10 Reasons for Car Insurance Claim Rejection : दर्शकांनो तुम्ही जर वाहन नव्याने खरेदी केलेले असेल आणि त्याचा विमा उतरवला असेल आणि भविष्यात जर तुमची देव ना करो पण कोणत्या ठिकाणी अपघात किंवा वाहनास दुखापत किंवा पुढील वाहनात दुखापत यांसारख्या गोष्टी घडल्यास तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करणे हे खूप महत्त्वाचे असते पण अशावेळी कंपन्या खूप काही कारणावरून इन्शुरन्स विमाधारकांचे फेटाळून लावतात त्यामुळे कोण कोणत्या कारणामुळे इन्शुरन्स फेटाळला जातो याचा खोल अभ्यास आपण ह्या ब्लॉगमध्ये मुख्यतः दहा ठळक मुद्द्या द्वारे सविस्तरपणे पाहणार आहोत
मुख्यतः कार विमा काढण्यामागे हे पुढील प्रमाणे कारणे असू शकतात जसे की तुमचा अपघात झाल्यास मोठ्या खर्चापासून बचावासाठी आर्थिक संरक्षण मिळते दंड किंवा पोलीस अडचणी पासून बचावासाठी कायदेशीर सुरक्षाही मिळते आणि नव्याने गाडी खरेदी केलेली असेल आणि ती जर वर्षभरात तुम्ही क्लेम न केला तर पुढील वर्षी प्रेमियम मध्ये सवलत मिळते ज्याला नोकरी बोनस असे म्हणतात तसेच पार्टनर गॅरेज मध्ये थेट क्लेम नोंदवता येतो ज्यामुळे कॅशलेस क्लेम सुविधाही मिळते आणि गाडीचा विमा असल्यामुळे तुम्ही निर्भीडपणे गाडी चालू शकता.
आम्ही कार विमा चे किती प्रकार त्याचे फायदे व तोटे तुम्ही विमा कोणत्या प्रकारे घेतला पाहिजे यावर ही ब्लॉग लिहिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता.

10 प्रमुख कारणे कार इन्शुरन्स क्लेम फेटाळून जाण्याची :
१) माहिती लपवणे किंवा चुकीची माहिती देणे
होय हे अगदी बरोबर वाचलेले आहात जसे की विमा क्षेत्रातील नियमानुसार पॉलिसी काढताना कोणतीही माहिती लपवणे किंवा चुकीची माहिती देणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो ज्यामुळे तुमचा विमा फेटाळून लावला जाऊ शकतो
जसे की तुम्ही जर तुमची गाडी जुनी असेल आणि ती रिस्टोरेशन करून नवीन असल्याचे भासवत असाल किंवा त्याबद्दल चुकीची माहिती देत असाल आणि गाडीच्या वयाबद्दलही कागदपत्रात फेरबदल करत असाल तर तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
जर गाडीचा आधीपासून अपघात झाला असेल आणि त्या जुन्या नुकसानाची माहिती लपून तुम्ही नवीन क्लेम करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कंपनीला सहज समजते ज्यामुळे तुमचा क्लेम रद्द करण्यात येतो. तसेच अपघाताच्या वेळी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे वैद्य लायसन नसेल किंवा पॉलिसीमध्ये त्यासारखीच माहिती नसेल तरीही क्लेम भेटायला जातो.
खोटी कागदपत्रे सादर करणे किंवा अपघाताची वेळ घटना चुकीची सांगणे यामुळे पॉलिसी देखील रद्द केली जाऊ शकते.
२) व्यावसायिक कारणासाठी खाजगी वापर
मोटर वाहन कायदा आणि विमा कंपनीचा नियमानुसार खाजगी वाहनांचा व्यवसाय कामासाठी वापर करणे आहे गंभीर प्रकारचा नियमांमध्ये भंग मानला जातो त्याप्रमाणे खाजगी गाडीसाठी प्रायव्हेट कार पॉलिसी दिली जाते तसेच व्यावसायिक व्यापारासाठी कमर्शियल व्हेईकल पॉलिसी घेणे बंधनकारक असते.
तशी तुलना करायला गेल्यास व्यावसायिक विम्याचा हप्ता खाजगी विमाच्या तुलनेत खूप जास्त असतो खाजगी विमा घेऊन व्यवसायिक व्यापार करणे ही विमा कंपनीचे फसवणूक मानली जाते या कारणामुळे तुमचा विमा फेटाळून लावला जाऊ शकतो.
