Top 10 best selling 7 seater may 2026: किंमत कमी आणि मायलेज भारी; ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स!

Top 10 Best Selling 7 Seater May 2026 : भारत देशातील सर्वात जास्त लोकांच्या उपयोगी आणि एकत्र कुटुंबाच्या प्रवासासाठी ज्या वाहनांच्या सेगमेंट चा जास्त वापर होतो अशा सेगमेंट म्हणजे ७ सीटर वाहन सेगमेंट आणि आज आपण ह्या ब्लॉगमध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय ७ सीटर प्रवासी वाहनांच्या मे महिन्याच्या विक्रीची आकडे विस्तार मध्ये पाहणार आहोत

मे महिन्यात ७ सीटर प्रवासी वाहनाच्या सेगमेंटने एकूण ८८,८३० युनिट वाहन विक्री केले आणि हे मागील वर्षा सोबत तुलना केल्यास मागील वर्षी मे २०२५ साली या सेगमेंटने ७१,१४८ युनिट वाहनांची विक्री केली होती याचा अर्थ मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २४.९% वार्षिक विक्रीमध्ये वृद्धी झालेली दिसून येते आणि यामुळे एक बाब स्पष्ट होते की
भारतीय कुटुंबांची आपल्या कुटुंबासाठी SUV आणि MPV वाहनांसाठी ओढ वाढतच चाललेली आहे आणि ह्या ब्लॉग मध्ये या सेगमेंटच्या वाहनांबद्दल विस्तार मध्ये पाहणार आहोत चला सुरू करूया…

 

Top 10 best selling 7 seater may 2026
Top 10 best selling 7 seater may 2026: किंमत कमी आणि मायलेज भारी; ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स!

 

Top 10 best selling 7 seaters may 2026 : विस्तर मध्ये तपशील

१) मारुती सुझुकी एर्टिगा

भारतीय लोकांची कुटुंबाच्या प्रवासासाठी सर्वात लोकप्रिय वाहन मे महिन्यासाठी मारुती सुझुकी एर्टिगा हे वाहन आहे या वाहनाने मे 2026 या महिन्यात २०,३५० युनिट वाहनांची विक्री केली. आणि ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 26.1% ची वृद्धी दर्शवित आहे तसेच एकूण मे महिन्याच्या एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये या गाडीचा 22.9% इतका हिस्सा येतो

Top 10 best selling 7 seater may 2026
Top 10 best selling 7 seater may 2026: किंमत कमी आणि मायलेज भारी; ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स!

२) महिंद्रा स्कॉर्पिओ

दोन नंबरला मे महिन्याच्या सर्वात जास्त ७ सीटर वाहना च्या यादीमध्ये महिंद्राच्या लोकप्रिय स्कार्पियो या वाहनाचा नंबर येतो या वाहनाने मे महिन्यात तब्बल १५,७७४ युनिट कारची विक्री केलेली आहे आणि ही विक्री मागील वर्षा सोबत तुलना केल्यास ९.५% ची विक्रीमध्ये वृद्धी दर्शवित आहे तसेच एकूण मे महिन्याच्या एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये या वाहनाचा १७.८% इतका हिस्सा येतो.

३) टोयोटा इंनोवा+ हैक्रोस

या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर टोयोटाची सर्वात जास्त विक्री होणारी ईनोवा हाय-हैक्रोसचा नंबर लागतो या वाहनाने मे महिन्यात १०,३२५ युनिट वाहनांची विक्री केली आहे मागील वर्षासोबत तुलना केल्यास या वाहनाने १६.२% ची वृद्धी या महिन्यात केली आहे तसेच एकूण मे महिन्याच्या एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये या वाहनाचा ११.६% इतका हिस्सा वाटणीला येतो.

) महिंद्रा XUV XUV7XO + XUV700

महिंद्राची XUV XUV7XO + XUV700 या वाहनांची ह्या यादीमध्ये चौथ्या नंबर लागतो आणि ह्या नंबर संगे या वाहनाने मे महिन्यात तब्बल ९ ,338 युनिट कारची विक्री केली. आणि ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेमध्ये एकूण सेगमेंट मध्ये सर्वात जास्त वृद्धी दर्शवली आहे अर्थात ४५.१% ची वृद्धी केलेली दिसून येते. तसेच मे महिन्याच्या एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये १०.५% ची हिस्सा या वाहनाच्या पदरी पडतो

५) महिंद्रा बोलोरो

पाचव्या क्रमांकावर महिंद्रा कंपनीची ग्रामीण भागामध्ये सर्वात लोकप्रिय महिंद्रा बोलेरो या वाहनाचा नंबर येतो या वाहनाने मे महिन्यात ८,९३३ युनिट वाहनांची विक्री केलेली आहे मागील वर्षाच्या तुलना केल्यास या कारच्या विक्रीमध्ये या महिन्यात ०.१% ची घसरण झालेली दिसून येते तसेच एकूण मे महिन्याच्या एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये १०.१% चा हिस्सा या कारच्या पदरी पडतो

६) किया कॅरेन्स + कॅल्विस

सहाव्या क्रमांकावर या कंपनीची एकमेव किया कॅरेन्स + कॅल्विस या वाहनाचा नंबर येतो या कारने मे महिन्यात एकूण ६,२०८ युनिट वाहनांची विक्री केली आहे मागील वर्षा सोबत तुलना केल्यास विक्रीमध्ये ३७.२% ची वृद्धी दिसून येते तसेच एकूण मे महिन्याच्या एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये ७% टक्क्याचा हिस्सा या वाहनाचा आहे.

