पावसाळ्यात गाडीला गंजापासून वाचवण्यासाठी ५ सर्वात सोप्या टिप्स; आजच करून पहा!

Tips to Prevent Rust and Corrosion During Monsoons : पावसाळ्याचे दिवस म्हणले की सर्वांना आवडते हिरवेगार झाडे त्यातून कारमधून प्रवास करताना दिसणारे निसर्गरम्य डोंगर दर्या पण पावसाचे वातावरण जितके तुम्हाला आनंद आहे निसर्गरम्य वाढते तितकेच ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.

जसे की सतत पाण्यात आणि चिखलात गाडी राहिल्यामुळे कारच्या लोखंडी शरीरावर गंज चढण्याचा धोका वाढतो त्यामुळे वेळेवर जर काळजी घेतली नाही तर ह्या गंज चढण्यामुळे कारचे आयुष्यमान आणि किंमत दोन्ही कमी होतात त्यामुळे खाली दिलेल्या या १ २  टिप्स तुम्ही नक्की अमलात आणू शकतात त्यामुळे तुम्हाला परत गंज चढण्याची भीती राहणार नाही…

पावसाळ्यात सतत पाणी आणि चिखलाच्या संपर्कात आल्यामुळे कारला गंज आणि क्षरण लागण्याचे धोका सर्वाधिक असतो यामुळे कारचे आयुष्य कमी होते त्यामुळे कारचे आयुष्य वाढवण्यासाठी माणसांच्या सुरुवातीला किंवा आधीच गाडीला अँटी-रस्ट कोटिंग करून घ्या आणि नियमितपणे स्वच्छ व कोरडी ठेवण्याचे काम करत रहावे.

 

 Tips to Prevent Rust and Corrosion During Monsoons.
पावसाळ्यात गाडीला गंजापासून वाचवण्यासाठी ५ सर्वात सोप्या टिप्स; आजच करून पहा!

 

१) अँटी-रस्ट कोटिंग

हि प्रामुख्याने वाहनांच्या तळ भागाला आणि लोखंड वस्तूंना गंजण्यापासून वाचणारे एक संरक्षण लेयर असते ज्याच्यामुळे गाडीच्या खालच्या भागाला अँटेरेस्ट कोटिंग मारणे खूप गरजेचे असते. हे धातू आणि हवेतील ऑक्सिजन आणि पाण्याचा संपर्क तोडते ज्यामुळे लोखंडावर गंज चढत नाही.

२) कारला वॅक्स पाॅलिश करणे

पावसाळा सुरू होण्यापूर्वी कारला चांगल्या दर्जाचे वॅक्स किंवा सिलिकॉन पॉलिश लावून घ्या. यामुळे कारच्या बॉडीवर पाण्याचे थेंब साचत नाहीत आणि पेंट सुरक्षित राहतो. खालील प्रमाणे त्याची प्रक्रिया नमूद केलेली आहे.
कारला वॅक्स पॉलिश करणे अतिशय सोपे आहे यासाठी प्रथम कार चांगली धुवून कोरडी करा त्यानंतर वॅक्स स्पंजवर घेऊन हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने कारच्या पेंटवर लावा. वॅक्स सुकल्यावर साधारण ५ ते १० मिनिटांनी एक स्वच्छ मायक्रोफायबर कापडाने घासून पुसून चमक आणा अशा पद्धतीने आपली कार वॅक्स पाॅलिश होते

) गाडीची नियमितपणे धुणे 

गाडीवर चिखल आणि घाण जास्त वेळ राहणार नाही याची जबाबदारी काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे तसेच एकदा गाडी स्वच्छ धुऊन घेणे जेणेकरून गाडीवर किंवा माती जास्त दिवस टिकून राहावे तसेच गाडी स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर पूर्णपणे कोरडी करणे जेणेकरून गाडीची चमक ही टिकून राहते

