१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

Top 5 SUV under 10 lakh: दर्शकांनो तुम्ही जर तुमच्या कुटुंबासाठी रोजंदारीच्या आणि लांबच्या प्रवासासाठी SUV कारच्या शोधात असाल आणि तुम्हाला खूप सारे मार्केटमध्ये व्हेरिएंट आणि पर्यायी उपलब्ध असल्यामुळे तुम्ही गोंधळून गेला असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Top 5 SUV under 10 lakh या यादीमध्ये आलेले वाहने हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य राहणार आहेत तर चला जाणून घेऊया कोण कोणत्या गाड्यांचा समावेश या यादीमध्ये केलेले आहे

खालील दिलेल्या यादी मध्ये top 5 SUV under 10 lakh मध्ये ह्या सर्वात चांगल्या पाच वाहनांची तुम्हाला सुरुवाती किंमत , गाडीमध्ये इंजिन कोणते आणि त्याची क्षमता तसेच गाडीचे मायलेज किती असेल आणि त्या गाडीचे फायदे आणि तोटे आणि गाडीमध्ये फीचर्स कोणकोणते उपलब्ध असतील तसेच तुम्ही हे वाहन का खरेदी करावे या इतक्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मधी सविस्तरपणे मिळणार आहेत जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न हा लेख वाचून झाल्यानंतर उद्भवू नये तर चला सुरू करूया…

Top 5 SUV under 10 lakh खालील प्रमाणे यादी

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

१) टाटा पंच (Tata punch)

या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाला सर्वांची आवडती टाटा पंच ही गाडी येते या गाडीची सुरुवाती किंमत ₹५.६५ लाख रुपयात सुरू होते आणि टॉप अँड वरिएंट ₹१०.६० लाख एक्स शोरूम किमतीपर्यंत जाते.

या गाडीसाठी टाटा मोटर्स कडून सध्या ३ सिलेंडर असणारी ३ इंजिन पर्याय उपलब्ध आहेत

पहिले इंजिन पर्याय 1.2 लिटर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे की ८८ hp ची ताकद आणि ११५nm चा टॉर्क निर्माण करते ते ५ आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सोबत ही आपल्याला मिळते.

दुसरा इंजिन पर्याय 1.2 लिटर पेट्रोल इंजिन जे की १२०hpची ताकद आणि 117 nm चार टॉर्क निर्माण करते हे ६ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सोबत येते.

तिसरा इंजिन पर्याय 1.2 लिटर iCNG जे की सीएनजी मोडवर असते 73.4 hpची ताकद आणि 103nm चा टॉर्क निर्माण करते आणि हे मॅन्युअल सोबत ऑटोमॅटिक पर्यायी मध्येही आपल्याला उपलब्ध असेल.

गाडीचे मायलेज पेट्रोलमध्ये २०.०९ किमी/लिटर आणि पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये १८.८० किमी/लिटर आणि सीएनजी मध्ये कंपनीचा दाव्यावरून २६.९९ किमी/केजी इतके मायलेज मिळते

ही टाटा पंच गाडीमध्ये आधुनिक फीचर्स भरभरून देण्यात आलेले आहेत जसे की १०.२५ इंचाची मोठी हरमन टचस्क्रीन , ज्यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले आपल्याला मिळतो तसेच वाईट असिस्टंट सनरुप , ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल , मागील एसी व्हेंटस, वायरलेस फोन चार्जर , क्रूज कंट्रोल यांसारखे आरामदायिक आणि सुविधा कारक फीचर्स उपलब्ध आहेत.

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

सुरक्षेबद्दल बोलायचं झाल्यास टाटा म्हणजे सुरक्षित दुसरे नाव याला अनुसरून या गाडीमध्ये ६ एअर बॅग्ज , इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम सारखे सेफ्टी फीचर्स आणि ३६० डिग्री कॅमेरा एवढे सेफ्टी फीचर्स मिळतात.

