Two Wheeler Sales May 2026: ‘या’ कंपनीने मारली बाजी; बाकीचे स्पर्धक पडले मागे!

Two wheeler sales may 2026 : भारतामध्ये मे महिन्यात टू व्हीलर मार्केट ने विकल्या एकूण २२,६०,६३५ युनिट मोटरसायकल. हो तुम्ही जे ऐकलं ते शंभर टक्के खरे आहे भारतीय लोकांनी हिरो , टीव्हीएस , होंडा , बजाज , सुझुकी , रॉयल एनफिल्ड यासारख्या बाईक एकूण २२,६०,६३५ एवढ्या खरेदी करून टू व्हीलर मार्केटला भरभराटी देण्याचे काम केले आहे. आणि एकूण विक्रीची मागील वर्षा सोबत तुलना केली तर १६.५५% ची यावर्षी वृद्धी दाखवत आहे मागील वर्षी मे २०२५मध्ये १९,३९,६७२ टू व्हीलर गाड्या विकल्या गेल्या होत्या आणि हा आकडा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांचे विक्री मिळून आपल्याला दिसते तर चला जाणून घेऊया या लिस्टमध्ये तुमची आवडती कंपनी आहे का?

 

Two Wheeler Sales May 2026
Two Wheeler Sales May 2026: ‘या’ कंपनीने मारली बाजी; बाकीचे स्पर्धक पडले मागे!

 

Two wheeler sales may 2026 : विस्तार मध्ये चर्चा :

१) हिरो मोटोक्रोप

हिरो कंपनीने मे महिन्याच्या विक्री मधून भारतीय मोटरसायकल बाजारावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे हिरो नी मे महिन्यात देशांतर्गत ५,३६,७८४ युनिट विक्री केली. मागील वर्षाच्या तुलनेत ९.७७% ची वृद्धीसह मे २०२६ च्या एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये २९.९१% चा व्याप्ती हिरोची आहे.
मागील वर्षी मे २०२५ मध्ये हिरो नी ४,८८,९९७ युनिटची विक्री केली होती आणि या वर्षा सोबत तुलना केली तर ४७,७८७ युनिटची तफावत वृद्धीच्या स्वरूपात ह्यावर्षी दिसून येते.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हिरोने या महिन्यात ३३,२८४ युनिट विक्री केली आणि मागील वर्षाच्या सोबत तुलना केली तर ७.१४% च्या वृद्धी सोबत एकूण अंतरराष्ट्रीय बाजाराच्या विक्रीच्या भागीदारी मध्ये हिरोचा ७.१४% व्याप्ती आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विक्री मिळून हिरोनी एकूण ५,७०,०६८ युनिट पूर्ण जगभर विक्री केलेली आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत १२.२८% च्या वृद्धी सोबत एकूण विक्रीच्या भागीदारी मध्ये २५.२२% इतका हिस्सा हिरोच्या पदरी पडतो.

२) होंडा

होंडा कंपनीने हिरो कंपनीच्या मागोमाग भारतीय बाजारामध्ये ४,५९,६११ युनिटची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेत १०.१५% ची वृद्धी सोबत देशांतर्गत विक्रीच्या भागीदारीमध्ये २५.६१% व्याप्ती होंडाची आहे.

होंडा ने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ५९,१६६ युनिटची विक्री करून मागील वर्षाच्या तुलनेमध्ये २३.६३% ची वृद्धी सोबत एकूण अंतरराष्ट्रीय विक्रीच्या भागीदारीमध्ये १२.७०% ची व्याप्ती होंडाने आपल्या कड ठेवली आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळून एकूण होंडाने ५,१८,७७७ युनिटची विक्री केली आणि ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत ११.५४% च्या वृद्धी सोबत येते आणि एकूण या महिन्याच्या विक्रीच्या भागीदारीमध्ये २२.९५% ची व्याप्ती होंडाची आहे.

 

Two Wheeler Sales May 2026
Two Wheeler Sales May 2026: ‘या’ कंपनीने मारली बाजी; बाकीचे स्पर्धक पडले मागे!