४) छतावर किंवा कव्हर खाली पार्क करणे

कार नेहमी कोरड्या किंवा कव्हर केल्या जागा बघून पार करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची गाडीही ओल्या किंवा पाथरीच्या जमिनीवर जास्त उभे राहणार नाही असे केल्यामुळे गाडीवर गंज चढण्याची किंवा पाण्यामुळे होणारे नुकसानाची कोणती चिन्हे भविष्यात दिसणार नाहीत

५) रबर सील साफ  ठेवणे

तुमच्या गाडीचा दरवाजाच्या , सनरूप च्या, खिडक्यांच्या रबरी पट्ट्यामध्ये पाणी आत येऊ नये म्हणून ते वेळोवेळी साफ करणे गरजेचे आहे तसेच नेहमी रबर सील हे कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करावा

 

 Tips to Prevent Rust and Corrosion During Monsoons.
पावसाळ्यात गाडीला गंजापासून वाचवण्यासाठी ५ सर्वात सोप्या टिप्स; आजच करून पहा!

 

६) स्क्रॅच अँड डेंट दुरुस्त करणे

जर कारच्या बॉडीवर कुठेही ओरखडे किंवा डेंट असतील तर ते लगेच दुरुस्त करून घ्या जेणेकरून आपल्या गाडीवर गंज चढू शकणार नाही कारण उघड्या पडलेल्या धातूवर पावसाचे पाणी पडल्यास तिथे लगेच गंज पकडतो.

८) कारला कोरडे ठेवा

पावसाळ्यात ओले पाय किंवा भिजलेली छत्री कार मध्ये ठेवल्यास आतील भाग दमट होऊन दुर्गंधी आणि गंज वाढू शकतो. त्यामुळे सिलिका जेल किंवा डीह्युमिडिफायर चा वापर करा. यामुळे उघड्या पडलेल्या मेटलच्या फरशीवर बुरशीचा वास आणि गंज येणे टाळता येऊ शकते.

९) दरवाजा व्हिजर्सचा वापर करा

खिडकी किंवा दरवाजाचे व्हिजर्स बसवल्यामुळे हलक्या पावसातही व्हेंटिलेशनसाठी तुम्ही खिडकी किंचित खाली करू शकता, ज्यामुळे केबिनमध्ये पाणी शिरत नाही. हे कारमधील इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आणि आतील मेटलचे रक्षण करते.

१०) दरवाजे आणि बॉनेटच्या ड्रेन होल्सची स्वच्छता ठेवणे

कार मधील ड्रेनेज होल स्वच्छ असल्याची खात्री करा जेणेकरून पाणी आत साठणार नाही.
तसेच सनरूप , दरवाजे आणि खिडक्यांच्या रबरी सील्सची तपासणी करा ज्यामुळे रबर सैल झाले असल्यास बदलून घ्या अन्यथा पाणी आज झिरपून केबिनमध्ये कार्पेट खराब करते आणि गंज निर्माण होतो

 

 Tips to Prevent Rust and Corrosion During Monsoons.
पावसाळ्यात गाडीला गंजापासून वाचवण्यासाठी ५ सर्वात सोप्या टिप्स; आजच करून पहा!

 

११) कब्जे आणि कुलुपांना वंगण घालणे

ओलावा आणि रस्त्यावरील घाण सहजपणे फिरणाऱ्या धातूंच्या भागांना जाम करतात. गंजणे आणि धातूंचा आवाज टाळण्यासाठी तुमच्या दरवाजाचे कब्जे(Door Hinges) कड्या(लॅचेस) आणि कुलपावर सिलिकॉन आधारित लुब्रिकंट किंवा गंजविरोधी स्प्रे वापरा.