टाटा पंचचे फायदे असे की भारत bNcap कडून ५ स्टार सेफ्टी रेटिंग तसेच उत्तम ग्राउंड क्लिअरन्स ज्यामध्ये १९३mm चा ग्राउंड क्लियरस मिळतो आणि सीएनजी मॉडेल मध्ये दोन छोटी सिलेंडर खाली बसल्यामुळे 210 लिटरचा बूट स्पेस वापरायला मिळते.

टाटा पंचचे तोटे असे की ४ सिलेंडर इंजिनच्या तुलनेत सुरुवातीला थोडे वायब्रेशन जाणवतात आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये गेअर बदलताना थोडा लॅग जाणवतो आणि मागील सीटवर बसण्यासाठी ३ प्रौढ लोकांना बसायचे असल्यास दाटीवाटीने बसू शकतात.

तुम्ही हे वाहन का खरेदी करावे जसे की जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एक चांगला आणि इंजिन असणाऱ्या गाडीचा आत्मविश्वास पाहिजे असेल तर हि गाडी उत्तम पर्याय आहे. तसेच टाटा मोटर सारख्या भारतीय कंपनीची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि गाडीमध्ये सुरक्षेच्या बाबतीत काही तडजोड करण्यात आलेले नाही ५ स्टार रेटिंग असणारी ही गाडी तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम राहील.

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

२) निशान मॅग्नेट (Nishan Magnite)

दुसऱ्या क्रमांकावर या यादीमध्ये निशान कंपनीची मॅग्नाइट ही कार येते याची एक्स शोरूम सुरुवाती किंमत ₹५.६५ लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेल ची किंमत ₹११.१३ लाख पर्यंत जाते

या वाहनांमध्ये 1.0 चे ३ सिलेंडर इंजिन पर्याय मिळतात जसे की पहिले १.० लिटर नॅचरल ऍस्पिरिटेड पेट्रोल इंजिन ज्यामध्ये ७२ एचपी ची ताकद आणि ९६ nm चा टॉर्क निर्माण होतो हे ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सोबत उपलब्ध आहे.

दुसरे इंजिन १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे की १०० hp ची ताकद आणि १६० nm चा टॉर्क निर्माण करते हे ५ स्पीड मॅन्युअल आणि प्रगत एक्सट्रॉनिक ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सोबत येते हे चालवायला अत्यंत स्मूथ आहे.

तिसरे इंजिन हे 1.0 लिटर सीएनजी मध्ये उपलब्ध आहे जे की बजेट लागणार ग्राहकांना उत्तम पर्याय आहे.

गाडीच्या मायलेज बद्दल सांगायचं झालं तर १.० लीटर पेट्रोल इंजिन मध्ये १९.९ किमी/लिटरचे मायलेज मिळते आणि सीएनजी मॉडेल मध्ये २४ किमी/किग्रॅ मायलेज मिळते.

या गाडीमध्ये तुम्हाला ८ इंचाची टच स्क्रीन इम्पोर्टेन्ट सिस्टीम आणि ७ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले तसेच वायरलेस अँड्रॉइड ऑटो व एप्पल कार प्ले मिळणार आहे आणि वायरलेस फोन चार्जर मागच्या सीट साठी एसी-वेंट्स यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

सुरक्षितता बाबतीत गाडीमध्ये ६ एअरबॅग्ज स्टॅंडर्ड मध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल , टायर प्रेशर मॉनिटर सिस्टीम आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत तसेच पार्किंगसाठी ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि हायवे साठी ड्रायव्हिंग क्रूज कंट्रोल यांसारखे आधुनिक सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत

निसान मॅग्नेटचे फायदे सांगायचे म्हणल्यास हॅच-बॅक कारच्या किमतीत तुम्हाला एक मोठी आणि बोल्ड लुक असणारी SUV मिळते.
तसेच टर्बो CVT गेअरबॉक्स पर्याय ह्या सेगमेंट मध्ये उपलब्ध होतो आणि २०५mm चा ग्राउंड क्लिअर असल्यामुळे खराब रस्त्यावर सहजपणे चालू शकते.

