पैशांची प्रचंड बचत! अवघ्या ७२ हजारांत Hero ची नवी इथेनॉल इंधन बाईक; सर्वसामान्यांसाठी मोठी लॉटरी!

पेट्रोलचे दर आग ओकत असताना तसेच सरकारचे मोटर सायकलच्या इंजन वर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स इंधन वापरण्याचा धोरण या सर्वांचा एकीकरण होऊन हिरो मोटो क्राफ्ट कंपनीने भारतीय बाजारामध्ये त्यांची भारतातील पहिली Hero MotoCorp Launch Flex Fuel Bike आणि ही फ्लेक्स इंधन मोटरसायकल स्प्लेंडर प्लस आणि एचएफ डीलक्स या मोटर सायकल असणार आहेत तर चला जाणून घेऊया विस्तार मध्ये काय काय हाय ह्याच्यामागचे गुढ?

 

 Hero MotoCorp Launch Flex Fuel Bike
पैशांची प्रचंड बचत! अवघ्या ७२ हजारांत Hero ची नवी इथेनॉल इंधन बाईक; सर्वसामान्यांसाठी मोठी लॉटरी!

 

दिनांक ४ जून २०२६ या तारखेला हिरो मोटो क्रोप कंपनीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री श्री नितीनजी गडकरी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी ह्या दोघांच्या हस्ते ह्या फ्लेक्स इंधन मोटरसायकल गाड्यांचे अनावरण केले आणि ही मोटरसायकल अनावरण करण्याची गोष्ट साधीसुधी नसून खूप मोठे आहे कारण ही भारतातील पहिली इथेनॉल मिश्रित इंधन वर चालणारी मोटरसायकल असणार आहे आणि ती पण १००cc  कम्प्युटर सेगमेंट मध्ये मिळणार आहे

 

केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोलमध्ये इथेनॉल चा वापर जास्त करून इथेनॉल मिश्रित फ्लेक्स इंधन बनवण्याकडे खूप भर दिला मागील काही महिन्यांमध्ये श्री श्री परिवहन मंत्री नितीनजी गडकरी प्रत्येक भाषणात इथेनॉल फ्लेक्स इंधन चा वापर सरकार करणार आहे हे सारखं सांगितल्यामुळे आणि त्यांच्या मोहिमेला हिरो मोटो क्रोप कंपनीकडून चांगला प्रसाद मिळाला दिसून येतो आणि त्यांच्यामुळे देशामध्ये पहिल्यांदा फ्लेक्स इंधनच्या मोटरसाय

कल लॉन्च केल्या आहेत आणि त्या आपल्याला जुलै महिन्यापासून दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये खरेदीसाठी शोरूम मध्ये मिळतील

 

इंजिन

 

स्प्लेंडर प्लस आणि एचएफ डीलक्स या दोन गाड्यांमध्ये हिरोचे 97cc चे सिंगल सिलेंडर इंजिन मिळते तसेच ते इंजिन 6.1kw ची ताकत व 8.3nm  चा टॉर्क निर्माण करते देते आणि हे इंजन इथेनॉल मिश्रित फ्लेक्स इंधन जे की E20 ते E85 कोणत्याही मिश्रित इंधनला साथ देणार आहे

 

 Hero MotoCorp Launch Flex Fuel Bike
पैशांची प्रचंड बचत! अवघ्या ७२ हजारांत Hero ची नवी इथेनॉल इंधन बाईक; सर्वसामान्यांसाठी मोठी लॉटरी!

 

किंमत

हिरो फ्लेक्स फ्युएल बाईक्सची किंमत (Price Table)

बाईकचे नाव (Bike Model)एक्स-शोरूम किंमत (दिल्ली)वैशिष्ट्य (Key Feature)
Hero HF Deluxe Flex Fuel₹ ७२,७९२सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी
Hero Splendor+ Flex Fuel₹ ८२,७१०जास्त फीचर्स आणि उत्तम मायलेज

 

हिरोची एचएफ डीलक्स इंजन ही मोटर सायकल  ₹७२,७९२ एक्स शोरूम दिल्ली. तसेच स्प्लेंडर प्लस फ्लेक्स इंधन मोटरसायकल एक्स शोरूम दिल्ली ₹८२,७१० रुपयाला मिळणार आहे

या दोन्ही गाड्या सामान्य माणसाला खिशाला परवडणाऱ्या आणि सरकारच्या धोरणामध्ये बसवून फ्लेक्स इंधनचा योग्यरित्या वापर करून लोकांना खरेदीसाठी शोरूम मध्ये मिळणार आहे.

 

का म्हणून फ्लेक्स इंधन वापरले आहे?

 

फ्लेक्स इंधन हे एकाच इंधनामध्ये पेट्रोल किंवा डिझेल सोबतच्या इथेनॉल किंवा मिथेनॉलच्या वेगवेगळ्या मिश्रणावर चालणारे इंधन असते आपण याला लवचिक इंधन असेही म्हणू शकतो.

 

याचा वापर का करावा कारण हे इतर इंधनापेक्षा स्वस्त मिळेल आणि ज्यामुळे प्रवासाचा खर्च कमी होणार तसेच याचा वापरामुळे पर्यावरणावर जास्त प्रदूषण होणार नाही आणि इथेनॉल ऊस आणि मक्यासारख्या पिकांमधून बनवली जाते त्यामुळे भारताला कच्च्या तेलावरील प्रदेशातील अवलंबित्व कमी करता येते.

