MG Hector Tomahawk EV Launched : भारतीय बाजारात 7-सीटर इलेक्ट्रिक SUV ची मागणी वाढत असताना MG ने Hector Tomahawk EV सादर करून या सेगमेंटमध्ये मोटे पाऊल टाकले आहे. MG Motor ने भारतात आपली बहुप्रतिक्षित Hector Tomahawk EV ही नवीन ५ आणि ७-सीटर इलेक्ट्रिक SUV अधिकृतपणे लॉन्च केलेली आहे.
मोठ्या भारतीय कुटुंबाची गरज लक्षात घेऊन डिझाईन केलेले या दमदार SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹१९.४९ लाख ठेवण्यात आलेले आहे या गाडीमध्ये 69.2 kWh क्षमतेची बॅटरी पॅक देण्यात आला असून ती एका चार्जरमध्ये 517 किलोमीटरची क्लेम्ड रेंज देते. सध्याच्या बाजारात मोठ्या कुटुंबासाठी एक परिपूर्ण आणि परवडणारी EV SUV म्हणून ह्या मॉडेलला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. या गाडीचा सर्वात मोठा सेलिंग पॉईंट म्हणजे तिचे BaaS मॉडेल ज्यामुळे ग्राहकांना सुरुवातीची किंमत खूपच कमी मोजावी लागणार आहे, जी या सेगमेंट मध्ये गेम चेंजर ठरू शकते.

MG Hector Tomahawk EV Price
JSW MG Motor India ने भारतामध्ये आपले नवीन इलेक्ट्रिक SUV MG Hector Tomahawk EV लॉन्च केले आहे ही संपूर्ण गाडी खरेदी करण्यासाठी याची सुरुवातीचे आकर्षक किंमत सुमारे ₹१९.४९ लाख पासून ते ₹२३.४९ लाखापर्यंत एक्स शोरूम आहे.
बॅटरी वेगळी भाड्याने घेण्याच्या BaaS प्रणाली अंतर्गत ही गाडी अधिक परवडणाऱ्या ₹१३.९९ लाख एक्स शोरूम या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होते. BaaS पर्याय मध्ये वापरलेल्या अंतराप्रमाणे बॅटरी रेंटल पर किलोमीटर दर प्रति किलोमीटर ₹४.९० आकारला जातो.
या गाडीचे वेरियटंनुसार एक्स शोरूम मूल्य Excite , Exclusive , आणि Essence या ट्रिम्सवर आधारित असून ₹१९.४९ लाख ते ₹२३.४९ लाखाच्या दरम्यान पसरले आहे.

MG Hector Tomahawk EV Battery आणि Range
MG Hector Tomahawk EV च्या या मॉडेलमध्ये कंपनीने 69.2 kWh क्षमतेची उच्च दर्जाची (LFP) लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी दिले आहे ज्याला अधिकृतपणे “मॅजिक बॅटरी प्रो” असे नाव देण्यात आले आहे. बॅटरी केमिस्ट्रीच्या दृष्टीने LFP तंत्रज्ञान हे पारंपारिक NMC बॅटरी पेक्षा अधिक स्थिर , आग प्रतिरोधक आणि दीर्घायुष्य मानले जाते. ज्यामुळे भारतीय उष्ण हवामानात ती अतिरिक्त बॅटरी सुरक्षितता प्रदान करणार आहे.
एमजीच्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक एसयूव्हीची MIDC रेंज 517 किलोमीटर आहे येथे हे स्पष्टपणे नोंदवणे आवश्यक आहे की 517 किलोमीटर हा केवळ MIDC मानकानुसार कंपनीचा दावा आहे. ही कोणती प्रत्यक्ष रस्त्यावर मिळणारी गॅरेंटेड रेंज नाहीये प्रत्यक्ष रियल वर्ल्ड ड्रायव्हिंग करताना हवामान , एअर कंडिशनर चा वापर , ट्रॅफिकची स्थिती आणि ड्रायव्हिंगची पद्धत यामुळे प्रत्यक्षात मिळणारी रेंज आणि क्लेम रेंज यामध्ये खूप फरक पडतो रियल वर्ल्ड कंडीशन मध्ये ही गाडी साधारणपणे ३५० ते ४०० किलोमीटर धावण्याची शक्यता असणार आहे.
तरीही शहर आणि हायवे वापरासाठी ही रेंज अत्यंत महत्त्वाची ठरते. शहरात रोजच्या कार्यालयाचा किंवा कुटुंबाचा प्रवास करताना एका चार्जरवर अनेक दिवस पुरू शकते, तर हायवेवर लांबच्या प्रवास करताना बॅटरी संपण्याची भीती दूर होते यात उपलब्ध असलेले ९० KW डीसी फास्ट चार्जिंग केवळ 35 मिनिटात बॅटरी ३०% ते ८०% चार्ज करते ज्यामुळे हायवे वरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

