Tips for night driving in Rainy season : दर्शकांनो आतापर्यंत तुम्ही खूप वेळा पावसाळ्याच्या दिवसात सकाळी , दुपारी प्रवास केला असेल पण संध्याकाळी प्रवास करताना तुम्हाला शंभर टक्के जाणवले असणार की खरे आव्हान हे रात्रीच्या प्रवासात असते जे की तुम्हाला पावसाळ्याच्या सिझनमध्ये रात्रीच्या प्रवास अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक ठरू शकतो.
प्रवास करताना तुमचा धोका कमी व्हावा आणि गाडी चालवताना तुम्हाला तुमच्या वाहनावर आत्मविश्वास मिळावा यासाठी या ब्लॉगमध्ये पावसाच्या सिझनमध्ये रात्री गाडी चालवताना कोण कोणत्या प्रकारची काळजी आणि टिप्स आणि ट्रिक्स वापरावे हे या ब्लॉगमध्ये प्रमुख 10 मुद्द्याद्वारे सविस्तरपणे सांगण्यात येणार आहे…

हेडलाईट चा योग्य वापर
पावसाळ्यात रात्रीच्या वेळी गाडी चालवताना हेडलाईचा योग्य वापर करणे अतिशय महत्त्वाचे असते जसे की अपघातला धोका टाळण्यासाठी नेहमी लो-बीमचा वापर करा हाय-बीममुळे पावसाच्या थेंबावर प्रकाश पडून चकाकी निर्माण होते त्यामुळे समोरचे काही दिसू शकत नाही खालील प्रमाणे टिप्स वापरून तुम्ही तुमचा प्रवास सुखकर बनवू शकता.
जसे की लो-बीमचा वापर पावसात नेहमी डिप्ड किंवा लो-बीम हेडलाईट सुरू ठेवा यामुळे समोरच्या चालकाला तुमची गाडी स्पष्ट दिसेल आणि प्रकाश परिवर्तित होणार नाही.
हाय-बीम प्रकाशामुळे पांढरी भिंत तयार झाल्यासारखे वाटते त्यामुळे हाय-बीम चा वापर पूर्णपणे तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा.
जर तुमच्या गाडीचा फॉग लाइट्स असतील तर ते सुरू करा हे लाईट रस्त्यावर खाली प्रकाश टाकतात ज्यामुळे रस्त्याच्या कडा आणि पांढरे पट्टे स्पष्ट दिसण्यास मदत होते.
विंडशील्ड आणि आरसे स्वच्छ ठेवणे
खालील दिलेल्या ट्रिक्स वापरून तुम्ही विंड शील्ड आणि आरसे स्वच्छ व स्पष्ट ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकता जसे की पावसाळ्यात गाडीचे आत बाहेरचे तापमानात फरक असल्यामुळे काचेवर वाफ जमा होते वाफ घालवण्यासाठी गाडीचा ‘एसी फ्रेश एअर मोडवर’ ठेवून ‘विंड शील्ड डीफाॅगर’ चालू करा आणि हवेचा फ्लो गरम किंवा सामान्य ठेवा ज्यामुळे आरसे स्वच्छं स्पष्ट दिसतील.
विंडशील्ड आणि आरशांवर पावसाचे पाणी साचून न राहता ते थेंबा थेंबाने खाली घसरण्यासाठी रेन एक्स सारखे वॉटर रिपेलेंट उत्पादन काचेवर लावू शकता हे काचेवर एक सुरक्षित थर बनवायचे काम करते.
तसेच आरशावर पाणी न थांबता ते स्पष्ट दिसण्यासाठी एक कापलेल्या बटाट्याचा तुकडा आरशावर चांगला घासा किंवा सेविंग फोम लावून काही वेळाने स्वच्छ मायक्रो फायबर कापडाने पुसून घ्या यात असणारे स्टार्च आणि क्लिंजिंग एजंट पाणी थांबून देत नाहीत हा प्रयोग आम्ही आमच्या इंस्टाग्राम मराठी ऑटो गुरु पेजवर करून दाखवलेले आहे तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकता.
