India launch E85 petrol : भारतामध्ये पहिल्यांदाच लॉन्च झाले 85 पेट्रोल ते पण पर्यावरण दिन दिवशी आणि ह्या पेट्रोलचा दर असणार आहे नियमित पेट्रोल दरापेक्षा ₹२० रुपये कमी.
काल भारतामध्ये दिनांक 5 जून 2026 रोजी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हार्दिक सिंग पुरी यांच्या हस्ते भारतातील पहिले E85 पेट्रोल पंपाचे दिल्लीमध्ये अनावरण करण्यात आले.
या पेट्रोल चा दर असणार ₹82.12 पर लिटर जे की दिल्लीनुसार आहे. याचा अर्थ हे दैनंदिन पेट्रोल पेक्षा 20 रुपये कमी पैशात आपल्याला पेट्रोल मिळणार आणि पेट्रोल पंपावर या E85 पेट्रोलचे वेगळ्या ब्रँडिंग नुसार डिस्पेंन्सर असणार आहे. चला जाणून घेऊया विस्तार मध्ये काय आहे नेमके ह्याच्या मागचे सत्य.

फक्त ₹८२ प्रति लिटर! भारतात E85 पेट्रोल अखेर लॉन्च,पण सर्वसामान्यांना मिळणार का फायदा?
E85 पेट्रोल म्हणजे नेमके काय?
E85 पेट्रोल हे सर्वात जास्त इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे जे की 85% इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोलचा वापर यात होतो.
आणि हे इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्यामागचे कारण कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी ज्यामुळे देशाचे परकीय चलन वाचणार आणि इंधनासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागणार नाही हे एक कारण आहे
इथेनॉल पेट्रोल पेक्षा जास्त स्वच्छ जळते त्यामुळे कार्बन मोनॉक्स उत्सर्जन 77% पर्यंत कमी होऊन हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत होते.
इथेनॉल हे ऊस आणि मक्यासारख्या पिकापासून बनविले जाते त्यामुळे या इथंनांचा वापर वाढल्यास स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
इथेनॉलचा ऑक्टेन नंबर जास्त असल्यामुळे इंजिनचा आवाज कमी होतो आणि गाडी एकदम स्मूथ चालते यांसारखे फायद्यामुळे सरकारने हे धोरण वापरण्यास सुरुवात केली आहे
E85 आणि E20 यांच्या किमतीमध्ये तफावत का?
ये E85 आणि E20 ची किमती मध्ये तुलना करायची असेल तर E20 पेट्रोल हे ₹१०२.१२ पर लिटर ह्या किमतीमध्ये मिळते तर नव्याने लॉन्च झालेले E85 हे ₹८२.१२ इतक्यामध्ये मिळते आणि ह्या दोन्ही पेट्रोलमध्ये तब्बल ₹२० रुपयाची तफावत आहे.
हे करून पण आपल्याला ह्या नव्या इंजिन पेट्रोलमध्ये मायलेज पहिल्या पेट्रोल सारखे मिळणार नाही कारण इथेनॉल ची एनर्जी डेन्सिटी पहिल्या पेट्रोलच्या तुलनेत कमी असणार.
E85 पासून चे वाहन हे किमतीमध्ये सामान्य गाड्यांपेक्षा जास्त असणार जसे की आत्ता नव्याने लॉन्च झालेली हिरो स्प्लेंडर प्लस आणि व्हॅगनार आर ह्या गाड्या दैनंदिन वाहनांपेक्षा किमतीमध्ये थोड्या जास्त आहेत.

