Top 10 PDI checks for new cars : प्रत्येक ग्राहकाला आपल्या नवीन खरेदी केलेल्या वाहनाची डिलिव्हरी घेणे हे खूप महत्त्वाचा आणि रोमांचकारक दिवस असतो पण हाच रोमांचकारक दिवस भविष्यात तुम्हाला खूप दुःख न देवो यासाठी तुम्हाला शोरूम मध्ये असतानाच तुम्ही नवीन कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी तिचे (PDI) म्हणजे Pre Delivery Inspection करणे अत्यंत गरजेचे असते ज्यामुळे भविष्यात तुम्हाला ट्रान्सपोर्ट किंवा स्टॉकयार्डमध्ये झालेले कोणतेही नुकसान किंवा छुपे दोष भविष्यात समजून त्याच्या पश्चाताप करण्यापेक्षा ते डिलिव्हरीच्या पहिलाच जाणून घेऊन त्या शोरूमच्या अधिकृत सहकाऱ्यांना सांगणे महत्त्वाचे असते ज्यामुळे भविष्यात तुम्हाला हे स्वखर्चाने करावे लागू नये.
जसे की वर सांगितल्याप्रमाणे नवीन किंवा जुनी गाडी घेताना PDI करणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण एकदा डिलिव्हरी घेतल्यानंतर गाडीतील दोषांची जबाबदारी डीलर्स सहसा घेत नाहीत हे फसवणुक टाळण्यासाठी आणि तुमचे लाखो रुपयांचे नुकसान वाचवण्यासाठी हे PDI करणे आवश्यक आणि गरजेचे असते त्यामुळे आज ह्या ब्लॉग मध्ये आपण सविस्तरपणे १० मुख्य मुद्द्याद्वारे PDI कशी करायची हे सांगणार आहोत…
मुख्य 10 सोप्या आणि सर्वात प्रभावी PDI तपासण्याची यादी खालील प्रमाणे

१) कागदपत्राची पडताळणी
ग्राहकांनो तुम्ही जर नवीन किंवा जुनी गाडी डिलिव्हरी घेताना शोरूमच्या कागदपत्रावर नमूद केलेली चे सिरीज आणि इंजिन क्रमांक गाडीवरील क्रमांकाचे तंतोतंत जुळतो का हे पहावे अन ते पाहण्यासाठी चेसिस क्रमांक हा सहसा कारच्या समोरच्या काचेवर , इंजिनच्या आत फायरवॉलवर किंवा ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या दरवाजा खांबावर(B-pillar) असतो तसेच इंजिन क्रमांक हा इंजिन ब्लॉक वर कोरलेला असतो ते तुम्ही काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे तसेच
शोरूमचे इन्व्हाईस , इन्शुरन्स पॉलिसी , तात्पुरते किंवा पक्के नोंदणी प्रमाणपत्र(RC book) आणि रोड टॅक्स पावती या सर्व कागदपत्रावर क्रमांक हा एकसारखाच असला पाहिजे तेही तपासणे.
तसेच मॅन्युअल बुक वर वॉरंटी कार्ड आणि सर्विस ओपन तपासून घ्या आणि त्यावर शोरूमचा शिक्का असल्याची खात्री करा आणि चेसिस क्रमांकावरून गाडी नेमकी कधी तयार झाली ते तपासून घ्या जेणेकरून तुम्हाला जुना स्टॉक मिळणार नाही याची खात्री होईल.
२) ओडोमीटर रीडिंग
ग्राहकांनो तुम्ही गाडीच्या मीटरमध्ये लावलेले अंतर किती आहे ते पाहणे गरजेचे आहे जसे की नवीन गाडी फॅक्टरी मधून यार्ड पर्यंत आणि तिथून शोरूम मध्ये आणताना 50 ते १०० किलोमीटर अंतर होत असते त्याच्यापेक्षा जर जास्त अंतर गाडीच्या मीटरवर दिसत असेल.
तर ती गाडी टेस्ट ड्राईव्ह किंवा वाहतूक दरम्यान तिचा गैरवापर झालेला असल्याची शक्यता आहे त्यामुळे अंतर जास्त आढळल्यास गाडीची डिलिव्हरी घेण्यापूर्वी शोरूम मॅनेजर कडे त्याची लेखी आणि योग्य कारण मागून घ्यावे.
