TATA Sierra ev review : दर्शकांनों तुम्ही जर तुमच्या कुटुंबासाठी नवीन आधुनिक , आकर्षक आणि प्रीमियम इलेक्ट्रिक SUV वाहनाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आज ऑटो गुरु घेऊन आलेला आहे TATA Sierra ev रिव्ह्यू यामध्ये आम्ही तुम्हाला या इलेक्ट्रिक वाहनाच्या एक्स्टेरियल , इंटेरियर , वाहनाचे बॅटरी आणि किती रेंज असेल या प्रश्नाचे उत्तर तसेच वाहनचा ड्रायव्हिंग अनुभव कसा आम्हाला वाटला याबद्दलही विशेष तुमच्या TATA Sierra ev बद्दल पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळावीत ह्या प्रयत्नाने ह्या लेख लिहिलेला आहे.
टाटा कंपनीने TATA Sierra ev या वाहनाला ३० जून २०२६ रोजी भारतीय बाजारामध्ये लॉन्च केलेले आहे या गाडीची सुरुवाती किंमत ₹१८.७९ लाख (एक्स शोरूम) असणार आहे तसेच टॉप मॉडेल व्हेरियंट ची किंमत ही ₹२६.४९ लाख (एक्स शोरूम) असणार आहे. तसेच या वाहनाचे बुकिंग सुरू झालेले आहे आणि या वाहनाची अधिकृत डिलिव्हरी कंपनीकडून १५ जुलै २०२६ पासून चालू होणार आहे. चला विस्तार मध्ये या वाहनाचा रिव्ह्यू पाहूया.
Tata Sierra EV review विस्तार मध्ये खालील प्रमाणे

१) एक्स्टरियर
टाटा सियारा ईव्ही या वाहनाची बाह्य बाजूनी रचना ही कंपनीकडून खूप आधुनिक आकर्षक आणि प्रीमियम वाटणारी केलेली आहे आणि या वाहनाचे बाहेरील डिझाईन पाहिल्यास कंपनीने जुन्या सियाराची ओळख कायम ठेवण्याचा निर्णय घेतला दिसून येतो
ही गाडी समोरून पाहायचं झाल्यास सर्वात पहिला टाटा कंपनीच्या मधोमध लोगो वर ध्यान खेचले जाते त्यानंतर लोगोच्यावर कनेक्टेड LED DRLs देण्यात आलेले आहेत जे या वाहनावर खूप आकर्षक दिसते तसे पाहायला गेल्यास ही इलेक्ट्रिक गाडी ICE इंजिनच्या तुलनेत समोरून इलेक्ट्रिक वाहनाच्या नुसार थोडी बदललेली दिसून येते तसेच गाडीत एलईडी हेडलॅम्प आणि ब्लॅक ग्लाॅसी कलर मध्ये बंपर समोरून खूप आकर्षक दिसते
साईडच्या बाजूने डोअर वर फ्लश डोअर हँडल्स देण्यात आलेले आहेत आणि साईडला असणाऱ्या चाकाची साईज ही 19 इंच कंपनीकडून मिळते. तसेच वाहनांमध्ये मागून कनेक्टेड LED टेललॅम्प पाहायला मिळतो तसेच वरून टाटाकडून पेनॉरामिक सनरुफ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हे वाहन भारताने सर्वात आकर्षक इलेक्ट्रिक SUV पैकी एक आहे जे की दमदार SUV लुक आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स देण्याचे काम करते.

२) इंटेरियर
टाटा सियारा ईव्हीच्या आत बसल्यावर तुम्हाला आपण अत्यंत आलिशान आणि प्रीमियम वाहनांमध्ये असल्याची भावना येते आत बसल्यावर समजते की हा आपन कुठेतरी महागड्या गाडीत बसलेला आहे. इंटेरियर मध्ये समोर ट्रिपल स्क्रीन डॅशबोर्ड पाहायला मिळतो यामध्ये 12.3 इंच टचस्क्रीन आहे. तसेच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि प्रवासासाठी स्वतंत्र स्क्रीन अशा प्रकारे तीन स्क्रीन आपल्याला डॅशबोर्ड वर पाहायला मिळतात.
सीट्सची प्रीमियम लेदर कॉलिटी खूप चांगली आहे आणि समोरच्या केबिनमध्ये दोन्ही सीट ह्या व्हेंटिलेटड असणार आहेत तसेच ड्रायव्हरला इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट मिळणार आहे.
