Electric Car Sales May 2026: भारतीयांनी खरेदी केल्या तब्बल २५,००० हून अधिक ई-कार्स; नंबर १ वर कोण?

Electric car sales may 2026 : भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत मे महिन्याच्या विक्रमी इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीने धुमाकूळ घातलेला आहे खालील दिलेल्या यादीमध्ये आपण पाहू शकता की भारतातील स्वदेशी ब्रँड चा दबदबा या गाड्यांच्या विक्रीमध्ये दिसून येतो. या यादीच्या शिखरावर टाटा मोटर्सचा १ क्रमांक येतो. त्यांनी या महिन्यात तब्बल दहा हजाराच्या वर इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे तसेच त्यांच्या मागे महिंद्रा , मारुती सुझुकी नवीन लॉन्च झालेली विनफास्ट यासारख्या कंपन्यांचा नंबर येतो चला विस्तार मध्ये जाणून घेऊया काय आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री बद्दल..

भारतातील प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांचे बाजारपेठ दिसून दिवस मोठे होत चालले आहे आणि याच्यात या मे महिन्याच्या आणि भर घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो खाली दिलेल्या यादीप्रमाणे एकूण मे महिन्यात २५,८८० युनिट इलेक्ट्रिक वाहनांचे विक्री झालेले आहेत. आणि ते मागील वर्षाच्या तुलने केल्यास मागील वर्षी १४,३२३ ची विक्री झाली होती याचा अर्थ ८०.७% यावर्षी विक्रीमध्ये वृद्धी दाखवत आहे.

Electric Car Sales May 2026
Electric Car Sales May 2026: भारतीयांनी खरेदी केल्या तब्बल २५,००० हून अधिक ई-कार्स; नंबर १ वर कोण?

 

Electric car sales may 2026 : विस्तार मध्ये खुलासा

१) टाटा मोटर्स

टाटा मोटर्स या कंपनीने मे महिन्यात १०,३३९ इलेक्ट्रिक वाहनांचा विक्री केली आणि ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत १०३.४% ची वृद्धी दाखवत आहे मागील वर्षी मे२०२५ ला ५,०८४ वाहनांची विक्री टाटा मोटर्स केली होती. आणि ह्या विक्री सोबत एकूण इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीच्या बाजाराच्या ३९.९% टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे

मागील महिन्यात सोबत ह्या महिन्याची तुलना केल्यास एप्रिल २०२६ महिन्यात ९,३०२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली होती याचा अर्थ मागील महिन्यापेक्षा ११.१% ची या महिन्यात वृद्धी झालेली आहे

२) महिंद्रा

महिंद्रा कार कंपनीने या महिन्यात ६,२१० युनिट वाहनांची विक्री केली ही विक्री मागील वर्षा सोबत तुलनेत जे की मे‌ २०२५ मध्ये ३,१३१ युनिट होती ह्याचा अर्थ या महिन्याच्या विक्रीनुसार महिंद्राने ९८.३% ची वार्षिक वृद्धी झालेली आहे.

तसेच एप्रिल २०२६ सोबत तुलना केल्यास त्यांची विक्री त्या महिन्यात ५८६४ युनिट वाहनांची होती त्या अर्थाने महिन्यात ५.९% ची वृद्धी महिंद्राने केली आहे आणि ह्या विक्रीमुळे महिंद्राचा महिन्याच्या विक्रीच्या एकूण भागीदारीमध्ये २४% चे वर्चस्व आहे

 

Electric Car Sales May 2026
Electric Car Sales May 2026: भारतीयांनी खरेदी केल्या तब्बल २५,००० हून अधिक ई-कार्स; नंबर १ वर कोण?

 

३) एमजी

या यादीमध्ये एमजी या कंपनीने तिसरा क्रमांक मिळवत ह्या महिन्यात ४,९८५ युनिटची विक्री केली मागील वर्षी मे २०२५ मध्ये कंपनीने ४,५९९ युनिट वाहनांची विक्री केली होती याचा अर्थ वर्षभरात ८.४% ची वृद्धी विक्रीमध्ये कंपनीने दाखविले आहे.

तसेच एप्रिल २०२६ महिन्यात कंपनीने ५,४२० वाहनांची विक्री केली होती याचा अर्थ महिन्यासोबत तुलना केल्यास ८% ची घसरण झालेली विक्रीमध्ये दिसून येते आणि या घसरणीमुळे कंपनीच्या महिन्याच्या विक्रीच्या एकूण भागीदारी मध्ये १९.३% व्याप्ती झाली आहे.

४) मारुती सुझुकी

ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंट मध्ये यावर्षीपासून नव्याने भाग घेतल्यामुळे कंपनीने या महिन्यात फक्त १,५९१ युनिट वाहनांची विक्री केली.