१२) कार मधला कचरा बाहेर काढणे

तुमच्या गाडीच्या हुड , विंडशिल्ड वायपर्स आणि ट्रंकमधील मोकळ्या जागेत ओले पानगळ आणि लहान फांद्या जमा होतात जर ते तसेच सोडले, तर हे ओले सेंद्रिय पदार्थ धातूंच्या भागावर ओलावा टिकवून ठेवतात, ज्यामुळे आत मध्येच गंज लागण्याची शक्यता जास्त असते हे भाग नियमितपणे ब्रशने स्वच्छ करणे तुमचे काम आहे जेणेकरून गंज धातू वर चढणार नाही.

 

गाडीला गंज लागल्यामुळे मालकाला भोगावे लागणारे तोटे

सुरक्षेचा मोठा धोका निर्माण होणे

  • गंजल्यामुळे गाडीची मुख्य फ्रेम कुमकवत होते अपघाताच्या वेळी गाडी योग्य प्रकारे आघात सहन करू शकत नाही ज्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो.
  • ब्रेकच्या स्टील पाईपला गंज लागल्यास ब्रेक ऑइल लीक होते आणि चालत्या गाडीचे ब्रेक अचानक फेल होऊ शकतात.
  • गाडीचे सस्पेन्शन आणि शाॅक शोषून घेणारे गजल्यास चालू गाडी ते अचानक तुटू शकतात त्यामुळे गाडीवरील नियंत्रित सुटू शकते.
  • गाडीच्या सेंसर जवळ गंज चढल्यास अपघाताच्या वेळी एअरबॅग्स वेळेवर उघडत नाहीत.

आर्थिक नुकसान

  • गंज लागलेली गाडी कोणीही चांगल्या किमतीत खरेदी करत नाही यामुळे गाडीची रिसेल व्हॅल्यू खूप कमी होते
  • गंजलेला भाग कापून नवीन मेटल वेल्डिंग करावे लागते हा गॅरेजचा खर्च अत्यंत महाग असतो.
  • गाडी जास्त गंज असेल तर अपघातानंतर इन्शुरन्स कंपन्या क्लेम देण्यास नकार देऊ शकतात किंवा गाडी टोटल लाॅस असे म्हणून घोषित करतात

गाडी दिसायला आणि वापरायला अडचणी येतात

  • जसे की गाडी दिसायला खराब दिसते गाडीचे रंग उडतो रंगाला फुगे येतात आणि गाडी जुनी व भंगार वाटू लागते.
  • गंज झाल्यामुळे गाडीचे नट बोल्ट इतके जाम होतात की साधे टायर बदलणे किंवा सर्विसिंग करणे खूप कठीण होऊन जाते.

 

 Tips to Prevent Rust and Corrosion During Monsoons.
पावसाळ्यात गाडीला गंजापासून वाचवण्यासाठी ५ सर्वात सोप्या टिप्स; आजच करून पहा!

 

निष्कर्ष

मान्सूनचा पाऊस हा निसर्गाचा देशाला मिळालेला एक अविभाज्य भाग आहे आणि ह्याचा आनंद घेण्यासाठी तुमची गाडी मजबूत स्थितीमध्ये असणे हे खूप आवश्यक आहे त्यामुळे वरील सर्व तंतोतंत पालन केल्यास तुम्ही तुमच्या गाडीची पावसाळ्यात कोणत्याही गंज किंवा शरण जाण्यापासून बचावू शकता आणि पावसाळ्यात उत्तम प्रकारे काळजी घेऊन सुरक्षित प्रवास करू शकता जर हे तुम्ही केले तर गाडीचे आयुष्य वाढते आणि होणाऱ्या खर्चापासून ही तुम्हाला वाचता येते पावसाळ्यात आपल्या गाडीची सर्विसिंग वेळच्या वेळ करून घेणे ज्यामुळे आपला पावसाळ्यात चिंतामुक्त होऊन प्रवास करता येतो तसेच आम्ही लिहिलेल्या १० मान्सून कार केअर टिप्स या ब्लॉगचे पण वाचन करावे जेणेकरून आपल्या जास्त विस्तार मध्ये या विषयावर माहिती मिळेल