प्रवास सुरू करण्याआधी वायपर ब्लेडची स्थिती नक्की तपासा जर वायपर काचेवर ओरखडे ओढत असतील तर किंवा व्यवस्थित पाणी साफ करत नसतील तर ते ताबडतोब बदला याच्या संदर्भात ही व्हिडिओ आम्ही आमच्या मराठी ऑटो गुरु पेजवर पोस्ट केलेला आहे तो तुम्ही संदर्भ म्हणून पाहू शकता
सुरक्षित अंतर आणि वेगावर नियंत्रण ठेवणे
रात्रीच्या वेळी गाडी चालवताना दुसऱ्या गाडीपासून आपल्या गाडीचे अंतर हे कायम सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे जसे की पावसाळ्यात रस्त्यावर ब्रेक लागण्यासाठी जास्त अंतर लागते यामुळे पुढे जाणाऱ्या वाहनापासून आपले वाहन नेहमी जास्त अंतरावर असणे गरजेचे आहे.
साचलेल्या पाण्यामुळे गाडीची नियंत्रण सुटू शकते, म्हणून कमी वेळात गाडी चालवणे योग्य राहील तसेच अचानक ब्रेक दाबल्यास गाडी घसरू शकते त्यामुळे हळूहळू ब्रेक दाबणे गरजेचे आहे.

सावधगिरी आणि लक्ष केंद्रित करणे
पावसाळी रात्री गाडी चालवताना कमी व्हिजिबिलिटी ओले रस्ते आणि हेडलाईटच्या प्रकाशाचा सामना करावा लागतो. यामुळे रात्री प्रवास करताना सावधगिरी आणि लक्ष केंद्रित करून चालकाने वाहन चालवावे.
जसे की चालकाने मानसिक सतर्क असले पाहिजे रात्रीच्या पावसाच्या सिझनमध्ये शांततेमुळे झोप येऊ शकते त्यामुळे चालकाने लक्ष केंद्रित राहण्यासाठी हलकी गाणे किंवा सहप्रवाशांची गप्पा मारल्या पाहिजे.
जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर मध्येच थांबून चहा किंवा कॉफी घ्या जेणेकरून झोपू उडून सतर्क राहाल तसेच गाडी चालवताना तुमच्या गाडीच्या पुढच्या बंपर वर लक्ष ठेवू नका तर दूरवरच्या रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडावर नजर फिरवत राहा जेणेकरून तुम्हाला रस्त्याबाबत आणि जवळील परिस्थितीबाबत जाणीव होत राहील.
पाणी साचलेले रस्ते टाळणे
मुख्यतः पावसाळ्याच्या दिवसात पाण्याखाली गेलेले रस्ते कायमस्वरूपी टाळणे हे महत्त्वाचे असते आणि त्यात रात्रीच्या प्रवासात असल्या रस्त्यामधून जाणे हे संकटाला आव्हान दिल्यासारखे आहे त्यामुळे अशा रस्त्यावरून जात असला तर तुम्ही तशी जोखीम घेऊ नका.
पाणी हे इंजिन आणि एक्झॉस्ट मध्ये गेल्यास गाडी जाग्यावर बंद पडू शकते आणि रस्त्यातच तुम्ही अडकण्याची शक्यता असणार त्यामुळे तुम्हाला नको-नको त्या संकटांमधून जावे लागेल त्यामुळे मुख्यतः पाणी साचलेले रस्ते , डबके कितीही अनुभवी ड्रायव्हर असाल तर ही टाळणे योग्य राहील.
अचानक ब्रेक लावणे टाळा.
पावसात आणि रात्रीचे वेळ गाडी चालवताना अचानक ब्रेक लावणे टाळा कारण यामुळे गाडी घसरू शकते त्याऐवजी हळुवार ब्रेक दाबा पुढच्या वाहनापासून जास्त अंतर ठेवा आणि कमी वेगात गाडी चालवा
तसेच अचानक ब्रेक लावणे हे खालील दिलेल्या मुद्द्याप्रमाणे टाळावे पहिले पुढच्या आणि तुमच्या वाहनांनी जास्त अंतर ठेवा यामुळे तुम्हाला हळुवार ब्रेक लावायला पुरेसा वेळ मिळतो दुसरे कारण जर गाडीत एबीएस(ABS) नसेल तर ब्रेक एकदम दाबण्याऐवजी हळूहळू दाबा आणि मग सोडा तिसरे कारण ओला रस्त्यावर गाडीचा वेग कमी ठेवा वेग जास्त असेल आणि अचानक ब्रेक लावला तर गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते.
इंडिकेटर चा वापर करणे
पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी गाडी चालवताना इंडिकेटर वापरणे अत्यंत महत्त्वाचे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असते या वातावरणात विजीबिलिटी खूप कमी होते त्यामुळे इंडिकेटर हे केवळ दिशादर्शक नाही तर पाठीमागून आणि समोरून येणाऱ्या गाड्यांना तुमचा पुढचा प्लॅन समजण्यास मदत करतात.
