मारुती सुझुकी ने भारतातील सर्वात पहिली फ्लेक्स इंधन कारचे अनावरण आज केले आहे आणि आणि ती कार आहे. मारुती सुझुकी इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त विक्री होणारी Maruti Suzuki WagonR Flex Fuel Car ही असणार आहे. आणि विशेष म्हणजे ह्या गाडीमध्ये E20 पासून E85 इथेनॉल मिश्रित पेट्रोल वर चालण्यासाठी कार सक्षम असणार आहे. तर चला जाणून घेऊया विस्तार मध्ये काय हाय हा नेमका विषय.
मागील तीन-चार वर्षापासून ही गाडी खूप चर्चेमध्ये होती लोकांना उत्सुकता होती की मारुती या गाडीचे अनावरण केव्हा करणार आणि तो दिवस आज आलेला आहे आज चार जून 2026 रोजी माननीय केंद्रीय परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या शुभहस्ते मारुती सुझुकी कडून अनावरण करण्यात आले

फ्लेक्स फ्यूल म्हणजे नेमका विषय काय?
दर्शकांनो फ्लेक्स फ्यूल म्हणजे असे इंधन जे पेट्रोल आणि इथेनॉल यांच्या मिश्रणापासून बनलेले असते जे की गाडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालते
आणि हे इंधन का वापरावे कारण हे इंधन दुसऱ्या पेट्रोल पेक्षा स्वस्त आहे तसेच इंधन संस्था असल्यामुळे प्रवास खर्चही कमी होतो आणि हे इंधन वापरल्यामुळे पर्यावरण ला पण दूषित होण्यापासून वाचवले जाते भारती आणि हे इंधन वापरले तर भारताच्या कच्चे तेल जे आपण परकीय देशांकडून घेतो त्याच्यावरती निर्भरता कमी होणार आहे.
ही गाडी कोणासाठी लॉन्च केलेली आहे?
ही गाडी मुख्यतः मारुती सुझुकी कंपनीकडून फक्त व्यावसायिक क्षेत्रासाठीच उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे जे लोक व्यवसाय , उद्योग धंदे वाढवण्याचा प्रयत्न करतायेत आणि त्यांना पेट्रोलच्या महागाईमुळे डोकेदुखी झाल्या त्यांच्यासाठी ही गाडी खूप फायदेशीर ठरणार आहे
कंपनीकडून असे कोणतेही माहिती मिळाली नाही जेणेकरून असे सांगण्यात येईल की ही गाडी लॉन्च केव्हा करण्यात येणार आहे आणि लोकांमध्ये याचे विक्री केव्हा चालू होईल
या गाडीची किंमत किती असणार आहे
या गाडीचे मारुती सुझुकी कडून फक्त अनावरण करण्यात आलेले आहे त्यामुळे ह्याची किंमत कंपनीकडून तर किती असेल असे सांगण्यात आलेले नाही. पण आमच्या सूत्रानुसार ह्या गाडीची किंमत ₹६ लाख ते ₹८.५० लाख पर्यंत असू शकते.

इंजन
मारुती सुझुकी ने ह्या वाहनासाठी त्यांचे आतापर्यंत वापरलेले के१२ जे की 1.2 लिटर 4 सिलेंडर इंजिन आहे ते या वाहनात वापरले जाणार आहे असे काही कंपनीकडून ऑफिशिअली कोणते इंजन वापरले आहे असे सांगण्यात आलेले नाही पण आमच्या अंदाजानुसार हे इंजनच वापरलेले असू शकते.
सरकारच्या इथेनॉल मिश्र इंधनधोरणाला समर्थन
भारत सरकार आणि माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून या इथेनॉल मिश्र पेट्रोल इंधनाला समर्थन करणे हेतू मारुती सुझुकीने नॅशनल इन्व्हरमेंट डे जो की उद्या 5 जून 2026 रोजी आहे त्यांच्यामुळे मारुती सुझुकीने फ्लेक्स कार आज अनावरण करून सरकारच्या मोहिमेला समर्थन दर्शविले आहे.
मारुतीने व्हॅगनार या गाडीला का निवडलं
मारुतीने व्हॅगनार या गाड्या निवडायचे कारण असे की कंपनीकडून सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि विक्री होणारी गाडी ही सध्या व्हॅगनार आहे आणि ही गाडी आपल्या आरामदायक सीट पुढील मोठे केबिन तसेच चांगल्या मायलेज व कमी खर्च यांसारख्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे याचा फायदा मारुतीला व्हावा याकरिता मारुतीने ही गाडी निवडली.
येणारा काळ हा ह्या फ्लेक्स इंधनाचा असल्यामुळे मारुतीने भारतात सगळ्यात पहिला नंबर लावून ही गाडी ह्या फ्लेक्स इंधनासोबत अनावरण केली आहे तसेच या गाडी अनावरण आधी हिरो मोटो क्रोप कंपनीने आपल्या स्प्लेंडर प्लस आणि एचएफ डीलक्स या hero मोटरसायकल फ्लेक्स फुल सोबत लॉन्च केल्या आहेत.

