2026 Toyota Innova Crysta Launch : टोयोटा ची सर्वात लोकप्रिय कार इनोवा क्रिस्टा या वाहनाचे नवीन मॉडेल भारतामध्ये लॉन्च झालेले आहे. आणि याची सुरुवाती किंमत ₹19.72 लाख एक्स शोरूम असणार आहे. कंपनीने या अपडेटेड कार मध्ये एक्स्टरियर आणि इंटेरियर मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे बदल केले आहेत तसेच इंजन मध्ये काही बदल न करता ते पहिल्या इनोवा क्रिस्टाचेच असणार आहे तर चला बघूया विस्तार मध्ये काय आहे नेमका विषय..

एक्स्टेरियर डिझाईन
या नव्याने लॉन्च झालेली टोयोटा इनोवा क्रिस्टामध्ये एक्स्टेरियर डिझाईन मध्ये गाडीच्या समोरच्या बाजूला नवीन डिझाईनची ग्रील आणि आकर्षक बंपर गर्मीश ही ॲक्सेसरीज मध्ये थोडे बदल करून देण्यात आलेले आहेत. या बदलामुळे गाडीचे फ्रंट बंपर व समोरचा पूर्ण लुक हा खूप बदललेला आणि आकर्षण वाटतो. तसेच बोलायच झाले तर गाडीचा रिअल बंपर मध्येही बंपर गर्मी ही एक ॲक्सेसरीज थोडा बदल करून देण्यात आलेली आहे जे की दिसायला आकर्षक वाटेल यासारखे बदल या अपडेट मध्ये एक्स्टेरियल डिझाईन मध्ये करण्यात आलेले आहेत.
इंटिरियर डिझाईन
इंटरियर डिझाईन मध्ये बोलायच झाले तर केबिनमध्ये ड्युअल टोन लेदर सीट अपहोल्स्टरी दिलेली आहे तसेच डॅशबोर्ड व डोअर ट्रिम्सवर वूड पॅटर्न बघायला मिळतो यांसारखे बदल डिझाईन मध्ये करण्यात आलेले आहेत तसेच टोयोटाकडून एसी कंट्रोल स्विचेस आणि सेकंड रो पॅसेंजर सिट-बॅक टेबल यामध्ये फ्रेश लुक द्यायचा काम केलेले दिसून येते.

इंजिन
वर सांगितल्याप्रमाणे टोयोटा ने ह्या अपडेटेड इनोवा क्रिस्टा मध्ये इंजन च्या बाबतीत कोणताही बदल केलेला नाही जसे की जुने इंजिन होते तेच इंजिन या गाडीमध्ये मिळेल. 2.4 लिटर डिझेल इंजिन जे की 5 मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये येते व ते 150hp ची ताकद व 343nm चा टॉर्क निर्माण करते हे इंजन काही बदल न करता या वाहनांमध्ये आपल्याला मिळणार आहे.
व्हेरियंट
टोयोटा इनोवा क्रिस्टा हे वाहन एकूण चार मुख्य व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. सर्व व्हेरियंटमध्ये 2.4 लिटर डिझेल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येतात.
टोयोटा इनोवा क्रिस्टा च्या चारही व्हेरियंट जे की गरजेनुसार सात सीटर आणि आठ सीटर मध्ये येतात त्यांचा तक्ता खालील प्रमाणे दिलेला आहे
| व्हेरियंट (Variant) | ७-सीटर किंमत (7-Seater Price) | ८-सीटर किंमत (8-Seater Price) |
| GX / GX Fleet | ₹ १९.७२ लाख | ₹ १९.७७ लाख |
| GX+ | ₹ २१.१५ लाख | ₹ २१.२० लाख |
| VX | ₹ २४.९३ लाख | ₹ २४.९८ लाख |
| ZX | ₹ २६.६३ लाख | उपलब्ध नाही |
सुरक्षितता (safety)
सुरक्षितता नुसार ही गाडी खूप मजबूत बनवली गेलेली आहे आणि या अपडेटेड वाहनांमध्ये खालील प्रमाणे सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत.
- दुर्घटनेपासून आतील लोकांना वाचवण्यासाठी वाहनामध्ये सात एअरबॅक्स दिलेले आहेत.
- तसेच ब्रेकची सुरक्षित वाढण्यासाठी ABS आणि EBD सारखे सुरक्षा फीचर्स दिलेले आहेत
- वाहन स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट यासारखे फीचर्स कोणत्याही डोंगर भागात चढताना किंवा उतरताना गाडीचा ताबा सुटू नये व चालकाला गाडी कंट्रोल करता यावी यासाठी दिलेले आहेत.

