10 Monsoon EV car care tips : दर्शकांनो आता मान्सून पावसाचा जोर पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि या पावसाच्या वादळी परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या वाहनाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे झालेले आहे त्यामुळे तुम्हाला या पावसाळ्याच्या दिवसात तुमच्या गाडीची गंज , ओलावा किंवा शॉर्टसर्किट पासून वाचवण्यासाठी विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आम्ही आज ह्या लेख मध्ये खालील १० सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाचे आयुष्य आणि कार्यक्षमता टिकून राहील
पावसाळ्याच्या दिवसात इलेक्ट्रिक वाहन वापरायचे म्हणल्यास तुम्हाला पेट्रोल डिझेल इंजिनच्या वाहना पेक्षा जास्त काळजी आणि खबरदारी घेणे हे खूप गरजेचे आहे. या जून महिन्यापासून पावसाचा जोर चालू झालेला आहे जसे आपण पुढील महिन्यात पदार्पण करेल तसे पावसाचा जोर आणखी तीव्र होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात इलेक्ट्रिक वाहन असेल तर त्या वाहनाची या पावसाच्या दिवसात कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे हे आम्ही विस्तारपणे ह्या लेखमध्ये सांगणार आहोत चला सुरू करूया…
पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांची काळजी घेणाऱ्या १० टिप्स

१) चार्जिंग पोर्ट कोरडे ठेवणे
चार्जिंग करताना चार्जिंग पोर्ट आणि प्लग पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा आणि चार्जिंग गन मध्ये पाणी जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या जेणेकरून ओलावा किंवा पाण्यामुळे शाॅर्ट सर्किट होणार नाही आणि इलेक्ट्रिक घटकांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले जाईल.
वाहनांची सुरक्षा राखण्यासाठी तुम्ही सुरुवातीला चार्जिंग सुरू करण्यापूर्वी फोर्ट आणि प्लगभोवती पाण्याची थेंब असल्यास ते कोरडे कापडाने स्वच्छ पुसून घ्या तसेच पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर चार्जिंग करणे शक्यतो टाळावे शेड असलेल्या ठिकाणी चार्जिंग करा. पोर्ट मध्ये पाणी गेल्यास ते नैसर्गिक हवेने कोरडे होऊन द्या कोणत्याही तीक्ष्ण वस्तू आत टाकू नका आणि चार्जिंग गन वापरत नसताना तिचे सुरक्षा कव्हर नेहमी बंद असल्याची खात्री करा
२) पाण्यातून गाडी चालवणे मुख्यता: टाळणे
साचलेल्या पाण्यातून गाडी घेणे शक्यतो टाळा जेणेकरून जास्त पाण्यातून जाताना अंतर्गत भागाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या तसेच बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांना वॉटर रेजिस्टंट IP67 रेटिंग दिलेले असते. तरी अति तिथे माती ह्या न्यायाने साचलेल्या पाण्यातून गाडी नेणे नेहमीच धोक्याचे ठरू शकते.
जसं की IP67 रेटिंग हे मर्यादित असते म्हणजे ठराविक वेळेसाठी किंवा ठराविक खोलीच्या पाण्यासाठीच(साधारण १ मीटर खोलीवर ३० मिनिटे) प्रभावी असते. सतत जास्त पाण्यात गाडी चालण्यासाठी ते बनलेले नाहीये त्यामुळे साचलेल्या पाण्यातून जाताना पाण्याचा दाब वाढवून ते बॅटरी पॅक किंवा इतर नाजूक इलेक्ट्रॉनिक भागांमध्ये शिरू शकते ज्यामुळे मोठी शॉर्टसर्किट होण्याची संभावना वाढते.
तसेच फक्त बॅटरीज नाही तर गाडीचे ब्रेक सस्पेन्शन आणि वायरींगचेही यामुळे अतोनात नुकसान होऊ शकते त्यामुळे तुम्ही पावसात जास्त साचलेल्या पाण्यात गाडी नेण्यापेक्षा चांगला कमी पाण्याचा मार्ग निवडणे सुरक्षित उपाय ठरू शकतो.
३) गाडी लगेच चार्ज करू नये
पावसातून भिजून आल्यानंतर लगेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला लावू नका जसं की गाडीला आणि बॅटरीला सामान्य तापमानाला येऊ द्या आणि नंतरच चार्जिंग करण्याची भूमिका घ्या.
पावसामुळे वाहनाच्या चार्जिंग पोर्टमध्ये किंवा आजूबाजूला पाणी असू शकते ओल्या स्थितीत प्लग जोडल्यास शॉर्टसर्किट होऊ शकते तसेच गाडी चालताना बॅटरी गरम होते पावसामुळे बाहेर तापमान अचानक बदलल्यास बॅटरीवर ताण पडतो त्यामुळे तिला सामान्य तापमानाला येणे खूप गरजेचे असते.
तसेच बॅटरी गरम किंवा ओलसर असताना चार्ज केल्यास त्याची कार्यक्षमता आणि आयुष्य कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही चार्जिंग सुरू करण्यापूर्वी चार्जिंग पोर्ट कोरड्या कापडाने पुसून घ्या नंतर प्रवास संपल्यानंतर किमान 15 ते 30 मिनिटे गाडी तसेच ठेवा आणि नंतर चार्जिंगला तुमचे वाहन लावू शकता.