Charging Time
कंपनीकडून ग्राहकांसाठी उत्तम आणि सोयीस्कर चार्जिंग टाईम चे पर्याय देण्यात आले आहेत जर तुम्ही लांबच्या प्रवासावर जात असाल तर हायवेवर प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी यामध्ये इन-बिल्ट Charging Planning चा सुलभ पर्याय उपलब्ध आहे हायवेवरील 90 Ka DC Fast चार्जिंगचा वापर केल्यास ह्या कारची बॅटरी केवळ सुमारे 35 मिनिटात 30-80% पर्यंत वेगाने चार्ज होते.
दुसरीकडे दैनंदिन वापरासाठी आणि सोयीसाठी होम चार्जिंगचा उत्तम पर्याय मिळतो घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या 7.4 KW AC चार्जर चा वापर केल्यास कारला १० ते १००% पूर्ण चार्ज करण्यासाठी सुमारे 12.5 तास लागू शकतात हे दोन्ही चार्जिंग पर्याय तुमचा इलेक्ट्रिक वाहनाचा प्रवास अधिक सुकर आणि चिंतामुक्त करणार आहेत.
Performance
MG Hector Tomahawk EV हि गाडी परफॉर्मन्सच्या बाबतीत अत्यंत दमदार आणि आधुनिक आहे. या इलेक्ट्रिक SUV मध्ये एक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर देण्यात आले आहे जी 201 HP ची पावर आणि 310 nm चा टॉर्क जनरेट करते. हि कार (Front-Wheel Drive) मध्ये येते. यातील इन्सर्ट टॉर्कमुळे तो ही कार अवघ्या 8.2 सेकंदात 0 तो 100 चा वेग सहज पकडू शकणार आहे.

Design आणि Exterior
MG Hector Tomahawk EV चे डिझाईन आणि एक्सटेरियर एका अत्यंत आकर्षक आणि आधुनिक लूक सादर करते. या गाडीला समोरून एक फ्रंट बोल्ड SUV डिझाईन देण्यात आले आहे. ज्यामध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प , स्लीक LED DRLs आणि EV ची ओळख असणारी क्लोज्ड ऑफ EV ग्रील समाविष्ट आहे. सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यातील एल्लुमिनेटेड MG लोगो जो रात्रीच्या वेळी गाडीला अधिक प्रेमियम लूक देते.
गाडीच्या साईड प्रोफाईल बद्दल बोलायचे तर यात 18-इंच alloy wheels आणि 225/55 टायर्स मिळतात. जे याला एक स्ट्रॉंग SUV लुक देणार आहेत. तसेच, यात Door-mounted ORVM आणि सुरक्षेसाठी साईड कॅमेरा जोडलेला आहे.
गाडीच्या मागील भाग हा अपराईड रिअर डिझाईन सोबत येणार आहे ज्यामध्ये आकर्षक LED tail-lamps , स्पोर्टस् Roof spoiler, EV badging आणि खाली सिल्वर ब्लॅक बंपर पाहायला मिळतो.
Tomahawk EV चे डायमेन्शन
- लांबी : ४,७४५ mm
- रुंदी : २,१३० mm
- उंची : १,७७० mm
- व्हीलबेस : २,८१० mm