३) गाडी दुरुस्त करणे किंवा पुरावा नष्ट करणे
विमा कंपनीच्या नियमानुसार (Surveyor) सर्वेयरने गाडीची पाहणी करण्यापूर्वी जर तुम्ही ती दुरुस्त केली तर तुमचा क्लेम नाकारला जातो
तुमच्या गाडीचा मोठा अपघात झाला असेल आणि ते तुम्ही चुकून किंवा मुद्दाम दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला असेल तर विमा कंपनीला गाडीचे नुकसान किती झाले होते याचा प्रत्यक्ष पुरावा उरत नाही त्यामुळेही तुमचा क्लेम नाकाला जाऊ शकतो.
सर्वेअर शिवाय वाहनांची दुरुस्त केल्यास विमा कंपनीला फसवणुकीचा किंवा खोटा क्लेमचा संशय येतो त्यामुळेही तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
४) वैद्य परवाना नसणे
वाहनाचा अपघात झाला त्यावेळी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे वैद्य ड्रायव्हिंग लायसन असणे हा वाहन विम्याचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जर अपघाताच्याक्षणी तुमच्याकडे वैद्य ड्रायव्हिंग लायसन नसल्यास किंवा लायसन ची मुदत संपली असेल तरीही तुमचा क्लेम फेटाळला जाऊ शकतो
नियमानुसार जर वाहन चालवणाऱ्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन मुदत संपलेली असेल तर ते कायदा आणि विमा कंपनीच्या दृष्टीने अवैद्य मानले जाते तसेच वैद्य परवाना नसणे हा वाहतूक नियमानुसार गुन्हा आहे या सर्वांगीण गोष्टींच्यामुळे तुमचा विमा फेटाळून लावला जाऊ शकतो

५) कंपनीला उशिरा माहिती देणे
वाहनाचा अपघात किंवा चोरी झाल्यानंतर लवकरात लवकर किंवा 24 ते 72 तासाच्या आत किंवा कंपनीच्या TC नुसार विमा कंपनीला कळवणे बंधनकारक असते त्या वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यास विमाचा क्लेम मिळवण्यात अडचण येऊ शकते.
अपघात झाल्यास विमा कंपनीला घटनास्थळी पाहणे करायला जाणे सोपे जाते तसेच वाहन चोरी झाल्यास पोलीस आणि विमा कंपनी तात्काळ शोध सुरू करू शकतात.
तुम्ही जर त्यांना वेळेवर घटनास्थळी ची माहिती देण्यास चुकला तर वेळेत माहिती देण्यास प्रलंब केल्याबद्दल विमा कंपनीला शंका येऊ शकतो आणि पारदर्शकता नसल्यामुळे विमा कंपनी तुमचा विमा क्लेम फेटाळून लावू शकते. पण तुमच्याकडे जर योग्य कारण असेल तर सात दिवसापर्यंत ही माहिती देऊ शकता.
६) मद्यपान करून वाहन चालवणे
अपघाताचे वेळी जर वाहन चालकाने ड्रग्जचे सेवन किंवा मद्यपान केले असेल तर अशा वेळी कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स क्लेम पूर्णपणे कंपनीकडून नाकारला जातो
जसे की मोटर वाहन कायदा १९८८ (कलम १८५) अन्वये, जर चालकाच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण 30 मिलीग्राम प्रति 100 मिली पेक्षा जास्त आढळले तर तो गंभीर गुन्हा ठरत असतो आणि त्यामुळे भारतातील IRDAI विमा नियामक संस्थाच्या नियमानुसार सर्व वाहन विमा पॉलिसीमध्ये मद्यपान करून गाडी चालवणे हा एक मुख्य अपवाद मानला गेला आहे त्यामुळे अपघात झाल्यास होणारे नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील नसते त्यामुळे ते तुमचा विमा क्लेम फेटाळून लावणार.
७) पॉलिसीची मुदत संपणे
तुम्ही जर विम्याचे नूतनीकरण वेळेवर न केल्यास किंवा मुदत संपल्यानंतर अपघात झाल्यास कंपनी नुकसान भरपाई देण्यास बांधील राहत नाही.
जसे की मुदत संपलेले वाहन रस्त्यावर चालवणे हा कायदेशीर गुन्हा सुद्धा ठरू शकतो त्यामुळे विम्याचे नूतनीकरण न झाल्यामुळे पॉलिसी लॅप्स तयार होतात त्या घटनेमध्ये अपघात झाल्यास कंपनी कोणत्याही क्लेम मंजूर करत नाही
८) अनधिकृत गॅरेज मध्ये दुरुस्ती
जर तुमची पॉलिसी कॅशलेस असेल तर कंपनीच्या अधिकृत सर्विसिंग सेंटर शिवाय इतरत्र गाडी दुरुस्त केल्यास विमा कंपनीकडून क्लेम्स मध्ये खूप प्रकारच्या अडचणी निर्माण होतात.