स्पेसिफिकेशन
या नव्या टोयोटा इनोवा क्रिस्टा मध्ये खालील प्रमाणे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत.
२०२६ टोयोटा इनोवा क्रिस्टा स्पेसिफिकेशन्स
| वैशिष्ट्ये (Parameter) | तपशील (Details) |
|---|---|
| इंजिन प्रकार (Engine Type) | २.४-लिटर, ४-सिलेंडर, २GD-FTV डिझेल इंजिन |
| इंजिन क्षमता (Displacement) | २३९३ cc |
| कमाल शक्ती (Max Power) | १४८ BHP @ ३४०० RPM |
| कमाल टॉर्क (Max Torque) | ३४३ Nm @ १४०० – २८०० RPM |
| गिअरबॉक्स (Transmission) | ५-स्पीड मॅन्युअल (Manual) |
| ड्राइव्ह टाईप (Drive Type) | रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) |
| मायलेज (Claimed Mileage) | अंदाजे १४.८ ते १५ किमी/लिटर |
| इंधन टाकी क्षमता (Fuel Tank) | ५५ लिटर |
| लांबी x रुंदी x उंची (L x W x H) | ४७३५ mm x १८३० mm x १७९५ mm |
| व्हीलबेस (Wheelbase) | २७५० mm |
| ग्राउंड क्लिअरन्स (Ground Clearance) | १७८ mm |
| ब्रेक्स (Brakes) | समोर: डिस्क (Disc) | मागे: ड्रम (Drum) |
| सस्पेंशन (Suspension) | समोर: डबल विशबोन | मागे: ४-लिंक कॉइल स्प्रिंग |
| टायर साईझ (Tyre Size) | १६-इंच (GX, GX+, VX) | १७-इंच (ZX) |
स्पेस आणि व्यवहारिकता
या वाहनाच्या बूट स्पेस आणि व्यवहारिकता बद्दल बोलायचं आहे तर तिन्ही रो सुरू असताना म्हणजेच सर्व सिट सुरू असताना या गाडीमध्ये 300 लिटर चा बूट स्पेस मिळतो.
तसेच तिसरा रो फोल्ड केल्यावर सुमारे 758 लिटरचा बूट स्पेस आपल्याला मिळून जातो
व्यवहारिकता साठी ही गाडी लोकप्रिय आहे कारण ह्या गाडीमध्ये बॉटल ठेवण्याची बॉटल होल्डर्स दिलेले आहेत तसेच कप ठेवण्यासाठी कप होल्डर्स पण दिलेले आहेत व या दोन ग्लोबॉक्स मिळतात जे की कूलिंग फीचर्ससह येतात.
ज्यामुळे उन्हाळ्यात आणि पाणी किंवा चॉकलेट थंड ठेवता येतात तसेच प्रवासांचे फोन चार्ज करण्यासाठी सर्व रांगांमध्ये 12V चार्जिंग सॉकेट्स आणि यूएसबी पोर्ट्स दिलेले आहेत.
कलर्स
हे मॉडेल मुख्यतः पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत जसे की प्लॅटिनम वाईट पर्ल , सुपर व्हाईट , सिल्वर मेटॉलिक , एटीट्यूड ब्लॅक मायका आणि एव्हेंट-गार्ड बॉझ मेटॉलिक.

किंमत
टोयोटा इनोवा क्रिस्टा या वाहनाची किंमत 19.72 लाख एक्स शोरूम पासून सुरू होते. GX वेरियंट 7 सीटरमध्ये ही किंमत मिळून जाते व या गाडीचे सर्वात महाग ZX वेरिएंट जे की 7 सीटर मध्ये मिळते ते 26.63 या एक्स शोरूम किंमतीमध्ये मिळते.
टोयोटा इनोवा क्रिस्टा या गाडीच्या संपूर्ण वेरियंटनुसार किमती खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसून जातील.
२०२६ टोयोटा इनोवा क्रिस्टा संपूर्ण किंमत तक्ता
| व्हेरियंट (Variant) | ७-सीटर किंमत (7-Seater Price) | ८-सीटर किंमत (8-Seater Price) |
|---|---|---|
| GX Fleet | ₹ १९.७२ लाख | ₹ १९.७७ लाख |
| GX | ₹ १९.७२ लाख | ₹ १९.७७ लाख |
| GX+ | ₹ २१.१५ लाख | ₹ २१.२० लाख |
| VX | ₹ २४.९३ लाख | ₹ २४.९८ लाख |
| ZX | ₹ २६.६३ लाख | उपलब्ध नाही (फक्त ७-सीटर) |
निष्कर्ष
ही गाडी आपल्याला खरेदी करायची असेल तर ही शेवटची संधी असणार आहे कारण टोयोटा कंपनीने 2027 पासून ह्या गाडीची उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय सरकारच्या कॅफे नॉर्म्स या धोरणाच्या दबावामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला.
तरी दर्शकांनी आपल्यालाही वाहन घ्यायचे असेल तर ही शेवटची संधी समजून आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकता.




Leave a Reply