Top 10 cars under 7 lakh : दर्शकांनो प्रत्येक भारतीय सामान्य व्यक्तीला आपल्या घरासमोर एक आपल्या कुटुंबासाठी चांगली , दिसण्यास टेकस आणि सामान्य व्यक्तीच्या बजेटला अनुसरून एक कार हवी असते की ज्या कार मध्ये मायलेज , सेफ्टी , दमदार फीचर्स आणि तेही कमी पैशात तर मित्रांनो हे सर्व गोष्टी तुम्हाला गाडीमध्ये पाहिजे असेल तर आज आपण top 10 cars under 7 lakh हा विषयावर लेख लिहीत आहोत या लेखामुळे तुमच्या कुटुंबासाठी कोणती गाडी योग्य राहील हे तुम्हाला समजण्यास मदत होईल.
या पहिल्या दहा गाड्यांच्या यादीमध्ये टाटा पंच पासून ते हुंडाई एक्स्टर , सिट्रॉनची C3 आणि भारतातील बजेट मधल्या ग्राहकांची सर्वात लोकप्रिय गाडी मारुती सुझुकी वॅगन आर या वाहनांचाही या यादीमध्ये समावेश आहे. तुम्हाला प्रत्येक वाहनाची किंमत , इंजिन , मायलेज , फायदे व तोटे आणि तुम्ही खरेदी का करावे या गोष्टींवर सविस्तरपणे माहिती हवी असेल तर तुम्ही खालील लेख वाचून तुमच्या ज्ञानामध्ये भर करू शकता चला सुरू करूया…
Top 10 cars under 7 lakh यादी खालीलप्रमाणे

१) टाटा पंच (Tata Punch)
सर्वात पहिला टाटा पंच या वाहनाचा नंबर येतो टाटा पंच ही गाडी आपल्याला फक्त सुरुवाती किंमत ₹ ५.६५ लाख रुपयात मिळणार आहे. तसेच या गाडीमध्ये १.२ लिटरचे ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन जे की ८८ hp ची ताकत आणि 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजन जे की 120 hp ची ताकद निर्माण करते तसेच लोकांचा सर्वात फायद्याची गोष्ट म्हणजे मायलेज जे की पेट्रोल मध्ये २०.९ किमी/लिटर आणि सीएनजी मध्ये २७ किमी/केजी इतकी मायलेज देते.
तसेच गाडीचे फायद्याची गोष्ट म्हणजे फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळते ज्यामुळे तुमचे कुटुंब सुरक्षित प्रवास करू शकते तसेच १९३ बेस्ट ग्राउंड क्लिअरन्स मिळते आणि समोरून रुबाबदार लोक जो की गाडी चालवताना तुमचा अभिमान वाढवेल.
गाडीचे तोटे बोलायचे झाल्यास वाहनामध्ये ३ सिलेंडर इंजिनमुळे सुरुवातीला किंचित व्हायब्रेशन जाणवतात
तुम्ही हे वाहन का खरेदी करावे? जर तुमचे बजेट ७ लाख असून तुम्हाला सर्वात सुरक्षित कार पाहिजे असेल आणि खराब रस्त्यावर सहज चालणारी छोटी पण टुमदार कार हवी असेल तर ही कार तुमच्यासाठी एक नंबर राहील.

२) मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)
दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट हे वाहनेते या वाहनाचे सुरुवाती किंमत ₹५.७३ लाख रुपयापासून सुरू होते. गाडीमध्ये इंजिन हे १.२ लिटर नवीन झेड सिरीजचे ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे की ८१.५ hp ची ताकद निर्माण करते. त्याप्रमाणे पेट्रोलमध्ये ही गाडी २४.८ ते २५.७५ किमी/लिटर आणि सीएनजी मध्ये ३२.८५ किमी/केजी इतके भयानक मायलेज देते
या गाडीचे फायदे म्हणायला गेल्यास कमालीचे मायलेज त्यात ६ एअर बॅगमुळे सुरक्षेमध्ये सुधारणा आणि गाडीची मार्केटमध्ये सर्वोत्तम रिसेल व्हॅल्यू या त्रिसूत्रीच याची फायदे म्हणून ठरते
गाडीचे तोट्याबद्दल बोलायला गेल्यास मागील सीटवर प्रौढ ३ लोकांसाठी जागा कमी पडते तसेच हायवेवर जास्त वेगाने गाडी चालवल्यास गाडीची स्टेबिलिटी राहत नाही त्यामुळे ड्रायव्हरचा आत्मविश्वास कमी होतो.
तुम्ही वाहन का खरेदी करावे? दिसायला स्टाईलिश , स्पोर्टी आणि युवकांना लगेच भाळवणारी आणि शहरात चालवण्यासाठी पैशाची बचत करणारी व भयानक मायलेज देणारे हे वाहन ह्या कारणामुळे तुम्ही खरेदी करू शकता.
