महिनाभराचा इंधनाचा खर्च होणार अगदी अर्धा! आजच घरी आणा भारतातल्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या १० सीएनजी कार; यादी पाहून थक्क व्हाल!

Top 10 highest mileage CNG cars in india : भारतातील वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमती आणि सरकारचे इथेनॉल E-20 , E-30 , E-85 , E-100 यासारख्या विविध इथेनॉल मिश्रित पेट्रोल चे लॉन्च करणे यांसारख्या गोष्टीमुळे सामान्य भारतीय नागरिक वैफल्यग्रस्त झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांकडे उरतो फक्त सीएनजी कारचा उपाय जसे की कमी रनिंग कॉस्ट , उत्तम मायलेज आणि सामान्य नागरिकांना परवडणारी देखभाल यामुळे भारतातील तमाम ग्राहक सीएनजी वाहनांना प्राधान्य देत आहेत.

भारतात अशा काही कार उपलब्ध आहेत ज्या 30 किमी प्रति किलो पेक्षा जास्त मायलेज देतात तुम्ही नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ह्या सर्वात जास्त दहा माहिती देणाऱ्या सीएनजी कारच्या यादीवर तुम्ही नजर फिरवली पाहिजे.

तुम्ही जर बजेट कार खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत विचारपूस करत असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे जसे की वर म्हणल्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे तुम्ही त्रासलेला आहात तुमचा त्रास कमी कमी करण्यासाठी सीएनजी कार तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला या ब्लॉगमध्ये विस्तारपणे भारतातील सर्वात जास्त टॉप 10 गाड्यांची सीएनजी मायलेज नुसार यादी खालील प्रमाणे दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता

 

Top 10 highest mileage CNG cars in india
महिनाभराचा इंधनाचा खर्च होणार अगदी अर्धा! आजच घरी आणा भारतातल्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या १० सीएनजी कार; यादी पाहून थक्क व्हाल!

 

भारतातील सर्वात जास्त टॉप 10 गाड्यांची सीएनजी मायलेज नुसार यादी

 

१) Maruti Suzuki Celerio CNG

आत्तापर्यंतच्या भारतातील इतिहासात सर्वाधिक मायलेज देणारी सीएनजी कार म्हणून मारुती सेलेरिओ नावाचे वर्चस्व आहे. या गाडीत 1.0 लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते जे की ५६.७ hp ची ताकद आणि ८२.१ nm चा टॉर्क निर्माण करते आणि हे इंजिन ५ स्पीड गेअर बॉक्स सोबत येते जे की सेलेरिओने सीएनजीच्या दाव्यानुसार एकूण ३४.४३ km/kg मायलेज देते. महत्त्वाचे म्हणजे हे कंपनीकडून फॅक्टरी फिटेड सीएनजी या वाहनांमध्ये मिळतो.
हे इंजन शहरातील लोकांना तसेच दररोजच्या प्रवासासाठी आणि जे ग्राहक बजेट ला पाहून आपल्या कुटुंबासाठी वाहन खरेदी करणार आहेत हे वाहन त्यांच्यासाठीच बनलेले आहे

२) Maruti Suzuki WagonR CNG

या यादीमध्ये दोन नंबरला मारुती सुझुकीची लोकप्रिय व्हॅगनार आर सीएनजी या गाडीचा नंबर येतो हि गाडी तब्बल ३४.०५ km/kg चे मायलेज देते. या सेगमेंटमध्ये उंचीला सर्वात चांगली आणि आतील केबिन मस्त वाटणारे तसेच कुटुंबाच्या नियोजनाने सर्वात मस्त असी ही गाडी आहे.

या गाडीमध्ये आपल्याला 1.0 लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते जे की ५६.७ hp ची ताकत आणि ८२.१ nm चा टॉर्क निर्माण करते आणि ही गाडी ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत येते.

Top 10 highest mileage CNG cars in india
महिनाभराचा इंधनाचा खर्च होणार अगदी अर्धा! आजच घरी आणा भारतातल्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या १० सीएनजी कार; यादी पाहून थक्क व्हाल!

३) Maruti Suzuki Alto K10 CNG

तिसऱ्या क्रमांकावर या यादीमध्ये मारुती सुझुकीची अल्टो के 10 सीएनजी गाडी जे की ३३.८५ km/kg इतके मायलेज देते आणि हे मायलेज देण्यासाठी गाडीमध्ये १.० लिटर चे ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे हे इंजिन ५६.७ hp ची ताकद आणि ८२.१ nm चा निर्माण करते आणि ही गाडी पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येते.

भारतातील सर्वात कीफायतशीर सीएनजी गाडीमध्ये ह्या गाडीचा नंबर येतो आणि ही गाडी दोन चाकी वरून चार चाकी कडे जे कुटुंब वळणार आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम असे वाहन आहे.