आणि वाहनात ॲम्बियंट लाइटिंग आपल्याला पाहायला मिळते तसेच वाहनांमध्ये पॅनोरॅमिक सनरुप हा पूर्ण डिक्की पर्यंत असल्यामुळे वाहनाच्या आत असणाऱ्या प्रवाशांना चांगला सूर्यप्रकाश आणि प्रवासात निसर्गाचा खूप चांगला अनुभव येणार आहे.
गाडीमध्ये आपल्याला जेबीएल प्रीमियम साऊंड सिस्टिम मिळते जे की डॉल्बी अटॅमस सपोर्ट सोबत एकत्रीकरण झाल्यामुळे वाहनाच्या आत साउंड च्या बाबतीत तर खूप चांगला अनुभव येणार आहे. तसेच वाहनांमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple Carplay ची सुविधा आहे तसेच फ्रंट केबिनमध्ये दोन जागी मोबाईल वायरलेस चार्जर सुविधा मिळणार आहे आणि कारच्या मागे खूप मोठा बूट स्पेस मिळतो.

३) बॅटरी , रेंज आणि चार्जिंग
टाटा सियारा ईव्हीमध्ये दोन प्रकारच्या बॅटरी पॅक मिळतात जसे की 63kwh आणि 75kwh आणि यांची कंपनीकडून दावा केलेले रेंज ही 63kwh साठी 565 किमी पर्यंत असणार आहे आणि 75kwh साठी 665 किमी पर्यंत असणार आहे पण प्रत्यक्ष रियल वर्ल्ड रेंज ही शहरांमध्ये 450 ते 550 किमी आणि हायवे-वर 400 ते 500 किमी इतकी मिळणार आहे.
चार्जिंग विषयी बोलायचं झाल्यास AC होम चार्जरने तुम्हाला ७ ते १० तास चार्जिंग करायला लागणार आहेत आणि 120kw DC फास्ट चार्जर ने २६ मिनिटात सुमारे 20% पासून 80% पर्यंत चार्जिंग होणार आहे.
४) ड्रायव्हिंग अनुभव
सियारा ईव्ही चालण्याचा अनुभवाविषयी सांगायचे झाल्यास ही गाडी चालवताना शांत , स्मूथ आणि शक्तिशाली वाहन चालण्याचा अनुभव देते चालवताना तुम्हाला जाणवते की आपण कोणते तर शक्तिशाली इंजिन असणाऱ्या वाहनाची सवारी करतोय ते सेगमेंट मध्ये सर्वात चांगले इलेक्ट्रिक बॅटरी असणारी हे वाहन आहे वाहन चालवताना आम्हाला असा कोणत्याही प्रकारची वाहनांमध्ये खराबी किंवा त्रुटी अशी जाणवली नाही.
ही गाडी चालवायला एकदम स्मूथ आणि ओव्हरटेक असो किंवा हायवेवर स्पीड मध्ये क्रूज करायचे असो ही तुम्हाला चालवताना फक्त आणि फक्त आत्मविश्वासच वाढवेल हे आम्ही सांगू शकतो या गाडीमध्ये चार प्रकारचे ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध आहेत जसे की Eco ,City , Sports , Boost.
तुम्हाला सिटीमध्ये किंवा ट्रॅफिक मध्ये Eco आणि City मोडवर तुम्ही वाहन चालू शकतात यामध्ये बॅटरी कमी खर्च होते आणि तुम्हाला रेंज ही चांगली मिळते पण Sports आणि Boost मोडमध्ये तुमची बॅटरी लवकर खर्च होते आणि तुमची पहिल्या दोन मोडच्या तुलनेत रेंज साधारण 60 ते 80 किलोमीटर कमी होते.

५) फीचर्स
टाटा सियारा ईव्ही ही मुख्यतः फीचर्स साठीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेली आहे या वाहनांमध्ये प्रीमियम महागड्या वाहनांचे फीचर्स यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे जसे की ऑटो पार्किंग , ट्रिपल स्क्रीन डॅशबोर्ड , गेम खेळण्यासाठी एअर कॅन्सल , १२ स्पीकर जेबीएल डॉल्बी ऑटोमस साऊंड सिस्टिम , ५४० डिग्री ट्रान्सपरंट मोड मधला कॅमेरा आणि मल्टी कलर मधला हेड ऑफ डिस्प्ले यांसारख्या तंत्रज्ञानामुळे हे वाहन खतरनाक फिचर्सने भरलेले वाटते.
