Tata Sierra EV Teased: टाटाची सर्वात खतरनाक गाडी नव्या रुपात परत आली; लुक पाहून वेडे व्हाल!

Tata Sierra ev teased : टाटा मोटर कंपनी आपली लोकप्रिय टाटा सियारा या गाडीला इलेक्ट्रिक स्वरूपात भारतीय बाजारामध्ये ३० जून २०२६ रोजी लॉन्च करणार आहे आणि लॉन्चच्या अगोदर कंपनीकडून एकंदरीत अधिकृतपणे टाटा सियारा इलेक्ट्रिक वाहनाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे आणि त्या ट्रेलरला पाहता आपल्याला असे म्हणावे लागेल की टाटा सियारा त्यांच्या जुने ICE इंजिन गाडी सारखीच दिसायला असणार आहे आणि हे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये प्रवेश या वाहनाला इतिहासात अजरामर करेल असेच वाटते.

कंपनीने काही दिवसा मागे घोषणा केली होती की ते आपल्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय सोनेरी पान जे की टाटा सियारा या नावाने ओळखले जाते अशा या गाडीचे इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये भारतीय बाजारासाठी लॉन्च करणार आहे आणि हे लॉन्च करताना कंपनीकडून कोणत्याही वेगळ्या प्रकारची डिझाईन मध्ये बदल करण्यात येणार नाही असेच दिसून येते आहे. जर केले तर काही थोडेफार बदल करू शकतात या येणाऱ्या 30 तारखेला कंपनी अधिकृतपणे टाटा सियारा ईव्ही चे लॉन्च करेल तर चला या ब्लॉग मध्ये बघूया काय आहे नेमकी टाटा सियारा ईव्ही बद्दल इतकी बाजारामध्ये चर्चा…

Tata Sierra EV Teased
Tata Sierra EV Teased: टाटाची सर्वात खतरनाक गाडी नव्या रुपात परत आली; लुक पाहून वेडे व्हाल!

 

एक्स्टरियर डिझाईन

येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन Tata Sierra EV च्या टीचर वर नजर टाकल्यास आपल्याला दिसून येते की ही गाडी आपली जुनी चौकोनी आकार आणि मागून सरळ अशा डिझाईनला कायम राखणार आहे आणि ही येणारी गाडी मध्ये समोरून कनेक्टेड एलईडी लाईट असणार आहे तसेच गाडीच्या मागेही कनेक्टेड टेलगेट असू शकते. तसेच वाहनांमध्ये आलाॅय विल्स हे एरोडायनिक अलाॅय व्हील्स पद्धतीचे असणार आहेत जे 2020 कन्सेप्ट कार मध्ये दिसून आले होते.

आणि आपल्या टीचर मध्ये दिसून येते की टाटा सियारा ईव्ही या गाडी समोरून पेट्रोल इंजन गाडीच्या तुलनेत पुढचा लुक हा खूप चांगला आणि स्पष्ट असणार आहे. आणि टीचर मध्ये बाहेरील आकारानुसार असे दिसून येते की टाटा सियारा आपल्या इलेक्ट्रिक वाहनांमध्येही जुनी अजरामर सियाराचे गुण डिझाईन मध्ये देणार आहे जेणेकरून ही इलेक्ट्रिक वाहन बाकीच्या मिड-साइज इलेक्ट्रिक वाहनासारखे दिसणार नाही.

बॅटरी आणि रेंज

टाटा EV  कंपनीकडून बॅटरी किती kWh ची असणार आहे हे अधिकृतपणे कोठे सांगण्यात आलेले नाही पण आमच्या सूत्राच्या माहितीनुसार टाटा कंपनीकडून तीन प्रकारचे बॅटरी व्हेरियंट ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत जसे की Tata Sierra EV RWD 65kwh , Tata Sierra EV RWD 75kwh , Tata Sierra EV AWD 75kwh

या तिन्ही वेरियंट असल्यास सोबत टाटा सियारा ईव्ही रियल वर्ल्ड रेंज 500 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षाही जादा असल्याची शक्यता आहे हे सर्व कंपनी कोणता बॅटरी पॅक ग्राहकांसाठी खुला करते याच्यावर आधारित असणार आहे.

इंटेरियर डिझाईन

टाटा सियारा ईव्ही या गाडीचे इंटेरियर केबिन हे ICE इंजन गाडीच्या केबिन सारखेच असणे शक्यता आहे जास्त करून बदल करण्यात येणार नाही त्यातही या येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एकूण तीन टचस्क्रीन सेटअप पाहायला मिळण्याचे शक्यता आहे जसे की १०.२५ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर , १२.३ इंच मध्य स्क्रीन आणि १२.३ इंच पॅसेंजर स्क्रीन हे तीन टचस्क्रीनचे सेटअप सर्वात महागड्या वेरियट मध्ये मिळणार आहेत.

त्याच्या खालील वेरियटमध्ये दोन टचस्क्रीन सेटअप मिळू शकते. आणि या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जे गाडीला पूरक असेल असा फिचर्सची भरणा या वाहनामध्ये मिळणार आहे जसे की पॅनोरमिक सनरूप , व्हेंटिलेटड सीड्स ,चांगल्या दर्जा ऑडिओ सिस्टीम , वेगवेगळ्या ड्रायव्हिंग मोड्स यांसारख्या सुविधाही केबिनमध्ये उपलब्ध असणार आहेत.

 

Tata Sierra EV Teased
Tata Sierra EV Teased: टाटाची सर्वात खतरनाक गाडी नव्या रुपात परत आली; लुक पाहून वेडे व्हाल!

 

फीचर्स

टाटा कंपनीच्या गाड्या आपल्या सेफ्टी फीचर्स साठी पूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत त्याच सेफ्टी फीचर्सचा पानावर पाऊल ठेवत टाटा या वाहनामध्ये लेवल 2 ADAS , 360 डिग्री कॅमेरा , खूप सारे एअर बॅग , यांसारखे फीचर्स कंपनीकडून गाडीमध्ये उपलब्ध होतील टाटा कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनाचे भारतीय बाजारात लॉन्च केल्यापासून खूप नाव केलेले आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सियारा इलेक्ट्रिक वाहनाचा पण असेच नाव व्हावे ही टाटाची अपेक्षा असणार आहे.

मार्केटमध्ये कोणत्या सेगमेंट मध्ये बसेल

आगामी ३० जून २०२६ ला लॉन्च होणारी ही Tata Sierra EV भारतीय मार्केटमध्ये Tata Curvv EV च्या वर आणि Tata Harrier EV च्या खाली अशी दोन वाहनांच्या मधी या वाहनाचा क्रमांक लागू शकतो.
मार्केटमध्ये या वाहनाची किंमत लगबग ₹ १८ लाख एक्स शोरूम पासून चालू होऊन सर्वात महागडे वेरियंट ₹ 25 लाखापर्यंत किंमत असण्याची शक्यता आहे.

 

Tata Sierra EV Teased
Tata Sierra EV Teased: टाटाची सर्वात खतरनाक गाडी नव्या रुपात परत आली; लुक पाहून वेडे व्हाल!

 

टाटा मोटर्स कंपनीला याचा काय फायदा होणार आहे

1990 च्या दशकातील प्रसिद्ध आणि धाडसी लोकांचे वाहन म्हणून प्रसिद्ध असणारी “सितारा” आहे नाव परत आणून टाटा मोटर्स ग्राहकांमध्ये एक भावनिक नाळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. जसे की जुन्या आणि नवीन दोन्ही पिढ्या मधील ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम या गोष्टीमुळे होऊन जाणार.
हे वाहन TATA Curvv आणि Tata Harrier EV
मध्ये पोझिशन केले गेल्यामुळे ग्राहकांना टाटाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियम इलेक्ट्रिक वाहन सेगमेंट मध्ये उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहेत.

सियारा ईव्ही टाटाची नवीन Acti.ev+ या आर्किटेक्चर वर आधारित असणार आहे आणि एकाच प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा जास्त कार बनवल्यामुळे कंपनीला उत्पादनाचा खर्च कमी होणार आहे.

टाटा मोटर्स आधीपासूनच भारतातील इलेक्ट्रिक वाहन मार्केटवर वर्चस्व गाजवत आहे आणि विक्रीचे संख्येमध्ये प्रथम क्रमांकावर विराजमान आहे आता सिआर ईव्ही लॉन्च केल्यावरही या संख्येमध्ये वाढ होण्याची प्रचंड शक्यता आहे आणि यामुळे टाटाचे इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओ अधिक मजबूत आणि मार्केटमधील वर्चस्व वाढत राहणार आहे.

Tata Sierra EV Teased
Tata Sierra EV Teased: टाटाची सर्वात खतरनाक गाडी नव्या रुपात परत आली; लुक पाहून वेडे व्हाल!

 

प्रतिस्पर्ध्यक

नव्याने लॉन्च होणाऱ्या ह्या टाटा सियारा इलेक्ट्रिक वाहनाला भारतीय बाजारामध्ये खूप मोठ मोठ्या कंपन्यांच्या गाड्या रायवल करण्याचे काम करतील त्यामध्ये Mahindra BE6 , Hyundai Creta EV ,MG ZS EV , Maruti e Vitara यांसारख्या वाहनाचे नावे येतात.

निष्कर्ष

Tata Sierra EV या वाहनाचे लॉन्चिंग हे टाटा मोटर साठी केवळ एक नवीन इलेक्ट्रिक वाहनाची भर नाहीये तर भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारामध्ये आपले अव्वल स्थान मजबूत करण्यासाठी जसे की मागील महिन्याच्या electric car sales May 2026 च्या आकड्यानुसार टाटा मोटर्स कंपनीच्या या तालिकेत प्रथम क्रमांक आहे आणि तोच क्रमांक टिकून ठेवण्यासाठी टाटा या वाहनाचा लॉन्च करत आहे  तसेच मार्केटवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी केलेली ही खेळी म्हणू शकतो.
ग्राहकांनो तुम्हाला जर ही गाडी खरेदी करायची असेल तर ३० जून २०२६ ही गाडी भारतीय बाजारामध्ये अधिकृतपणे लॉन्च होणार आहे त्यानंतर तुम्ही बुकिंग करून ही गाडी शोरूम मध्ये जाऊन आपल्या घरी आणू शकता.धन्यवाद!!!