३) इंजिन आणि प्लूइड लेव्हल्स ची पाहणी
इंजिन बे उघडून कुलंड ब्रेक ऑइल आणि वायपर वाॅशरच्या पातळी योग्य आहे का ते तपासणे गरजेचे आहे जसं की इंजिन थंड असेल तेव्हाच वाहनाचे फ्लूइड लेवल तपासावे आणि गाडी नेहमी सपाट मैदानावर पार करूनच निवड तपासणी योग्य राहील
कुलंडच्या पांढऱ्या पारदर्शक टाकीवरील Max आणि Min रेषा पहा. पातळी या दोन्हींच्या मध्ये असावी गरम असताना याचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करू नका तसेच ब्रेक फ्लूइड रिझर्व्हायरवरील पातळी तपासा ती. Max च्या जवळ असावी आणि ऑइलचा रंग गडद काळा झाला असल्यास ते बदलणे गरजेचे आहे तसेच विंडशील्ड वायपरच्या टाकीत पाणी किंवा वॉशर पूर्ण भरून घ्या
गाडी न्यूट्रल मध्ये ठेवून इंजिन चालू करा आणि इंजिन मधून कोणताही धातू घासण्याचा , शिट्टीसारखा किंवा सततचा टकटक आवाज येत नाही ना याकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला कोणत्या गोष्टीचा असामान्य आवाज येत असेल तर त्वरित मेकॅनिकला दाखवा
४) बॉडी आणि पेंट स्क्रॅचेस
ग्राहकांनो तुम्ही मुख्यतः दिवसाच्या उजेडात कारच्या चारही बाजूंनी फिरून पेंटवर स्क्रॅचेस किंवा डेंट आहेत का ते बारकाईने पहा कारच्या खालील बाजूस ही तपासून घ्या
जसे की वेगवेगळ्या कोण्यातून कारच्या पेंट कडे पहा जेणेकरून बारीक बोरखेडेही स्पष्ट दिसतील आणि कारच्या पॅनेलच्या रेषेत उभे राहून पृष्ठभाग सपाट आहे काही कुठे बडबड आहे ती तपासा.
तसेच हेडलाइट्स , टेललाईट्स आणि सर्व काचांवर कुठे तडे गेलेले आहेत का ते पाहणे गरजेचे आहेत आणि कारखाली वाकून किंवा रॅमवर चढवून खालचा पत्रा गंजलेला आहे का किंवा कुठे आदळला आहे का हे तपासून घ्या.
५) पॅनल गॅप्स
दर्शकांना कारचे दरवाजे , बोनेट , बूट ज्याला आपण डिकी म्हणतो आणि छताचा भाग एकमेकांना जोडलेले असतात आणि त्या जोडणाऱ्या मध्ये असणाऱ्या बारीक जागेला पॅनल गॅप म्हणतात.
जसे की जर कारच्या सर्व बाजूला गॅप समान नसतील तर गाडीची काही भाग खराब फिटिंगचे अशु शकतात किंवा ती आधी कुठे धडकली असू शकते.
त्यामुळे फॅक्टरीतून गाडी बाहेर पडताना किंवा शोरूम मध्ये असताना काही भाग चुकीच्या पद्धतीने जोडीला गेले असतील तर ते पॅनेल गॅप वरून लगेच ओळखता येतात ते तुम्ही कसे ओळखायचे सांगतो.
कारच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूच्या दारामधील अंतर समान आहे की नाही ते पाहणे बोनेट व्यवस्थित बंद होते आहे का आणि त्याच्या कडांच्या गॅप सर्व बाजूने सारखे आहेत का ते तपासणी व सर्व गॅपमध्ये तुमची बोट फिरून पहा जर गॅपमध्ये अचानक मोठा फरक किंवा चढ-उतार जाणवला तर तो दोष असू शकतो त्यामुळे दोष आढळल्यास ते डीलर्स सविस्तरपणे तपासणी करण्यास सांगणे.

६) टायर आणि उत्पादन तारीख बघणे
गाडीच्या सर्व ५ टायरवर नवीन रबरचे बारीक धागे ज्याला (Treads) असे म्हणतो ते आहेत की नाही ते तपासा.
टायरच्या बाजूला असलेली DOT कोड तपासा. आणि DOT कोड असा वाचावा या कोडचे शेवटचे चार अंक उत्पादनाच्या आठवडा आणि वर्ष दर्शवतात (उदाहरणात १२२६ म्हणजेच २०२६ चा १२ वा आठवडा)
गाडीची डिलिव्हरी घेताना टायर सहा महिन्यापेक्षा जास्त जुने नसावे याची तपासणी करूनच पुढचे पाऊल उचलावे.
७) आतील भागांची तपासणी
कार खरेदी करत असताना आतील भागाची तपासणी करणे महत्त्वाचे असते जसे की सर्व सीट्सवर कुठे फाटलेली जळलेली (उदाहरण सिगरेटचा डाग) कायमचे डाग आहेत का ते तपासा.
डॅशबोर्ड वर कुठेही स्क्रॅच , क्रॅक्स किंवा सूर्यप्रकाशामुळे रंग उडाला आहे तेही बघणे महत्त्वाचे आहे तसेच पायपुसणे काढून खालील कार्पेट तपासा व छताच्या कापडावर पाण्याचे डाग आहेत का ते पहा जे गळती दर्शवू शकतात.
