Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची पूर्ण माहिती

Bajaj Pulsar N160 S , N160 SS launched वाचकांनो बजाज ऑटो ने भारतीय बाजारात Bajaj Pulsar N160 चे दोन नवीन व्हेरियंट Bajaj Pulsar N160 आणि N160 SS लॉन्च केले आहेत हे नवीन मॉडेलची एक्स शोरूम मुंबई किंमत अनुक्रमे ₹१,३३,५११ आणि ₹१,४२,५८५ आहे. 

ह्या दोन्ही नवीन बाइक्समध्ये सर्वात मोठे बदल म्हणजे 164.5 cc चे नवीन ४-व्हाॅल्व्ह ऑइल-कूल्ड इंजिन मिळणार आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक थ्रोटल , चार रॉयडिंग मोडस आणि क्राऊल टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ह्या गाडीच्या टॉप-वेरियट N160 SS मध्ये ५-इंच TFT डिस्प्ले , गुगल मॅप्स मिररिंग आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे प्रीमियम फीचर्स या अत्याधुनिक पल्सर च्या नवीन वेरियंटमध्ये मिळणार आहेत. 

आजच्या लेखामध्ये आपण या बजाज पल्सर च्या दोन्ही गाड्यांबद्दल कंपनीकडून ग्राहकांसाठी कोणकोणते नवीन फीचर्स , टेक्नॉलॉजी , डिझाईन इंजिन तसेच गाडीची मायलेज क्षमता , किंमत आणि फायदे व तोटे या सर्वांगीण गोष्टींचा आजच्या लेखामध्ये उल्लेख असणार आहे

Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launche
Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची पूर्ण माहिती

बाईक मध्ये नवीन काय?

नवीन Bajaj Pulsar N160 S आणि N160 SS मध्ये जुन्या N160 च्या तुलनेत मोठे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक बदल करण्यात आलेले दिसून येतात.

यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 164.5cc सिंगल सिलेंडर , ४ व्हाॅल्व्ह इंजिन , आॅईल-कूल्ड इंजिन , 18.8 HP ची पावर आणि 14.4 ते 14.5 nm चा टॉर्क निर्माण करते जुन्या दोन व्हाॅल्व्ह इंजिनच्या तुलनेत पावर मध्ये या इंजिन मध्ये लक्षणीय प्रकारची वाढ झालेली दिसून येते.

यासोबतच ह्या नवीन मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनिक थ्रोटल , रोड , रेन , स्पोर्ट आणि ऑफ रोड असे चार रायडिंग मोड्स , क्राउल टेक्नॉलॉजी , 37 mm USD फोर्क्स , 300 mm मोठा फ्रंट डिस्क , 130/70-17 रियल रेडियल टायर , N160 SS  मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल , 5-इंच TFT डिस्प्ले , Google Maps मिंररिंग , Bluetooth आणि Wi-Fi कनेक्टिव्हिटी यांसारखे महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला या बाईकमध्ये मिळून जातात.

Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched
Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched

डिझाईन आणि लुक

नवीन N160 S आणि N160 SS च्या डिझाईन मध्ये Pulsar N160 ची ओळख कायम ठेवण्यात आलेली दिसून येते. बाईकला मस्कुलर स्ट्रीटफायटर लुक, आक्रमक फ्रंट प्रोफाइल दिला गेलेला आहे ज्यामुळे गाडीची स्पोर्ट बॉडी वर्क दिसून येतो.

नवीन मॉडेल्समध्ये शार्प ग्राफिक्स आणि कलर अलाॅय व्हील्स देण्यात आलेले आहेत. N160 SS हँडल बारच्या अँगल मध्येही बदल करण्यात आलेला दिसून येतो तसेच या बदलामुळे ड्रायव्हिंग पोझिशन देखील अधिक आरामदायी करण्याचा कंपनीकडून प्रयत्न करण्यात आलेला आहे.