Interior आणि Features
MG Hector Tomahawk EV चे इंटेरियर अत्यंत प्रेमियम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे सज्ज आहे. ग्राहकांसाठी ही इलेक्ट्रिक SUV 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही सेटिंग कॉन्फिगरेशन पर्याय मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. गाडीचा प्रीमियम केबिनमध्ये पाऊल ठेवतात सर्वात आधी डॅशबोर्डवरील 15.6 इंचची भव्य टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम लक्ष वेधून घेते. ड्रायव्हरच्या सुविधासाठी यामध्ये ८.८ इंचाचा डिजिटल एमआयडी (MID) स्क्रीन देण्यात आला आहे. प्रवासातील मनोरंजन साठी यात १०-स्पीकरची इन्फिनिटी साऊंड सिस्टिम मिळणार आहे जे की उत्कृष्ट ऑडिओ अनुभव देणार आहे
आमच्या रिपोर्टनुसार केबिनला लक्झरी लुक देण्यासाठी यात ड्युअल पेन पॅनोरामिक सनरूप समाविष्ट केले आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही गाडी खूप पुढे आहे ज्यामध्ये आय स्मार्ट फीचर्स , कनेक्टेड कार-टेक्नॉलॉजी आणि जिओ कनेक्टिव्हिटी चा सपोर्ट मिळणार आहे. यात दिलेल्या GenAi वाईस असिस्ट ड्रायव्हरला केवळ आवाजाद्वारे अनेक कामांमध्ये नियंत्रित करण्याची सुविधा देतो.
याव्यतिरिक्त स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी वायरलेस चार्जिंग पॅड देखील या गाडीमध्ये उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या आणि ड्रायव्हिंगच्या दृष्टीने यात 360 डिग्री कॅमेरा आणि अत्यंत उपयुक्त असे सी-थू बाॅनेट कॅमेरा देण्यात आला आहे. हे कॅमेरे कठीण रस्त्यावर आणि पार्किंग करताना गाडीच्या सभोत्याचे दृश्य स्पष्ट दाखवणार आहेत.

Safety Features
MG Hector Tomahawk EV मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि प्रगत safety Features चे मजबूत कवच देण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी गंभीर दुखापतींपासून पुर्ण संरक्षण देण्यासाठी यात ६ airbags आणि वाहणारा कणखर बनवणारे मजबूत बांध्याचे बॉडी स्ट्रक्चर देण्यात आलेले आहे.
या ईव्हीमध्ये प्रगत Level 2 ADAS हे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य आहे. ड्रायव्हिंग सुरक्षित करण्यासाठी या अंतर्गत forward collision warning , Automatic emergency braking , Lane -related Assistance आणि blind spot related Features यांसारखी महत्वाची सुरक्षा वशिष्ठ्ये मिळून जातात तसेच अरुंद किंवा गरजेचे ठिकाणी सोप्या ड्रायव्हिंग साठी यात 360 डिग्री कॅमेरा चा उत्तम सपोर्ट हे मिळणार आहे.
बॅटरी सेफ्टीचा विचार केल्यास एमजी च्या अधिकृत माहितीनुसार यातील प्रगत इंटेलिजंट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम 24×7 उत्तम प्रकारे बॅटरी हेल्थ मॉनिटरिंग करत असते याशिवाय संभाव्य धोके टाळण्यासाठी यांचे बॅटरी आर्किटेक्चर खास अपघात आणि क्रॅश प्रोटेक्शन लक्षात घेऊनच अत्यंत सुरक्षितपणे डिझाईन करण्यात आलेले आहेत.
5-Seater आणि 7-Seater
MG Hector Tomahawk EV ही एक परफेक्ट Family Electric SUV म्हणून समोर येत आहे यामध्ये ५-सीटर आणि ७-सीटर हे दोन्ही उत्तम पर्याय मिळणार आहेत.
5-सीटर गाडी हे लहान कुटुंबासाठी आणि शहरात रोज प्रवास करण्यासाठी बेस्ट असणार आहे तिसरी रो नसल्यामुळे यात मागे बसणाऱ्यांना उत्तम लेगरूम आणि तब्बल ६१० लिटरचा प्रचंड मोठा बूट स्पेस मिळणार आहे ज्यामुळे लॉन्ग ट्रीपला भरपूर सामान घेऊन तुम्हाला जाता येईल.
७-सीटर गाडीही मोठ्या संयुक्त कुटुंबासाठी वरदान ठरणार आहे यांचे तिसऱ्या रो मध्ये प्रवाशांना उत्तम कम्फर्ट मिळणार आहे ज्यामुळे पूर्ण कुटुंब एकत्र प्रवासाचा आनंद घेऊ शकणार आहे