टाटा सियारा ईव्ही मध्ये मिळणारे सगळे फिचर्स आम्ही खालील तक्त्यामध्ये अधोरेखित केलेले आहेत :
टाटा सिएरा ईव्हीचे फीचर्स (TATA Sierra EV Features)
टाटा सिएरा ईव्ही (TATA Sierra EV) ही टाटाची प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असून आधुनिक तंत्रज्ञान,
प्रीमियम इंटिरिअर आणि अत्याधुनिक सुरक्षा फीचर्ससह येणार आहे. खाली दिलेली माहिती
ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या मॉडेल, अधिकृत टीझर्स आणि उपलब्ध माहितीनुसार आहे.
लॉन्चवेळी काही फीचर्समध्ये बदल होऊ शकतात.
| फीचर | तपशील |
|---|---|
| एक्सटेरियर फीचर्स | |
| LED Headlamps | फुल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स |
| Connected DRLs | समोर पूर्ण रुंदीची LED लाईट बार |
| LED Tail Lamps | कनेक्टेड LED टेललॅम्प्स |
| Flush Door Handles | एअरोडायनामिक फ्लश डोअर हँडल्स |
| Alloy Wheels | 19-इंच अलॉय व्हील्स (अपेक्षित) |
| Panoramic Glass Roof | मोठा पॅनोरॅमिक सनरूफ |
| इंटिरिअर फीचर्स | |
| Triple Screen Dashboard | तीन डिजिटल स्क्रीन असलेला प्रीमियम डॅशबोर्ड |
| Digital Instrument Cluster | पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले |
| Infotainment System | मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट |
| Wireless Android Auto & Apple CarPlay | वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी |
| Ventilated Seats | समोरील व्हेंटिलेटेड सीट्स |
| Powered Driver Seat | इलेक्ट्रिक अडजस्टेबल ड्रायव्हर सीट |
| Dual Zone Climate Control | ड्युअल-झोन ऑटो AC |
| Wireless Charger | मोबाईल वायरलेस चार्जिंग |
| Ambient Lighting | मल्टी-कलर अम्बियंट लाईटिंग |
| Premium Sound System | JBL / Harman प्रीमियम ऑडिओ (अपेक्षित) |
| EV फीचर्स | |
| Battery Pack | सुमारे 65–75 kWh बॅटरी (अपेक्षित) |
| Range | 550–600 किमी (अपेक्षित) |
| Fast Charging | DC फास्ट चार्जिंग सपोर्ट |
| Vehicle-to-Load (V2L) | बाह्य उपकरणांना वीज पुरवठा (अपेक्षित) |
| Drive Modes | Eco, City आणि Sport मोड |
| Regenerative Braking | मल्टी-लेव्हल रिजनरेटिव्ह ब्रेकिंग |
| सेफ्टी फीचर्स | |
| Airbags | 6 एअरबॅग्स |
| ADAS Level 2 | Adaptive Cruise Control, Lane Keep Assist, AEB, Traffic Sign Recognition इ. |
| 360° Camera | 360-डिग्री कॅमेरा |
| Blind Spot Monitor | ब्लाइंड स्पॉट मॉनिटर |
| Electronic Stability Control | ESC, ABS, EBD, Traction Control |
| Tyre Pressure Monitoring System | TPMS |
| ISOFIX | चाइल्ड सीट अँकर |
| कनेक्टेड कार फीचर्स | |
| Connected Car Technology | iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी |
| Remote AC Control | मोबाईलद्वारे AC कंट्रोल |
| Remote Lock/Unlock | अपद्वारे लॉक/अनलॉक |
| Live Vehicle Tracking | रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग |
| OTA Updates | Over-the-Air सॉफ्टवेअर अपडेट्स |
६) सुरक्षा फीचर्स
टाटा कंपनी म्हणलं की ग्राहकांची सुरक्षाही आलीच ह्याच ब्रीदवाक्यावर पाऊल ठेवत टाटाकडून या वाहनाची सुरक्षा करण्यासाठी खूप सारे सुरक्षा फीचर्स दिलेले आहेत जसे की ६ एअरबॅक्स , लेव्हल-2 ADAS , अडॅपटिव्ह क्रूज कंट्रोल , लेनकीप असिस्ट , ब्लाइंड स्पोर्ट मॉनिटरिंग , ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग , ५४० डिग्री कॅमेरा , इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल , हिल होल्ड , चारही चाकांवर डिस्क ब्रेक , इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेफ्टी फीचर्स या वाहनांमध्ये मिळतात.