 

३) टीव्हीएस

तीन नंबरला भारत देशांतर्गत टू व्हीलर विक्रीमध्ये टीव्हीएस कंपनीचे स्थान येथे जसं की टीव्हीएस ने मे महिन्यात ३,८४,५६५ युनिटची विक्री देशांतर्गत केली आणि मागील वर्षाच्या तुलनेत २३.३४% ची सर्वात जास्त वृद्धी सोबत टीव्हीएस एकूण महिन्याच्या भागीदारीमध्ये २१.४३% ची व्याप्ती आहे.

टीव्हीएस ने आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये १,५८,५४६ युनिटचे विक्री केली मागील वर्षांत तुलनेत ४८.३४% च्या वरती सोबत एकूण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या विक्रीमध्ये ३४.०२% ची भागीदारी टीव्हीएस ची आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एकूण टू व्हीलर च्या विक्रीमध्ये टीव्हीएस ने दोन नंबरचा क्रमांक मिळवून ५,४३,१११ युनिटची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ३०.५०% च्या वृद्धी सोबत एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये २४.०२% ची व्याप्ती टीव्हीएस ची दिसून येते.

 

४) बजाज

बजाज कंपनीने मे महिन्या त देशांतर्गत च्या विक्रीमध्ये २,०९,५२८ युनिटची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ९.४६% च्या वृद्धी सोबत एकूण देशांतर्गत विक्रीच्या भागीदारीमध्ये ११.६८% भागीदारी बजाजची दिसून येते.

आंतरराष्ट्रीय विक्रीमध्ये बजाज विक्रीच्या यादीमध्ये एक नंबरचा क्रमांक मिळवलेला दिसून येतो बजाज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये १,८३,६७६ युनिटची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ३०.३१% च्या वृद्धी सोबत आंतरराष्ट्रीय विक्रीच्या भागीदारीमध्ये तब्बल ३९.४२% ची व्याप्ती फक्त बजाजची आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विक्री मिळून एकूण बजाजने ३,९३,२०४ युनिट ची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेत १८.३०% आणि एकूण विक्रीचे भागीदारीमध्ये १७.३९% ची व्याप्ती बजाजची आहे.

 

५) सुझुकी

पाचव्या क्रमांकावर या यादीमध्ये सुझुकी कंपनीचा नंबर लागतो या कंपनीने मे महिन्यात १,१०,०२८ युनिटची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये २.०९% च्या वृद्धी सोबत एकूण देशांतर्गत विक्रीच्या भागीदारीमध्ये ६.१३% ची भागीदारी सुझुकी कंपनीची आहे.

आंतरराष्ट्रीय विक्रीमध्ये सुझुकी २२,२१६ युनिट विक्री करते आणि आंतरराष्ट्रीय विक्रीच्या मागील वर्षाच्या तुलने म्हणजे ५.२०% ची वृद्धी दिसून येते एकूण आंतरराष्ट्रीय विक्रीच्या भागीदारीमध्ये ४.७७% ची व्याप्ती सुझुकी कंपनीची आहे.

एकूण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विक्रीचा कडे मिळून सुझुकीने ह्या महिन्यात १,३२,२४४ युनिटची विक्री केलेली आहे मागील वर्षातून तुलनेत २.६०% ची वृद्धी सोबत एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये ५.८५% ची व्याप्ती सुझुकी कंपनीची दिसून येते

 

Two Wheeler Sales May 2026
Two Wheeler Sales May 2026: ‘या’ कंपनीने मारली बाजी; बाकीचे स्पर्धक पडले मागे!

