्या वर दिसून येतात आणि या ३५० सीसीच्या वरील मोटरसायकल मध्ये येतात गोरिला 450 , हिमालयान 450 , सुपर-मेटर 650 ,
शॉट-गन 650 , (650भाऊ) म्हणजेच इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेन्टल जीटी , आणि नव्याने मागच्याच महिन्यात लॉन्च झालेली बुलेट 650 ह्या मोटर सायकलचे नाव येते.

रॉयल एनफिल्ड कंपनीची देशांतर्गत आणि परदेशात झालेले मोटरसायकल विक्री :

येथे तुमच्या माहितीनुसार रॉयल एनफिल्डच्या इंजिन क्षमतेनुसार विक्रीचा संक्षिप्त तक्ता खालीलप्रमाणे आहे:

इंजिन क्षमतेनुसार विक्री (Engine Capacity-wise Sales)

इंजिन क्षमता (Engine Capacity)मे २०२६ (संख्या)मे २०२५ (संख्या)वार्षिक बदल / वाढ (YoY %)
३५० सीसी पर्यंत (Up to 350cc)९०,७८४७६,४९२📈 +१९%
३५० सीसी पेक्षा जास्त (Above 350cc)१२,४४७१२,९३७📉 -४%
एकूण (Total)१,०३,२३१८९,४२९📈 +१५%

 

मे २०२६ महिन्यात कंपनीने भारत देशांतर्गत ९४,११५ युनिट मोटरसायकलची विक्री केली आणि ही विक्री मे २०२५ वर्षाच्या तुलना करावी तर ७५,८२० युनिट मोटरसायकल विक्री सोबत 24% वृद्धी दर्शवित आहे.

रॉयल एनफिल्ड कंपनीचे परदेशात मोटरसायकल विक्री बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी मे २०२६ महिन्यात ९,११६ युनिट मोटरसायकल्स प्रदेशात विक्री केल्या आणि मागील मे २०२५ वर्षा सोबत तुलना केली तर १३,६०९ युनिट सोबत ३३% कमतरता दाखवत आहे.

 Royal Enfield Sales May 2026
बुलेटप्रेमींचा थरार! Royal Enfield Sales May 2026 चा हा आकडा पाहून प्रतिस्पर्धी कंपन्याही चक्रावल्या

कंपनीने हे आकडे कसे साध्य केले :

हे आकडे साध्य करण्यासाठी कंपनीने एक रेट्रो ब्रँड पासून ते उत्कृष्ट गुणवत्ता प्रधान करणारी व जास्त संख्यांमध्ये मोटरसायकल विकणाऱ्या ब्रँड कडे कसा प्रवास केला प्रवासाच्या सारांश या आकडेवारीवरून दिसून येतो.

350 सीसी सेगमेंट वर्चस्व

भारतातील मध्यम आकारातील मोटरसायकल मार्केटमध्ये रॉयल इन्फिल्ड चा एकूण तब्बल 94 टक्के वाटा आहे .

आणि या वाट्याचे श्रेय जाते कंपनीच्या 350cc जे सीरीज इंजिन इंजिनला कारण ह्याच इंजन चा वापर कंपनीने 350 प्रत्येक मोटरसायकलमध्ये केला आहे.

आणि यांच्यामध्ये क्लासिक ३५० , बुलेट ३५० , हंटर 350 , मेटर 350 या बाईकचा वाटा आहे. आणि या बाईक ग्राहकांच्या प्रत्येक आवडनिवड वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या फायदे-तोटे बघून निर्मित केलेली आहे.

एकच इंजिन अनेक मॉडेल्स रणनीती

कंपनीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व नफा वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म शेअरिंग म्हणजेच एकच इंजिन अनेक मॉडेल्स रणनीती याचा वापर करून कंपनीने यात खूप नफा मिळवण्याची हुशारी केली आहे.

एकाच इंजिन प्लॅटफॉर्म अनेक वेगवेगळ्या मोटरसायकल बनवल्यामुळे येणारा इंजन उत्पादन खर्च कमी केला. उदाहरण. 650 इंजिनचा वापर शॉर्ट गन , सुपरमेटोर , कॉन्टिनेन्टल जीटी आणि नवीन लॉन्च झालेली बुलेट ६५० या सर्व मध्ये एकच वापर केला आहे.

केवळ बाईक म्हणून नाही तर लाईफस्टाईल म्हणून दर्शवणे

रॉयल इन्फिल्ड कंपनी फक्त बाईक म्हणून मोटरसायकल विकत नाही तर एक रायडिंग संस्कृती विकते ज्यामुळे ग्राहकांमध्ये कंपनीच्या ब्रँड सोबत एक भावनिक नाते जपले जाते.

