टाटा की एमजी? केवळ ₹४.६९ लाखात घरी आणा इलेक्ट्रिक कार, पण कोणती आहे सर्वात बेस्ट?

दर्शकांनो तुमचे जर दहा लाखाच्या आत बजेट आहे  आणि तुम्हाला या बजेटमध्ये  सर्वोत्तम इलेक्ट्रिक वाहन पाहिजे असेल तर तुम्ही काही दिवसांपूर्वी नव्याने लॉन्च झालेली New Tata Tiago EV vs MG Comet EV या दोन्ही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एक निवडू शकता.

 

 ह्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया की तुम्हाला ह्या दोन गाड्यांमध्ये कोणती गाडी घ्यायला पाहिजे त्यांच्या इलेक्ट्रिक बॅटरी पासून ते एक्सटेरियर ,  इंटेरियर , सुरक्षितता , स्पेसिफिकेशन , कलर्स  आणि किंमत ह्यापर्यंत तुम्हाला सर्व माहिती या ब्लॉगमध्ये मिळेल तर चला सुरू करूया.

 

New Tata Tiago EV vs MG Comet EV
टाटा की एमजी? केवळ ₹४.६९ लाखात घरी आणा इलेक्ट्रिक कार, पण कोणती आहे सर्वात बेस्ट?

 

इलेक्ट्रिक बॅटरी आणि रेंज

 

 पहिला टाटा टियागो ईवी मध्ये दोन प्रकारच्या बॅटरी आपल्याला मिळतात. पहिली 19kwh आणि दुसरी 24kwh  ह्यात 19kwh बॅटरीवर 61hp ताकत आणि 110nm टॉर्क मिळतो तसेच 24kwh बॅटरीवर 75hp ची ताकद आणि 114nm टॉर्क मिळतो आणि या बॅटरीची रियल वर्ल्ड रेंज ही प्रत्येकी 19kwh साठी 160 ते 170 किलोमीटर असेल व 24kwh बॅटरी साठी 205 ते 215 किलोमीटर असणार आहे

 

आणि आता एमजी कॉमेट ईवी मध्ये आपल्याला फक्त एक प्रकारची बॅटरी मिळते ती असेल 17.3kwh आणि ह्या बॅटरी पॅक ने गाडीला 42hp ताकद व 110nm टॉर्क भेटणार. आणि ह्या बॅटरी पॅक ने तुम्हाला 230 किलोमीटर पर्यंत रेंज मिळणार.

 

एक्स्टरियर डिझाईन

 

टाटा टियागो ईवी  च्या एक्सपेरमध्ये टाटा ने खूप बदल केला आहे जसे की पुढचा पूर्णतः भाग हा एका कलर थीम मध्ये दिसतो व पुढून एलईडी हेडलाईन्स दिसतात आणि त्याच्यावर पण खूप धारदार लुक देतात. 

टाटा ने यात फॉग लॅम्प न देता पैसे वाचण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो तसेच गाडीचा बंपर ही पहिल्यापेक्षा थोडा बदल दिसतो गाडीच्या पुढे नंबर प्लेट साठी जागा आहे तसेच पाठीमागून गाडी कनेक्टेड एलईडी टेलर दिलेले आहे तसेच मागील बंपर पण पहिल्यापेक्षा बदल केलेला दिसून येतो यांसारखे बाहेरून टाटा टियागो ईवीमध्ये बदल केलेले दिसतात

 

एमजी कॉम्बोट ईवी च्या एक्स्टर्नल डिझाईन मध्ये समोरून दोन मोठे हेडलॅम्प दिसतात त्याच्या खाली 

फोगलॅम्प पण या गाडीमध्ये दिसून येतो तसेच सर्वात वर कनेक्टेड एलईडी लाईट पूर्ण बंपर वर दिसून येते गाडीच्या बॅक साईडला पण कनेक्टेड टेल लाईट आहे तसेच टेन लाईटच्या बरोबर मध्ये एमजी चा लोगो आणि त्याच्या खाली दोन्ही बाजूला टेललॅम्प आहेत.

