Citroen Aircross Comfort Edition Launch: फक्त ₹१० लाखांच्या आत मिळणार प्रीमियम लक्झरी?

Citroen Aircross Comfort Edition Launch : सिट्रोएन इंडिया विदेशी कंपनीने आपले लोकप्रिय SUV एअर-क्रॉसचे नवीन कम्फर्ट एडिशन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलेले आहे. ह्या कम्फर्ट एडिशन ची सुरुवातीची किंमत ही ₹९.०९ लाख एक्स शोरूम असणार आहे. हा एक लिमिटेड रन(मर्यादित कालावधीसाठी) मॉडेल असल्यामुळे केबिन आणि इंटेरियर पहिल्यापेक्षा अधिक प्रेमियम बनण्यासाठी अनेक नवनवीन फीचर्स जोडले गेलेले आहेत

ह्या नवीन कंफर्ट एडिशन बेस-स्पेक्ट ‘You’ आणि मिड-स्पेक्ट ‘Plus’ या नवीन व्हेरिएंट वर आधारित आहे तसेच ही गाडी लॉन्च करण्यामागे कंपनीचा जागतिक १०८ वा वर्धापन दिनाच्या उत्सवानिमित्त ही गाडी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नवीन लिमिटेड एडिशन मध्ये लॉन्च केलेली आहे. चला सविस्तरपणे जाणून घेऊया काय आहे गाडीचे व्हेरियंट आणि काय आहे लिमिटेड एडिशन चे गुढ..

Citroen Aircross Comfort Edition Launch
Citroen Aircross Comfort Edition Launch: फक्त ₹१० लाखांच्या आत मिळणार प्रीमियम लक्झरी?

 

इंटेरियर

या एडिशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व वेरिएंट साठी प्रेमियम लेदर सीड्स स्टॅंडर्ड देण्यात आलेले आहेत जे की मेट्रोपॉलिटन बेज लेदररेट अपहोल्स्टी या नावाने ओळखले तसेच या कारमध्ये पुढील आणि मागील दोन्ही प्रवासासाठी ऍडजेस्टेबल हे ड्रेस देण्यात आलेले आहे आणि केबिनमध्ये ब्लॅक ग्रेन सरफेस सिल्वर एक्सेंट आणि सॉफ्टवेअर एलिमेंट्स डॅशबोर्ड पहिल्यापेक्षा जास्त आकर्षक आणि आधुनिक करण्यात आलेला आहे.

व्हेरियंटनुसार गाडीमध्ये १०.२ इंच टच स्क्रीन इन्फोटेक सिस्टीम , ७ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर , एलईडी प्रोजेक्टर आणि अलाॅय व्हील्स यांसारखे फीचर्स गाडीचे मुख्य फीचर्स म्हणून मिळणार आहेत.

इंजन

या सिट्रोन इंडिया कंपनीच्या लिमिटेड एडिशन एअर क्रॉस SUV मध्ये उपलब्ध असणारी ह्या गाडीचे इंजिन १.२ लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असणार आहे जे की ८२ hp ची ताकद जनरेट करते आणि ५ स्पीड बॉक्स सोबत उपलब्ध असणार आहे तसेच मिड-ट्रेन पल्स व्हेरियंटमध्ये १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे की ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत मिळेल हे ११० hp ची ताकद जनरेट करते आणि टॉप मॅक्स व्हेरियंट हे ११०hp ची ताकद निर्माण करते ह्यावेळी इंजन मॅन्युअल किंवा ६ स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये उपलब्ध आहे

Citroen Aircross Comfort Edition Launch
Citroen Aircross Comfort Edition Launch: फक्त ₹१० लाखांच्या आत मिळणार प्रीमियम लक्झरी?

 

व्हेरियंट व फीचर्स

या लिमिटेड एडिशन एअरकॉस SUV वाहनांमध्ये ३ वेरियंट आपल्याला मिळतात

१) YOU Pack व्हेरियंट

सिट्रोन एअरक्राच्या सर्वात बेस मॉडेलवर ₹ ३६,६०० रुपये अतिरिक्त देऊन कंपनीकडून अधिकृतपणे हे स्पेशल ॲक्सेसरीज मिळणार आहे.