कंपनी द्वारा रायडिंग इव्हेन्स म्हणजेच उदाहरणला हिमालय ओडिसी आणि रायडर मॅनिया यासारख्या मोठ्या मोठ्या ट्रीप आयोजित करून कंपनी ग्राहकांना आपल्या सोबत जोडून ठेवण्यास सक्षम होते. यासोबतच कंपनी अधिकृत रायडिंग जॅकेट्स , हेल्मेट , कपडे आणि कस्टम ॲक्सेसरीज विकून कंपनी एक मोठा स्त्रोत निर्माण करते.

काय असेल रॉयल इन्फिल्ड चे भविष्य :

कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठाची ओळख आणि ग्राहकांची उत्सुकता लक्षात घेऊन २०२६ च्या सुरुवातीला आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Flying Flea C6 लोकांमध्ये सादर केली याच्यामुळे कंपनीचे भविष्य खूप उज्वल असणार आहे कारण कंपनी भविष्यात ७५० सीसी प्लॅटफॉर्म लोकांसाठी आणणार आहे तसेच 450cc व नवीन 250cc हायब्रीड मोटरसायकल आणण्याचा पण कंपनीचा एक मजबूत डाव असू शकतो.

बदलत्या बाजारपेठ आणि ग्राहकांच्या मनात इलेक्ट्रिक वाहनांबद्दल वाढते महत्त्व त्याचा विचार करून कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकल मध्ये खूप निवेश करेल असे दिसून येणार आहे.

 

Royal Enfield Sales May 2026
बुलेटप्रेमींचा थरार! Royal Enfield Sales May 2026 चा हा आकडा पाहून प्रतिस्पर्धी कंपन्याही चक्रावल्या

 

विषय 2,500 करोड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सचा :

रॉयल एनफिल्ड कंपनीने घोषित केलेल्या 250 कोटीचा प्लांट आहे त्यांच्या व्यवसायिक विस्ताराचा एक अतिशय महत्त्वाचा मानबिंदू असणार आहे आणि हा प्लांट आंध्र प्रदेशातील टाळा तिरुपती जिल्हा येथे उभारण्यात येत आहे तामिळनाडू बाहेर उभारताना पहिलाच मोठा प्लांट असणार आहे.

कंपनीने यात जवळपास 2500 कोटींची प्रचंड गुंतवणूक करणार आहे.

ह्या नवीन ग्रीनफिल्ड प्लांट मधून दरवर्षी नऊ लाख मोटरसायकल उत्पादन करणार हे उद्दिष्ट कंपनीचे असणार आहे. आणि ह्या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे पंधरा हजार लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची प्रचंड शक्यता आहे. आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी हा प्लॅन पुढील 18 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

कंपनीने हा निर्णय घेण्याचे कारण असे आहे की रॉयल इन्फिल्ड चे तमिळनाडूमधील चार प्लांट्स आहेत ज्यांची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे 14.6 लाख युनिट्स आहे आणि ती जवळपास पूर्ण वापरली जात आहे. भारतीय आणि जागतिक बाजारात बुलेट आणि इतर मॉडेलची वाढती मागणी पाहता कंपनीकडून भविष्यात बाईकचा तुटवडा भासू नये यासाठी कंपनीने तामिळनाडू राज्याच्या बाहेर जाऊन या नवीन प्लांटची घोषणा केली आहे

सामान्य ग्राहकांना याचा फायदा काय होणार?

रॉयल एनफिल्डच्या विक्रमी विक्री आणि नवीन घोषणांचा सामान्य ग्राहकांना थेट आणि दीर्घकालीन फायदा होणार आहे.

या फायद्यांमध्ये सर्वप्रथम गाड्यांची डिलिव्हरी लवकर मिळणार आहे पूर्वीसारखे लोकप्रिय मॉडेल साठी ग्राहकांना करावा लागणारा आता लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. तसेच ग्राहकांसाठी नवनवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत कमी बजेट पासून ते उत्कृष्ट दर्जांच्या सेगमेंट पर्यंत अनेक पर्याय या ब्रँडमध्ये मिळतील.

पूर्वीसारखीच रिटेल व्हॅल्यू पण उत्तम राहणार आहे हा एकच ब्रँड आहे ज्याची पहिल्यापासून आत्तापर्यंत रिसेल व्हॅल्यू नेहमीच चांगली राहिली आहे आणि वाढत्या विक्रीमुळे कंपनी आपल्या शोरूम आणि सर्विसिंग नेटवर्कच्या जाळ्या अधिक मजबूत करून लोकांसाठी गाडीची सर्विसिंग आणि सुट्टे भाग सहज आणि स्वस्त उपलब्ध करून देतील.