४) योग्य सर्विसिंग करणे
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटर मध्ये गाडीची तपासणी करून घ्या जसे की वायरिंग आणि बॅटरी पॅक व्यवस्थित आहे का नाही ते तपासा.
कुठेही कट किंवा उघडी वायर नाही ना याची खात्री करा यामुळे शॉर्टसर्किट ठेवू शकते तसेच बॅटरीचे कव्हरेज आणि सील व्यवस्थित असणे गरजेचे आहे जेणेकरून पाणी आत जाणार नाही.
पावसाळ्यात रस्ते घसरणे होतात त्यामुळे ब्रेक लाइनर्स आणि टायरची ग्रिप उत्तम आहे का हेही बघा तसेच पावसाळ्यात स्पष्ट दिसण्यासाठी वायपर ब्लेड्स आणि सर्व लाइट्स चालू आहेत का ते आवश्यक चेक करा.
५) ओरिजनल चार्जर वापरणे
नेहमी कंपनीने दिलेले मूळ चार्जर वापरा स्थानिक किंवा अनधिकृत चार्जर वापरल्याने पावसाळ्यात शॉर्टसर्किट होण्याचा धोका वाढू शकतो
ओला हाताने चार्जिंग करणे टाळा हात पूर्णपणे कोरडे असल्याशिवाय चार्जरला हात लावू नका तसेच गाडी चार्जिंगला लावण्यापूर्वी त्याच्या पोर्ट मध्ये पाणी किंवा ओलसरपणा नाही नाही ना याची खात्री करा.
६) सुरक्षित ठिकाणी पार्किंग करणे
उघड्यावर, झाडाखाली किंवा पाणी साचणाऱ्या तळघरात गाडी पार्क करू नका यामुळे वाहनावर झाड पडणे किंवा पाण्यात गाडी खराब होणे यांसारख्या गोष्टी टाळता येऊ शकतात
बेसमेंट मध्ये पार्किंग केल्यामुळे पाणी साचू शकते आणि पाणी साजल्यामुळे गाडी पूर्णपणे बुडून इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक बिघाड होऊ शकतो तसेच झाडाखाली गाडी पार्क केल्यास वादळ वाऱ्यामुळे झाड किंवा फांद्या पडून गाडीचा चक्काचूर होऊ शकतो
उघड्यावर पार्किंग करणे नेहमी टाळावे जेणेकरून मुसळधार पाऊस आणि गारपीट मुळे वाहनाचे थेट नुकसान होणार नाही.
जिथे पाणी साचण्याची शक्यता नसेल अशी उंचावरील ठिकाणी गाडी पार्क करा आणि शक्यतो काँक्रीटचे छत किंवा पक्के शेड असलेल्या ठिकाणीच गाडी पार्क करण्याची भूमिका घ्या.