निसान मॅग्नेटचे तोटे बाकीच्या मोठ्या कंपनीच्या तुलनेत ह्या कंपनीचे सर्विस सेंटर्स आणि नेटवर्क भारतात खूप मर्यादित आहेत तसेच नॅचरल इंजिन हाय स्पीडवर आवाज किंवा कंपनी निर्माण करू शकते आणि किंमत कमी करण्यासाठी काही ठिकाणी हार्ड प्लास्टिकचा वापर केलेला जाणवतो.

तुम्ही वाहन का खरेदी करावे जसे की तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला हाॅचबॅक ऐवजी मोठी रोड प्रेजेंस देणारी SUV पाहिजे असेल ज्यामध्ये ३६० डिग्री कॅमेरा आणि आधुनिकुतेनुसार फीचर्स हवे असेल तरी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

३) मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki brezza)

तिसऱ्या क्रमांकावर या यादीमध्ये मारुती सुझुकी कंपनीची ब्रेजा ही गाडी येते या गाडीची सुरुवाती किंमत ₹८.२६ लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेल ची किंमत ₹१३.०१ लाख पर्यंत उपलब्ध होईल

वाहनांमध्ये वरील दोन्ही गाडीच्या ३ सिलेंडर इंजिनच्या तुलनेत ह्या ब्रेजामध्ये स्मूथ आणि चांगल्या दर्जाचे ४ सिलेंडर इंजिन मिळते
जे की १.५ लिटर K15C नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन १०३ hp ताकत आणि‌ १३७ nm टाॅर्क निर्माण करते हे ५ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड टोक कन्वर्टर ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सोबत येते.

तसेच सीएनजी मध्ये हे इंजिन ८८ hp ची ताकद आणि १२१.५ nm चा टॉर्क निर्माण करते आणि हे फक्त मॅन्युअल गिअर बॉक्स सोबत सीएनजी मध्ये येते.

मोठे १.५ लिटरचे इंजिन असल्यामुळे त्या गाडीमध्ये हायब्रीड तंत्रज्ञानामुळे ब्रेजा उत्तम मायलेज देते. जसे की पेट्रोल मॅन्युअलमध्ये १९.८९ किमी/लीटर , पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये १९.८० किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरिएंट मध्ये २५.५१ किमी/केजी इतके मायलेज मिळून जाते

गाडीमध्ये आधुनिक आणि प्रेमियम फीचर्स उपलब्ध आहेत जसे की नवीन ९-इंचाची स्मार्ट-प्ले प्रो+ टचस्क्रीन इम्पोर्टेन्ट सिस्टीम आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो व एप्पल कार प्ले तसेच हेड्स-अप डिस्प्ले आणि वायरलेस फोन चार्जर यासारखे प्रीमियम फीचर्स मिळतात

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

सुरक्षितता चा विचार केला तर त्यासाठी ६ एअर बॅग , इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम , हील होल्ड असिस्ट , ABS आणि मागील प्रवासासाठी एसी व्हेंटस तसेच पार्किंग साठी ३६० कॅमेरा यासारखे सुरक्षेच्या बाबतीत फीचर्स उपलब्ध आहेत.

