Renault Kiger 4 New Variants Launched : रेनॉल्ट इंडिया कंपनीने आपल्या Kiger या गाडीला पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक आणि परवडणारी बनवलेले आहे कंपनीकडून Kiger वाहनाला चार नवीन व्हेरियंट देण्यात आलेले आहेत त्यामध्ये Evolution+ हे व्हेरियंट ₹६.९९ लाखाचे आणि ₹७.८९ लाखाच्या Turbo Evolution+ मुळे ग्राहकांना कमी किमतीत प्रेमियम फीचर्स आणि चांगला परफॉर्मन्स मिळणार आहे.
रेनॉल्ट Kiger मध्ये रेनॉल्ट कंपनीने नवीन ४ व्हेरियंट्स आणल्यामुळे आत्ता ही गाडी अजून चांगल्या आधुनिक फीचर्स आणि सेगमेंट मध्ये टर्बो इंजिन कमी किमतीत उपलब्ध झालेले आहे हे करण्यामागे कंपनीचा हेतू हा बजेटमध्ये ग्राहकांना टर्बो इंजिनचा वापर करता यावा किंवा खरेदी करता यावे ह्यासाठी कंपनीने हे ४ नवीन वेरीएंट्स लॉन्च केलेले आहेत आजच्या लेखमध्ये आपण ह्या विषयावर विस्तार मध्ये चर्चा करणार आहोत. चला सुरू करूया…
मुख्य बदल नेमके काय आहेत?

नवीन चार व्हेरियंट्स लॉन्च केलेले आहेत ते खालील प्रमाणे दिलेले आहेत.
- Evolution+ (NA Manual)
- Evolution+ (NA AMT)
- Evolution+ (Turbo Manual)
- Techno Turbo Manual
रेनॉल्ट Kiger ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलेले हे ४ नवीन व्हेरियंट्स ग्राहकांना कमी बजेटमध्ये जास्त प्रेमियम फीचर्स देणाऱ्या उद्देशाने आणले गेलेले आहेत.
१) Evolution+ (NA Manual)
हा कारचा मिड लेवल वेरियंट आहे जो सामान्य ड्रायव्हिंग साठी उत्तम आहे यामध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन असणार आहे सोबत ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स मिळतो.
या वेरियंटची एक्स शोरूम किंमत ₹६.९९ लाख पासून सुरू होते आणि ह्यामध्ये महत्त्वाचे फीचर्स दिलेले आहेत जसे की कमी बजेटमध्ये ८ इंच टच स्क्रीन , ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल , वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार्प्ले आणि पोस्ट बटन स्टार्ट स्टॉप यांसारखे प्रीमियम फीचर्स या किमतीमध्ये बजेट ग्राहकांना मिळाणार आहेत.
२) Evolution+ (NA AMT)
ज्यांना ट्रॅफिक मध्ये वारंवार गिअर बदलण्याचा त्रास नको आहे त्यांच्यासाठी हा एक परवडणारा ऑटोमॅटिक व्हेरियंट पर्याय म्हणून उपलब्ध केलेला आहे.
जसं की यांच्या इंजिन मध्ये 1.0 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजन आहे पण यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर बॉक्स मिळतो ज्यामुळे यात क्लच दाबावा लागत नाही.
या व्हेरियंट्सची (एक्स शोरूम) किंमत ₹७.४५ लाख आहे.
या व्हेरियंटमध्ये फीचर्स वर नमूद केलेल्या Evolution+ मॅन्युअल वेरियंट सारखेच आहेत जसे की ८ इंच टच स्क्रीन , ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल , वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले आणि पुश बटन स्टार्ट स्टॉप यांसारखे प्रीमियम फीचर्स दिले गेलेले आहेत. फक्त ड्रायव्हिंग ऑटोमॅटिक आणि सोपी करण्यासाठी हे व्हेरियंट कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेले आहे
३) Evolution+ (Turbo Manual)
या व्हेरियंट मुळेच लोकं खूप खुश होणार आहेत जसे की कमी बजेटमध्ये असणाऱ्या ग्राहकांसाठी हे जादा दमदार परफॉर्मन्सचे इंजिन असणारे व्हेरियंट लॉन्च करण्यात आलेले आहे.
यात शक्तिशाली १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे जे की १०० HP ची ताकद निर्माण करेल तसेच नेहमीच्या इंजिन पेक्षा खूप जास्त पिक-अप देईल आणि यासोबतच हाय स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत हे इंजिन येणार आहे.
यावेळी यांची एक्स शोरूम किंमत ₹७.८९ लाख रुपये इतकी आहे.
विशेषता हे व्हेरियंट लॉन्च झाल्यामुळे किगर टर्बो या सेगमेंट मधली सर्वात स्वस्त टर्बो पेट्रोल SUV बनली आहे पूर्वी टर्बो इंजिन थेट महागड्या व्हेरियंट (Emotion) मध्ये मिळायचे पण कंपनीकडून हेवेअर दिल्यामुळे ग्राहक खुश होतील हे नक्कीच.
४) Techno Turbo Manual
हा किगरचा (हाय-स्पेक) म्हणजेच वरच्या श्रेणीतील व्हेरिएंट आहे जो आता नवीन गिअरबॉक्स सोबत ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे.
विशेषतः यात 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सोबत आता ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे यापूर्वी टेक्नो टर्बो वेरीएंट फक्त महागड्या CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध होता.
मॅन्युअल गिअर बॉक्स असल्यामुळे या वेरियंट CVT ऑटोमॅटिक पेक्षा तब्बल ₹९०,००० ने स्वस्त झाला असून याची किंमत ₹८.४५ लाख (एक्स शोरूम) असणार आहे.
या व्हेरियंटमध्ये आता अत्याधुनिक फीचर्स मिळतात जसे की ट्राय ऑक्टा एलईडी हेडलॅप्स , 16 इंच अलॉय व्हील्स , पुश-बटन स्टार्ट , डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमॅटिक AC यांसारखे अत्याधुनिक फीचर्स ह्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहेत.