७) रबर सील तपासणी करणे
गाडीच्या खिडक्या , दरवाजे आणि इतर पॅनलची सिलिंग तपासा तडे गेलेल्या सीलमुळे ओलावा आत जाऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणांना गंज चढू शकतो
रबर सील खराब झाल्यामुळे खिडक्या आणि दरवाजा मधून पाणी गाडीचे आत शिरू शकते तसेच गाडीच्या सीट आणि मॅटमध्ये ओलावा राहिलेले दुर्गंधी येऊ शकते आणि शॉर्टसर्किटमध्ये खराब होऊ शकतो.
या सर्वांपासून वाचण्यासाठी रबर सीलवर साचलेली धूळ आणि कचरा ओल्या कापडाने साफ करा. नंतर रबर मऊ ठेवण्यासाठी आणि तडे जाण्यापासून वाचवण्यासाठी सिलिकॉन प्रोटेक्ट स्प्रे वापरा तसेच जर रबर कडक झाले असेल किंवा फाटले असेल तर ते ताबडतोब मेकॅनिकल कडे जाऊन बदलून घेणे गरजेचे आहे.
तसेच तुम्हाला जर पावसाळ्यात गाडी गंजण्यापासून वाचवायचे असेल तर महत्त्वाच्या तीन ट्रिक्स या विषयावर लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही वाचू शकता.
८) क्लिनिंग आणि कोटिंग करणे
पावसाळ्याचे पाणी आणि चिखलामुळे गाडीचा पेंट खराब होऊ शकतो नियमित गाडी धुवा आणि शक्य असल्यास रस्ट-प्रूफ कोटिंग वापरण्याचा प्रयत्न करा.
गाडीवर चिखल सुकू देऊ नका तो लगेच धुवा आणि गाडीच्या खालच्या भागाला गज लागण्यापासून वाचवण्यासाठी रस्ट-प्रूफ कोटिंग नक्की करा तसेच वॅक्स किंवा सिरॅमिक कोटिंग सुद्धा करू शकता यामुळे रंगावर एक सुरक्षितत थर तयार होतो आणि पाणी रंगावर थांबत नाही आणि गाडी धुतल्यानंतर ती चांगल्या मायक्रो फायबर कापडाने पूर्ण कोरडी करा या सर्व गोष्टी केल्याने तुमची गाडी गजण्यापासून वाचू शकते.
९) विंडशील्ड वायफर्स तपासणे
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंग साठी वायपर्स आणि सर्व लाइट्स व्यवस्थित कार्यरत आहेत का याची खात्री करा.
वायफरचे रबर खराब किंवा कडक झाले असल्यास ते लगेच बदला, जेणेकरून काचेवर स्क्रॅच पडू शकतात तसेच वायफायरच्या पाण्याच्या टाकीत नेहमी पाणी आणि चांगला शाम्पू किंवा क्लिनर भरून ठेवा यामुळे काच स्वच्छ राहते.
मुसळधार पावसात हेडलाइट्स आणि टेललाईट चालू ठेवल्याने समोरच्या रस्ता दिसतो आणि मागून येणाऱ्या गाड्या नाही तुमची गाडी स्पष्ट दिसते तसेच वळण घेताना इंडिकेटर वापर नक्की करा आणि हे करत असताना गाडीचे सर्व लाईट्स योग्यपणे चालतात का हे मेकॅनिकल कडे जाऊन तपासून घ्या

१०) बॅटरी काढताना खबरदारी घेणे
जर तुमची इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर डिटॅचेबल बॅटरीची असेल तर ती बॅटरी काढताना किंवा लावताना मुख्य बटन बंद असल्याची खात्री करा
चालू इंग्निशनमध्ये बॅटरी काढल्यास किंवा लावल्यास स्पार्क होऊ शकतो ज्यामुळे बॅटरी किंवा वाहनाचे नुकसान होऊ शकते तसेच अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे स्कूटर मधील स्क्रीन किंवा कंट्रोलर खराब होऊ शकते तसेच पार्किंग मुळे हाताला विजेचा झटका लागण्याचा किंवा किरकोळ भाजन्याचा धोका निर्माण होतो.
हे सर्व वाचण्यासाठी पावसात किंवा ओल्या जागी बॅटरी काढणे किंवा लावणे शक्यतो टाळा. बॅटरी जड असते त्यामुळे ती काढताना हातातून दिसणार नाही याची खात्री करा खाली पडल्यास बॅटरीचे अंतर्गत नुकसान होऊ शकते. तसेच बॅटरी जोडण्याचे टर्मिनस असतात तिथे धूळ किंवा कचरा जमा होऊ देऊ नये ते नेहमी सुक्या कापडाने स्वच्छ ठेवा इतक्या खबरदारी घेतल्यावर तुम्ही बॅटरी योग्यपणे हाताळू शकता.
निष्कर्ष
पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे सामान्य ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन वापरताना कोणत्या प्रकारची काळजी आणि खबरदारी घेणे हे माहीत नसते त्यामुळे आजचा लेख त्या सामान्य ग्राहकांना आपल्या इलेक्ट्रिक वाहनाविषयी आणि आपण वाहनाची कशाप्रकारे काळजी घ्यावी याविषयी माहिती देण्यासाठी हा लेख लिहिलेला आहे हा लेख तुम्ही पूर्णपणे वाचून तुमच्या जीवनामध्ये अवलोकन करावे जेणेकरून तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाचे आयुष्यमान आणि कार्यक्षमता टिकून राहते. धन्यवाद!!!




Leave a Reply