फक्त ₹८२ प्रति लिटर! भारतात E85 पेट्रोल अखेर लॉन्च,पण सर्वसामान्यांना मिळणार का फायदा?
E85 पेट्रोलची उपलब्धता
आत्ता हे फक्त दिल्लीमध्ये पुसा रोड या ठिकाणी सुरुवाती पाऊल म्हणून लॉन्च झालेली आहे भारत सरकारचा भविष्याचा नियोजन असे आहे की दिल्ली एनसीआर आणि मुंबई पुणे नागपूर कॉर्नर या ठिकाणी एकूण 50 ते 100 E85 पेट्रोल पंप सुरुवातीच्या काही उभारण्यात येणार आहेत.
सरकारचा दावा असा आहे की २०२६ वर्ष संपायच्या आधी हेच पेट्रोल पंपाची संख्या ५०० च्या वर जाईल तसेच पुढील वर्षी २०२७ च्या शेवटपर्यंत पूर्ण भारत देशात मुख्य शहरांमध्ये 5000 च्या वर हे पेट्रोल पंपवर पेट्रोल मिळणार असे धोरण आहे.
हे धोरण सरकारसाठी खूप महत्त्वाची आहे कारण हे E85 वाहनासोबत E85 पेट्रोल पण जागोजागी मिळावे तेवढेच महत्त्वाचे आहे कारण दोघात तफावत झाली तर मोठा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे सुरुवातीला दोन वर्ष सरकारसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.
का हे पेट्रोल दैनंदिन पेट्रोल कार मध्ये वापरले जाऊ शकत नाही?
आपण पेट्रोल रेगुलर पेट्रोल कार मध्ये वापरू शकत नाही कारण हे इंजिनच्या परफॉर्मन्स मध्ये खूप अडचणी निर्माण करणार तसेच मेकॅनिकल गंज चढू शकतो तसेच इंधन प्रणाली निकामी होऊ शकते.
त्यामुळे दैनंदिन कार फक्त E10 आणि E20 मिश्रित पेट्रोल साठीच वापरली जाऊ शकते आणि या E85 पेट्रोल साठी एक वेगळीच फ्लेक्स इंधन वाहन जे ह्या पेट्रोल वापरण्यासाठी बनलेले आहेत तेच वापरावे लागेल.
कोणते वाहने ह्या E85 पेट्रोल साठी वापरली जाणार?
ह्या वैशिष्ट्यपूर्ण E85 पेट्रोल साठी वाहन हे फ्लेक्स फुल वाहन असणे आवश्यक आहे सामान्य पेट्रोल वाहनांमध्ये हे E85 पेट्रोल वापरता येत नाही त्यामुळे इंजन वाहनांचे मोठे नुकसान होऊ नये यासाठी वैशिष्ट्यपूर्ण फ्लेक्स इंधन वाहन वापरले जाते.
तसेच काही दिवसाआधी भारतीय कंपन्यांकडून या वाहनांचे लॉन्च करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मारुती सुझुकीकडून वॅगनार आर फ्लेक्स इंधनकार तसेच हिरो कडून स्प्लेंडर प्लस आणि एचएफ डीलक्स या वाहनांची पण लॉन्च झालेले आहेत हे असेच वैशिष्ट्यपूर्ण वाहन ह्या पेट्रोलसाठी वापरले जाते.

फक्त ₹८२ प्रति लिटर! भारतात E85 पेट्रोल अखेर लॉन्च,पण सर्वसामान्यांना मिळणार का फायदा?
भारतीय लोकांची गाडी खरेदीसाठी रणनीती काय असावी?
तुम्हाला जर नवीन कार खरेदी करायची असेल तर ह्या पेट्रोल लॉन्च झाल्यामुळे तुम्हाला पहिला तुमच्याकडे आधीपासून पेट्रोल कार असेल तर त्यात चुकूनही E85 इंधन भरायचे नाही. सध्यांच्या सामान्य गाड्यांमध्ये फक्त E20 किंवा E30 पेट्रोल वापरले जाऊ शकते. सामान्य गाडीत हे इंधन टाकल्यास इंजन गंजणे आणि इंधन वाहिन्या खराब होण्याच्या धोका उद्भवू शकतो.
तुम्हाला थोडे थांबणे फायदेशीर ठरू शकते कारण सध्या फक्त मारुती वॅगनार आर फ्लेक्स इंधन उपलब्ध आहेत परंतु टाटा मोटर्स आणि टोयोटा देखील त्यांच्या अनुक्रमे टाटा पंच फ्लेक्स इंधन आणि हायक्रॉस फ्लेक्स इंधन या गाड्या भारतीय बाजारामध्ये लवकरच आणणार आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त पर्याय उपलब्ध होतील.
सध्या तुम्ही कुठे राहता हे महत्वाचे आहे तुम्ही तुमचा परिसर तपासा तुमच्या परिसरात हे E85 पंप आहेत किंवा भविष्यात येणार का हे सुनिश्चित करून कार खरेदी करायचे त्यानुसार ठरवा.
E85 कारच्या इंजिन मध्ये खास बदल केलेले असल्यामुळे या गाड्या सामान्य पेट्रोल गाड्यापेक्षा ४०,००० ते एक लाखापर्यंत महाग होणार त्यामुळे इथेनॉलमुळे गाडीचे मायलेज १५ ते २०% कमी होते मात्र इंधन ₹२० रुपये कमी केल्यामुळे जर तुमचा दररोजचा प्रवास जास्त असेल तर तीन वर्षाच्या आत गाडीची अतिरिक्त किंमत वसूल होऊन जाते.
ऑटो गुरुचा याच्यावर निष्कर्ष
थोडक्यात सल्ला द्यायचा झाला तर जर तुम्ही मुंबई पुणे किंवा नागपूर मध्ये राहत असाल आणि तुमचे रोजचे फिरणे जास्त असेल तर फ्लेक्स इंधन कार घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
इतर जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या सध्या नेहमीचे पेट्रोल हायब्रीड किंवा इलेक्ट्रिक वाहन निवडणे अधिक व्यवहारिक ठरेल.