 

इंटिरियर डिझाईन

 

टाटा टियागो ईवीचे इंटरियर मध्ये बोलायचे झाले तर टाटा ने पहिला स्टेरिंग वरचा लोगो बदलून लोगोच्या ऐवजी टाटा एव्ही या नावाचा लोगो स्टेरिंगच्या मधोमध दिलेला आहे. तसेच गाडीचा डॅशबोर्ड दोन-टोन मध्ये दिसून येतो.

गाडीच्या मधोमध केबिनला 10.25 इंच चा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम बघण्यास मिळते व स्पेलिंग च्या समोर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिसून येतो जोकी ब्लूटूथ ला साथ देणारे आहे. अशाप्रकारे टाटा टियागो ईवी चा इंटिरियर केबिन स्पेस आहे

 

एमजी कॉमेट ईवी मध्ये इंटरियर खूप उत्कृष्ट दर्जाचे काम केलेले आहे असे दिसून येते गाडीत बसले ते श्रीमंतीचा फील येतो. गाडीच्या केबिनमध्ये दोन जुळे 10.25 इंच टचस्क्रीन बघायला मिळतात तसेच गाडीमध्ये उत्कृष्ट दर्जाची प्लास्टिक वापरण्यात आलेले आहे जे की डिझाईन मध्ये दिसून येते. तसेच स्टेरिंग वर एमजी चा मोठा लोगो दिसून येतो.

 

New Tata Tiago EV vs MG Comet EV
टाटा की एमजी? केवळ ₹४.६९ लाखात घरी आणा इलेक्ट्रिक कार, पण कोणती आहे सर्वात बेस्ट?

 

 

 वेरियंट

 

टाटा टियागो ईवी मध्ये चार प्रकारचे वेरियंट बघायला मिळतात जसे की स्मार्ट 19kwh, प्युअर प्लस 19kwh , प्युअर प्लस 24kwh आणि क्रिएटिव्ह प्लस 24kwh हे चार बेरियंट बघायला मिळतात यात पहिल्या वेरियंटची किंमत ₹6.99 लाख एक्स शोरूम पासून सुरुवात होऊन शेवटचे वेरियंट ₹9.99 लाख एक्स शोरूम किंमत आहे.

 

एमजी कॉमेट ईवी मध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट बघायला मिळतात  जसे की  Executive 17.3 kWh , Excite 17.3 kWh , Excite FC 17.4 kWh , Exclusive 17.3 kWh , Exclusive FC 17.4 kWh हे बेरियंट बघायला मिळतात

 

फीचर्स

 

टाटा टियागो ईवी मध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो , ॲपल कार प्ले , ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल,  क्रूज कंट्रोल , ओआरव्हीएम , हाईट ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट ,  चार स्पीकर्स , रेन सेंसिंग वायपर्स  यांसारखे फीचर्स मिळतात.

 

एमजी कॉमेट मध्ये पुढील पॉवर विंडोज, ओआरव्हीएम टर्न इंडिकेटर्स , एलईडी टेलगेट , इमर्जन्सी कॉल बटन ,  रिमोट कार लॉक-अनलॉक ,   रिमोट ऑन-ऑफ एप वरून यांसारखे फीचर्स मिळतात

 

New Tata Tiago EV vs MG Comet EV
टाटा की एमजी? केवळ ₹४.६९ लाखात घरी आणा इलेक्ट्रिक कार, पण कोणती आहे सर्वात बेस्ट?

