Honda cars India sale May 2026 : होंडा कार इंडिया कंपनीने मे 2026 या महिन्यात भारत देशांतर्गत आणि निर्यात एकूण 7853 युनिट्स विकले आणि यामध्ये वर्ष दर वर्ष 31% ची वृद्धी केली आहे
होंडा कार इंडिया एक भारतातील उत्कृष्ट दर्जाची मजबुती व आधुनिकेला गवसणी घालणारे टेक्नॉलॉजी यांसाठी पूर्ण देशभर लोकप्रिय आहे. आणि ह्याचे जे प्रतीक म्हणून होंडा कार इंडिया कंपनीने मे महिन्यात 7853 युनिटची एकूण विक्री केली आणि या विक्रीमध्ये वर्ष दर वर्ष 31 टक्क्याची वर्दी घडली आहे. आणि वृद्धी आपल्याला एक चांगला संदेश देते की आत्ताच्या वर्तमान काळात युद्ध , तेलाच्या किमती मध्ये चढ-उतार यांसारखे संकटे असूनही होंडाने 31 टक्क्यांची वर्ष दर वर्षी दाखवली आहे.

होंडा गाड्यांची तुफान विक्री! Honda cars India sale May 2026 मध्ये झाली ३१% ची मोठी वाढ
होंडा कार इंडियाची आंतरदेशीय आणि प्रदेशात झालेली विक्री
होंडा कार इंडिया विक्री अहवाल (मे २०२६)
| विक्रीचा प्रकार | मे २०२६ (युनिट्स) | मे २०२५ (युनिट्स) | एप्रिल २०२६ (युनिट्स) | वार्षिक वाढ (YoY %) | मासिक वाढ (MoM %) |
|---|---|---|---|---|---|
| देशांतर्गत विक्री | ५,१११ | ३,९५० | ४,०६९ | +२९.३९% | +२५.६१% |
| निर्यात | २,७४२ | २,०३५ | ८६९ | +३४.७४% | +२१५.५४% |
| एकूण विक्री | ७,८५३ | ५,९८५ | ४,९३८ | +३१.२१% | +५९.०३% |
होंडा कार इंडियाने एकूण मे २०२६ महिन्यात आंतरदेशीय आणि परदेशात झालेली विक्री ही 7853 युनिट्स इतकी आहे आणि त्यामध्ये आंतरदेशीय विक्री हे ५१११ युनिट इतकी आहे आणि परदेशात २७४२ ची विक्री केली आहे ही विक्री मागील वर्षात सोबत बराबरी केली तर मागील वर्षी मे 2025 मध्ये होंडा कार इंडियाने ३९५० आंतरदेशीय विक्री केली होती व परदेशात २०३५ युनिट विक्री केली.
होंडा कार इंडिया च्या लाईन मध्ये एकूण पाच जुन्या व नव्या कार उपलब्ध आहेत त्यामध्ये आत्ताच मागील महिन्यात लॉन्च झालेली न्यू होंडा सिटी , न्यू अमेज व सेकंड जनरेशन अमेज यांसारख्या गाड्या लाईनअप मध्ये उपलब्ध आहेत आणि आत्ताच लोकांमध्ये ज्या कारची माहिती वेबसाईटवरून होंडा कार इंडियाने खुली केली ती ऑल न्यू Z-RV
एवढे संकटे असूनही कशी एवढी वृद्धी केली कशी ?
होंडा कार इंडियाने आपली विक्रीची संख्या एवढी संकटे असूनही नियमित ठेवण्यासाठी काही ठराविक गाड्यांवर व ग्राहकांच्या विश्वासावर लक्ष केंद्रित केले त्यांनी प्रत्येक सेगमेंट गाडी लॉन्च न करता ज्यात ग्राहकांचा आणि होंडा कार इंडिया चा मजबूत पगडा आहे व त्यांचा इतिहास आहे तशाच गाड्यांवर होंडाने आपला विश्वास दर्शविला आहे आणि त्याचे फळ आपण विक्रीच्या संख्या मधून पाहत आहे.
होंडा कार इंडियाने भारतामधील चालू असलेल्या SUV कार बदल लोकांच्या मनात विश्वासिता व लोकप्रियता जाणून त्यांनी होंडा एलिवेट ही गाडी 2023 मध्ये लॉन्च केली होती आणि त्याचे फळ यांना आत्ता दिसून येत आहेत.
तसेच त्यांची गेल्या अनेक दशकापासून जी गाडी प्रेमियम सेडान सेगमेंटमध्ये लोकांची पहिली पसंत राहिली आहे ती होंडा सिटी पाचव्या जनरेशन प्लॅटफॉर्म सहित मागील महिन्यात लॉन्च केली आणि याचा फायदा होंडा कार इंडियाला दिसून येत आहे.