७) व्हेरियंट
टाटा सियारा ईव्हीमध्ये एकूण ६ प्रकारचे व्हेरियंट ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हे वेरियंट एकूण दोन बॅटरी पॅक मध्ये तुम्हाला मिळतील. जसं की Pure, Adventure, Empowered , Empowered A , Empowered A AWD असे या व्हेरियंटची नावे आहेत.
८) प्रमुख स्पेसिफिकेशन
टाटा सियारा टीव्ही मध्ये बॅटरी पासून ते रेंज पर्यंत आणि रेंज पासून ते टॉर्क व चार्जिंग तसेच बूट स्पेस यांसारख्या गोष्टी खालील तक्त्यामध्ये तुम्हाला विस्तार पणे सांगितलेल्या आहेत विस्तार मध्ये स्पेसिफिकेशन पाहण्यासाठी खालील तक्ता पाहावा.
टाटा सिएरा ईव्हीचे प्रमुख स्पेसिफिकेशन
९) उपलब्ध रंग
या सियारा ईव्हीमध्ये ग्राहकांना एकूण सात प्रकारचे रंग उपलब्ध असणार आहेत यामध्ये अंदमान ॲडव्हेंचर , बेंगाल रूज , कूर्ग क्लाउड , नैनिताल नाॅकटर्न , प्रिस्टीन व्हाईट , प्युअर ग्रे , ऋषिकेश रॅपिडस, हे या रंगांची नावे आहेत.
कोणता रंग कोणत्या व्हेरियंटसाठी उपलब्ध असेल या याबद्दल खालील तक्त्यात सांगितलेले आहे
कोणता रंग कोणत्या व्हेरिएंटसाठी उपलब्ध असेल?
टाटा सिएरा ईव्हीमध्ये आकर्षक मोनोटोन आणि ड्युअल-टोन रंग पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. खालील तक्त्यात विविध रंग कोणत्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे, याची माहिती दिली आहे.
१०) फायदे
टाटा सियारा ईव्ही या वाहनाचे खूप सारे छोटे-मोठे फायदे आपल्याला पाहायला मिळतात कोण कोणते फायदे आपल्याला या वाहनातर्फे मिळणार आहेत हे खालील प्रमाणे सांगितलेले आहे
टाटा सियारा ईव्ही दिसायला आकर्षक आलिशान इंटेरियर आणि प्रीमियम डिझाईन असलेले वाहन वाटते.
या गाडीची सेगमेंट मध्ये सर्वात जास्त लांब ड्राइविंग रेंज असणार आहे.
ही गाडी खूप कमी वेळात ० ते ८० फास्ट चार्जिंग करू शकते आणि लांबच्या प्रवासात तुमचा चार्जिंग साठी थांबण्याचा कालावधी कमी करते.
या वाहनाची देखभालीचा खर्च हा कमी असणार आहे
हे वाहन तुम्ही लांबच्या प्रवासासाठी कोणत्याही चार्जिंगची टेन्शन न घेता वापर करू शकता
या वाहनांमध्ये चांगल्या दर्जाची सुरक्षा फीचर्स असल्यामुळे तुमच्या कुटुंबाला चांगली सुरक्षा मिळणार आहे.
सेगमेंट मध्ये सर्वात जास्त आधुनिक फीचर्स ची भरणा असलेली SUV आहे.
११) तोटे
टाटा सियारा ईव्ही चे तोटे खालील प्रमाणे सांगितलेले आहेत जसे की
या वाहनाची सुरुवात ही किंमत सेगमेंट मधल्या इतर वाहनाच्या तुलनेत तुम्हाला जास्त वाटू शकते.
भारत देशात इतकं चांगल्या प्रकारचे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तुम्हाला काही भागात चार्जिंग स्टेशनची कमतरता भासू शकते.
तुम्हाला संपूर्ण कुटुंबासोबत जर लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला घरामधूनच प्रवासाच्या मार्गानुसार चार्जिंग चे नियोजन करावे लागणार आहे.
या गाडीचे टॉप वेरिएंट हे इतर कंपनीच्या टॉप व्हेरियंटच्या तुलनेत महाग वाटते.