 

सुरक्षितता (safety)

 

सुरक्षेसाठी टाटा टियागो ईवीमध्ये सुरुवातीचे दोन एअरबॅग सेटअप बदलून सहा एअरबॅक्स स्टॅंडर्ड दिलेले आहेत. तसेच 360 डिग्री कॅमेरा जो की खूप सार्‍या व्यू मोडमध्ये असेल आणि रेन सेंसिंग वाइपर्स , ट्रेक्शन कंट्रोल , हिल होल्ड एसिस्ट , टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम , यांसारखे  सेफ्टी फीचर्स असणार आहेत.

 

एमजी कॉमेट ईवी मध्ये दोन एअर बॅग , हिल होल्ड असिस्ट , रियर कॅमेरा , ऑंटी लॉक ब्रेक्स , फ्रॅक्शन कंट्रोल , सेंट्रल लॉकिंग , ऑटोमॅटिक वायफर्स , रियर पार्किंग सेन्सर्स , ब्लाइंड स्पोर्ट मॉनिटर यांसारखे फीचर्स दिलेले आहेत

 

टेक्नॉलॉजी

 

टाटा टियागो ईवी मध्ये झेड कनेक्ट ॲपद्वारे रिमोट कार ट्रेकिंग आणि जिओ फेन्सिंग सारखे कनेक्टेड फीचर्स मिळतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते म्हणजे 10 ते 80 चार्जिंग फक्त 35 मिनिटात होते.

 

एमजी कॉमेट ईवी यामध्ये प्रगत व्हाईस कमांड्स आणि विंग्स आई स्मार्ट कनेक्टिव्हिटी मिळते मात्र यात DC फास्ट चार्जिंग मिळत नाही ही फक्त AC चार्जरने चार्ज होते त्यामुळे लांब मार्गाच्या रस्त्यांसाठी ही गाडी बनलेली नाही.

 

स्पेसिफिकेशन

 

खालील तक्त्यामध्ये तुम्हाला टाटा टियागो ईवीच्या स्पेसिफिकेशन बद्दल माहिती दिलेली आहे:

वैशिष्ट्ये (Features)मध्यम रेंज (Medium Range – १९.२ kWh)लांब रेंज (Long Range – २४ kWh)
बॅटरी पॅक (Battery Pack)१९.२ kWh (Lithium-ion)२४ kWh (Lithium-ion)
प्रमाणित रेंज (MIDC Range)२२६ किमी (km)२८५ किमी (km)
पॉवर (Max Power)६१ bhp (४५ kW)७४ bhp (५५ kW)
टॉर्क (Max Torque)११० Nm११४ Nm
Acceleration (०-६० किमी/तास)६.२ सेकंद५.७ सेकंद
ड्राइव्ह मोड्स (Drive Modes)सिटी (City) आणि स्पोर्ट (Sport)सिटी (City) आणि स्पोर्ट (Sport)
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग४ लेव्हल्स (0, 1, 2, 3)४ लेव्हल्स (0, 1, 2, 3)
आसन क्षमता (Seating)५ सीटर (5 Seater)५ सीटर (5 Seater)
डिकीची जागा (Boot Space)२४० लीटर (240 Litres)२४० लीटर (240 Litres)
ग्राउंड क्लिअरन्स१६६ मिमी (166 mm)१६६ मिमी (166 mm)
टायरचा आकार (Tyre Size)१७५/६५ R१४१७५/६५ R१४
ब्रेक्स (Breaks)पुढे: डिस्क, मागे: ड्रमपुढे: डिस्क, मागे: ड्रम
सुरक्षा रेटिंग (Safety)४-स्टार (Global NCAP)४-स्टार (Global NCAP)
एअरबॅग्ज (Airbags)६ एअरबॅग्ज (स्टँडर्ड)६ एअरबॅग्ज (स्टँडर्ड)
वॉरंटी (Warranty)८ वर्षे किंवा १,६०,००० किमी८ वर्षे किंवा १,६०,००० किमी

चार्जिंगची वेळ (Charging Time)

टाटा टियागो ईवी चार्जिंगची वेळ (Tata Tiago EV Charging Time)