३) टाटा टियागो (Tata Tiago)
तिसऱ्या क्रमांकावर या यादीमध्ये टाटा कंपनीची टाटा टियागो या वाहनाचा क्रमांक येतो या वाहनाची सुरुवाती किंमत ₹4.57 लाख रुपयापासून सुरू होते आणि या गाडीमध्ये १.२ लिटरमध्ये ३ सिलेंडर इंजिन मिळते जे की 86 hp ची ताकद निर्माण करते. तसेच या इंजिन सोबत पेट्रोलमध्ये १९.१ किमी/लिटर आणि सीएनजी मध्ये २६.४९ किमी/किजी इतके मायलेज मिळते.
या वाहनाचे फायदे असे की ४ स्टार सेफ्टी रेटिंग व टाटा कंपनीचे असल्यामुळे अतिशय मजबूत बिल्ड क्वालिटी आणि हरमन कंपनीची एक नंबर म्युझिक सिस्टीम या गाडीमध्ये मिळतात.
गाडीचे तोटे सांगायचं झाल्यास केबिनमध्ये इंजनचा आवाज मारुतीच्या कार पेक्षा थोडा जास्त येतो आणि पुढील व मागील सीटवरील हेड्रेस्ट फिक्स असल्यामुळे ऍडजेस्टेबल होत नाहीत.
तुम्ही हे वाहन का खरेदी करावे? जसे की कमीत कमी बजेटमध्ये (५ लाखाच्या आसपास) मजबूत आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी फॅमिली कार हवी असेल तर हे वाहन तुमच्यासाठी योग्य राहील

४) हुंडाई एक्स्टर (Hyundai EXTER)
चौथ्या क्रमांकावर या यादीमध्ये हुंडाई कंपनीची एक्स्टर हे वाहन येते या वाहणाची सुरुवाती किंमत ₹५.८१ लाख रुपयापासून सुरू होते वाहनांमध्ये 1.2 लिटरचे ४ सिलेंडर काप्पा पेट्रोल इंजिन मिळते जे की ८३ hp ची ताकद निर्माण करते आणि गाडी मायलेज हे पेट्रोलमध्ये १९.४ किमी/लिटर आणि सीएनजी मध्ये 27.1 किमी/केजी देण्याची क्षमता आहे.
गाडीचे फायदे बोलायचे आल्यास ६ एअर बॅग मिळतात आणि ४ सिलेंडर इंजिन असल्यामुळे केबिनमध्ये शांत वातावरण असते तसेच आधुनिक काळातील डॅश कॅमेरा आणि सनरूप सारख्या आधुनिक फीचर्समुळे ही वाहन अजून आकर्षक वाटते.
तोटे सांगायचं झाल्यावर मुख्य हायवेवर स्पीड जास्त वाढल्यावर गाडीचे स्टेबिलिटी खराब होते तसेच मागून डिझाईन मध्ये गाडी तुम्हाला आवडेल यावर प्रश्नचिन्ह आहे.
तुम्ही ही गाडी खरेदी का करावी? याचे उत्तर टाटा पंचला पर्याय म्हणून जर तुम्हाला एक चांगले प्रकारचे स्मूथ इंजिन आणि भरपूर आधुनिक फीचर्स आवडत असतील तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय राहू शकतो
५) मारुती सुझुकी बलेनो ( Maruti Suzuki Baleno)
पाचव्या क्रमांकावर भारतातील प्रीमियम हॅचबॅक मानली जाणारी मारुती सुझुकी बलेनो या वाहनाचा नंबर लागतो या वाहनाची सुरुवात किंमत ₹५.९९ लाख रुपये इतकी आहे आणि वाहनांमध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते जे की २२.९४ किमी/लीटर इतके मायलेज देते.
फायद्याची गोष्ट बोलायची झाली तर प्रेमियम केबिन कमी बजेटमध्ये (लेदरमध्ये फिनिशिंग , सॉफ्ट टच मटेरियल आणि रिफाइंड इंजिन) ह्या गोष्टीमुळे याला आपण भारतातील प्रेमियम हॅजबॅक म्हणतो
तोटे सांगायचं झाल्यास हाय स्पीड वर सेफ्टी आणि सीट मेटल कॉलिटी मध्ये सुधारणा गरजेचे आहे
तुम्हालाही वाहन का खरेदी करायला पाहिजे? तुमचे कुटुंब जर कमी व्यक्तींचे असेल तर बजेटमध्ये प्रेमियम केबिन फॅमिली साठी अत्यंत कम्फर्टेबल हॅचबॅग ही तुम्हाला मिळून जाईल.