मारुती ब्रेजाचे फायदे असे की ३ सिलेंडर गाड्याच्या तुलनेत ह्या गाडीचे इंजन स्मूथ आणि शांत चालताना जाणवते तसेच मारुती सुझुकीची नेटवर्क भारतात पूर्ण देशभर पसरल्यामुळे ह्या गाडीची रिसेल व्हॅल्यू आणि सर्विस मध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि केबिनमध्ये ५ लोकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे

मारुती ब्रेजा चे तोटे असे की पंच किंवा मॅग्नेटचे तुलनेत ब्रेजाची सुरुवाची किंमत जवळपास २.५ लाख रुपयांनी जास्त आहे आणि हायवेवर अचानक वेग घेण्यासाठी लागणारा टर्बो इंजिन या गाडीमध्ये उपलब्ध नाहीये आणि या गाडीमध्ये टाटा पचंसारखे व्टिन सिलेंडर सीएनजी इंजिन नसून मोठा सीएनजी टॅंक डिक्कीत असल्यामुळे सामान ठेवण्यासाठी कमी जागा होते

हे वाहन तुम्ही का खरेदी करावे याचे उत्तर असे की जर तुम्हाला पुढील ८-१० वर्षे कोणतीही डोकेदुखी नको असेल आणि एक चांगली फॅमिली कार हवी असेल तर मारुतीचे इंजिन पूर्ण देशामध्ये सर्वोत्तम आहे. तसेच टाटा पंच किंवा मॅग्नेटच्या तुलनेत ह्या गाडीचा रोड प्रेझेन्स आणि केबिनमधील जागा मोठी जाणवते आणि ६ स्पीड टोक कन्वर्टर ऑटोमॅटिक गेअर बॉक्स असल्यामुळे ट्रॅफिक मध्ये गाडी चालण्यासाठी खूप आरामदायक वाटते. आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या वाहनाची GNCAP मध्ये ४ स्टार रेटिंग मिळालेली गाडी आहे.

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

४) महिंद्रा XUV 3XO (Mahindra XUV 3XO)

चौथ्या क्रमांकावर महिंद्रा कंपनीची XUV 3XO ही गाडी येते या गाडीची सुरुवाती एक्स शोरूम किंमत ₹७.५४ लाख रुपयापासून सुरू होते आणि टॉप मॉडेल ची किंमत ₹१४.८९ लाख रुपये पर्यंत जाते
महिंद्रा ने या गाडीमध्ये सेगमेंट मधले सर्वात शक्तिशाली इंजिन पर्याय उपलब्ध केले आहेत.

पहिला १.२ लिटर TCMPFi टर्बो पेट्रोल इंजिन हे इंजिन १११ HP ताकद आणि २०० nm चा टॉक निर्माण करते हे सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सोबत उपलब्ध असेल.

दुसरे इंजिन १.२ लिटर mStallion TGDi टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे की १३१ hpची ताकद आणि २३०nm चा टॉर्क निर्माण करते हे त्यांच्या सेगमेंट मधले सर्वात वेगवान पेट्रोल इंजिन असून हे ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ कन्वर्टर ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सोबत उपलब्ध आहे.

तिसरे इंजिन १.५ लीटर mHawk डिझेल इंजिन हे इंजिन एकूण ११७ hp ची ताकद आणि तब्बल ३०० nm चा जबरदस्त टॉर्क देते हे सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स सोबत उपलब्ध आहे.

ही गाडी मायलेज च्या बाबतीत पेट्रोलमध्ये १७.९६ ते २०.१ किमी/लीटर आणि डिझेल मध्ये २०.१ ते २१.२ किमी/लीटर मायलेज देऊ शकते

गाडीमध्ये प्रीमियम १०.२५ इंचाची मोठी टच-स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि १०.२५ इंचाची पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो आणि सेगमेंट मधली पहिलीच मोठी आणि ७ स्पीकर असणारी प्रीमियम हरमन गार्डन साऊंड सिस्टिम या गाडीमध्ये उपलब्ध आहे

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

सुरक्षिततेच्या बाबतीत या गाडीमध्ये ६ एअरबॅग स्टॅंडर्ड , चारही चाकांना डिस्क ब्रेक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेव्हल टू अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स उपलब्ध आहे आणि ३६० डिग्री कॅमेरा सुरक्षेसाठी या गाडीमध्ये मिळतो

महिंद्राच्या XUV 3XO चे फायदे असे की ह्या गाडीचे टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन मारुती ब्रीजा किंवा टाटा पंच पेक्षा खूप जास्त पावर आणि टॉर्क निर्माण करते तसेच भारत Bncap यांच्याकडून 5 स्टार सेफ्टी मिळालेली मजबूत बिल्ड क्वालिटी असलेली ही गाडी आहे.

