मे २०२६ मधील टॉप १० सर्वात जास्त विकल्या गेलेल्या SUVs; तुमची आवडती गाडी कितव्या नंबरवर?

Top 10 SUVs May 2026 : दर्शकांनो भारतीय प्रवासी वाहनांचे बाजारपेठेने मे 26 ह्या महिन्यात वाहनांची चांगली विक्री करून काही नवीन रेकॉर्ड बनवलेले आहेत आणि त्यामध्ये SUV आणि कार दोन्ही सेगमेंटचा बरोबरीचा हात दिसून येतो.

फक्त एसीवी वाहनांच्या विक्री बद्दल बोलाय झाले तर मे महिन्यात तब्बल १,९४,२२५ वाहने सर्व ब्रँडचे मिळून विक्री झालेली आहेत आणि ही विक्री मागच्या वर्षी तुलनेत 34.10% ची वृद्धी दाखवत आहे मागील वर्षी १,४४,८३२ एकूण वाहनांची विक्री झालेली होती

या दोन्ही वर्षाचा तफावत तब्बल ४९,३९३ वाहनांचा आहे. चला जाणून घेऊया Top 10 SUVs May 2026 बद्दल विस्तार मध्ये अवलोकन..

Top 10 SUVs May 2026
मे २०२६ मधील टॉप १० सर्वात जास्त विकल्या गेलेल्या SUVs; तुमची आवडती गाडी कितव्या नंबरवर?

Top 10 SUVs May 2026 : यादीचे विस्तार मध्ये वर्णन

क्रमांकवाहनाचे नावमे २०२६ विक्री (युनिट्स)वार्षिक वाढ/घसरण (YoY)बाजारातील भागीदारी
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स20,686+52.28%10.65%
टाटा पंच / ईवी20,208+53.87%10.40%
टाटा नेक्सन / ईवी19,100+45.85%9.83%
महिंद्रा स्कॉर्पिओ / स्कॉर्पिओ N15,774+9.53%8.12%
हुंडाई क्रेटा / ईवी15,253+2.64%7.85%
मारुती सुझुकी ब्रेझा13,245-14.91%6.82%
हुंडाई वेन्यू11,714+55.77%6.03%
मारुती सुझुकी विटारा (नवीन मॉडेल)10,853नवीन लॉन्च5.59%
महिंद्रा थार / थार रॉक्स10,787+3.83%5.55%
१०किया सेल्टोस10,597+74.24%5.46%

 

१) मारुती सुझुकी फ्रॉक्स

मारुती सुझुकी ने ह्या आकड्यांमध्ये शिखरावर राहण्याचा मान प्राप्त केलेला दिसून येतो त्यांची कॉम्पॅक्ट एसयूवी या महिन्यात तब्बल २०,६८६ युनिट विकली आहेत. मागील वर्षाची तुलना केली तर ह्या महिन्यात ५२.२८% ची वृद्धी दर्शविली आहे.
आणि ह्या विक्रीमध्ये १०.६५% ची भागीदारी या महिन्यासाठी दिसून येते.

२) टाटा पंच/ईवी

टाटाच्या गाडीने या यादीमध्ये दुसरा क्रमांक मिळालेला आहे आणि यांनी २०,२०८ युनिट ची विक्री केलेली आहे आणि ही विक्री मागील वर्षाचा तुलनेत ५३.८७% ची वृद्धी दर्शवित आहे आणि यांचा एकूण एसयूवीच्या विक्रीमध्ये १०.४०% ची भागीदारी दिसून येते

३) टाटा नेक्सन/ईवी

तिसऱ्या क्रमांकावर पण टाटाचीच नेक्सन ही गाडी येते आणि या गाडीने १९,१०० विक्री केलेली आहे आणि मागील वर्षा सोबत तुलनेमध्ये ४५.८५% ची वृद्धी दिसून येत आहे आणि एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये ९.८३% ची जागा या गाडीने व्यापली आहे

४) महिंद्रा स्कार्पियो/N

चौथ्या क्रमांकावर या यादीमध्ये महिंद्राच्या लोकप्रिय स्कार्पिओ या वाहनाचा नंबर येतो स्कार्पिओ ने मे महिन्यात तब्बल १५,७७४ एसयूवीची विक्री केलेली आहे आणि ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ९.५३% जास्त दाखवत आहे आणि पूर्ण विक्रीच्या भागीदारीमध्ये ८.१२% ची भागीदारी या वाहनाची आहे.

 

Top 10 SUVs May 2026
मे २०२६ मधील टॉप १० सर्वात जास्त विकल्या गेलेल्या SUVs; तुमची आवडती गाडी कितव्या नंबरवर?

 

५) हुंडाई क्रेटा/ईवी

पाचव्या क्रमांकावर हुंडाईची क्रेटा येते आणि या एसव्हीने मे महिन्यात १५,२५३ ची विक्री केलेली आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेमध्ये २.६४% ची वृद्धी या वाहनाने विक्रीमध्ये केलेली दिसून येते आणि पूर्ण एसयूवी विक्रीच्या भागीदारीमध्ये ७.८५% ची भागीदारी या वाहनाची आहे.