चार्जरचा प्रकार (Charger Type)१९.२ kWh बॅटरी (Medium Range)२४ kWh बॅटरी (Long Range)
DC फास्ट चार्जर (१०% ते ८०%)~ ३५ मिनिटे~ ३५ मिनिटे
७.४ kW AC फास्ट चार्जर (१०% ते १००%)~ २.६ तास~ ३.६ तास
३.३ kW घरगुती चार्जर (१०% ते १००%)~ ५.१ तास~ ६.९ तास

 

खालील तक्त्यामध्ये तुम्हाला एमजी कॉमेट ईवी चा स्पेसिफिकेशन बद्दल माहिती आहे:

वैशिष्ट्ये (Features)तपशील (Details)
बॅटरी पॅक (Battery Pack)१७.३ kWh (Lithium-ion – IP67 Rated)
प्रमाणित (MIDC Range)२३० किमी (km)
पॉवर (Max Power)४१.४ bhp (३१ kW)
टॉर्क (Max Torque)११० Nm
ड्राइव्ह मोड्स (Drive Modes)इको (Eco), नॉर्मल (Normal) आणि स्पोर्ट (Sport)
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग३ लेव्हल्स (Light, Normal, Heavy)
आसन क्षमता (Seating)४ सीटर (4 Seater) – २ दरवाजे
डिकीची जागा (Boot Space)पाठीमागील सीट्स फोल्ड केल्यानंतर स्पेस मिळते (सर्व पैसेंजर बसल्यास शून्य बूट स्पेस)
ग्राउंड क्लिअरन्स१६५ मिमी (165 mm)
टायरचा आकार (Tyre Size)१४५/७० R१२ (१२-इंच व्हील्स)
ब्रेक्स (Breaks)पुढे: डिस्क, मागे: ड्रम
टर्निंग रेडियस (Turning Radius)४.२ मीटर (अतिशय लहान – ट्रॅफिकसाठी उत्तम)
एअरबॅग्ज (Airbags)२ एअरबॅग्ज (स्टँडर्ड)
बॅटरी वॉरंटी (Battery Warranty)८ वर्षे किंवा १,२०,००० किमी

 

चार्जिंगची वेळ (Charging Time)

एमजी कॉमेट EV मध्ये DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळत नाही, परंतु यात व्हेरिएंटनुसार खालील AC चार्जिंग पर्याय मिळतात:

चार्जरचा प्रकार (Charger Type)चार्जिंगची वेळ (०% ते १००%)
७.४ kW AC फास्ट चार्जर
(फक्त Fast Charging ‘FC’ व्हेरिएंट्ससाठी)
~ ३.५ तास
३.३ kW घरगुती चार्जर
(नॉर्मल व्हेरिएंट्ससाठी)
~ ७ तास

 

New Tata Tiago EV vs MG Comet EV
टाटा की एमजी? केवळ ₹४.६९ लाखात घरी आणा इलेक्ट्रिक कार, पण कोणती आहे सर्वात बेस्ट?

 

स्पेस आणि व्यवहारिकता

 

टाटा टियागो ईवी मध्ये पाच जण बसू शकतात चार दरवाजे असल्याने मागे बसणे सोपे जाते तसेच यात 240 लिटरची मोठा बुक स्पेस (डिक्की) मिळते

 

एमजी कॉमेट ईवी मध्ये फक्त चार जण बस शकतात गाडीमध्ये फक्त दोन दरवाजे असल्याने मागे जाण्यासाठी पुढची सीट पुढे सरकावून मागे जावे लागते त्यामुळे लोकांची कसरत होण्याची शक्यता आहे तसेच चारही लोक बसले असेल डीकी साठी जागा उरत नाही

 

कलर्स

 

टाटा कंपनी त्यांच्या टियागो ईवी साठी एकूण सहा कलर्स उपलब्ध केले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे डेहराडून ड्यू , सोबो सर्ज , पैंगोंग पल्स , माथेरान मान्सून , प्युअर ग्रे , फ्रीस्टाइन व्हाईट.