दोन्ही नवीन व्हेरीएंट्स Atlantic Blue , Pearl Metallic White आणि Brooklyn Black या रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

इंजिन आणि इंजिनची क्षमता

नवीन  Bajaj Pulsar N160 S आणि N160 SS मध्ये 164.5 सिंगल सिलेंडर , 4-व्हाॅल्व्ह , ऑइल कुल्ड इंजिन देण्यात आलेले आहे आणि या इंजिन मध्ये 164.5cc इंजिन क्षमता आहे तसेच हे सिंगल-सिलेंडर 4-व्हाॅल्व्ह इंजिन प्रकारात येतो आणि हे इंजिन 18.5 hpची पावर आणि 14.5 nm चा टॉर्क निर्माण करते आणि हे इंजिन 5-स्पीड गिअर बॉक्स मध्ये गाडीसोबत येणार आहे. 

तसेच जुन्या N160 मधील 2-व्हाॅल्व्ह इंजिनच्या तुलनेत नवीन इंजिन मध्ये पावर वाढले आहे कंपनीत 0 ते 60Kmph वेळ सुमारे 4.5 सेकंद असल्याचा दावा केलेला आहे.

Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched
Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची पूर्ण माहिती

मायलेज

नवीन 4-व्हाॅल्व्ह Bajaj Pulsar N160 S आणि N160 SS मध्ये अधिकृत किंवा स्वतंत्र मायलेज टेस्टचे आकडे लॉन्च वेळी उपलब्ध झालेले नाहीत त्यामुळे सध्या ठराविक KMPL आकडा सांगणे योग्य ठरणार नाही.

मात्र, नवीन इंजिन मध्ये इलेक्ट्रॉनिक थ्रोटल आणि वेगवेगळे रायडिंग मोड्स असल्यामुळे रायडिंग परिस्थितीनुसार थ्रोटल रिस्पॉन्स बदलता येतो. त्यामुळे प्रत्यक्ष मायलेज रायडिंग स्टाईल , ट्रॅफिक , वेग आणि रोड कंडीशन वर अवलंबून राहणार आहे.

ब्रेक आणि सुरक्षा

सुरक्षेच्या बाबतीत Bajaj Pulsar N160 S आणि N160 SS मध्ये महत्त्वाचे हार्डवेअर अपडेट्स कंपनीकडून करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये 300mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 230mm रियर डिस्क ब्रेक आहे तसेच यामध्ये जुन्या मॉडेलच्या तुलनेत फ्रंट डिस्कचा आकार वाढत आलेला दिसून येतो.

N160 S मध्ये सिंगल-चैनल ABS तर N160 SS डबल चैनल ABS देण्यात आलेला आहे. तसेच टाॅप  N160 SS मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल देखील मिळते व इलेक्ट्रॉनिक थ्रोटलच्या मदतीने हे सिस्टीम व्हिल-स्लिप कमी करण्यास मदत करते याशिवाय 37 mm USD  फ्रंट फोकमुळे बाईकचे हँडलिंग आणि फ्रंट-एंड स्थिरता सुधारण्यास खूप मदत होणार आहे.

Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched
Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची पूर्ण माहिती

फीचर्स आणि टेक्नॉलॉजी

नवीन N160 ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची टेक्नॉलॉजी असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला LCD डिजिटल डिस्प्ले , ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी , Turn-By-Turn नेवीगेशन , इलेक्ट्रॉनिक थ्रोटल , 4 रायटिंग मोड्स , क्राऊल टेक्नॉलॉजी , USB चार्जिंग , LED लाइटिंग इतके सारे फीचर्स मिळतात.

 आणि यावरचे मॉडेल N160SS मध्ये 5-इंच TFT डिस्प्ले , Goggle Maps मिररिंग , ब्लूटूथ , Wi-Fi कनेक्टिव्हिटी , ट्रॅक्शन कंट्रोल , ऍडजेस्टेबल लीवर्स , 4 राइडीग मोड्स ,  इलेक्ट्रॉनिक थ्रोटल , क्रॉउल टेक्नॉलॉजी , Dual Channel ABS यांसारखे महत्त्वपूर्ण फिचर्स मिळतात. 