महिंद्रा XUV 3XO चे तोटे असे की जुन्या मॉडेल पेक्षा बूट स्पेस (३६४ लिटर) वाढलं जरी असला तरी सामान ठेवण्यासाठी डिझाईन खूप अरुंद वाटते तसेच जर तुम्ही गाडी खूप वेगाने किंवा ट्रॅफिक मध्ये चालवली तर शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिनमुळे मायलेज खूप कमी मिळू शकते.

ही गाडी तुम्ही का खरेदी करावी याचे उत्तर असे की जर तुम्हाला ड्रायव्हर गाडी चालताना दमदार पिक-अप उत्तम आणि वेग आवडत असेल तर या गाडीचे पेट्रोल असो किंवा डिझेल इंजिन तुम्हाला खूप आवडेल तसेच सब-४ मीटर सेगमेंट मध्ये लेव्हल २ सारखे फीचर्स किंवा पॅनोरामिक सनरुप यांसारखे फीचर्स अनुभव चे इच्छा असेल तर ही कार तुमच्यासाठी योग्य ठरू शकते आणि चांगल्या प्रकारची सेफ्टी रेटिंग आणि मागील सीट वर बसण्यासाठी कम्फर्टेबल जागा यांसारख्या गोष्टीमुळे तुम्हीही तुमच्या कुटुंबासाठी गाडी घेऊ शकता.

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

५) टाटा नेक्साॅन (Tata nexon)

पाचव्या क्रमांकावर टाटा कंपनीची नेक्साॅन ही गाडी येते ह्या गाडीची सुरुवाती किंमत एक शोरूम ₹७.३७ लाख सुरू होते आणि टॉप मॉडेल ची किंमत ₹१४.३२ लाख रुपये पर्यंत जाते

ह्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल आणि सीएनजी तिन्ही दमदार पर्याय उपलब्ध आहेत.
पहिले १.२ लीटर पेट्रोल इंजिन जे की ११८.२७ hp ची ताकद आणि १७० nm चा टॉर्क निर्माण करते हे ५ स्पीड मेन्यूअल आणि ६ स्पीड मॅन्युअल किंवा ६ स्पीड ऑटोमॅटिक इतक्या गिअर बॉक्समध्ये उपलब्ध आहे.

दुसरे १.५ लिटर टर्बो-चाज्ड॔ डिझेल इंजिन हे इंजिन ११३.३१ HP ची ताकद आणि २६० nm चा जबरदस्त टॉर्क देते हे ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड AMT ॲटोमॅटिक गिअर बॉक्स सोबत येते.

तिसरे इंजिन 1.2 लिटर iCNG इंजिन सिलेंडर तंत्रज्ञानासह सीएनजीचा पर्याय यामध्येही उपलब्ध आहे.

या इंजिन प्रकारानुसार मायलेज सांगायचे झाल्यास पेट्रोलमध्ये १७.० ते १७.४ किमी/लिटर इतके मायलेज देऊ शकते आणि डिझेलमध्ये साधारणपणे २३.२ ते २४.१ किमी/लिटर इतके मायलेज मिळेल आणि सीएनजी मध्ये साधारण २४ किलो/केजी मायलेज मिळते.