 

एमजी कंपनीकडून त्यांच्या एमजी कॉमेट ईवी  यासाठी पुढील कलर्स उपलब्ध आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे अरोरा सिल्वर , कॅंडी व्हाईट , स्टेरी ब्लॅक , एप्पल ग्रीन , 

 

किंमत

 

टाटा टियागो ईवी सर्व  वेरियंटचे किंमत खालील प्रमाणे एक्स शोरूम असेल

व्हेरिएंट (Variant)बॅटरी पॅक / रेंजथेट खरेदी किंमत (Ex-Showroom)BaaS अंतर्गत किंमत (फक्त कारची किंमत)*
Smart१९.२ kWh (Medium Range)₹ ६.९९ लाख₹ ४.६९ लाख
Pure Plus१९.२ kWh (Medium Range)₹ ८.४९ लाखउपलब्ध (माहिती डीलरकडे)
Pure Plus२४ kWh (Long Range)₹ ९.४९ लाखउपलब्ध (माहिती डीलरकडे)
Creative Plus२४ kWh (Long Range)₹ ९.९९ लाखउपलब्ध (माहिती डीलरकडे)

 

एमजी कॉमेट ईवी  वेरियंटची किंमत खालील प्रमाणे एक्स शोरूम असेल

व्हेरिएंट (Variant)थेट खरेदी किंमत (Ex-Showroom)BaaS अंतर्गत किंमत (फक्त कारची किंमत)बॅटरी भाडे (दर किमी)
Executive 17.3 kWh₹ ७.६३ लाख₹ ४.९९ लाख₹ ३.२० / किमी
Excite 17.3 kWh₹ ८.७३ लाख₹ ६.०९ लाख₹ ३.२० / किमी
Excite FC 17.4 kWh₹ ९.०० लाख₹ ६.३६ लाख₹ ३.२० / किमी
Exclusive 17.3 kWh₹ ९.७३ लाख₹ ७.०९ लाख₹ ३.२० / किमी
Exclusive FC 17.4 kWh₹ ९.९७ लाख₹ ७.३६ लाख₹ ३.२० / किमी

 

शेवटचा निष्कर्ष तुम्ही कोणती खरेदी करावी?

 

वरील सर्व माहिती आपण वाचली असेल तर निष्कर्ष देण्यास काही वाव नाही तरीपण टाटा टियागो ईवी तुम्ही खरेदी करावी जर ही तुमच्या कुटुंबाची पहिली किंवा मुख्य कार असली पाहिजे तसेच तुम्हाला ५ लोक बसण्यासाठी आणि सामानासाठी बूट स्पेस डिक्की हवे असेल तरीही ही कार खरेदी करू शकता.

तुम्ही कधी शहरा बाहेर किंवा हायवे वर लांबचा प्रवासाला जाणार असाल तर ही कार शंभर टक्के तुमच्यासाठीच आहे.

जर तुम्ही एमजी कॉमेट ईवी  खरेदी करावी असे तुम्हाला वाटते तर तुमच्याकडे लांबच्या प्रवासासाठी आधीच एक घरात मोठी कार उपलब्ध असायला पाहिजे किंवा ही तुमची पहिली कार नसावी.

तुम्हाला फक्त शहरात ऑफिसला जाण्यासाठी किंवा भाजीपाल्यासाठी ही कार खरेदी करावी लागणार कारण यात डीसी चार्जिंग नसल्यामुळे लांबच्या पल्यासाठी ही कार बनलेली नाही.

तुमच्या ट्रॅफिक मध्ये सहज वयोवता येणारी गर्दीत सहज पार्क होणारी आणि आतून दिसायला अत्यंत आधुनिक प्रेम हवी असेल तर ही तुमच्यासाठी आहे.