६) सिट्रोन C3 ( Citroen C3)
सहाव्या क्रमांकावर या यादीमध्ये विदेशी कंपनी ची c3 या वाहनाचा नंबर लागतो या वाहनांमध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे इंजन आपल्याला उपलब्ध आहेत पहिले 1.2 लिटरचे नॅचरली अस्पिरेटेड इंजन जे की ८२hp ची पॉवर निर्माण करते दुसरे १.२ लिटर पेट्रोल इंजिन जे की ११० HP ची पावर निर्माण करते आणि तिसरे सीएनजी इंजिन जे की 1.2 लिटर फॅक्टरी फिटेड सीएनजी इंजिन आपल्याला मिळणार आहे. या गाडीची पेट्रोलमध्ये १९.३ किमी/लिटरचे मायलेज व सीएनजी वेरियंटमध्ये 28.1 किलो/केजी ची मायलेज मिळते.
गाडीच्या फायद्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सस्पेन्शन आणि कंफर्ट या वाहनांमध्ये मिळते तसेच टर्बो पेट्रोल इंजिन असल्यामुळे तुम्हाला हायवेवर या गाडीने ओव्हरटेक करताना आत्मविश्वास कमी होणार नाही तसेच वायरलेस ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइडला सपोर्ट करणारी सिस्टीम यात उपलब्ध आहे.
तोटे सांगायचं ह्याच्या प्रतिस्पर्धींसोबत तुलना केल्यास या कंपनीचे सर्विस नेटवर्क भारतातील लहान शहरांमध्ये कमी आहेत तसेच बेस व्हेरियंट मध्ये फीचर्स आणि सुरक्षा खूप कमी मिळते आणि रिसेल व्हॅल्यू ही तुम्हाला या वाहनात मिळणार नाही
तुम्ही ही का खरेदी केली पाहिजे? जर तुम्हाला भारतातील टाटा टियागो , मारूती सुझुकी वॅगनार यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे स्टायलिश दिसायला मिनी-Suv यासारखे वाहन पाहिजे असेल तर हे वाहन तुम्ही निवडू शकता तसेच चांगल्या प्रकारचा तुम्हाला कमी पैशात खूप फायदा होणार आहे.

७) रेनॉल्ट क्विड ( Renault Kwid)
सातव्या क्रमांकावर रेनॉल्ट कंपनीचा क्विड हे वाहनेते ज्याची सर्वाधिक किंमत 4.92 लाख रुपयापासून सुरू होते या गाडीमध्ये 999cc चे पेट्रोल इंजिन मिळते 21 ते 22 किमी/लीटर मायलेज देऊ शकते
गाडीचे फायदे बोलायला गेल्यास अत्यंत कमी पैशात एसयूव्ही सारखी दिसणारी ज्यामध्ये आठ इंच स्क्रीन चांगल्या प्रकारचा ग्राउंड क्लिअरन्स दिसायला एक दिन आकर्षक यांसारख्या फीचर्स मुळे गाडी चांगली वाटते
तोटे सांगायची झाल्यास भारतीय बाजारातील इतर वाहनाच्या तुलनेत सुरक्षेच्या दृष्टीने आणि बिल्ड कॉलेजच्या बाबतीत ही गाडी बरीच मागे पडते
हे वाहन तुम्ही का खरेदी केले पाहिजे? जर तुम्ही पहिलीच कार शिकत आहात किंवा तुमचे बजेट ५ लाखाच्या आत आहे आणि कमी पैशात आकर्षक लुक व टच स्क्रीन सारखे फीचर्स तुम्हाला पाहिजे असतील तर ही गाडी तुमच्यासाठी आहे.
८) निशान मॅग्नाइट (Nishan Magnite)
आठव्या क्रमांकावर निशाण कंपनीची मॅग्नेट गाडी येते या गाडीची सुरुवातीची किंमत ₹५.६२ लाखापासून सुरू होते आणि गाडीमध्ये १.० लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते जे की ७२ hp ची ताकद निर्माण करते आणि पेट्रोलमध्ये १८.७५ किमी/लिटरचे मायलेज हे गाडी देते.
गाडीचे फायदे सांगायचे झाल्यास ७ लाखाच्या बजेटमध्ये मिळणारी सर्वात मोठी कॉम्पॅक्ट , ४ स्टार सेफ्टी रेटिंग सोबत आकर्षक लुक मध्ये आपल्याला मिळू शकते.
गाडीचे तोटे बोलायचे झाल्यास बेस मॉडेलमध्ये इंजिनचे परफॉर्मन्स थोडे संत वाटतो आणि या कंपनीचे सर्विस नेटवर्क खूप कमी असल्यामुळे हे वाहन घेताना भीती वाटू शकते.