ह्या नवीन टाटा नेक्साॅनच्या फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास १०.२५ इंचाची मोठी फ्लोटिंग टच स्क्रीन इन्फोटेकमेंट सिस्टीम उपलब्ध आहे यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सह आपल्याला मिळून जाईल आणि १०.२५ इंचाचाच पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो ज्यामध्ये नेविगेशन साठी नकाशा उपलब्ध आहे.
तसेच व्हॉईस-असिस्टेड पॅनोरामिक सनरूप केबिन मधल्या सीट साठी वायरलेस फोन चार्जर चांगल्या दर्जेचे ९ स्पीकर जेबीएल साऊंड सिस्टिम इतके फीचर्स यामध्ये मिळतात

Top 5 SUV Under 10 Lakh
१० लाखांच्या आत या ५ खतरनाक SUV; शोरूमला जाण्यापूर्वी हे नक्की पाहा

 

सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये सर्व व्हेरियंटमध्ये ६ एअरबॅग स्टॅंडर्ड मध्ये आणि ABS सह EBD सारखे फीचर्स तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम व ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिग यांसारखे आधुनिक फीचर्स ही मिळतात व ३६० डिग्री कॅमेरा यासारख्या आधुनिकतेनुसार फीचर्स सुरक्षा देण्यासाठी उपलब्ध आहेत.

टाटा नेक्साॅनचे फायदे असे की ग्लोबल Ncap यांच्यामध्ये किंवा भारत Ncap यांच्यामध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी हि भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे तसेच हायवेवर गाडी चालताना मिळणारी स्टॅबिलिटी आणि आराम या सेगमेंट मध्ये सर्वोत्तम आहे तसेच २०८nm चा ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळे ही गाडी खड्डे किंवा पाण्यामध्ये सहज जाऊ शकते.

टाटा नेक्साॅनचे तोटे पेट्रोल इंजिन ३ सिलेंडर असल्यामुळे मारुती ब्रेजाच्या ४ सिलेंडर इंजिन के शांत रिफाईड नाही आणि ग्राहकांसाठी खूप जास्त गिअरबॉक्स पर्याय (५MT ,६MT , AMT , DCA) असल्यामुळे योग्य व्हेरियंट निवडताना गोंधळ होऊ शकतो. तसेच एसी आणि इतर नियंत्रणासाठी टच पॅनेल दिल्यामुळे गाडी चालवताना स्क्रीन कडे न बघता ते वापरणे थोडे कठीण होऊन जाते.

हे वाहन तुम्ही का खरेदी करावे याचे उत्तर असे की जर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षा हे सर्वात पहिले मानबिंदू असेल तर ही गाडी सेफ्टीच्या बाबतीत ६ एअर बॅग आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंग यामुळे सर्वोत्तम पर्याय असणार आहे तसेच अनेक कंपन्यांनी डिझेल गाड्या बंद केले आहेत अशा वेळी जर तुम्हाला हायवेवर लांबच्या प्रवासासाठी दमदार टॉर्क देणारी आणि जास्त माहिती देणारी डिझेल कार हवी असेल तर नेक्साॅन उत्तम पर्याय आहे.

निष्कर्ष

तुमच्या गरजेनुसार तुम्हाला कोणती कार घ्यायला पाहिजे यानुसार आम्ही आम्ही चार गोष्टी केलेले आहेत जसे की
१)जर तुमचे बजेट ₹७ ते ₹८ लाख असेल तर तुमच्यासाठी टाटा पंच किंवा निसान मॅग्नेट ह्या गाड्या खूप चांगल्या आहेत.

२) जर तुम्हाला मेंटेनन्सची डोकेदुखी नको असेल आणि इंजिन स्मूथ हवी असेल तर तुम्ही मारुती ब्रेजा या वाहनासोबत जाऊ शकता.

३) तसेच जर तुम्हाला पावर स्पीड आणि आधुनिक तंत्रज्ञान आवडत असेल तर तुम्ही महिंद्राच्या XUV 3XO सोबत जाऊ शकता.

४) शेवटचा पर्याय म्हणून जर तुम्हाला सुरक्षितता आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स हवा असेल तर तुम्ही टाटाच्या नेक्सन या गाडीकडे पर्याय म्हणून जाऊ शकता. धन्यवाद!!!