होंडा गाड्यांची तुफान विक्री! Honda cars India sale May 2026 मध्ये झाली ३१% ची मोठी वाढ
ह्या विक्री आकड्या मधून सामान्य माणसाला काय फायदा
होंडा कार इंडिया च्या या विक्री आकडे मधून सामान्य माणसाला अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत जसे की मिळक्लास लोकांच्या बजेटमध्ये उत्कृष्ट दर्जाची भावना देणारे सीडान लोकांना मिळणार आहे जसे की होंडा अमेझ आणि होंडा एलिव्हेट यांसारख्या गाड्या तसेच कमी मेंटेनन्स मध्ये जास्त मायलेज देऊन लोकांची खिशावर पडणारी जास्त वजन कमी होणार आहे.
जर एखाद्या माणसाला पाच ते सात वर्षांनी आपली कार विकायचे असेल तर त्यांना सेकंड हॅन्ड मार्केटमध्ये खूप चांगली किंमत मिळणार.
होंडा आपल्या कमी बजेटच्या गाड्यांमध्ये उत्तम मिल्क कॉलिटी एअर बॅग आणि प्रगत सेफ्टी फीचर्स देऊन सामान्य कुटुंबाला प्रवासात सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन देते.
नवीन होंडा सिटी आणि ZR-V चा मुख्य प्रभाव
नवीन लॉन्च झालेल्या होंडा सिटी फेसलिफ्ट आणि झेड आर व्ही च्या आगमनामुळे होंडाच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते
होंडा सिटी फेसलिफ्टच्या प्रभावाबद्दल बोलायचे झाले तर ₹१२ लाख ते ₹२१ लाख किंमत असलेले सेडानने बाजारात पुन्हा एकदा स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. नवीन फेसलिफ्ट मध्ये १०.१ इंच टचस्क्रीन , 360 डिग्री कॅमेरा , व्हेंटिलेलेड सीट्स यामुळे ग्राहकांना या गाडीकडे अधिक आकर्षण वाढले आहे व ही गाडी लॉन्च झाल्यापासून होंडा कार इंडियाला मिडसाईज सिडान सेगमेंट मध्ये या मॉडेलने होंडाला विक्रीमध्ये मजबूतीचे स्थान दिले आहे
जो होंडा झेड आर व्ही चा प्रभाव बद्दल बोलायचे तर ही गाडी थेट आयात केली जाणार असून तिचे विक्री वाढविण्यापेक्षा होंडाची एक प्रेम ब्रँड म्हणून भारतात ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

होंडा गाड्यांची तुफान विक्री! Honda cars India sale May 2026 मध्ये झाली ३१% ची मोठी वाढ
होंडा कंपनीच्या विक्रीवर विक्री विभागाच्या उपाध्यक्षचे मत :
होंडा कार इंडियाचे विपणन आणि विक्री विभागाचे उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले, “इंधनाचे दर आणि त्याचा ग्राहकांच्या मानसिकतेवर होऊ शकणारा संभाव्य परिणाम यांविषयी बाजारात सुरुवातीला काही चिंता व्यक्त केली गेली असली, तरीही मे महिना होंडा कार्स इंडियासाठी अत्यंत फलदायी ठरला. नवीन ‘होंडा सिटी’चे यशस्वी लाँचिंग झाल्यामुळे बाजारातील आमचे स्थान अधिकच बळकट झाले; तर दुसरीकडे, ‘ZR-V’चे भारतात झालेले पहिले अनावरण (प्रीमियर) ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करणारे ठरले आणि त्यामुळे SUV क्षेत्रातील होंडाची जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा व क्षमता अधिकच अधोरेखित झाली.
होंडा कार इंडियाची भविष्यातील रणनीती
भारतीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी होंडा कार कंपनीकडून होंडा कार इंडिया ची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आगामी काळात लॉन्च करणार आहे त्याची सुरुवात म्हणून होंडाने भारतात आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कार च्या टेस्ट पूर्ण भारतभर सुरू केले आहेत.
नुकतीच नवीन होंडा सिटी आणि ZR-V ही SUV हायब्रीड असणार आहे यांची SUV बाजारात सादरीकरण करण्यात आले आणि त्यात नवीन होंडा सिटी मागील मे महिन्यात लॉन्च करण्यात आली.
होंडा भारतात आपल्या मोठ्या टू व्हीलर ग्राहक वर्गाला कार खरेदी करण्यासाठी आकर्षित योजना आखत आहे जेणेकरून मिडल क्लास घरामध्ये पहिली कार कुटुंबामध्ये खरेदी करण्याचा मान होंडा कार इंडिया आपल्याकडे घेऊ इच्छिते आहे