 

६) रॉयल एनफिल्ड

मे महिन्याच्या विक्रीच्या यादीमध्ये रॉयल एनफिल्ड कंपनीचा सहा नंबरला क्रमांक येतो या कंपनीने ९४,११५ युनिटची विक्री या महिन्यात करून मागील वर्षाच्या तुलनेत २४.१३% ची वृद्धी सोबत एकूण देशांतर्गत विक्रीच्या भागीदारीमध्ये ५.२४% ची व्याप्ती या कंपनीची आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रॉयल एनफिल्डने ९,११६ युनिटची विक्री केलेले आहे मागील वर्षाच्या तुलनेत ३३.०१% ची घसरण आपल्याला या कंपनीच्या विक्रीमध्ये दिसण्यात येते तसेच पूर्ण आंतरराष्ट्रीय विक्रीच्या भागीदारीमध्ये १.९६% ची भागीदारी या कंपनीची आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विक्रीची संख्या मिळून ही कंपनी १,०३,२३१ युनिटची विक्री करते मागील वर्षाच्या तुलनेत १५.४३%च्या वरती सोबत एकूण भागीदारीमध्ये ४.५७% ची व्याप्ती या कंपनीची स्वतःची आहे.

 

मे 2026 दुचाकी विक्री आकडेवारी

कंपनीमे 2026एप्रिल 2026मासिक बदल (%)मे 2025वार्षिक बदल (%)
हिरो (Hero)5,36,7845,32,433+0.82%4,88,997+9.77%
होंडा (Honda)4,59,6114,84,000-5.04%4,17,250+10.15%
टीव्हीएस (TVS)3,84,5653,48,545+10.33%3,09,287+24.34%
बजाज (Bajaj)2,09,5282,10,063-0.25%1,91,412+9.46%
सुझुकी (Suzuki)1,10,02898,004+12.27%1,07,780+2.09%
रॉयल एनफिल्ड (Royal Enfield)94,1151,04,129-9.62%75,820+24.13%

 

या विक्रीमधून आपल्याला काय बघायला मिळते.

या विक्रीमधून आपल्याला असे समजते की

  • हिरो कंपनीचे या टू व्हीलर मोटरसायकलच्या बाजारावर वर्चस्व टिकून आहे
  • टीव्हीएस कंपनी हिरोच्या लगोलग पाठीमागे दिसून येते. आणि प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • होंडा कंपनी मागील वर्षाच्या तुलनेत मोठी भरारी घेऊन पाच लाखाच्या वर एकूण मोटरसायकल युनिटची विक्री करून नवीन उंचांक गाठलेला आहे.
  • बजाज कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सर्वात जास्त मोटरसायकल विकून एकूण विक्रीमध्ये चार लाखाच्या आसपास बजाज दिसून येतो.
  • सुझुकी आपल्या स्कूटरच्या बळावर या यादीमध्ये तग धरून आहे.
  •  रॉयल एनफिल्ड आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी विक्री जरी केली असेल तरी भारतीय बाजारामध्ये चांगल्या प्रकारची विक्री केल्यामुळे या यादीमध्ये सहा क्रमांकावर येतो.

 

Two Wheeler Sales May 2026
Two Wheeler Sales May 2026: ‘या’ कंपनीने मारली बाजी; बाकीचे स्पर्धक पडले मागे!

 

निष्कर्ष

भारतामध्ये टू व्हीलर मोटरसायकल चे मार्केट दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आपल्याला पुढील भविष्याच्या वर्षात कंपन्यांचे विक्रीची आकडे अजून आवाढाव्यप्रमाणे वाढलेले दिसून येणार भारतीय ग्राहक हिरो कंपनीला खूप प्रेम देत आहेत.

टीव्हीएस , होंडा या कंपन्यांना पण भारतीय लोकांनी विक्रीमध्ये मागे न ठेवण्याचे काम केलेले आहे आणि रॉयल इन्फिल्ड आपल्या रेट्रो लुक साठी आणि लोकांच्या मनात राज्य करत असल्यामुळे म्हाताऱ्यापासून ते तरुणापर्यंत सर्वांच्या आवडीची बाईक असल्यामुळे ही या विक्रीमध्ये दिसून येते

थोडक्यात सांगायचे तर आपल्याला जर नवीन बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही वरील दिलेल्या यादी बघून आपल्या कंपनीची या यादीमध्ये नाव आहे का असेल तर त्यांची किती विक्री आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होईल याची पूर्ण पडताळणी करून आपण गाडी खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा.