Ampere Reo VYB EV launch : दर्शकांनो तुम्ही जर इथेनॉल मिश्रित पेट्रोल डिझेल आणि त्याचबरोबर वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे हैराण झाला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जसे की ग्रेव्हीच इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीच्या एंपियर ब्रँड ने शहरी व दररोज स्कूटरचा जास्त वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर रिओ व्हीवायपी (Reo VYB) भारतीय बाजारात लॉन्च केलेली आहे. ही स्कूटर अवघ्या ₹६९,४९९ रुपयांना आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकता आणि ही स्कूटर शक्यतो नव्याने गाडी शिकणारे लोकांसाठी किंवा शहरी भागात कमी दळणवळण वापरण्या लोकांसाठी बनलेली आहे.
स्कूटर पहिल्यांदा पाहिल्यास समजून येते की ही स्कूटर बजेट मधल्या शहरी ग्राहकांसाठी बनलेले आहे ज्यामध्ये बॅटरी क्षमता ही कमी आहे आणि रेंज पण आपल्याला सिमित मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही स्कूटर आपण आपल्या घरी कोणत्याही लायसन किंवा मोठा खर्च अंगावर पडेल अशा भारापासून मुक्त होऊन घेऊ शकता.

बॅटरी , रेंज व चार्जिंगचा वेळ
या ग्रेव्हीच इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीच्या रिओ व्हीवायपी इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये (LFP) लिथियम फेरोफॉस्फेट बॅटरी आपल्याला पाहायला मिळते जे की सुरक्षा आणि मजबुतीसाठी लोकप्रिय आहे तसेच गाडीची रेंज सिंगल चार्जिंग मध्ये 80 किलोमीटर पर्यंत आपल्याला मिळणार याबरोबर या रिओ व्हीवायपी इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड ताशे २५ किलोमीटर असणार आहे. ज्यामुळे ही स्कूटर विशेषतः शहरी प्रवास आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीच फक्त आपल्याला वापरता येणार आहे. याची बॅटरी चे आयुष्य किमान १,००,००० पर्यंत असणार आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरची चार्जिंग वेळ ही ० ते १००% करण्यासाठी ५ तास ३० मिनिटे इतका वेळ घेते.
किंमत
ग्रेव्हीज इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीच्या रियो व्हीआयपी या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत ही ₹६९,४९९ रुपये इतकी असणार आहे.

डिझाईन
या इलेक्ट्रिक स्कूटरचा डिझाईन मुख्य: आधुनिक लुक , वजनाला हलकी आणि सामान्य ग्राहकाला वापरण्यासाठी उपयुक्त अशा त्रिसूत्री वर या ग्रेव्हीज इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने इन हाऊस इंजिनिअरिंग आणि डिझाईन टीमने चांगल्या प्रकारे संगम घालून ही डिझाईन तयार केलेली आहे.
तरुण पिढी आणि कॉलेज कुमारांना आकर्षित करण्यासाठी वळणदार बॉडी पॅनेल्स आणि स्लीक फ्रंट डिझाईन खूप सुंदर प्रकारे बघायला मिळतात तसेच या डिझाईनला योग्य दिसेल असे आधुनिक LED हेडलाईट आणि LED टेल लॅम्प हे दिले गेलेले आहे.
तसेच गाडीच्या साईड कडून अम्बियटं साईड लायटिंग ही देण्यात आलेले आहे त्यामुळे साडीच्या बाजूने स्कूटर आकर्षक लुकमध्ये दिसते .
आधुनिक फीचर्स
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये प्रीमियम की-फॉब दिला आहे तुम्ही त्याच्या मदतीने चावी शिवाय स्कूटर रिमोटने लॉक आणि अनलाॅक आणि स्टार्ट करू शकता.
हँडलवार एक डिजिटल 3.5 साईज मधले कलर स्क्रीन आहे ज्यावर स्पीडोमीटर मीटर , ओडोमीटर , ट्रीप मिटर आणि बॅटरी लेवल आपण स्पष्टपणे पाहू शकता आणि त्याचा वापर करू शकता तसेच आपल्याला प्रवास करताना मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी पोर्ट देखील या स्कूटरमध्ये मिळतो.
ज्यांची उंची कमी आहे किंवा ज्यांना वाहन चालण्याची कला माहीत नाही त्यांच्यासाठी स्कूटर सहज मागे घेण्यासाठी रिव्हर्स मोडची सुविधा कंपनीकडून उपलब्ध आहे.

स्पेस आणि व्यवहारिकता
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आपल्याला 24 लिटरची मोठी स्टोरेज स्पेस असलेली डिक्की मिळणार आहे ज्यामध्ये आपण कॉलेजची बॅग , भाजीपाल्याची पिशवी किंवा फुल साईट हेल्मेट पण ठेवू शकता.
सामान्यतः ही स्कूटर दोन प्रौढ व्यक्ती बसतील अशा योजनेने बनविले गेले आहे त्यामुळे तुम्ही स्कूटरवर दोन प्रौढ व्यक्ती आरामात बसून एका जागेवर दुसऱ्या जागेवर प्रवास करू शकता.
स्कूटरचे एकूण वजन ७१.४ किलो आहे ज्यामुळे गर्दीचे ठिकाणी ती वळवणे खूप सोपी जाणार आहे.
वॉरंटी आणि सर्विस नेटवर्क
ग्रेव्हीज इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीकडून या स्कूटरवर जर तुमची बॅटरीचा सेल खराब होण्यावर किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट जे की ३ वर्षे किंवा ३०,००० किलोमीटरच्या आधी अशी कोणतीही घटना घडली तर तुम्हाला बॅटरी वॉरंटी मिळू शकते.
तसेच स्कूटरच्या मुख्य पार्टस जसे की मोटार कंट्रोलर , कन्वर्टर आणि चार्जर यासारख्या मुख्य इलेक्ट्रिक पार्ट्स वर १ वर्ष किंवा १०,००० किमीची वॉरंटी मिळते.
या कंपनीची संपूर्ण पॅन इंडिया सर्विस उपलब्ध आहे जसे की भारतात ३०० हून अधिक शहरांमध्ये एंपियर चे ४०० पेक्षा जास्त अधिकृत सर्विस सेंटर उपलब्ध आहेत. तसेच कोणत्याही समस्येसाठी कंपनीची १२×७ डेडिकेटेड कस्टमर केअर हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहे.

कलर्स
ही स्कूटर एकूण चार आधुनिक रंगांमध्ये उपलब्ध आहे जसे की Warm White , Pastel Purple , Dark Grey , Aqua Matallic
निष्कर्ष
Ampere RIO VYB ही स्कूटर स्थानिक प्रवासासाठी शाळा कॉलेजच्या फेऱ्या आणि दैनंदिन घरगुती कामासाठी एक अंतर व्यावहारिक त्यानुसार आणि तुमच्या बजेटला अनुसरून सर्वोत्तम स्कूटर आहे.
मुख्यतः 25 किलोमीटर ताशी टॉप स्पीड असल्यामुळे ही चालवायला अत्यंत सुरक्षित आहे आणि लायसन्स किंवा आरटीओ रजिस्ट्रेशनचे अजिबात गरज नाहीये तसेच फक्त 71 किलो ची वजन असल्यामुळे ही स्कूटर महिलांना व नवीन चालकांना हाताळायला सोपी जाऊ शकते




Leave a Reply