४) Maruti Suzuki dzire CNG

चौथ्या क्रमांकावर या यादीमध्ये मारुती सुझुकी डिजायर सीएनजी या गाडीचा नंबर येतो आणि हे वाहन तब्बल ३३.७३ km/kg चे मायलेज देते जे की भारतातील सर्व कॉम्पॅक्ट सिडन च्या तुलनेत सर्वात जास्त मायलेज आहे. आणि या गाडीमध्ये १.२ लिटरचे ३ सिलेंडर इंजिन वापरलेले आहे जे की ७० hp ची ताकद आणि १०१.८ nm चा टॉर्क निर्माण करते आणि या गाडीचा गेअर बॉक्स ५ स्पीड मॅन्युअल आहे.

ही गाडी जे ग्राहक तीन बॉक्सच्या सिडान च्या शोधात आहेत आणि ज्यांना त्यात मायलेजही चांगली पाहिजे त्यासाठी ही गाडी सर्वोत्तम पर्याय असू शकतो तसेच या गाडीमध्ये डिक्की मध्ये सामान ठेवायला जागा ही खूप मिळते.

५) Maruti Suzuki Swift CNG

पाचव्या क्रमांकावर या यादीमध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट सीएनजी या वाहनाचा नंबर लागतो या वाहनाने ३२.८५ km/kg चे मायलेज दिलेले आहे जे की भारतातील सीएनजी हॅजबॅग सेगमेंट मधील सर्वात जास्त आहे. तसेच या वाहनांमध्ये १.२ लिटरचे ३ सिलेंडर Z12 पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे हे इंजिन ७० hp ची ताकद आणि १०१.८ nm चा टॉर्क निर्माण करते जे की ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत आपल्याला बाजारामध्ये मिळेल.

६) Maruti Suzuki S-presso CNG

सहाव्या क्रमांकावर मारुती सुझुकीचे एस-प्रेसो सीएनजी या वाहनाचा नंबर लागतो. हे वाहन तब्बल ३२.७३ km/kg इतके मायलेज देते आणि ह्या वाहनात 1.0 लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे जे की ५६.७ hp ची ताकद आणि ८२.१ nmचा टॉर्क निर्माण करते आणि हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत आपल्याला मिळते.
भारतातील बजेट मधल्या ग्राहकांसाठी SUV वाहनासारखी भावना देण्याचे काम हे गाडी करते कमी पैशात या गाडीमध्ये आपल्याला कुटुंबातील जास्त उंचीच्या लोकांना बसण्यासाठी उंच बसण्याची स्थिती या गाडीमध्ये मिळते जे की सेगमेंट मध्ये एकमेव आहे.

७) Maruti Suzuki Baleno CNG आणि Toyota glanza CNG

सातव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची बलेनो सीएनजी आणि टोयोटा ग्लास सीएनजी चा नंबर लागतो ह्या दोन्ही गाड्या एकमेकांच्या कंपनीच्या करारानुसार डिझाईन आणि इंजिनचा वापर हा एक सारखा असतो हे वाहने ३०.६१ km/kg इतके मायलेज देते. या वाहनांमध्ये १.२ लिटर ४ सिलेंडर पेट्रोल सीएनजी इंजिन वापरण्यात आलेले आहे जे की ७७.५ hp ताकद आणि ९८.५ nm चा टॉर्कसह बाजारामध्ये उपलब्ध आहे.
हे सेगमेंटमध्ये सर्वात चांगले केबिन कॉलिटी ग्राहकांना देण्याचे काम करते तसेच या गाडीमध्ये फीचर्स आणि गाडी खरेदीनंतर अनुभव हे सर्वात चांगल्या प्रकारे मिळतात.

 

Top 10 highest mileage CNG cars in india
महिनाभराचा इंधनाचा खर्च होणार अगदी अर्धा! आजच घरी आणा भारतातल्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या १० सीएनजी कार; यादी पाहून थक्क व्हाल!

 

८) Maruti Suzuki Fronx CNG आणि Toyota urban cruiser Taisor CNG

आठव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची फ्रॉक्स
सीएनजी आणि टोयोटा अर्बन क्रूजर टायझर सीएनजी हा गाड्यांचा नंबर लागतो वरील सांगितल्याप्रमाणे मारुती सुझुकी आणि टोयोटा कंपनीचे डिझाईन आणि इंजन एकसारखी वापरण्याच्या करारानुसार ह्या या गाड्या २८.५१ km/kg इतके मायलेज देतात या वाहनांमध्ये १.२ लिटर ४ सिलेंडर पेट्रोल सीएनजी इंजिन दिलेले आहे जे की ७७.५ hp ची ताकद आणि ९८.५ nm चा टॉर्क निर्माण करतात आणि हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत बाजार मध्ये उपलब्ध आहे.