प्रत्येक सीट बेल्ट पूर्णपणे बाहेर ओढून पहा की तो कुठे अडकत तर नाही ना आणि बेल्ट बकल मध्ये टाकल्यावर व्यवस्थित क्लिक आवाज येतो का आणि तो लाॅक होतो का ते तपासा व बेल्ट सोडल्यावर तो स्वतःहून वेगाने पूर्णपणे आज परत जातो का यासारख्या बारीक गोष्टी पाहा.
८) सर्व इलेक्ट्रिक बटणे व एसीची तपासणी
या मुद्द्यात सुरुवात ही एसी फुल स्पीडवर चालून पाच मिनिटात गाडी थंड होते का ते पहा आणि सर्व AC व्हेंट्स सारखीच हवा येते का ते तपासा व हिवाळ्यासाठी एसीची हीटर देखील चालू करून तपासा की चालते का.
आणि शेवटला म्युझिक सिस्टीम तुम्हाला जर आवड असेल तर ती नक्कीच बघितली पाहिजे जसं की स्क्रीनचे टच सेंसर आणि सर्व फंक्शन व्यवस्थित चालतात का ते पहा सर्व स्पीकर्समधून स्पष्ट आवाज येतो का नाही ते तपासा आणि ब्लूटूथ , यूएसबी अँड्रॉइड कार प्ले कनेक्ट होतो का योग्यपणे ते पहा
९) गाडीचे दिवे आणि वायपर्सची तपासणी
घेणाऱ्या गाडीचे ची तपासणी लाईट्सपासून करा जसे की गाडीचे हेडलाईट हाय बीम आणि लो बीम दोन्ही चांगल्या प्रकारे प्रकाश मारतात का का ते पहा.
इंडिकेटस॔ डावे , उजवे आणि हॅझाडऺ लाइट्स तपासा. गाडीचा पुढील आणि मागील फॉग लॅम्प सुरू करून पहा आणि सर्व लाइट्स योग्य प्रकारे प्रकाश भारतात काय तेही तपासणे गरजेचे आहे
ही वायपर ब्लेड्स आणि काचेवर पाणी मारा स्प्रे वॉशर तपासा. वायपर्स योग्य प्रकारे चालतात का व काचेवरील पाणी योग्य प्रकारे साफ होते का तेही एकदा बघून घ्या.
१०) टूलकिट आणि स्टेफनी
गाडीची डिलिव्हरी घेताना किंवा तपासताना डिक्की उघडून तिथे स्टेफनी , टायर जॅक आणि स्पॅनर उपलब्ध आहेत की नाही ते नक्की तपासा तसेच जर तुम्ही शोरूम मधून काही अतिरिक्त ॲक्सेसरीज घेतल्या असतील तर त्या गाडीत व्यवस्थित बसले आहेत की नाही हे तपासणी खूप गरजेचे आहे
गाडीसोबत मिळणारे टूल किट व्यवस्थित काम करत आहे का आणि सर्व टूल्स योग्य स्थितीत आहेत का ते पहा तसेच गाडीमध्ये फर्स्ट एड किट (First-aid kit) आणि वार्निंग ट्रँगल आहे का नाही याची खात्री करून घ्या.
शोरूमधून घेतलेल्या अतिरिक्त ॲक्सेसरीज ची यादी आणि तुमचे बिल यांची प्रत्यक्ष गाडीतील साहित्याची पडताळणी करून सर्व योग्य आहे का ते पहा.

निष्कर्ष
प्रत्येक ग्राहकाला ज्या पैशाची गाडी घेण्यासाठी किंमत मोजली आहे त्या किमतीला योग्य ठरेल अशी डीलर्स कडून गाडी मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे तुमच्या पैशाची किंमत झाली पाहिजे जे तुम्हाला भविष्यात खूप आनंद आणि आठवणी देणार आहे अशा या गाडीची शोरूम मधून तुम्हाला चांगल्या प्रकारे कशी मिळाली पाहिजे यासाठीच हा लेख आम्ही बनवलेला आहे वरील लेख वाचून तुम्ही कोणत्याही चुका न करता तुमचे वाहन तुम्ही चांगल्या आणि योग्य परिस्थितीमध्य खरेदी कराल ह्यात प्रश्नचिन्हच नाही..
दर्शकांना पावसाचे दिवस चालू आहेत ह्या पावसाळ्यात तुमच्या गाडीचे रक्षण करणे १० मान्सून कार केअर टिप्स वर आम्ही लेख लिहिलेला आहे तसेच गाडी गंजण्यापासून कशी रोखावी व काळजी घ्यावी याविषयी लेख लिहिलेले आहेत तेही तुम्ही पहावे. धन्यवाद!!!




Leave a Reply