 

 Hero MotoCorp Launch Flex Fuel Bike
पैशांची प्रचंड बचत! अवघ्या ७२ हजारांत Hero ची नवी इथेनॉल इंधन बाईक; सर्वसामान्यांसाठी मोठी लॉटरी!

 

याचा सामान्य माणसाला काय उपयोग होईल?

 

फ्लेक्स इंधन मोटरसायकल मुळे सामान्य लोकांवर आणि वाहन चालकावर खूप वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो जसे की नवीन गाड्या बाजारात आल्यामुळे किंमत पण जास्त असणार कारण फ्लेक्स इंधन गाडीमध्ये वापरायचे म्हणल्यावर इथेनॉलच्या वापरासाठी इंजिन मध्ये बदल करावे लागल्यामुळे या नवीन इंडियन गाड्या नेहमीच्या पेट्रोल गाड्यापेक्षा थोड्या महागच मिळणार.

 

इथेनॉल मध्ये पेट्रोल पेक्षा कमी ऊर्जा असते त्यामुळे शंभर टक्के पेट्रोलच्या इथेनॉल मिश्रित इंधन गाडीचे मायलेज 20 ते 40 टक्के कमी होऊ शकतं.

 

सरकारने जरी दबाव टाकून कंपन्याकडून गाड्या लॉन्च करायला लावल्या तरी अजूनही सर्व पेट्रोल पंपावर या क्षमतेचे इथेनॉल मिश्रित इंधन उपलब्ध नाहीये त्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो.

 

यामध्ये सर्वसामान्य साठी एक मोठी डोकेदुखी थांबणार आहे जे की जुन्या गाड्यांवर या इथेनॉल इंधनचा प्रभाव जसे की मी वर म्हणलो जुन्या मोटरसायकल इथेनॉल इंधन साठी बनल्यामुळे त्यांच्या सायलेन्सरला गंज लागणे किंवा पेट्रोलच्या पाईप खराब होणे किंवा फुल पंप बिघडण्याची तक्रार येऊ शकते. तसेच सामान्य माणसाला जुन्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकलकडे सारखं जावं लागणार त्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्कीच

 

फ्लेक्स इंधन मोटरसायकलचे फायदे

 

फ्लेक्स इंधन मोटरसायकलचे मुख्य फायदे खालील प्रमाणे आहेत

 

  • इथेनॉल पेट्रोलपेक्षा जास्त स्वच्छ जळते. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जन 77% पर्यंत कमी होऊन हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत होणार.
  • इथेनॉल हे ऊस आणि मक्यासारख्या पिकापासून बनविले जाते त्यामुळे या इंधनांचा वापर वाढल्यास स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
  • किरणच्या वापरामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होते त्यामुळे देशाचे परकीय चलन वाजते आणि इंधनासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागत नाही.
  • इलेक्ट्रिक गाड्या प्रमाणे ह्या बाईक्स चार्जिंग साठी वेळ घेत नाहीत तुम्ही नेहमीच्या पेट्रोल पंपावर जाऊन काही मिनिटात पेट्रोल किंवा इथेनॉल मिश्रित इंधन भरू शकता.
  • इथेनॉलचा ऑक्टेन नंबर जास्त असतो त्यामुळे इंजन चा आवाज कमी होतो आणि गाडी एकदम स्मूथ चालते.

 

फ्लेक्स इंधन मोटरसायकलचे तोटे

 

फ्लेक्स इंधनच्या मोटरसायकलचे मुख्य तोटे खालील प्रमाणे आहेत.

 

  • इथेनॉलच्या ऊर्जा घनता पेट्रोल पेक्षा कमी असते. त्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल वर गाडी चालवताना मायलेज 15% ते 25% पर्यंत कमी मिळते.
  • इथेनॉल हवेतील ओलावा शोषण घेतो यामुळे इंधनाच्या टाकीमध्ये आणि पाईप्स मध्ये गंज पकडण्याची किंवा इंजिनचे पार्ट खराब होण्याची शक्यता खूप जास्त असू शकते.
  • हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात जास्त इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणाऱ्या बाइक्स लवकर सुरू होत नाहीत.
  • सध्या भारतात सर्वच पेट्रोल पंपावर उच्च क्षमतेचे इथेनॉल मिश्रित इंधन सहज उपलब्ध नाही त्यामुळे ग्रामीण भागात इंधन मिळण्यात अडचण 100% येऊ शकते.
  • या बाईक्समध्ये खास प्रकारचे गंजरोधक पार्ट्स आणि इंजिन सेन्सर्स वापरावे लागतात त्यामुळे नेहमीच्या पेट्रोल बाईकच्या तुलनेत याची खरेदी किंमत थोडी जास्त असू शकते.
  • इथेनॉल बनवण्यासाठी ऊस आणि मक्यासारख्या अन्नधान्य पिकाच्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो यामुळे भविष्यात अन्नधान्याची टंचाई किंवा अन्नधान्याचे भाव वाढण्याचा धोका असणार.

 

निष्कर्ष

 

तुम्हाला जर ही मोटरसायकल खरेदी करायची असेल तर तुम्ही आपल्या शहरात इथेनॉल इंधन मिळण्याचे पेट्रोल पंप आहेत का ते सर्वप्रथम बघावे आणि वरील दिलेले फायदे आणि तोटे वाचून तुम्हाला योग्य वाटेल असा निर्णय घ्यावा.