तसेच विशेष म्हणजे N160 SS मधील 5-इंच TFT वर Google Maps मिरर करता येते, त्यामुळे या सेगमेंटमध्ये ही बाईक अधिक टेक्नॉलॉजी पुरस्कृत पाहायला मिळणार आहे.

व्हेरियंट आणि किमती

नवीन Bajaj Pulsar N160 चे दोन नवीन व्हेरिएंट लॉन्च करण्यात आलेले आहेत:

Bajaj Pulsar N160 Price
दिल्ली एक्स-शोरूम किंमत
व्हेरियंटएक्स-शोरूम मुंबई किंमत
Pulsar N160 S₹1,33,511
Pulsar N160 SS₹1,42,585

किमती एक्स शोरूम मुंबई आहेत तुमच्या जवळच्या शहरानुसार आरटीओ इन्शुरन्स आणि इतर शुल्कामुळे ऑन रोड किंमत वेगळी असणार आहे.

 तसेच महत्त्वाचे म्हणजे जुनी २-व्हाॅल्व्ह Pulsar N160 देखील नवीन S आणि SS सोबत विक्रीत सुरु राहणार आहे ज्यामुळे ग्राहकांना आता Pulsar N160 मध्ये ६ पर्याय उपलब्ध असणार आहेत.

प्रतिस्पर्ध्या कोणासोबत?

Bajaj Pulsar N160 S आणि SS ची थेट स्पर्धा भारतीय 160 स्ट्रीटफायटर सेगमेंट मधील बाईक सोबत असणार आहे यामध्ये मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून TVS Apache RTR 160 4V , Hero Xtreme 160R 4V आणि Yamaha FZ-S ह्या बाईक सोबत असणार आहे.

बाईकचे फायदे

  • ह्या बाईक्समध्ये नवीन 4-व्हाॅल्व्ह इंजिन असणार आहे जे की 18.5 HP ची पावरसह नवीन इंजिन जुन्या इंजिन पेक्षा जास्त परफॉर्मन्स देईल.
  • इलेक्ट्रॉनिक थ्रोटलमुळे विविध रायटिंग मोड्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारख्या तंत्रज्ञान शक्य झाली आहेत.
  • Road ,Rain , Sports आणि Off-Road हे 4 मोड्स वेगळे परिस्थितीत उपयोगी ठरू शकतात
  • टॉप मॉडेल मध्ये 5 इंची TFT स्क्रीन दिलेली आहे ज्यामुळे गुगल मॅप्स नेवीगेशन थेट स्क्रीनवर दिसणार आहे.
  • बाईकचे इंजिन खूप शांत आहे व इंजिनचा आवाज चांगला असून बसण्याची पोझिशन खूप आरामदायक असणार आहे
Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched
Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची पूर्ण माहिती

बाईकचे तोटे

  • ग्राहकांना जास्त पावर साठी 4-व्हाॅल्व्ह मॉडेल घ्यावे लागेल पण जर तुम्ही त्याचे बेस मॉडेल निवडले तर तुम्हाला ड्युअल चॅनेल ABS मिळत नाही जे जुन्या 2-व्हाॅल्व्ह मध्ये स्टॅंडर्ड मिळायचे.
  • या बाईचे वजन सुमारे १४८ किलो आहे. 160cc सेगमेंट मधील इतर बाईकच्या तुलनेत ही थोडी जास्त जड आहे.
  • बेस मॉडेलमध्ये हेडलाईट बंद करण्यासाठी कोणताही वेगळा स्वीच नाहीये बाईक सुरू केल्यांवर एलईडी हेडलाईट सतत चालू राहते त्यामुळे बॅटरीवर ताण पडू शकतो.
  • टॉप व्हेरिएंटमध्ये फीचर्स जास्त असले तरी त्याची किंमतही वाढते या किमतीत टीव्हीएस आपाची सारख्या इतर चांगल्या बाईकचा पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

ही बाईक तुम्ही का खरेदी करावे?