१२) किंमत
टाटा सियारा ईव्ही या गाडीची बेस मॉडेल किंमत ₹१८.७९ लाख (एक्स शोरूम) असणार आहे तसेच टॉप AWD वेरियंट ची किंमत ₹२५.९९ लाख (एक्स शोरूम) असणार आहे
टाटा सियारा ईव्ही गाडीची व्हेरियंटनुसार एक्स शोरूम किंमत खालील प्रमाणे तक्त्यामार्फत दिलेला आहे:
टाटा सिएरा ईव्हीची व्हेरिएंटनुसार एक्स-शोरूम किंमत
टाटा सिएरा ईव्हीची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. खालील तक्त्यात विविध व्हेरिएंट्सच्या एक्स-शोरूम किंमती दिल्या आहेत.
टाटा सियारा ईव्ही का घ्यावी?
जर तुमची दर महिन्याची एक हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त प्रवास या वाहनाने होणार असेल तर हे वाहन तुम्ही घ्यावे
तुमच्या घरी चार्जिंगची सुविधा असेल तर हे वाहन तुम्ही घ्यावे
तुम्हाला सेगमेंट मधली प्रेमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही पाहिजे असेल तर ही गाडी घेऊ शकता.
तुमचे जर साथ लोकांचे कुटुंब असेल आणि प्रत्येकाला आरामदायिक सीट सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आनंद घ्यायचा असेल तर हे वाहन तुमच्यासाठी.
आत्ता भारतात चालू असलेल्या पेट्रोल , डिझेल मिश्रित इथेनॉल यांसारख्या गंभीर दूषित इंधनापेक्षा इलेक्ट्रिक वाहन घेऊन सर्व गोष्टींना टाटा बाय-बाय करू शकता व तुम्हाला गाडी खराब होण्याची टेन्शनच राहणार नाही.
टाटा सियारा ईव्ही का घेऊ नये?
ग्राहकांनो जर तुमच्या भागात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तेवढ्या चांगल प्रगत झालेले नसेल आणि चार्जिंग स्टेशनची कमी असेल तर तुम्ही हे वाहन घेण्याचे टाळावे.
तुम्हाला कमी बजेटमध्ये प्रेमियम SUV हवे असेल तर ही तुमच्यासाठी नाहीये.
तुमच्या जर घरी किंवा ऑफिसमध्ये चार्जिंगची सुविधा नसेल तरी वाहन घेण्याचे तुम्ही टाळावे.

माझे मत
टाटा कंपनीची ही टाटा सियारा ईव्ही ही कुटुंबासाठी लांबच्या प्रवासासाठी आणि दैनंदिन वापरासाठी उत्कृष्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे तसेच दिसायला आकर्षक डिझाईन , महागड्या प्रीमियम गाड्यांसारखे सियाराचे इंटिरियर तसेच ५०० च्या वर असणारी रेंज या सर्व सर्वांगीण गोष्टींचा विचार केला तर ग्राहकांनो तुम्हाला तुमच्या गरजा आणि सोयीनुसार हा सेगमेंटमधला सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आणि ज्यांचे बजेट कमी आहे किंवा राहत्या भागात चार्जिंग स्टेशनची उपलब्धता नाही यांसारख्या अडचणी असतील तर तुम्ही ही गाडी घेणे शक्यतो टाळले पाहिजे.
निष्कर्ष
टाटा कंपनीने आत्तापर्यंत बनवलेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत ही टाटा सियारा ईव्ही ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात चांगल्या दर्जाची इलेक्ट्रिक गाडी आहे असे ठामपणे म्हणू शकतो. कारण या वाहनांमध्ये असणारे बॅटरी पॅक व त्या बॅटरी पॅक ची खतरनाक चालवताना जाणवणारी ताकद आणि गाडीमध्ये मिळणारे सेगमेंट मध्ये मिळणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फीचर्स ह्या गोष्टीमुळे ही गाडी लोकांच्या मनात घर निर्माण करणार आहे.
ज्या ग्राहकांचे बजेट ₹१८ ते ₹२६ लाखाच्या दरम्यान असेल आणि तुम्ही इलेक्ट्रिक प्रीमियम वाहन शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर हे वाहन तुमच्यासाठीच बनलेले आहे. तसेच तुम्हाला या वाहनाचा रिव्ह्यू आवडला असेल तर आम्ही हुंडाई क्रेटा या वाहनाचा देखील रिव्ह्यू केलेला आहे तोही तुम्ही विस्तार मध्ये पाहू शकता. धन्यवाद!!!




Leave a Reply