Citroen E-C3X launched : Citroen या विदेशी कंपनीने भारतामध्ये त्यांची Ec3 EV जे की आता अपडेटेड वर्जनमध्ये EC3X EV या नावाने ओळखली जाणार आहे ती अवघ्या सुरुवाती किंमत ₹11.99 लाख किमतीमध्ये नव्याने लॉन्च करण्यात आलेली आहे. तसेच BaaS स्कीम अंतर्गत या गाडीची किंमत ₹५.१० लाख रुपये कमी होऊन ती तुम्हाला ₹६.८९ लाख रुपये ह्या किमतीमध्ये मिळणार आहे.
या गाडी विषयी बोलायचे झाले तर ही गाडी पहिल्या मॉडेल पेक्षा जास्त आधुनिकतेला डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलेली दिसून येते. ज्यामध्ये बाहेरून आणि इंटेरियर मध्ये बदल केलेले दिसून येतात गाडीचे इंटेरियर केबिन हे पहिल्यापेक्षा जास्त उत्कृष्ट दर्जेचे काम केलेले आणि प्रेमियम भावना देणारे असे वाटते तसेच गाडीमध्ये आता पहिल्यापेक्षा जास्त फीचर्स ची भरणा केलेली आहे आणि ही गाडी आता ग्राहकांना एकूण तीन वेगवेगळ्या व्हेरियंट मध्ये उपलब्ध असणार आहे तर चला जाणून घेऊया या ब्लॉगमध्ये काही गाडी तुमच्यासाठी कुटुंबासाठी योग्य राहील.

बॅटरी पॅक आणि रेंज
Citroen E-C3X या गाडीमध्ये फक्त एक आणि एकमेव बॅटरी पॅक मिळतो जो की २९.२ kWh क्षमतेचा आहे. आणि ह्या बॅटरी पॅक नुसार गाडीची एका चार्जेमध्ये 320 ते 325 किलोमीटर जाण्याची क्षमता आहे कंपनीने असा दावा केलेला आहे की पहिल्या मॉडेल पेक्षा ह्या मॉडेलची रियल वर्ल्ड रेंज ही 79 किलोमीटर जास्त असणार आहे. तसेच ही बॅटरी पॅक एअर कुल्ड लिथियम आयन या तंत्रज्ञाने बनलेला आहे.
29.2 kWh बॅटरी पॅक असल्यामुळे ही गाडी 57hp ची ताकद आणि 143nm चा टॉर्क निर्माण करते. तसेच हे वाहन AC चार्जरने १० ते १०० टक्के १० तास ३० मिनिटे इतका कालावधी लावते पण ती जर DC फास्ट चार्जर वापरले तर १० ते ८० हे फक्त 57 मिनिटात चार्जिंग करून देते.
एक्स्टेरियर डिझाईन
या वाहनाच्या एक्सस्टेरीयर डिझाईन मध्ये खूप सारे छोटे मोठे बदल केलेले सहजपणे डोळ्याच्या निदर्शनास येतात जसे की गाडीमध्ये नवीन प्रोजेक्ट LED हेड लॅम्पचा वापर तसेच 15 इंचच्या डायमंड कट अलॉय व्हील्स नव्याने बसवण्यात आलेल्या आहेत तसेच वाहनांमध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल आऊटसाईड रिव्ह्यू मिरर म्हणजे (ORVMs.) पाहायला मिळतात. तसेच गाडीमध्ये LED DRLs जेकी समोरून V अक्षरासारखे आणि मागून एलईडी टेल लाईट आपल्याला मिळतात.
तसेच वाहनांच्या चाकावर काळा कलर्स मध्ये ग्लायडिंग हे खूप आकर्षक दिसते तसेच गाडीमध्ये हॅलोजन फॉग लॅम्प वापरण्यात आलेला आहे.
अशाप्रकारे हे वाहन समोरून आणि मागून सुंदर आणि दिसते. तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर लुक मध्ये तर तुम्ही नाही म्हणू शकणार नाही हे नक्की सांगतो.

इंटिरियर डिझाईन
गाडीच्या इंटरियर मध्ये पहिल्या मॉडेल च्या तुलनेत काही मोठा बदल केलेला नाही जसे की वाहनांमध्ये ड्युअल टोन थीम मिळणार आहे ड्रायव्हर साठी कलर मध्ये टीएमटी डिस्प्ले उपलब्ध असणार तसेच वाहनाची केबिन मधली सीट काम केल्यामुळे फिनिशिंग हे खूप प्रेमियम आणि उत्कृष्ट दर्जाची वाटते
संपूर्णतः वरील सर्व मुद्द्यांचा विचार केला तर इंटेरियर केबिन मधला फील तुम्हाला गाडीत बसल्यावर प्रेमियम आणि श्रीमंत वाटणार आहे.
तंत्रज्ञान आणि फीचर्स
या गाडीमध्ये एकूण कार कनेक्टेड २.० सोबत तब्बल 40 पेक्षा जास्त फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत जसे की वायरलेस चार्जिंग , जेबीएल सिस्टीम , सात इंचाचा कलर मधील पीएफटी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल , टाइप C फास्ट चार्जिंग पोर्ट , यासोबतच तुम्हाला सेफ्टी फीचर्स म्हणून ६ एअरबॅक्स टॉप व्हेरियंट मध्ये उपलब्ध असतील आणि बाकीच्या व्हेरियंट मध्ये ४ एअरबॅक्स मिळणार आहेत.
वाहनामध्ये लेन डिपारचे मॉर्निंग , फ्रंट वेहिकल डिस्टन्स पार्किंग कॅमेरा , पार्किंग सेन्सर्स सोबत कनेक्टेड असेल आणि ISOFIX लहान मुलांना बसण्यासाठी सीट माउंट हेही सेफ्टी फीचर्स उपलब्ध असणार आहे.

