TVS paddock premium retail network : दर्शकांनो भारतातील लोकप्रिय टीव्हीएस मोटर कंपनीने घोषणा केली आहे
आणि या घोषणेच्या अंतर्गत ते लॉन्च करणार आहेत टीव्हीएस पॅडॅक (paddock) प्रेमियम रिटेल नेटवर्क हे असे नेटवर्क असेल जिथे टीव्हीएस कंपनीच्या ग्राहकांना टीव्हीएस कंपनीच्या हाय अँड मोटरसायकल , प्रीमियम स्कूटर , प्रीमियम इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांनी 2020 साली खरेदी केलेल्या नॉर्थन बाईक कंपनीच्या नॉर्टन ह्या बाईकच्या नवीन मोटरसायकली विक्रीसाठी उपलब्ध प्रीमियम स्थान या गोष्टींसाठी हे टीव्हीएस कडून नवीन आकर्षक शोरूम सुरू करण्याचे ध्येय आखले गेले आहे.
हे पाऊल टीव्हीएस मोटर कंपनीकडून त्यांच्या टू व्हीलर च्या सर्वसामान्य बाजारपेठेच्या पुढे जाऊन उत्कृष्ट दर्जाचे प्रीमियम मोटर सायकल विकण्याचे ठिकाण बनवण्याचे ध्येय असणार आहे.

टीव्हीएस पॅडॅक (paddock) प्रेमियम रिटेल नेटवर्क म्हणजे काय?
टीव्हीएस प्रीमियम रिटर्न नेटवर्क म्हणजे टीव्हीएस कंपनीकडून त्यांच्या उत्कृष्ट दर्जाचे मोटरसायकल , प्रीमियम स्कूटर , प्रीमियम इलेक्ट्रिक वाहने तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय कंपनी नॉर्थन मोटरसायकल ह्या मोटरसायकल विकण्यासाठी सर्वसामान्य बाजारपेठेच्या पुढे जाऊन बनविलेले एक जागा किंवा शोरूम.
येथे टीव्हीएसच्या प्रीमियम बाईक्स जसे की (apache RTR 310, RR 310 , Apache RTX 300) आगामी प्रीमियम स्कूटर प्रीमियम इलेक्ट्रिक वाहने आणि नॉर्टन मोटरसायकलच्या नवीन मोटरसायकली विक्रीसाठी उपलब्ध असतील. तसेच या प्रीमियम रिटर्न नेटवर्क अंतर्गत टीव्हीएस मोटर कंपनी त्यांचे नव्याने लॉन्च करणारे टीव्हीएस स्कूटर आणि नॉर्थन मोटरसायकलच्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट दर्जाची ठिकाण असावे असा हेतू ठेवून हे टीव्हीएस कडून कामगिरी करण्यात येत आहे.
टीव्हीएस पॅडॅक (paddock) प्रेमियम रिटेल नेटवर्क मध्ये आपल्याला काय सुविधा मिळतील?
हे केवळ गाडी खरेदी करण्यासाठी दुकान नसून दुचाकी पेमेंट साठी एक लाइफस्टाइल बसणार आहे याच्या मध्ये टीव्हीएस कडून प्रेमियम बाईक आगामी उत्कृष्ट दर्जाची स्कूटर्स उत्कृष्ट दर्जा इलेक्ट्रिक वाहने हे सर्व विक्रीसाठी उपलब्ध असतील.
- तसेच ग्राहकांसाठी त्यांच्या आवडीनुसार गाडीचे रंग , फीचर्स आणि सेटअप कस्टमाइझ करण्यासाठी कस्टमायझेशन(BTO) झोन असणार आहे.
- ग्राहकांसाठी अधिकृत रायडिंग जॅकेट्स , हेल्मेट्स आणि लाईफस्टाईल कपड्यांसाठी स्वतंत्र असे विभाग असणार त्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सेसरीज मिळू शकतील.
- रायडर्स ना एकत्र येण्यासाठी , गप्पा मारण्यासाठी आणि बाईक कम्युनिटी इव्हेंट्स आयोजित करण्यासाठी खास कम्युनिटी लाउंज एरिया असणार आहे.
- हाय परफॉर्मन्स बाईकची योग्य काळजी घेण्यासाठी आत्याधुनिक वर्कशॉप आणि प्रशिक्षित मेकॅनिक उपलब्ध असणार आहेत जे की गरजेनुसार सर्विस करून देतील. अशा प्रकारच्या सर्विस आणि सुविधा या टीव्हीएस च्या प्रीमियम रिटेल नेटवर्कमध्ये आपल्याला मिळणार आहेत.
नॉर्थन मोटरसायकल सोबत टीव्हीएसची रणनीती काय असेल?
टीव्हीएस कंपनीच्या प्रीमियम रिटर्न नेटवर्क च्या उभारणीच्या पाठीमागे कंपनीची नॉर्थन मोटरसायकल जे की टीव्हीएस कंपनीने लोकप्रिय ब्रिटिश मोटरसायकल ब्रँड कडून 2020 आली खरेदी केलेला ब्रँड आहे आणि खरेदी केल्यापासून टीव्हीएस ह्या ब्रँड वर नव्याने पुनर्रचना करण्यासाठी काम करत आहे तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ब्रँडचा नावचा डंका पूर्ण देश-विदेशात वाजवा यासाठी प्रयत्न करत आहे.
टीव्हीएस कंपनी विदेशात नॉर्थन मोटरसायकलचा नाव करण्यासाठी साल २०३० च्या आतपर्यंत पूर्ण जगभरातील प्रमुख विविध २० देशांमध्ये एकूण 200 डीलरशिप सुरू करण्यासाठी आणि त्यानुसार कंपनी काम करत आहे तसेच २०३० पर्यंत वार्षिक तब्बल २०,००० मोटरसायकल विक्री करण्याचे ध्येय बाळगून आहे.