यावर्षी नव्याने या सेगमेंट मध्ये पाऊल ठेवल्यामुळे मागील वर्षासोबत तुलना शक्य नाही पण एप्रिलला २०२६ मध्ये या कंपनीने १,३३१ युनिट वाहनांची विक्री केली होती यानुसार महिन्याच्या तुलनेमध्ये १९.५% ची वृद्धी या महिन्यात झालेली दिसून येते आणि एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये या कंपनीचा ६.१% ची व्याप्ती आहे.

५) विनफास्ट

भारतामध्ये यावर्षी नव्याने लॉन्च झालेली व्हिएतनाम इलेक्ट्रिक वाहन कंपनी विनफास्ट ने मे २०२६ महिन्यात १,२३८ युनिट वाहनांची विक्री केली आहे.

मागील वर्षा सोबत तुलना करणे शक्य नसल्यामुळे मागील महिन्यात विनफास्ट कंपनीने १,२९० युनिट वाहनांची विक्री केली होती याचा अर्थ महिन्याच्या तुलनेत ४% ची विक्रीमध्ये घसरण झालेली दिसून येते आणि एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये या कंपनीचा ४.८%% हिस्सा आहे.

 

Electric Car Sales May 2026
Electric Car Sales May 2026: भारतीयांनी खरेदी केल्या तब्बल २५,००० हून अधिक ई-कार्स; नंबर १ वर कोण?

 

६) BYD

ही चायनीज कंपनी बिवायडीने या महिन्यात ६८६ युनिट वाहनांची विक्री केली मागील वर्षाच्या तुलनेमध्ये १०.५% ची वृद्धी दिसून येत आहे.

तसेच मागील एप्रिल २०२६ मध्ये या कंपनीने ५५४ वाहनांची विक्री केली होती याचानुसार महिन्याच्या विक्री तुलनेमध्ये २३.८% ची वृद्धी झालेली दिसून येते एकूण विक्रीच्या भागीदारी मध्ये कंपनीचा २.६% ची हिस्सेदारी आहे.

७) हुंडाई

हुंडाई कंपनीने या महिन्यात ४६० युनिट वाहनांची विक्री केली मागील वर्षाच्या तुलनेमध्ये हुंडाई कंपनीची ३६% ची घसरण विक्रीमध्ये झालेली दिसून येते.
ही तुलना एप्रिल २०२६ सोबत केली तर हुंडाईने ५५९ युनिटची विक्री केली होती त्यानुसार १७.७% ची मागील महिन्याच्या तुलनेत घसरण झालेली दिसून येते. यामुळे हुंडाईने आपले एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये खूप मोठा हिसा गमावून फक्त १.८% एवढीच जागा राहिलेली आहे

८) किया

क्या कंपनीने या महिन्यात ३४९ युनिटची विक्री केली आहे मागील वर्षी मे २०२५ मध्ये फक्त ४१ ची विक्री केली होती याचा अर्थ मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात तब्बल ७५१.२% ची वृद्धी झालेली आहे.

एकूण विक्रीच्या भागीदारीत किया कंपनीचा १.३% इतका हिस्सा आहे.

९) सिट्रोन

या कंपनीने ह्या महिन्यात फक्त २२ युनिटची विक्री केली आणि मागील वर्षा सोबत तुलना केल्यास मागील वर्षी मे २०२५ मध्ये फक्त १२९ युनिटची विक्री केली होती. याचा अर्थ एकूण झालेली विक्रीच्या भागीदारीत ह्या कंपनीचा फक्त ०.१% इतकीच हिस्सेदारी आहे.

 

Electric Car Sales May 2026
Electric Car Sales May 2026: भारतीयांनी खरेदी केल्या तब्बल २५,००० हून अधिक ई-कार्स; नंबर १ वर कोण?

 

 

या विक्रीच्या आकड्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठ चे भविष्य काय असेल?

ह्या विक्रीच्या आकड्यामुळे भविष्य हे खूप मोठे आणि तेजस्वी असेल यात शंका नाही कारण सरकारकडून दिवसांनी दिवस येणारे नव नवीन पेट्रोल आणि डिझेलवर निर्बंध आणि नवीन फ्लेक्स इंधन(E85) लॉन्च यांसारख्या गोष्टीमुळे लोकांचा पेट्रोल आणि डिझेलवर विश्वास कमी होत आहे याचा सरळ फायदा इलेक्ट्रिक वाहनांचा होईल आणि यामुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांवर वाढला जात आहे त्यामुळे लोक या वाहनांची खरेदी भविष्यात जास्त करतील आणि याचा फायदा इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेला हमखास होणार.