तुम्ही गाडी का खरेदी करावी? जर तुम्हाला कमी बजेटमध्ये याची हॅच-बॅक सोडून एक मोठी आणि सेगमेंट मधील कॉम्पॅक्ट SUV जे की रुबाबदार आणि दिसायला खरेखुरी SUV वाटते असे वाहन पाहिजे असेल तर ही गाडी तुमच्यासाठी योग्य ठरेल.
९) निशान ग्रेवाईट ( Nishan Gravite)
नव्या क्रमांकावर निशान कंपनीची ग्रेवाईट हे वाहन येते या वाहनाची सुरुवात किंमत 5.65 लाख रुपयापासून सुरुवात होते. वाहनामध्ये १.० लिटरचे ३ सिलेंडर नॅचरल अस्पिरिटेड इंजिन मिळते जे की ७१ hp ची ताकद निर्माण करते त्यासोबत कंपनीकडून ट्विन सिलेंडर सीएनजी किड्स चा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि मायलेज म्हणायला गेल्यास पेट्रोलमध्ये १९.५ किमी/लिटर आणि सीएनजी मध्ये 24 किमी/केजी इतके मायलेज देते.
गाडीचे फायदे बोलायचे झाल्यास बजेटमध्ये सात सीटर वाहनाचा पर्याय निर्माण करते तसेच इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखे आधुनिक फीचर्स बेस मॉडेल पासून मिळतात
तोटे सांगायचे झाल्यास 1.0 लिटरचे इंजिन असल्यामुळे शहरात चालवायला चांगले आहे पण गाडीत ७ लोक बसल्यास हायवेवर किंवा घाटात गाडी ओव्हरटेक करताना ड्रायव्हरला आत्मविश्वास येत नाही तसेच सर्विस नेटवर्क भारतीय ग्रामीण भागात नसल्यामुळे ही वाहन फक्त शहरी भागासाठीच बनलेली आहे असे वाटते.
तुम्ही हे वाहन का खरेदी करावे? जर तुमचे कुटुंब मोठे आहे तुमचे बजेट सात लाखाच्या आसपास आहे तुम्हाला ड्रायव्हर पेक्षा जास्त सुरक्षित वाहन पाहिजे असेल तसेच आधुनिक पिक्चर्स असणारी फॅमिली कार घ्यायचा आहे तू आहे तरी तुमच्यासाठी बनलेले आहे.
१०) मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki WagonR)
या यादीच्या सर्वात शेवटला दहाव्या क्रमांकावर भारतातील सर्वात लोकप्रिय मारुती सुझुकी व्हॅगनार या वाहनाचा नंबर येतो या वाहनाची किंमत ₹४.९९ लाख रुपयापासून सुरू होते आणि इंजिन मध्ये १.० लिटर आणि 1.2 लिटर पेट्रोल असे दोन इंजिन मिळतात जे की अनुक्रमे ६७ आणि ८९ HP ची ताकद निर्माण करतात
वाहनामध्ये 23.5 ते 24.4 किमी/लिटरचे मायलेज पेट्रोलमध्ये मिळते आणि सीएनजी मध्ये 34.5 किमी/केजी इतके भयानक मायलेज देणारी हे गाडी आहे.
फायद्याबद्दल बोलायचं प्रचंड अंतर्गत जागा जे की टाॅल बॉय डिझाईन मुळे मस्त हेडरूम मिळतो, बसणे , उतरणे ,मेंटेनन्स करण्यासाठी सोपी गाडी आहे
तोट्या बद्दल बोलायचं तर हलकी बॉडी आणि कमी सेफ्टी रेटींगमुळे हायवे वर चालण्यासाठी फारशी योग्य अशी गाडी नाहीये.
तुम्ही गाडी का खरेदी करावी? जर तुमचे कुटुंब मोठे किंवा उंच असेल आणि तुम्हाला मुख्यतः शहरांतर्गत प्रवासासाठी आणि रोजच्या वापरासाठी अत्यंत व्यावहारिक कार हवी असेल तर हे वाहन तुमच्यासाठी बनलेले आहे.

निष्कर्ष
ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील बजेट मधल्या ग्राहकांसाठी वरील यादी ही वरदान ठरणार आहे तुम्हाला जर वाहन खरेदी करायचे असेल तर वरील तुमच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार तुम्ही तुमचे वाहन निवडावे तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर आमचे अजून काही गाड्यांच्या काळजी घेण्याबद्दल जसे की पावसाळ्यात गाडी गंजण्यापासून कशी वाचवावे त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स तसेच दहा मान्सून कार केअर टिप्स हे लेख ही वाचू शकता. धन्यवाद!!!




Leave a Reply