रेनॉल्ट इंडिया कंपनीचे अधिकृत अधिकाऱ्यांचे वक्तव्य :
रेनॉल्ट इंडियाची विक्री आणि विपणन विभागाचे उपाध्यक्ष फ्रान्सिस्को हिडाल्गो म्हणाले,
रेनॉल्टचे उद्दिष्ट ग्राहकांना कमी किमतीत चांगली तंत्रज्ञान युक्त आणि आधुनिक वाहने उपलब्ध करून देणे आहे. नवीन कीगरमध्ये टर्बो इंजिन , प्रेमियम फीचर्स आणि अधिक पर्याय ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगला आणि समाधानकारक वाहन वापरायचा अनुभव मिळेल.
रेनॉल्ट Kiger या वाहनाची खास वैशिष्ट्ये
- रेनॉल्ट किगरची ही वैशिष्ट्ये खरोखरच ह्या कारला तिच्या सेगमेंट मधल्या एक सर्वोत्तम आणि ग्राहकांना व्यावहारिक दृष्ट्या उत्तम पर्याय बनवतात जसे की 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजन १०० hp ची ताकत आणि १६० nm चा टॉर्क निर्माण करतात.
- ह्या कारचे वजन कमी असल्यामुळे इंजिन अतिशय दमदार पिक-अप घेते आणि हायवे वर ओव्हरटेक करताना किंवा गाडीवर लोड असतानाही कार अजिबात लॅग मारत नाही
- तसेच भारतीय रस्त्यावर मोठ-मोठे स्पीड ब्रेकर्स आणि खड्ड्यापासून वाचण्यासाठी २०५ मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स गाडीला मिळतो.
ह्या गाडीमध्ये ४०५ लिटरचा बूट-स्पेस या किमतीच्या आणि आकाराच्या मानाने खूप मोठा आहे तसेच तुम्ही जर कुटुंबासोबत चार-पाच दिवसाच्या लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर हे वाहन तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल. - या गाडीचे रूपरेल हे फंक्शनल आहे म्हणजेच ते प्रचंड लोड पेलू ही शकतात जसे की डिक्कीत जागा कमी पडल्यास तुम्ही छतावर 50 किलो पर्यंतचे सामान किंवा एक्स्ट्रा लगेच अधिकृतपणे लावू शकता हे तुम्हाला प्रवासासाठी खूप उपयोगी पडते.

निष्कर्ष
ग्राहकांनो रेनॉल्ट कंपनीकडून चार नवीन व्हेरियंटचे पर्याय उपलब्ध केल्यामुळे तुम्हाला कमी किमतीत जास्त फीचर्स अनुभवायला मिळणार आहेत. तसेच बजेट मधल्या ग्राहकांना आता टर्बो इंजिन परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध झालेले आहे. आणि या नवीन व्हेरिएंट मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय ग्राहकांना मिळतात तसेच B-SUV सेगमेंट मध्ये सर्वात व्हॅल्यू फॉर मनी गाडी बघायची झाल्यास रेनॉल्टची Kiger हे वाहन ठरते. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर आम्ही नवीन कार खरेदी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी top 10 PDI checks for new cars या विषयावर ही लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता




Leave a Reply