६) मारुती सुझुकी ब्रेझ्झा

सहाव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची ब्रेझ्झा हे वाहनांचा नंबर लागतो या वाहनाने मे महिन्यात १३,२४५ युनिटची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये या वाहनाची १४.९१% ची घसरण झालेली दिसून येते पूर्ण वाहनांच्या विक्रीच्या भागीदारीमध्ये ६.८२% ची भागीदारी या वाहनांची आहे.

७) हुंडाई वेन्यू

सातव्या क्रमांकावर हुंडाई वेन्यू या वाहनाचा नंबर लागतो या वाहनाने मे महिन्यात ११,७१४ युनिटची विक्री केलेली आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ५५.७७% ची वृद्धी या वाहनाच्या विक्रीमध्ये झालेली दिसून येते पूर्ण एसयूवी विक्रीच्या भागीदारीमध्ये ६.०३% ची व्याप्ती या वाहनाची आहे.

८) मारुती सुझुकी विक्टोरिज

आठव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची नव्याने लॉन्च झालेली विक्टोरिजचा नंबर लागतो या वाहनाने या महिन्यात १०,८५३ युनिट ची विक्री चा पल्ला पार केलेला आहे नव्याने लॉन्च झाल्यामुळे या वाहनाचा मागील वर्षा सोबत तुलना करणे शक्य नाही या वाहनाची एकूण एसयूवीच्या विक्रीच्या भागीदारीमध्ये ५.५९% ची व्याप्ती आहे.

९) महिंद्रा थार/रॉक्स

नव्या क्रमांकावर महिंद्राच्या फार या वाहनाचा नंबर येतो या वाहनाने मे महिन्यात तब्बल १०,७८७ युनिटची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेत ३.८३% ची वृद्धी दिसून येते आणि संपूर्ण एसयूवीच्या विक्रीच्या भागीदारीमध्ये ५.५५% ची व्याप्ती या वाहनाची आहे.

१०) किया सेल्टोस

दहाव्या क्रमांकावर त्याची सेल्टोस
या वाहनाचा नंबर लागतो या वाहनाने मे महिन्याच्या विक्रीमध्ये १०,५९७ युनिटच्या विक्रीचा पल्ला पार केलेला आहे मागील वर्षे तुलनेमध्ये ७४.२४% ची वृद्धी विक्रीमध्ये दिसून येते पूर्ण एस सी व्ही विक्रीच्या भागीदारीमध्ये ५.४६%ची व्याप्ती या वाहनाची आहे

Top 10 SUVs May 2026
मे २०२६ मधील टॉप १० सर्वात जास्त विकल्या गेलेल्या SUVs; तुमची आवडती गाडी कितव्या नंबरवर?

टॉप टेन वाहनांच्या लिस्टमध्ये कोणत्या कंपनीचा किती गाड्यांचा आणि किती वाहनाचा समावेश

या यादीमध्ये सर्वात जास्त वाहनांचा समावेश मारुती सुझुकी कंपनीकडून आहे या कंपनीच्या ३ वाहनांचा समावेश या यादीमध्ये दिसून येतो तसेच महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे २ वाहनांचा समावेश , टाटा मोटर्स या कंपनीच्या २ वाहनांचा समावेश , आणि हुंडाई या कंपनीचे पण २ वाहनांचा समावेश , आणि सर्वात शेवटी कियाच पण १ वाहन या यादीमध्ये दिसून येते.

या यादीमध्ये मारुती सुझुकीची एकूण ४२,७८४ युनिट  वाहनाचा समावेश तसेच दोन नंबरला टाटा मोटर्स च्या ३९,३०८ युनिट वाहनांचा समावेश तीन नंबरला हुंडाईच्या २६,९६७ युनिट वाहनांचा समावेश , चार क्रमांकाला महिंद्रा अँड महिंद्रा जी दोन वाहने २६,५६१ युनिट वाहनांचा समावेश , पाचव्या क्रमांकाला किया कंपनीचे एकच वाहन १०,५९७ युनिट सोबत दिसून येते.

 

Top 10 SUVs May 2026
मे २०२६ मधील टॉप १० सर्वात जास्त विकल्या गेलेल्या SUVs; तुमची आवडती गाडी कितव्या नंबरवर?

 

निष्कर्ष

मारुती सुझुकी कंपनीकडून नवीन वाहनांचे लॉन्च आणि जुन्या वाहनांचे फेसलिफ्ट यामुळे मारुती सुझुकीचा या सेगमेंट मध्ये वर्चस्व दिसून येते. तसेच टाटा मोटर्सचे या यादीमध्ये पहिल्या तीन मध्ये दोन वाहने असल्यामुळे टाटा मोटर्सचे पण सेगमेंटवर वर्चस्व समाप्त नाही झालेले आहे असे समजते

महिंद्रा चे स्कार्पिओ आणि थार यांच्या जीवावर त्यांचे पण या यादीमध्ये नाव गाजत आहे. हुंडाईचे महत्त्वपूर्ण दोन वाहने वेन्यू आणि क्रीटा यांच्या बळावर होंडाई पण या सेगमेंटमध्ये तग धरून आहे आणि त्याने पण या यादीमध्ये आपला नाव समाविष्ट केलेले आहे.