TATA motors price hike from July 1 : दर्शकांना तुम्ही जर टाटा कंपनीची खरेदी करणारा असाल तर तुमच्यासाठी एक कडू बातमी आहे जसे की टाटा मोटर कंपनीने १ जुलै २०२६ पासून आपल्या संपूर्ण पेट्रोल , डिझेल , सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहन वाहनांवर १.५% किमतीमध्ये वाढ होणारे घोषणा केली आहे तर ह्या ब्लॉगमध्ये आपण टाटा मोटर्स कडून कोणत्या गाडीवर किती किमतीमध्ये वाढ होईल तसेच पुढच्या महिन्यात गाड्यांची किंमत किती असेल आणि किंमत वाढणे मागे कारण काय? यांसारख्या गोष्टी विस्तार मध्ये सांगणार आहे…
टाटा मोटर कंपनीने १ जुलै २०२६ पासून टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन आणि ICE वाहनांवर १.५% ने किमतीमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा केलेली आहे आणि ही किमत वाढ टाटा मोटर्सच्या प्रत्येक वाहनावर लागू होणार आहे.

किमतीमध्ये वाढ टाटा मोटर्स का करत आहे?
टाटा मोटर्स ने एक जुलै 2026 पासून आपल्या गाड्यांच्या किंमती वाढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या दरवाढीमागील मुख्य कारणे खालील प्रमाणे दिलेले आहेत :
- गाड्या तयार करण्यासाठी लागणारे स्टील अल्युमिनियम रबर आणि प्लास्टिक यासारख्या कच्च्या मालाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले आहेत
- जगभरात आणि देशांतर्गत वाढत्या महागाईमुळे गाड्याच्या उत्पादनाचा आणि कारखान्याच्या व्यवस्थापन चा खर्च वाढला आहे
- गाड्यांमध्ये सुरक्षा आणि उत्सर्जनविरोधी नवनवीन तंत्रज्ञान आणि फीचर्स जोडण्यासाठी कंपनीला अतिरिक्त गुंतवणूक करावी लागत आहे
- कंपनीने स्पष्ट केलेले आहे की वाढलेला एकूण खर्चाचा मोठा हिसा कंपनी स्वतः सहन करत आहे परंतु वाढीव खर्चाचा काही फार कमी करण्यासाठी गाड्यांच्या किमतीत एक पॉईंट पाच टक्के पर्यंत वाढ करणे कंपनीला भाग पडले आहे.

याचा ग्राहकांवर काय प्रभाव पडेल?
टाटा मोटर्स दरवाढीचा ग्राहकावर थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे
- जसे की १ जुलै २०२६ पासून टाटाचे सर्व पेट्रोल , डिझेल , सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्या १.५% पर्यंत महाग मिळतील त्यामुळे गाड्यांच्या मॉडेल आणि वेरियंटनुसार किमती वाढतील.
- एक्स शोरूम किंमत वाढल्यामुळे त्यावर आकारला जाणारा आरटीओ टॅक्स आणि विमा देखील वाढेल यामुळे ग्राहकांना गाडी खरेदी करताना एकूण ऑन रोड बजेट वाढवावे लागणार आहे.
- जर ग्राहक बँकेतून कर्ज घेऊन गाडी खरेदी करणार असतील तर वाढलेल्या किमतीमुळे कर्जाची रक्कम वाढू शकते परिणामी ग्राहकांच्या मासिक हप्ता किंवा डाऊन पेमेंट वाढणार.
- जे ग्राहक ३० जून २०२६ किंवा त्यापूर्वी गाडीची बुकिंग आणि डिलिव्हरी पूर्ण करतील त्यांना जुन्या किमतीतच गाडी मिळणार आहे.

ह्या वर्षात दुसऱ्यांदा किमतीमध्ये वाढ
टाटा मोटर कंपनीकडून या वर्षात दुसऱ्यांदा किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली दिसून येते पहिल्यांदा कंपनीने १ एप्रिल २०२६ रोजी ०.५% इतकी वाढ किमतीमध्ये केली होती त्यानंतर पुन्हा एकदा कंपनीकडून १ जुलै २०२६ पासून गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल.
टाटा कंपनीच्या गाड्यांचे आत्ताचे दर
टाटा मोठे सर्वप्रमुख प्रवासी वाहनांची चालू अंदाजे एक शोरूम किंमत यादी खालील तक्त्यात दिलेले आहे ही किंमत १ जुलै २०२६ च्या दरवाढीपूर्वीचे आहे
टाटा मोटर्स गाड्यांची चालू किंमत यादी (जून २०२६)
| मॉडेलचे नाव | इंधन प्रकार | अंदाजे एक्स-शोरूम किंमत |
|---|---|---|
| Tata Tiago | पेट्रोल / CNG | ₹ ४.७० लाख – ₹ ८.५५ लाख |
| Tata Tigor | पेट्रोल / CNG | ₹ ५.५५ लाख – ₹ ८.८४ लाख |
| Tata Punch | पेट्रोल / CNG | ₹ ५.६५ लाख – ₹ १०.६० लाख |
| Tata Altroz | पेट्रोल / डिझेल / CNG | ₹ ६.३० लाख – ₹ १०.७७ लाख |
| Tata Tiago EV | इलेक्ट्रिक | ₹ ६.९९ लाख – ₹ ९.९९ लाख |
| Tata Nexon | पेट्रोल / डिझेल | ₹ ७.३७ लाख – ₹ १४.२२ लाख |
| Tata Punch EV | इलेक्ट्रिक | ₹ ९.६९ लाख – ₹ १२.५९ लाख |
| Tata Curvv | पेट्रोल / डिझेल | ₹ ९.७० लाख – ₹ १९.१० लाख |
| Tata Sierra | पेट्रोल / डिझेल | ₹ ११.४९ लाख – ₹ २१.२९ लाख |
| Tata Tigor EV | इलेक्ट्रिक | ₹ १२.४९ लाख – ₹ १३.७५ लाख |
| Tata Nexon EV | इलेक्ट्रिक | ₹ १२.४९ लाख – ₹ १७.४९ लाख |
| Tata Harrier | डिझेल | ₹ १२.८९ लाख – ₹ २५.८५ लाख |
| Tata Safari | डिझेल | ₹ १३.२९ लाख – ₹ २६.४० लाख |
| Tata Curvv EV | इलेक्ट्रिक | ₹ १६.९९ लाख – ₹ १९.४९ लाख |
| Tata Harrier EV | इलेक्ट्रिक | ₹ २१.४९ लाख – ₹ ३०.२३ लाख |

ऑटो गुरुचा संदेश
ग्राहकांनो तुमच्यासाठी आमचा संदेश एकदम सरळ असणार आहे जसे की तुम्ही जर टाटा कंपनीची गाडी खरेदी करण्याची ओढ असेल तर ते तुम्ही १ जुलै २०२६ च्या पूर्वी करणे गरजेचे आहे.
त्यामुळे तुम्हाला वाहनाची डिलिव्हरी १ जुलै च्या आधी व्हावे जेणेकरून तुम्ही किमतीच्या वाढीचा फटका तुम्हाला सोसावा लागणार नाही आणि तुम्हाला आत्ताच्या किमतीमध्येच गाडी मिळनार आहे.




Leave a Reply