BaaS म्हणजे काय?
Battery-as-a-Service(BaaS) ही एक आधुनिक व्यापारी सिस्टीम आहे, जिथे तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करताना बॅटरी मालकीऐवजी भाड्याने घेता. यावेळी सुरुवातीची खरेदी किंमत लक्षणीयरीत्या कमी होते. कारण बॅटरी हा कारमधील सर्वात महागडा भाग असतो.
नुकतीच MG Hector Tomahawk EV ही गाडी ₹१३.९९ लाखाच्या आकर्षक स्टार्टिंग प्राइज मध्ये उपलब्ध होणार आहे पण लक्षात ठेवा ही ₹१३.९९ लाख किंमत फक्त कारची बॅटरी शिवाय म्हणजे BaaS सुरुवातीची किंमत आहे.
या मॉडेलमध्ये ग्राहकाला बॅटरी वापरण्यासाठी प्रति किलोमीटर नुसार चार्जर द्यावा लागतो हे लोक जास्त ड्रायव्हिंग करतात किंवा ज्यांची रनिंग कमी आहे त्यांनी खरेदीपूर्वी याची गणित नीट समजून घेणे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला अचूक नियोजन करता येईल.
MG Hector Tomahawk EV vs Rivals
MG Hector Tomahawk EV ची सुरुवातीची एक शोरूम किंमत ₹१९.४९ लाख (म्हणजेच BaaS बॅटरी रेंटल योजनेअंतर्गत ₹१३.९९ लाख आहे. जी मुख्य प्रतिस्पर्धी Mahindra XEV 9S (₹१९.९५ लाख) पेक्षा कमी आहे. Kia Careñs Clavis EV ची सुरुवातीची किंमत कमी आहे, पण तिचे टॉप-स्पेक मॉडेल MG पेक्षा ₹1.5 लाख आणि महाग आहे.
सीटिंग नुसार MG Hector Tomahawk EV मध्ये ५ आणि ७-सीटर पर्याय मिळतात. Mahindra XEV 9s ५ ,६ आणि ७-सीटर पर्यायात उपलब्ध आहे. तरी Kia Careñs Clavis EV ७-सीटर रचनेत आहे.
Battery नुसार MG मध्ये ६९.२ kWh बॅटरी असून ५१७ किमी रेंजचा दावा आहे. , Mahindra XEV 9s मध्ये ५९kWh , ७०kWh आणि ७९kWh असे त्रिमूर्ती बॅटरी पर्याय दिले आहेत.

कोणासाठी योग्य?
ज्याचा ऑफिस किंवा व्यवसायाचा प्रवास ठरलेला आहे आणि त्यांच्याकडे घर किंवा ऑफिसमध्ये हक्काची चार्जिंग सोय उपलब्ध आहे तसेच ज्यांना मोठ्या कुटुंबासाठी जास्त जागा असलेली , आरामदायक आणि प्रीमियम फीचर्सची SUV हवी आहे. व ज्यांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या खर्चातून कायमची सुटका करून प्रवासाचा खर्च कमी करायचा आहे त्यांच्यासाठी MG Hector Tomahawk EV ही कार सर्वोत्तम पर्याय राहणार आहे.
Delivery आणि Availability
MG च्या अधिक माहितीनुसार नवीन विचार डिलिव्हरी आणि टेस्ट वेळ सप्टेंबर 26 पासून सुरू होणार आहे राष्ट्रवादी ग्राहकांसाठी शोरूम डिस्प्ले आणि टेस्ट देखील याच काळात उपलब्ध करून दिले जातील.
कंपनीने आपली उत्पादन आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यांवर भर दिला आहे. जेणेकरून ग्राहकांना वेळेवर डिलिव्हरी मिळेल. सुरवातीला प्रमुख महानगरांमध्ये ही गाडी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तिचा इतर शहरांमध्ये विस्तार केला जाईल. बुकिंग केलेल्या ग्राहकांना प्राधान्याने डिलिव्हरी दिली जाईल. त्यामुळे तुम्ही MG Hector Tomahawk EV खरेदी करण्यास उत्सुक असेल तर जवळच्या MG डीलरशिप संपर्क साधून तुमचे बुकिंग आणि टेस्ट ड्राईव्ह करून घ्या.
निष्कर्ष
MG Hector Tomahawk EV च्या लॉन्चमुळे कंपनीने भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमधील ७-सीटर सेंगमेंट मध्ये एक मजबूत आणि आक्रमक एन्ट्री केलेली आहे. शक्तिशाली ६९.२ kWh बॅटरी पॅक आणि प्रगत ADAS सारखे प्रीमियम फीचर्स मिळतात.
वाचकांना वरील माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही आमचे इतर लेख जसे की Manual vs Automatic कार , EV Driving Range कशी वाढवावी? आणि १० Monsoon EV car care Tips असे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय लेख पाहू शकता…धन्यवाद!




Leave a Reply