कलर्स
ही गाडी तुम्हाला तब्बल सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे जसे की
- पोलार व्हाईट
- कॉस्मो ब्ल्यू
- पर्ल नेरा ब्लॅक
- स्टील ग्रे
- गाने॔ट रेड
- डीप फॉरेस्ट ग्रीन
किंमत
नवीन २०२६ Citroen E-C3X ची भारतातील एक्स शोरूम किंमत ₹११.९९ लाख लागते १३.२६ लाख दरम्यान असणार आहे तसेच जर तुम्हीही कार BaaS बॅटरी अँड सर्विस म्हणजेच बॅटरी मॉडेल अंतर्गत खरेदी करणारा असाल तर तिची किंमत तुम्हाला ₹६.८९ लाख ते ₹८.३० लाख पर्यंत खाली येते
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही दोन्ही पर्यायाच्या व्हेरियंट नुसार सविस्तर किंमत देण्यात आलेले आहे ते तुम्ही पाहू शकता :
| व्हेरियंट | पूर्ण किंमत (बॅटरी पॅकसह) | BaaS मॉडेल किंमत (बॅटरी रेंटलशिवाय) | बॅटरी रेंटल खर्च |
|---|---|---|---|
| eC3X Live (Base) | ₹११.९९ लाख | ₹६.८९ लाख | + ₹२.२६ प्रति किलोमीटर |
| eC3X Live (O) (Mid) | ₹१२.३५ लाख | ₹७.०९ लाख | + ₹२.२६ प्रति किलोमीटर |
| eC3X Shine (Top) | ₹१३.२६ लाख | ₹८.३० लाख | + ₹२.२६ प्रति किलोमीटर |

प्रतिस्पर्ध्यक
भारतीय बाजारपेठेत Citroen E-C3X या गाडीची थेट स्पर्धा बजेट फ्रेंडली आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांची असणार आहे जसे की टाटाची गाडी मुख्यतः TATA Punch EV ह्यासोबत मुख्य स्पर्धक म्हणून याची स्पर्धा असणार आहे.
या दोन्ही वाहनांचा थेट तुलना करत किंमत बॅटरी क्षमता दावा केलेले रेंज त्यांचे चांगले मुद्दे यानुसार तुलना करून खाली तक्ता बनलेला आहे ते तुम्ही पाहावे.
| गाडीचे वैशिष्ट्ये | सिट्रोएन eC3X | टाटा पंच ईव्ही |
|---|---|---|
| किंमत (Ex-Showroom) | ₹११.९९ लाख – ₹१३.२६ लाख | ₹९.६९ लाख – ₹१२.५९ लाख |
| BaaS किंमत | ₹६.८९ लाख – ₹८.३० लाख (+ ₹२.२६ / किमी) | ₹६.४९ लाखांपासून सुरू (+ ₹२.६० / किमी) |
| बॅटरी क्षमता | २९.२ kWh (एकच पर्याय) | ३० kWh (Medium Range) / ४० kWh (Long Range) |
| दावा केलेली रेंज | ३२० – ३२५ किमी | ३६५ किमी (MR) / ४६८ किमी (LR) |
| सुरक्षा (Airbags) | ४ ते ६ एअरबॅग्ज (व्हेरियंटनुसार) | ६ एअरबॅग्ज (सर्व व्हेरियंटमध्ये स्टँडर्ड) |
| प्रीमियम फीचर्स | १०.२५-इंच स्क्रीन, ७-इंच डिजिटल कन्सोल, वायरलेस चार्जर | १०.२५-इंच स्क्रीन, ३६०-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ |
| बूट स्पेस | ३१५ लीटर | ३६६ लीटर (+ पुढील भागात १४ लीटर फ्रँक स्पेस) |
| ग्राउंड क्लीअरन्स | १७० मिमी | १९० मिमी |
| मुख्य फायदा | उत्तम केबिन स्पेस आणि अतिशय आरामदायी राईड क्वालिटी | जास्त रेंजचे पर्याय, प्रगत टेक फीचर्स आणि मजबूत एसयूव्ही लुक |
निष्कर्ष
दर्शकांनो तुम्हाला जर कमी पैशात चांगल्या उत्कृष्ट दर्जाची विदेशी कार हवी असेल तर ही Citroen E-C3X तुमच्यासाठी चांगला पर्याय राहील तसेच या गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक पिक्चर्स आपल्याला कमी पैशात मिळून जातील. खरेदी करायचे असेल तुम्ही मन बनवले असेल तर तुम्ही ते त्यांच्या अधिकृत डीलरशिप मध्ये जाऊन किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट देऊनही तुम्ही ते बुकिंग करू शकता.
तसेच तुम्हाला जर तुमची गाडी पावसाळ्यात गंजण्यापासून वापर वाचवायचे असेल तर ती कसे वापरावे याचे टिप्स अँड ट्रिक्स वर मी आम्ही ब्लॉग बनवलेला आहे ते तुम्ही वाचू शकता तसेच आता पावसाळ्यात दिवस चालू आहेत पावसाळ्यात १ ० मान्सून कार केअर टिप्स ज्यामुळे तुमची कार पावसाळ्यात बंद पडणार नाही यावरही आम्ही लेख लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद!!




Leave a Reply