आपण मुसळधार पावसात पाठीमागील ड्रायव्हरला तुमची गाडी किती अंतरावर आहे हे पटकन समजत नाही अशावेळी योग्य वेळी इंडिकेटर दिल्यास मागची गाडी सुरक्षित अंतर ठेवू शकते
हायवेवर लेन बदलताना किंवा वळताना इंडिकेटर चालू केल्यास तुमच्या मागे असणाऱ्या वाहनांना तुमच्या हालचालीचा अंदाज येतो. तसेच अनेकदा डायवर पावसात गाडी हळू चालवण्यासाठी किंवा कमी दृश्यमान त्यामुळे डबल इंडिकेटर हजार्ड लाइट्स चालू करतात मात्र या सवयीमुळे तुम्ही डावीकडे वळणार आहात की उजवीकडे हे मागच्या डायवाला समजत नाही त्यामुळे वळताना नेहमी सिंगल इंडिकेटर वापर करावा.
टायर प्रेशरची तपासणी करणे.
पावसाच्या दिवसात रात्रीचे वेळी प्रवास करताना टायर मधली हवेचा दाब तपासणे दुप्पट महत्त्वाचे असते कारण या काळात रस्ते निसरडे असतात आणि दृश्यमानता खूप कमी असते.
जेव्हा रस्त्यावर पाणी साचलेले असते तेव्हा टायर आणि रस्त्यामध्ये पाण्याचा एक थर तयार होतो ज्यामुळे जर टायरमध्ये हवा कमी असेल तर टायरचा मधला भाग दबला जातो आणि तो पाणी बाजूला फेकू शकत नाही यामुळे टायर रस्त्यावरून पूर्णपणे घसरतो आणि गाडीवरील ताबा सुटतो योग्य हवेचा दाब टायरला पाण्याचा थर कापून रस्त्याची पकड मजबूत ठेवण्यास मदत करतो.
हवा कमी करू नका काही लोक ग्रीप वाढवण्यासाठी पावसाळ्यात टायरची हवा मुद्दाम कमी करतात पण ही चुकीची पद्धत आहे नेहमी मॅन्युफॅक्चरने सुचवलेल्या योग्य प्रेशर च ठेवावे
ट्रेड डेप्थ तपासा जसे की टायऱ्यावरील नक्षी किमान ३ मिमी खोल असणे गरजेचे आहे जेणेकरून पाणी सहज बाहेर फेकले जाईल

धोक्याची सूचना देणारे दिवे(hazard light) वापरावे.
हे दिवे फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला वापरायला सांगितलेले आहे जसे की गाडी बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास हे दिवे वापरायचे असतात भारतामध्ये खूप ठिकाणी अडाणी लोक गाडी चालक होतात ज्यांना माहित नसते की गाडी चालवताना हे दिवे लावल्यास इतर वाहन चालक जो समजूतदार आहे तो गोंधळून जातो.
त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते मुख्यतः धोकादायक दिवे जे आपण हजार्ड लाईट म्हणतो ते चुकीच्या वेळी लावल्यास मागच्या ड्रायव्हरचा बल्ल्या होणार..
त्यामुळे पावसात किंवा कमी प्रकाशात हेडलाइट्स आणि फॉगल्याॅप वापरा त्यामुळे रस्ता आणि तुमचं वाहन स्पष्ट दिसू दिसू शकेल.
निष्कर्ष
खाली दिलेल्या प्रमुख 10 मुद्द्यांच्या बळावर आम्ही तुम्हाला सविस्तरपणे पावसात रात्रीच्या वेळी प्रवास कसा करावा , कोण कोणत्या प्रकारचे गोष्टी करणे योग्य राहील आणि कोण कोणत्या प्रकारच्या गोष्टी टाळू शकता या सर्वांचे सविस्तरपणे या ब्लॉगमध्ये माहिती सांगण्यात आलेले आहे तसेच या विषयाला अनुसरून आम्ही पावसाळ्यात गाडीला गंजण्यापासून वाचवण्यासाठी पाच सोपे टिप्स आणि १ ० मानसून कार केअर टिप्स या विषयावर पण विस्तार मध्ये सांगितलेले आहे तेही तुम्ही पाहू शकता हे तुम्ही वाचून तुमच्या ड्रायव्हिंग कलेमध्ये याचा वापर करून तुमची ड्रायव्हिंग कला चांगल्या प्रकारे सुधारू शकता.




Leave a Reply