उत्कृष्ट दर्जाचे स्कूटर बनवण्याकडे लक्ष
टीव्हीएस चे प्रीमियम रिटेल नेटवर्क फक्त नॉर्थन मोटरसायकल साठी नसून ते टीव्हीएस नवीन प्रीमियम मोटरसायकल आणि स्कूटर साठी वापरण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार टीव्हीएस मॅक्सि स्टाईल इलेक्ट्रिक स्कूटर जे की 160cc स्कूटर प्लॅटफॉर्म बनवले जाणार आहे.
आणि हे प्रीमियम स्कूटर टीव्हीएस शहरी भागातील ग्राहकांचे ध्यान खेचण्यासाठी व त्यांना दैनंदिन वापरासाठी उपलब्ध असे स्कूटर बनवण्याचे ध्येय ठेवले आहे आणि हेच स्कूटर टीव्हीएस च्या इलेक्ट्रिक वाहनाच्या पोर्टफोलिओ बळकट करून त्यांचे पहिल्यापासून असणारी iQube आणि TVS X ह्या स्कूटर च्या वरती स्थान असेल.

टीव्हीएस त्यांच्या लोगो मध्ये बदल करणार असल्याची संकेत?
टीव्हीएस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी काही आधुनिकतेनुसार लोगो मध्ये बदल करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नवीन डिझाईन सोबत जाणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. तसेच आत्ताचे टीव्हीएस कंपनीचे शोरूम हे आधुनिकीकरण करण्याचे काम टीव्हीएस करत आहे आणि हे करण्यामागे कंपनीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झेप घेण्याचा प्रयत्न चे पहिले पाऊल असेल.
टीव्हीएस मोटर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक यांचा संदेश :
टीव्हीएस मोटर कंपनीची व्यवस्थापिका संचालक सुदर्शन वेणू यांनी कंपनीच्या भूमिका आणि दृष्टिकोन स्पष्ट करताना खालील विधान केलेले आहे
ते म्हणतात “टीव्हीएस पॅडॅक ही आमच्या ग्राहकांशी अधिक दृढ आणि भावनिक नाते निर्माण करण्यासाठी नावीन्यता , कस्टमायझेशन आणि एक अनोखा खरेदीचा अनुभव एकत्र आणून प्रेमियम मालकी हक्काची व्याख्या पुन्हा बदलण्याची आमची धोरणात्मक वचनबद्धता आहे”
ऑटो गुरुचा संदेश :
आमच्या सूत्रानुसार टीव्हीएस मोटर कंपनी हे नवीन आणि खास प्रेमियम रिटेल नेटवर्क आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत अधिकृतपणे सुरू करणार आहे. आणि हे करण्यामागे tvs कंपनीचे लक्ष हे भारतातील प्रमुख मोठ्या शहरांमधील प्रेमियम मोटरसायकल प्रेमींना आकर्षित करण्याचे असेल.
हे प्रीमियम रिटेल नेटवर्क बनवण्यासाठी लंडनच्या चेकलँड कीडलेसाइट्स या प्रसिद्ध प्रीमियम रिटेल डिझाईन एजन्सीच्या सहकाऱ्यांनी हे शोरूम डिझाईन केले जात आहे.




Leave a Reply