फ्लेक्स फुल इंधनाचे भविष्य
भविष्यात आपल्याला खूप साऱ्या कंपनीकडून या इथेनॉल पेट्रोल मिश्रित इंधनाचा वापर करून कंपन्या गाड्या मोटरसायकल लॉन्च करू शकतात तर आपला फायदा बघून लोकांनी या संधीचे सोने करून पैसे बचत व आपल्या पाकिटावर कमी खर्च पडावा ही भूमिका घेऊन या गाड्या खरेदी करू शकतात.
फ्लेक्स इंधन कार फायदे
फ्लेक्स इंधन कारचे मुख्य फायदे खालील प्रमाणे आहेत
- इथेनॉल पेट्रोलपेक्षा जास्त स्वच्छ जळते. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जन 77% पर्यंत कमी होऊन हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत होणार.
- इथेनॉल हे ऊस आणि मक्यासारख्या पिकापासून बनविले जाते त्यामुळे या इंधनांचा वापर वाढल्यास स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
- किरणच्या वापरामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होते त्यामुळे देशाचे परकीय चलन वाजते आणि इंधनासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागत नाही.
- इलेक्ट्रिक गाड्या प्रमाणे ह्या कार चार्जिंग साठी वेळ घेत नाहीत तुम्ही नेहमीच्या पेट्रोल पंपावर जाऊन काही मिनिटात पेट्रोल किंवा इथेनॉल मिश्रित इंधन भरू शकता.
- इथेनॉलचा ऑक्टेन नंबर जास्त असतो त्यामुळे इंजन चा आवाज कमी होतो आणि गाडी एकदम स्मूथ चालते.
फ्लेक्स इंधन कारचे तोटे
फ्लेक्स इंधनच्या कारचे मुख्य तोटे खालील प्रमाणे आहेत.
- इथेनॉलच्या ऊर्जा घनता पेट्रोल पेक्षा कमी असते. त्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल वर गाडी चालवताना मायलेज 15% ते 25% पर्यंत कमी मिळते.
- इथेनॉल हवेतील ओलावा शोषण घेतो यामुळे इंधनाच्या टाकीमध्ये आणि पाईप्स मध्ये गंज पकडण्याची किंवा इंजिनचे पार्ट खराब होण्याची शक्यता खूप जास्त असू शकते.
- हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात जास्त इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणाऱ्या बाइक्स लवकर सुरू होत नाहीत.
- सध्या भारतात सर्वच पेट्रोल पंपावर उच्च क्षमतेचे इथेनॉल मिश्रित इंधन सहज उपलब्ध नाही त्यामुळे ग्रामीण भागात इंधन मिळण्यात अडचण 100% येऊ शकते.
- या कारमध्ये खास प्रकारचे गंजरोधक पार्ट्स आणि इंजिन सेन्सर्स वापरावे लागतात त्यामुळे नेहमीच्या पेट्रोल बाईकच्या तुलनेत याची खरेदी किंमत थोडी जास्त असू शकते.
- इथेनॉल बनवण्यासाठी ऊस आणि मक्यासारख्या अन्नधान्य पिकाच्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो यामुळे भविष्यात अन्नधान्याची टंचाई किंवा अन्नधान्याचे भाव वाढण्याचा धोका असणार.
निष्कर्ष
दर्शकांनो तुम्हाला जर ही गाडी खरेदी करायची असेल आणि इंधनामध्ये बचत व पैशांमध्ये बचत मिळवायची असेल तर तुम्ही ही गाडी एक वेळ नक्की घेण्याचा विचार करू शकता.
सध्याच्या घडीला तर सामान्य लोकांना ही गाडी विकली जाणार नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे फक्त व्यवसायसाठीच ही गाडी विक्रीसाठी खुली असणार आहे
वरील दिलेले फायदे व तोटे बघून आपण या कार बद्दल व इंधनाबद्दल आपला विचार सांगू शकता.




Leave a Reply