९) Hyundai Exter CNG

या यादीमध्ये नव्या क्रमांकावर हुंडाई एक्स्टर सीएनजी या वाहनाचा नंबर येतो ही गाडी पाच वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये बाजारपेठेत उपलब्ध आहे. ही गाडी २७.१० km/kg इतके मायलेज देते आणि यात १.२ लिटर ४ सिलेंडर पेट्रोल इंजिन्स सीएनजी सेटअप दिलेला आहे आणि हे इंजन ६९ hp च्या ताकद सोबत ९५.२ nm चा टॉर्क निर्माण करते आणि हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत बाजारामध्ये उपलब्ध आहे.
ग्राहकांना सर्वोत्तम फीचर्स , दिसायला एकदम धाकड आणि हुंडाई कंपनीचे ब्रँड पाहिजे असेल तर हे वाहन तुमच्यासाठी आहे.

१०) Tata Punch CNG

दहाव्या क्रमांकावर या यादीमध्ये टाटा कंपनीची एकमेव टाटा पंच सीएनजी या वाहनाचा नंबर लागतो हे वाहन तब्बल २६.९९ km/kg इतके मायलेज देते आणि या वाहनांमध्ये १.२ लिटर ३ सिलेंडर नैसर्गिक रित्या अस्पीरेटर पेट्रोल सीएनजी इंजिन मिळते जे की ७३.५ hp ची ताकद आणि १०३ nm चा टॉर्क निर्माण करते हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ५ स्पीड AMT गिअरबॉक्स या दोन पर्याय सोबत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
टाटा पंच हे वाहन दोन सिलेंडर सीएनजी सेटअप सोबत येते जे की डिक्की मध्ये बूट स्पेस वाढवण्याचे काम करते.

 

Top 10 highest mileage CNG cars in india
महिनाभराचा इंधनाचा खर्च होणार अगदी अर्धा! आजच घरी आणा भारतातल्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या १० सीएनजी कार; यादी पाहून थक्क व्हाल!

 

Top 10 highest mileage CNG cars in india या यादीचा निष्कर्ष

या यादीमध्ये मारुती सुझुकी कंपनीचा वर्चस्व पाहायला मिळते एक-दोन कंपनीच्या गाड्या सोडल्या तर सर्व गाड्या मारुती सुझुकीच्या दिसायला मिळतात. या यादीमुळे आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की मारुती सुझुकी कंपनी ही बजेट मधल्या ग्राहकांसाठी बनलेली आहे ज्या लोकांना कमी पैशात चांगली सुविधांची गाडी पाहिजे असेल तर मारुती सुझुकी कंपनी ती तुम्हाला देण्याचे काम करते.

टोयोटा कंपनीचा मारुती सुझुकी सोबत डिझाईन आणि इंधन ची आदलाबदली ह्या करारामुळे टोयोटा कंपनीच्या गाड्यांचा पण या यादीमध्ये दोन वेळा संदर्भ आलेला दिसून येतो.

हुंडाई कंपनीची एकमेव अशी एक्सप्रेस सीएनजी हे वाहनकीन या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळते.

या यादीमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेगमेंट मधल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मधल्या गाड्यांचा समावेश या यादीमध्ये पाहायला मिळतो जसे की उत्कृष्ट दर्जाची हॅचबॅक पासून ते सिडान क्रॉस-ओवर एसयूव्ही ते मायक्रो एसयुव्ही यांसारख्या आकारांच्या गाड्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

Top 10 highest mileage CNG cars in india
महिनाभराचा इंधनाचा खर्च होणार अगदी अर्धा! आजच घरी आणा भारतातल्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या १० सीएनजी कार; यादी पाहून थक्क व्हाल!

निष्कर्ष

या यादीमुळे आपल्याला असे पाहायला मिळते की भारतातील बजेट मधल्या ग्राहकांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे सीएनजी गॅस मध्ये पर्याय आहेत. जसे की आपण दोन चाकी वरून चार चाकी वाहन घेण्यासाठी पाहत असाल तर आपण मारुती सुझुकीच्या सेलेरिओ , व्हॅगनाआर यांसारख्या वाहनांचा पर्याय आपल्या कुटुंबासाठी आपण निवड करू शकता.

तुम्हाला जर सर्वात फायदेशीर सीएनजी सांगायचे म्हणल्यास ती व्हॅगनार आर सीएनजी आणि डिझायर सीएनजी ही दोन नावे समोर येतात.
तसेच एसयुव्ही गाडी खरेदी करण्याचे आपले मन असेल तर टाटा पंच सीएनजी आणि हुंडाई एक्स्टर सीएनजी हेही उत्कृष्ट दर्जाचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत त्यामुळे वाढत्या पेट्रोल डिझेलचा खर्चापासून आपल्याला मुक्त व्हायचे असेल तर या वाहनांची आपण निवड करू शकता.