 

Top 10 best selling 7 seater may 2026
Top 10 best selling 7 seater may 2026: किंमत कमी आणि मायलेज भारी; ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स!

 

७) मारुती सुझुकी XL6

सातव्या क्रमांकावर मारुती सुझुकी कंपनीची XL6 जे की मारुती सुझुकी एर्टिगा चे प्रीमियम वर्जन म्हणणे योग्य ठरेल असे या वाहनाने मे महिन्यात ३,७७० युनिट कारची विक्री केली मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ७.५% ची वृद्धी दिसून येत आहे तसेच एकूण मे महिन्याच्या एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये ४.२% ची भागीदारी या कारची आहे.

८) महिंद्रा 9S

आठव्या क्रमांकावर महिंद्रा कंपनीची ह्या सेगमेंट मध्ये चौथी गाडी तिचे नाव महिंद्रा 9S या वाहनाने मे महिन्यात एकूण ३,५०२ युनिट वाहनांची विक्री केली आहे तसेच मागील वर्षा सोबत विक्रीची तुलना होऊ शकत नाही कारण ही गाडी ह्या वर्षी लॉन्च झालेली आहे. एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये या वाहनांची ३.९% ची हिस्सा आहे.

९) टोयोटा फोरचुनर

नव्या क्रमांकावर दबंग लोकांची गाडी ह्या वाक्यासाठी प्रसिद्ध असणारी टोयोटा फोरचुनर चा क्रमांक लागतो या वाहनाने मे महिन्यात २,९०५ युनिट वाहनांची विक्री केली आहे तसेच मागील वर्षाच्या विक्री सोबत तुलना केल्यास १३% ची वृद्धी दिसून येते आणि एकूण विक्रीच्या भागीदारीमध्ये ३.३% ची हिस्सा या कारचा आहे असे दिसून येते.

 

Top 10 best selling 7 seater may 2026
Top 10 best selling 7 seater may 2026: किंमत कमी आणि मायलेज भारी; ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स!

 

१०) टोयोटा रूमिअन

दहाव्या क्रमांकावर टोयोटा कंपनीची रूमियन या वाहनाचा नंबर लागतो या वाहनाने मे महिन्यात २,११९ युनिट कारची विक्री केलेली आहे मागील महिन्याच्या तुलनेमध्ये १०.५% ची वृद्धी या विक्री मध्ये दिसून येते. तसेच एकूण मे महिन्याच्या विक्रीच्या हिस्सेदारीमध्ये या वाहनाचा २.५% हिस्सा पदरी पडतो.

या विक्रीचा सामान्य माणसाला काय फायदा

  • ज्या गाड्यांची सर्वात जास्त विक्री झालेली आहे त्या विक्रीमुळे सामान्य माणसाला कोणती गाडी घ्यावी याचा अंदाज येतो
  • विक्रीच्या कलामुळे असे समजते की कोणत्या कंपनीचे वर्चस्व या सेगमेंट मध्ये आहे
  • ज्या कंपनीच्या जास्त गाडी विकल्यामुळे त्या कंपनीचे शोरूम किंवा डीलरशिप पण पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले असते त्यामुळे सामान्य जनतेला गाडी खरेदी खरेदीनंतर सर्विसिंगसाठी शोरूम ला जाण्याचा जास्त खर्च व वेळ वाचते

 

Top 10 best selling 7 seater may 2026
Top 10 best selling 7 seater may 2026: किंमत कमी आणि मायलेज भारी; ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स!

 

ऑटो गुरुचा निष्कर्ष

या वाहनांच्या विक्रीमुळे काही गोष्टी स्पष्ट होतात जसे की या सेगमेंटवर मारुती सुझुकी व महिंद्रा कंपनीचे वर्चस्व दिसून येते एकूण पहिल्या दहा गाड्यांमध्ये या दोन कंपनीच्या सहा गाड्यांचा नंबर लागतो. तसेच एकूण मागील वर्षा सोबत तुलना केलेल्या आकडे मध्ये सर्वात जास्त महिंद्राच्या XUV XUV7XO + XUV700 या गाडीने ४५.१% ची वृद्धी केलेली दिसून येते. अशाप्रकारे ह्या ब्लॉगमध्ये असा एकूण ७  सीटर वाहनांच्या विक्रीचा सरा-जमा बघायला मिळतो.