जसे की दर्शकांना आपल्याला माहिती आहे बेस मॉडेलमध्ये अनेक महत्त्वाचे फीचर्स ग्राहकांना दिले जात नाहीत पण तुम्ही गाडी घेताना ह्या ॲक्सेसरी म्हणून जोडला तर तुमच्या कार मध्ये खालील दिलेले प्रीमियम फीचर्स कंपनीकडून इन्स्टॉल करून मिळणार आहेत.

  • 10.2 इंच टच स्क्रीन इनपुटमेंट सिस्टिम
  • रिव्हर्स पार्किंग कॅमेरा
  • फाॅग लॅम्प
  • सॉफ्ट-टच इंटिरियर ट्रिम्स
  • क्रोम इन्सर्ट डोर ग्लायडिंग
  • फुल व्हील कव्हर्स

२) Plus Pack व्हेरियंट

मिड-व्हेरीयंट जे की प्लस पॅक या नावाने ओळखले जाते. यावेळी चे ॲक्सेसरीज तुम्हाला तुमच्या वाहनांमध्ये घ्यायचे असतील तर तुम्हाला ₹८,४६० रुपये भरावे लागणार आहेत आणि हे भरल्यानंतर तुम्हाला फीचर्स म्हणून रिव्हर्स कॅमेरा जो की गाईडलाईन सोबत मिळेल आणि वायरलेस चार्जर, डोर क्लाइंडिंग जे की क्रोम इन्सर्ट असलेले असेल आणि गाडीचे एक्सटेरियर स्टाईल वाढवून मिळेल.

३) Max Pack व्हेरियंट

सिट्रोन एअर क्रॉस च्या सर्वात टॉप वेरियंट वर अधिकृतपणे ₹४०,००० रुपये देऊन खालील ॲक्सेसरीज तुम्हाला उपलब्ध होणार आहे.
जसे की जेबीएल ऑडिओ सिस्टीम आणि फ्रंट अँड रियर डॅश कॅमेरा जो की ऑडिओ अलर्ट सोबत गाडीमध्ये मिळणार आहे.

किंमत

सिट्रोन एअर क्रॉस कम्फर्ट एडिशन मध्ये बेस मॉडेल YOU व्हेरियंट मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येणारे 5 सीटर एक्स-शोरूम किंमत ₹९,०९,००० रुपये इतक्या पैशात मिळणार आहे.

सिट्रोन एअर क्रॉस कम्फर्ट एडिशनमध्ये मिड मॉडेल Plus व्हेरियंट मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत ५ सीटर एक्स-शोरूम किंमत ₹९,९९,००० रुपये इतक्या पैशात तुम्हाला उपलब्ध होणार आहे.

सिट्रोन एअर क्रॉस कम्फर्ट एडिशन मध्ये टॉप मॉडेल Plus Turbo व्हेरियंट जे की ७ सीटर टर्बो इंजिन सोबत उपलब्ध असणार आहे याची एक्स-शोरूम किंमत ₹११,९९,००० रुपये इतक्या पैशात मिळणार आहे.

प्रतिस्पर्ध्यक

ह्या सिट्रोन एअर क्रॉस कम्फर्ट एडिशन गाडीला मिडसाईज SUV सेगमेंट मध्ये टक्कर देण्यासाठी हुंडाई क्रेटा , मारुती ग्रँड विटारा , रेनॉल्ट डस्टर , किया सेल्टोस , होंडा एलिवेट ह्यांसारख्या वाहनांचा समावेश होतो. हे सर्व वाहने या गाडीला या सेगमेंटमध्ये विक्रीमध्ये टक्कर देण्यासाठी उभे आहेत.

निष्कर्ष

सिट्रोन इंडिया कंपनीकडून जागतिक १०८ वा वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने हे सिट्रोन लिमिटेड एअर क्रॉस कम्फर्ट एडिशन लॉन्च करण्यात आलेले आहे. हे लॉन्च करण्यामागे हेतू कंपनीचा असा असणार आहे की बजेट मधल्या ग्राहकांना कमी पैशात चांगल्या फीचर्सची भरणा असलेली गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीमध्ये कमी पैशात सिट्रोन च्या टॉप मॉडेल चे फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत तसेच आम्ही काही दिवसापूर्वी सिट्रोन कंपनीचे नवीन इलेक्ट्रिक वाहन E-C3X हे लॉन्च झाले होते याच्यावर आम्ही लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद!!!