वाचकांनो 160cc च्या सेगमेंटमध्ये फक्त याच बाईकचा टॉप मॉडेलमध्ये ड्युअल चॅनेल ABS सोबत ट्रॅक्शन कंट्रोल मिळते यामुळे पावसाळ्यात किंवा खराब रस्त्यावर अचानक ब्रेक लावल्यास बाईक घसरणार नाही आणि यामध्ये क्रॉल टेक्नॉलॉजी दिले आहे यामुळे बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये क्लच आणि एक्सलेटर न दाबता तुम्ही बाईक संत गतीने पुढे चालु राहू शकते ज्यामुळे शहरात चालताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणार नाही.

नवीन ४-व्हाॅल्व्ह इंजिनमुळे बाईकला 18.5 hp ची दमदार पावर मिळते यामुळे शहरात वेगाने ओवरटेक करणे असो किंवा हायवेवर वेगाने बाईक चालवणे खूप सोपे होणार आहे. आणि या बाईचा रोबोटिक एलईडी हेडलाईट लुक अतिशय आकर्षक आहे तसेच जास्त स्पीडवर इंजिन मध्ये थरथराट जाणवत नाही त्यामुळे तुम्हाला रायडिंगचा अनुभव खूप स्मूथ होणार आहे.

वाचकांनो जर तुम्हाला कमी बजेटमध्ये उत्तम सुरक्षा , आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजच्या वापरासाठी एक खतरनाक दिसणारी बाईक हवी असेल तर तुम्ही Bajaj Pulsar N160 S किंवा N160 SS नक्कीच खरेदी करावी.

Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched
Bajaj Pulsar N160 S, N160 SS Launched; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची पूर्ण माहिती

निष्कर्ष

ह्या दोन्ही Bajaj Pulsar N160 S आणि N160 SS हे N160 लाईन-अप मधील साधे कॉस्मेटिक अपडेट्स नसून मोठमोठे तांत्रिक अपडेट करण्यात आलेले आहेत. बजाज ने नवीन 164.5 HP ची पावर देणारी इंजिन , इलेक्ट्रिक थ्रोटल , क्रोल टेक्नॉलॉजी , 4-राइडिंग मोड्स आणि 37 mm USD फोर्क्स यामुळे बाईकचे परफॉर्मन्स पॅकेज अधिक मजबूत झाले आहेत.

त्यातही N160 SS हा अधिक आकर्षक ठरतो कारण त्यात 5-इंच TFT, गुगल मॅप्स मिररिंग , ट्रॅक्शन कंट्रोल , वाय-फाय आणि ड्युअल चॅनेल ABS सारखे  प्रेमियम फीचर्स मिळतात.

जर तुमचे बजेट 1.30 लाख पासून सुरु होणारे बाईक घ्यायची असेल तर तुम्ही हे बाईक घेऊ शकता ही बाईक TVS Apache  RTR व हिरोचे एक्स्ट्रीम यांसारख्या बाईक समोर अधिक मजबूत स्पर्धक म्हणून उभे राहिले आहे

बाईक खरेदी करण्याचा निर्णय हा केव्हाही जो माणूस बाईक राईड करणार आहे त्याचा असला पाहिजे त्यामुळे तुम्ही अंतिम खरेदीपूर्वी प्रत्यक्ष मायलेज , राईड कॉलिटी आणि On Road किंमत तपासून सर्वांगीण गोष्टी ध्यानात घेऊन खरेदी करा तुमचा मोलाचा पैसा वाया घालू नका तसेच जर तुम्हाला मान्सून पावसाळ्यात बाईक चालवायच्या टिप्स पाहिजे असलेल्या तर आम्ही Monsoon Riding Tips for motorcycle  या नावाने लेख ही लिहिला आहे तोही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद!!!