तुम्हाला जर तुमचे वाहन खराब झाले असेल किंवा काही अडचणी असतील तर ते तुम्ही फक्त विमा कंपनीच्या अधिकृत नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्त करावे लागते तुम्ही चुकूनही अनधिकृत किंवा नॉन नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्त केल्यास तुम्हाला विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा क्लेम मिळत नाही.
चुकून तुमच्याकडून ही चूक झाली तर तुम्हाला परत विमा कंपनीला मूळ बिल , पेमेंट पावती आणि दुरुस्तीचे फोटो कंपनीला सादर करावे लागतात आणि या सर्व गोष्टी करोपर्यंत क्लेम क्लीनन्सला खूप वेळ लागतो किंवा काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात अशा प्रकारेही तुमचा क्लेम रिजल्ट होऊ शकतो.

९) गाडी दुसऱ्याच्या नावावर असणे
जर तुम्ही सेकंड हॅन्ड गाडी खरेदी केली असेल आणि विम्याचे नाव नवीन मालकाच्या नावावर केलेले नसेल तर ही चूक तुम्हाला अपघातानंतर क्लेम मिळण्यात कायदेशीर अडचण निर्माण करू शकते आणि फक्त या कारणामुळे इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.
जसे की वर सांगितल्याप्रमाणे सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करताना केवळ आरसी बुक (RC Book) नावावर करणे पुरेसे नसते तर विमा देखील स्वतःच्या नावावर हस्तांतरित करणे तितकेच गरजेचे असते ते तुम्ही करण्यास चुकला तर अपघात झाल्यास विमा वर नवीन मालकाचे नाव नसणार आणि विमा कंपनी नवीन मालकांला अनोळखी व्यक्ती मानून तुमचा क्लेम पूर्णपणे नाकारला जाणार.
मोटर वाहन कायद्यानुसार गाडी खरेदी केल्यानंतर 14 दिवसाच्या आत विमा पॉलिसी नवीन मालकाच्या नावावर हस्तांतरित करणे बंधनकारक असते जर 14 दिवसाच्या आत अपघात झाल्यास थर्ड पार्टीलाबिलिटी क्लेम मंजूर होऊ शकतो मात्र स्वतःच्या गाडीच्या नुकसानीचा क्लेम मिळण्यात खूप अडचणी येतात आणि जर 14 दिवस उलटून गेले आणि विम्यावर नाव बदलले नसले तर कंपनी कोणत्याही प्रकारचा क्लेम तुम्हाला देणार नाही.
१०) अनधिकृत बदल किंवा मॉडिफिकेशन
तुम्ही जर कंपनीच्या मूळ रचनेत आरटीओची परवानगी न घेता गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बदल किंवा मॉडिफिकेशन केलेस जसे की (अनधिकृत सीएनजी किट , मोठे आलाॅय व्हील्स किंवा इंजिन बदलणे ) असे प्रकार घडल्यास कंपनी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लेम देणार नाही.
तुम्ही जर कंपनीच्या मूळ रचनेत बदल केल्यास अपघाताचा धोका वाढतो त्यामुळे विमा कंपनी क्लेम भेटू शकते.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनात कोणत्याही मोठा बदल करण्यापूर्वी आरटीओ आणि विमा कंपनी दोघांनी पूर्वकल्पना देणे बंधनकारक असते. ते तुम्ही जर न केल्यास तुमचा पुढे अपघात किंवा कोणतीही वाहनाला इजा झाल्यास तुम्हाला विमा नाकारला जाऊ शकतो.
निष्कर्ष
भारतातील खूप सार्या ग्राहकांना जे कार घेणार आहेत किंवा कार चालवतात त्यांना वरील काही मुद्दे माहिती असतात काही मुद्दे माहिती नसतात आणि तुम्हाला काही गोष्टींची कमी माहिती असल्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन विमा कंपनी विमा क्लेम करण्यास नकार देऊ शकते. आता तुम्ही वरील दहा प्रमुख कारणे बघितल्या असल्यास तुमच्या पुढील आयुष्यात या मुद्द्यामुळे तरी तुमचा इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊ शकता.
तसेच तुम्हाला जर रात्रीच्या पावसात ड्रायव्हिंगची भीती वाटत असेल त्यावरही आम्ही ५ सिक्रेट टिप्स दिलेले आहेत तसेच तुमच्या वाहनाची काळजी घेण्यासाठी १० माॅन्सून कार केअर टिप्स या विषयावर पण लेखन केलेले आहे हे तुम्ही जरूर पाहावे




Leave a Reply